पुरातत्त्वशास्त्राचे प्राध्यापक असणार्या व्यंकटेश कुलकर्ण्यांना एक दिवस अचानक दिसते हुबेहूब त्यांच्यासारखीच दिसणारी एक व्यक्ती. कुलकर्णी अचंबित होतात आणि शोध घेत एका वेगळ्याच रहस्याच्या मुळाशी जाऊन पोहोचतात. मग सुरू होतो भावनांचा कल्लोळ!
त्या व्यक्तीचा व्यंकटेश कुलकर्ण्यांशी काय संबंध?
तुटलेल्या मानवी नात्यांना पुन्हा एकत्र बांधून, वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याची एका मुलाची धडपड म्हणजे ’पितृऋण’!
श्रीमती सुधा मूर्ती यांच्या कादंबरीवर आधारित, नितीश भारद्वाज यांनी दिग्दर्शित केलेल्या, ६ डिसेंबर, २०१३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार्या या चित्रपटाच्या निमित्तानं आम्ही घेऊन आलो आहोत एक प्रश्नमंजूषा!!!
ही स्पर्धा सोपी आहे.
http://vishesh.maayboli.com/node/1434 या दुव्यावर दहा प्रश्न आहेत.
सर्व प्रश्न श्रीमती सुधा मूर्ती यांचं साहित्य व चित्रपट, चित्रपटातील कलाकार यांच्याशी संबंधित आहेत.
सर्वच्या सर्व दहा प्रश्नांची उत्तरं ओळखलीत, की ही उत्तरं माध्यम प्रायोजकांच्या इनबॉक्सात पाठवण्यासाठी ’सुपूर्त करा’चं बटन दाबा. तुमच्या उत्तरांबरोबर अर्थातच तुमचा मायबोली आयडीही माध्यम प्रायोजकांपर्यंत पोहोचेल.
सर्व दहा प्रश्नांची अचूक उत्तरं देणार्या पहिल्या तीन स्पर्धकांना मिळतील ५ / ६ डिसेंबर, २०१३ रोजी मुंबई / पुणे इथे होणार्या 'पितृऋण' या बहुचर्चित चित्रपटाच्या शुभारंभाच्या खेळाची प्रत्येकी दोन तिकिटं.
सर्व दहा प्रश्नांची उत्तरं बरोबर आली नाहीत, तर जास्तीत जास्त बरोबर उत्तरं देणार्या स्पर्धकांना बक्षीस दिलं जाईल. बरोबर उत्तरं देणार्या दोन स्पर्धकांच्या प्रवेशिका एकाच वेळी आल्यास लकी ड्रॉ पद्धतीनं विजेते निवडले जातील.
या स्पर्धेची उत्तरं देण्याची मुदत २ डिसेंबर, २०१३, भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ६ वाजेपर्यंत आहे.
३ तारखेला विजेत्यांची नावं याच बाफवर घोषित केली जातील.
महत्त्वाच्या सूचना -
१. 'अरेच्चा, उत्तर नेमकं चुकलं', असं तुम्ही 'सुपूर्त करा'चं बटन दाबल्यानंतर लक्षात आलं, तरी हरकत नाही. तुम्ही पुन्हा एकदा योग्य उत्तर लिहून प्रवेशिका पाठवू शकता.
अशी दुसरी प्रवेशिका पाठवल्याची सूचना माध्यम प्रायोजकांना संपर्कातून द्यायला कृपया विसरू नका.
तुम्ही पाठवलेली शेवटची प्रवेशिका निकाल जाहीर करताना ग्राह्य धरली जाईल.
२. या प्रश्नांची उत्तरं या बाफवर कृपया लिहू नका. उत्तरं जाहीर लिहिल्यास त्या आयडीची प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही.
३. शुभारंभाच्या खेळाची तिकिटं चित्रपटनिर्मात्यांकडून देण्यात येतात. अपरिहार्य कारणास्तव कार्यक्रमात बदल झाल्यास तसं विजेत्यांना कळवण्यात येईल.
http://vishesh.maayboli.com/node/1434
तर मग तुमच्या 'करड्या पेशीं'ना लावा कामाला आणि पाठवा आम्हांला प्रश्नांची उत्तरं! शक्य तितक्या लवकर! वेळेची उलटमोजणी सुरू झाली आहे...
भारीये!!!
भारीये!!!
लोकहो, या स्पर्धेला दिलेल्या
लोकहो,
या स्पर्धेला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल आम्ही आभारी आहोत.
या प्रश्नमंजूषेतील सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं एकाही स्पर्धकानं दिली नाहीत.
जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं देणारे स्पर्धक आहेत -
१. सामी
२. कविन
३. माधवी.
४. मुग्धमानसी
या चारही स्पर्धकांनी ८ प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली.
सामी व कविन 'पितृऋण'च्या मुंबईतील ५ डिसेंबर रोजी होणार्या शुभारंभाच्या खेळाला उपस्थित राहतील, तर माधवी. व मुग्धमानसी 'पितृऋण'च्या पुण्यातील ६ डिसेंबर रोजी होणार्या शुभारंभाच्या खेळाला उपस्थित राहतील.
धन्यवाद
आमच्या चुकलेल्या प्रश्नांची
आमच्या चुकलेल्या प्रश्नांची उत्तरं तरी सांगा आता
अजूनही ज्यांना प्रश्नमंजूषेत
अजूनही ज्यांना प्रश्नमंजूषेत रस असे, ते उत्तरं देण्याचा प्रयत्न करू शकतात. बरोबर उत्तरं सोमवारी जाहीर करू.
कविन,
तुम्हांला एसएमएस केला आहे.
सर्व विजेत्यांचं अभिनंदन!
सर्व विजेत्यांचं अभिनंदन!
मायबोली आणि माध्यम
मायबोली आणि माध्यम प्रायोजकांचे आभार. सर्व विजेत्यांचं अभिनंदन!
उत्तरे इथेच दिली जातील का? उत्सुकता आहे.
मायबोली आणि माध्यम
मायबोली आणि माध्यम प्रायोजकांचे आभार. सर्व विजेत्यांचं अभिनंदन!
उत्तरे इथेच दिली जातील का? उत्सुकता आहे.
+ १
मायबोली आणि माध्यम
मायबोली आणि माध्यम प्रायोजकांचे आभार.>>+१
उत्तरं सोमवारी देणार आहेत इथे असं वर लिहीलय. तेव्हा सोमवार पर्यंत वाट पाहुया. उत्तर आत्ता लिहीली तर अजून कोणी भाग घेऊ इच्छीत असेल तर त्यांना घेता येणार नाही म्हणून आत्ता देत नसावेत उत्तरं.
धन्यवाद माप्रा. आणि क्षमस्व, मला आवडलं असतं हा कार्यक्रम बघायला पण कार्यक्रमाचं ठिकाण आणि माझं रहाण्याचं ठिकाण हे तसे दोन धृव आहेत (ऑड डे आणि ऑड वेळ - उशीरा कार्यक्रम संपतो हे लक्षात घेता दोन धृवच आहेत)
असो, जाणार्यांनो मस्त गटग करा आणि इथे सचित्र वृ द्या
विजेत्यांचं अभिनंदन
विजेत्यांचं अभिनंदन
अरे वा! छान वाटले धन्यवाद.
अरे वा! छान वाटले धन्यवाद.
मी पण काही कारणास्तव येऊ शकत नाही.
माध्यम प्रायोजक , तुम्हाला मेल केली आहे.
उत्तरे द्या प्लीज. उत्सुकता
उत्तरे द्या प्लीज. उत्सुकता आहे.
उत्तरांच्या प्रतिक्षेत
उत्तरांच्या प्रतिक्षेत
उत्तरं सांगा प्लीज.
उत्तरं सांगा प्लीज.
हो ना, सांगा की अचूक उत्तरे,
हो ना, सांगा की अचूक उत्तरे, गेला बाजार तनुजाचे ३ मराठी चित्रपट तरी सांगा
हर्पेन,तनुजाचे ३ मराठी
हर्पेन,तनुजाचे ३ मराठी चित्रपट तरी सांगा>> १) झाकोळ २) उनाड मैना ३) पितृऋण
चला म्हणजे एक उत्तर बरोबर
चला म्हणजे एक उत्तर बरोबर दिलय मी
पितृऋण पण ह्यात धरायचा काय!
पितृऋण पण ह्यात धरायचा काय! पण मला फक्त झाकोळ माहित होता, उनाड मैना पण माहित नव्हता
सर्व विजेत्यांचे
सर्व विजेत्यांचे अभिनंदन..
मला वाटतं नाटक, "लग्नाची बेडी" असावे. मोजकेच प्रयोग झाले त्याचे.
.
.
अरे, सांगा की उत्तरे.
अरे, सांगा की उत्तरे.
उत्तरं देण्यास उशीर
उत्तरं देण्यास उशीर झाल्याबद्दल क्षमस्व.
प्रश्नांची उत्तरं पुढीलप्रमाणे -
१. सुधा मूर्तींचे पुस्तक 'वाईझ अँड अदरवाईझ'ची प्रथमावृत्ती कधी प्रकाशित झाली?
उत्तर - २००२ साली
२. सुधा मूर्तींच्या 'पितृऋण' या कादंबरीचा मराठी अनुवाद कुणी केला आहे?
उत्तर - मंदाकिनी कट्टी
३. सुधा मूर्ती यांनी लिहिलेली पहिली कादंबरी कोणती?
उत्तर - Gently Falls the Bakula
४. दुष्काळग्रस्त भागातील एका गरीब बाईने अनेकांना पाणी पुरवल्याबद्दलची गोष्ट सुधा मूर्तींच्या कुठल्या पुस्तकात आहे?
उत्तर - The day I stopped drinking milk
५. लेखनासंदर्भात सुधा मूर्तींना मिळालेले दोन पुरस्कार कोणते?
उत्तर - आर के नारायण अवॉर्ड फॉर लिटरेचर २. कर्नाटक सरकारकडून दिला जाणारा Attimabbe पुरस्कार
६. श्री. सचिन खेडेकर यांची दुहेरी भूमिका असलेला पहिला चित्रपट कोणता?
उत्तर - पितृऋण
७. श्रीमती सुहास जोशी यांनी अभिनय केलेलं पहिलं व्यावसायिक नाटक कोणतं?
उत्तर - बॅरिस्टर
८. श्रीमती सुहास जोशी यांनी एक प्रसिद्ध लेखिका आपल्या अद्वितीय अभिनयाद्वारे जिवंत केली. या लेखिकेचं नाव काय?
उत्तर - श्रीमती लक्ष्मीबाई टिळक
९. तनुजा यांनी अभिनय केलेले तीन मराठी चित्रपट कोणते?
उत्तर - झाकोळ, उनाड मैना, पितृऋण
१०. तनुजा यांचा अभिनय असलेल्या मराठी नाटकाचं नाव काय?
उत्तर - लग्नाची बेडी
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मायबोलीकरांचे पुन्हा एकदा आभार
अरे मग माझी सर्व उत्तर बरोबर
अरे मग माझी सर्व उत्तर बरोबर आलीत
याचा अर्थ
जाई., तू उत्तरं व्यवस्थित
जाई.,
तू उत्तरं व्यवस्थित सुपूर्त केली होती का? कारण तुझी उत्तरं आमच्यापर्यंत पोहोचलेली दिसत नाहीत.
पण तू हीच उत्तरं दिली असलीस, तर तुझं अभिनंदन
पुढच्या प्रीमियरला सर्वांत आधी फोन तुला.
माध्यम प्रायोजक, धन्यवाद. ४
माध्यम प्रायोजक, धन्यवाद. ४ आणि १० च उत्तर मला माहीत नव्हतं आणि ३ चुकलं
माझे चवथे आणि दहावे उत्तर
माझे चवथे आणि दहावे उत्तर चुकले
धन्यवाद माप्रा
धन्यवाद माप्रा
६ आणि ९ गुगली आहेत.
६ आणि ९ गुगली आहेत.