Submitted by पुष्कर एकतारे on 1 December, 2013 - 11:10
पंढरीचा वारस
पंढरीच्या विटेचा । वारस शोधाया ।
निघाला माझा । विठुराया ।
धुंडिले तयाने । भक्ताचिये दारी ।
नसे त्या वारी । एकादस ।
शोधि तो योग्यांत । तपस्वी साधुंत ।
त्यांना भ्रांत फक्त । मोक्षाची ।
देवतांचा स्वर्ग । म्हणे अध्यात्माचे धाम ।
त्यांचे खरे काम । अप्सरांत ।
जगी मग तो । संतासिये पाही ।
खरा संत काही । सापडेना ।
वारसाचा शोध । फळाला न आला ।
पुन्हा तो राहिला । विटेवरी ।
विठुच्याही डोळी । अंती आले पाणी ।
अन् गेले वाहोनी । तमा कोणा ।
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूपच छान रचना. आशय पण खूप
खूपच छान रचना. आशय पण खूप आवडला. शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
फार सुंदर !! अगदी पटला विचार
फार सुंदर !!
अगदी पटला विचार आणि खूप आवडला
धन्यवाद