खादाडी (फक्त प्रचि)

Submitted by डीडी on 12 November, 2013 - 09:01

बायको भारतात गेली की काहिबाही उद्योग करुन, थोडी पाककला सुधारण्यावर भर दिला. तसही जेवण करणं हे काम, जर आवड म्हणुन केलं तर तितकस कंटाळवाणं नाही वाटणार हे जाणलं. त्यात विकएंडला जरा निवांत वेळ असतोच, मग करा काही ना काही प्रयोग.. त्याच काही प्रयोगांची प्रचि इथे देत आहे.

१. साबुदाणा खिचडी

२. वडापाव

३. कॉर्न चाट

४. पाव भाजी

५. दाल-बाटी

६. वांग्याचं भरीत-भाकरी

७. पेप्पर गार्लिक प्रॉन

८. चिकन फ्राईड राईस, चिकन मंच्युरीयन

९. चिकन थाळी, सोलकढी सहित

१०. पॉम्फ्रेट फ्राय

११. प्रॉन पुलाव

१२. ग्रीन चिकन तंदुरी

१३. बेंगाली फिश करी

१४. चिकन दम बिर्यानी

१५. तंदुरी पॉम्फ्रेट

१६. चिकन पांढरा रस्सा

१७. चिकन तंदुरी

१८. स्पायसी चिकन आचारी

१९. चिकन शवर्मा

२०. आता काही गोड - कुल्फी

Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव!!!!! Happy

एक सुचना : धागाकर्त्याच्या पोटात दुखलं तर मायबोलीकरांना जबाबदार धरू नये!

स्वाती, मी देखिल घालते कढीपत्ता. मस्तच लागतो. शिवाय लाल मिरच्याही असतात फोडणीत जिर्‍यांच्या मागोमाग. शिवाय वरून सढळ हातानं कोथिंबीरही घालते. तरीही त्या प्रकाराला साबुदाण्याची उसळ न म्ह्णता खिचडीच म्हणते. Proud

सगळेच प्रचि महान आहेत. पदार्थांव्यतिरीक्त गार्निशिंग वगैरे किती निगुतीने केलं आहे.

खरं तर गार्निशिंग चेच फोटो टाकले आहेत असं मला वाटतं.. सजावटीखाली कोणता तरी पदार्थ असणारच Happy

दार्शनिक मेजवानी आहे.

सगळेच फोटो सॉलिड आहेत एकदम. फक्त हे बायको माहेरी गेल्यावर उदरभरणासाठी नवोदिताने केलेले प्रयोग नक्कीच वाटत नाहीत. Happy
"this is how its done!" असं एखाद्या 'प्रो' ने सांगवं तसं वाटतय Happy

असो. आता क्रमवार पाकृ टाका.
<<
हे ऐकल्यावर त्यांचं इथलं हे शेवटचंच पोस्ट ठरेल Lol

काय फोटो आहेत का काय. एकदम मस्तच. शवार्मा आणि प्रॉन्स पुलाव यक्ष्ट्रा आर्डिनरीच. कुल्फीही झ्याक.

हे सगळं तुम्ही केलंत??????
मस्त आहेत सगळे फोटोज !
बायदवे सगळ्या फोटोंवर गुगलची लिंक कशी दिसतेय ?

तसही जेवण करणं हे काम, जर आवड म्हणुन केलं तर तितकस कंटाळवाणं नाही वाटणार हे जाणलं.

जोरदार टाळ्या. . मस्त प्रचि बॉस.

बरेचसे फोटो छान आहेत ..

मिलिंदा, शूम्पी, इब्लिस +१ .. Wink

क्रमवार पाककृती टाकताना सजावट कशी केली त्याचेही स्टेप बाय स्टेप फोटो टाका किंवा सगळ्यात बेस्ट आम्हाला ओपन आमंत्रण द्या मेजवानीसाठी .. Wink Lol

मस्त फोटो! एवढं खपून पदार्थ केल्यावर त्यांची इतकी देखणी सजावट करणे अन ( खादाडी सुरु न करता) मग त्याचे फोटो काढणे - फारच पेशंस आहे .

Pages