Submitted by डीडी on 12 November, 2013 - 09:01
बायको भारतात गेली की काहिबाही उद्योग करुन, थोडी पाककला सुधारण्यावर भर दिला. तसही जेवण करणं हे काम, जर आवड म्हणुन केलं तर तितकस कंटाळवाणं नाही वाटणार हे जाणलं. त्यात विकएंडला जरा निवांत वेळ असतोच, मग करा काही ना काही प्रयोग.. त्याच काही प्रयोगांची प्रचि इथे देत आहे.
१. साबुदाणा खिचडी
२. वडापाव
३. कॉर्न चाट
४. पाव भाजी
५. दाल-बाटी
६. वांग्याचं भरीत-भाकरी
७. पेप्पर गार्लिक प्रॉन
८. चिकन फ्राईड राईस, चिकन मंच्युरीयन
९. चिकन थाळी, सोलकढी सहित
१०. पॉम्फ्रेट फ्राय
११. प्रॉन पुलाव
१२. ग्रीन चिकन तंदुरी
१३. बेंगाली फिश करी
१४. चिकन दम बिर्यानी
१५. तंदुरी पॉम्फ्रेट
१६. चिकन पांढरा रस्सा
१७. चिकन तंदुरी
१८. स्पायसी चिकन आचारी
१९. चिकन शवर्मा
२०. आता काही गोड - कुल्फी
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वॉव!!! सह्हीच्च
व्वॉव!!! सह्हीच्च आहे...यातले काहि फोटो आधी टाकले होते का?
पण हे फक्त बायको भारतात गेली की च का? त्या असताना नाही का करत त्यांच्यासाठी??/
ग्रेट.. मला तुमच्या घरचे बरेच
ग्रेट..
मला तुमच्या घरचे बरेच सर्व्हिंग बोल्स इ. जामानिमा आवडलाय...
आय होप तुम्ही बाहेरून ऑर्डर करून घरी फक्त फोटो काढले नाहीयेत. :दिवा:...आय मीन ती चिकन थाळी, पापलेट, तंदुरीचे लेग्ज कसले सही दिसताहेत.....:)
तुम्ही सुगरण (ह्याचं
तुम्ही सुगरण (ह्याचं पुल्लिंगी काय म्हणे?) आहात ह्यात वाद नाही. पण ...
इथे इतके सुंदर फोटो देणं हा.. निव्वळ दूष्टपणा आहे.. दूऊऊऊष्टपणाच. नुस्ते फोटो
:प्रचंड भूक खवळलेली बाहुली:
:तोंपासुबा:
खल्लास.. अप्रतिम मेजवानी!!
खल्लास.. अप्रतिम मेजवानी!!
महान आहेत फोटो. कॉर्न चाटचे
महान आहेत फोटो.
कॉर्न चाटचे भांड खूप आवडले.
दालबाटी फोटोसाठी अशी वाढली असेल तर ठीक पण अशी वरणभातासारखी सर्व्ह करत नाहीत हो.
ओ डीडी...ते दिनेश काका काय
ओ डीडी...ते दिनेश काका काय कमी होते की तुम्ही पण आलात जीव जळवायला असलं काय काय दाखवुन.......
पण फोटो मस्तच आलेत हं....आणि शवर्मा तर ऑसम फॉसम थॉसम.......
भुक चाळवली माझी !!!!
भुक चाळवली माझी !!!!
सहीच !
सहीच !
सगळे फोटो भारी आहेत. यातल्याच
सगळे फोटो भारी आहेत. यातल्याच काही पदार्थांच्या पाककृती त्यांनी दिल्यात की याआधी.
एकदम मस्त.. .
एकदम मस्त.. .
फार सुंदर! फोटोग्राफी आणि
फार सुंदर! फोटोग्राफी आणि त्यातील पदार्थ.
यम्मी दिसतायत एकदम सगळे पदार्थ.
धागाकर्त्याच्या पोटात दुखलं
धागाकर्त्याच्या पोटात दुखलं तर मायबोलीकरांना जबाबदार धरू नये!
आईशप्पथ!! काय झकास
आईशप्पथ!! काय झकास प्रेझेंटेशन आहे... एकसे बढकर एक आहेत फोटोज. शवर्मा आणि स्पायसी चिकन आचारी बघून आपणही चिकन खावं अशी इच्छा झाली. आणि आता खिचडी करताना कढीलिंब पण घालून बघीन.
एक्स्ट्रा कॉमेंटः 'उभ्या
एक्स्ट्रा कॉमेंटः
'उभ्या चमच्याने' तूप वाढायची विशिष्ट पद्धत आवडली. हार्ट पेशंटांस पथ्यकर हो..
(ऑनेस्टली, ती मारवाडी स्टाईलची तुपात अक्षरश: तळलेली बाटी हातात धरवतही नाही. ही बेक्ड बट्टी मस्त आहे.)
बायको गेली माहेरी, बहार येई
बायको गेली माहेरी, बहार येई डीडींच्या घरी.:फिदी:( हे बायको गेली माहेरी, काम करी पितांबरीच्या धर्तीवर वाचावे)
माझ्यासाठी साबुदाणा खिचडी, कॉर्न चाट आणी कुल्फी जरुर ठेवा. कॅलरीज गेल्या उडत.
अगदी दिनेशजींसारखे नयनरम्य प्रेझेंटेशन आहे, तिथेच १०० मार्क्स्.:स्मित:
बाय द वे, सौ. ना हे आधीच खिलवुन झाले असणार, नाहीतर त्यांनी पाहिले तर माबो बंद होणार तुमची.:फिदी:
तोंपासु फोटोज !
तोंपासु फोटोज !
प्रचि काढायचेच कष्ट घेतले
प्रचि काढायचेच कष्ट घेतले ना?? की करायचे पण घेतलेत...
ऑस्सम, अप्रतिम शब्द ही फिके
ऑस्सम, अप्रतिम शब्द ही फिके पडतील हो! दिनेशदांनंतर आता सुगरणपणात कॉम्पिटिशन आली की... मला तुमच्या घरचे बरेच सर्व्हिंग बोल्स इ. जामानिमा आवडलाय...>>>+१११ कॉर्नचाटचं भांडही सही आहे अगदी.
सातपासून पुढचे फोटो म्हणजे
सातपासून पुढचे फोटो म्हणजे छळवाद आहे
श्वार्माचा फोटो एखाद्या जाहिरातीत शोभेल असा आलाय. बाकीचेही सुंदरच अर्थात.
भूक चाळवलेय
भूक चाळवलेय
मस्तच!
मस्तच!
बाकी कसली नाही पण साखि ची
बाकी कसली नाही पण साखि ची कृती द्या लवकर.
माझी साखि कधीच इतकी मोकळी आणि पांढरी होत नाही.
प्रचंड सुंदर आलेत सगळे
प्रचंड सुंदर आलेत सगळे फोटोज...
मस्तच. बायकोला पण आराम दया
मस्तच. बायकोला पण आराम दया असे सर्व करून, ती खुश होईल. सर्व शाकाहारी पदार्थ सुंदर, मांसाहार करत नाही त्यामुळे सांगू शकणार नाही. अनिश्काला अनुमोदन.
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
अरे धन्यवाद काय... इतके
अरे धन्यवाद काय... इतके टेम्प्टिंग प्रचि इथे टाकायचे नसतात.
मार डाला यार
१५ आणि १७ साठी भेटलच पाहिजे.
हे तुम्ही केलत? खरेच की
हे तुम्ही केलत? खरेच की काय?
सगळ्या नॉनवेज डिशेस , वडा पाव, पाव भाजी द्या इकडे. साबूदाणा फुलला नाहीये नीट. जरासे ताकाचा हबका देवून झाकण ठेवून दिले असती तर नीट शिजलं असतं ना... (फु. स.)
खरे तर मला सुद्धा साबू खिचडी जमत नाही... ते इथला साबुदाणा खराब वगैरे... तेव्हा फु. स.
पण आता वरचे वर करायला लागणार... इथे पुरावे आहेत मग कारणं नाही देता येणार बायकोला.
इंद्रधनुष्य.. इथे टाकले
इंद्रधनुष्य.. इथे टाकले म्हणुन तर भेटायची इच्छा झाली ना तुला...
झंपी - हो... खरेच... बरं.. हो का?.... ते करतोच, तिने सांगितलं म्हणुन हा धागा केला..
गोड एकच आयटम आहे अन बहुतेक
गोड एकच आयटम आहे
अन बहुतेक नॉन वेज आहेत
Pages