नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण काही घरांमध्ये "ड्रेस नको, पण
रुसवा/नाराजी आवर"
अशी स्थिती पाहिली आहे.>>>>> in that case अशा लोकांना मोठे व्हा म्हणायची गरज आहे

ok mama pan jahnavi naavacha arth kay aahe?

jaee, 100% barobar aahe..

गोगो...

जान्हवी चा अर्थ "गंगा".... जाह्नू राजाची जी कन्या ती जाह्नवी असेही म्हटले जाते.

"होणार सून मी या घरची" मालिकेतील सार्‍या स्त्री पात्रांची नावे नदीचीच आहेत : भागीरथी, नर्मदा, इंद्रायणी, शरयू, सरस्वती....इ.

खूप छान वाटले वाचून ।आता नर्मदा ज़रा वेगळि विचार करणारी वाटू लागली।
पण शरयुचं विसराळूपणा खराच आहे की......

ड्रेससाठी जान्हवी परवानगी मागत असलेली पाहून हसावे की रडावे ते कळले नाही ----
बऱ्याच एकत्र कुटुंबात हे बघितलेले आहे. माहेरी जाताना, अगदी बाहेर पडताना पण परवानगी मागावी लागते.

पण काही घरांमध्ये "ड्रेस नको, पण रुसवा/नाराजी आवर" अशी स्थिती पाहिली आहे.>>>>> मी सुद्धा पाहिली आहे.....मुलींनी घातला तर चालतो ड्रेस, पण सूनांनी नाही घालायचा.......स्टार प्रवाह वर "पुढ्चे पाऊल" मध्ये कल्याणी - सून साडी नेसायची आणि मुलगी - पूजा ड्रेस घालयची लग्नानंतर.....

मुलींनो.....

पंजाबी ड्रेस "सून" झाल्यावर टाकावा आणि साडीत शिरावे अशी जी पारंपारिक विचारसरणी विविध मालिकांतून दाखविली जात आहे ती मी निषेधार्ह मानतो..... प्रत्यक्ष जीवनात आता असला कुढा विचार टाकला पाहिजे आणि टाकणारे बरेच लोक आहेत..... त्यापैकी मी एक आहे हे सांगण्यात मला आनंद होत आहे. माझी सून पुण्याची आणि लग्न झाल्यावर जेव्हा ती कोल्हापूरला आली होती तेव्हा साडी नेसली होती.... मी तिला तसे का केलेस असे विचारले....[कारण तिला मी लग्नापूर्वी फक्त पंजाबी ड्रेस....सलवार कुडता मध्येच पाहिले होते], तर त्यावर ती उत्तरली, "मामा, मला वाटले इथे कोल्हापुरात हा ड्रेस चालणार नाही." त्या क्षणी मी तिला जितके दिवस तू कोल्हापूरात राहाणार आहेस तितका काळ निर्धोकपणे पंजाबी ड्रेसवरच वावर अशी सूचना केली होती. मुलाने तर पुण्यात असतानाच माझा याबाबतीतील दृष्टीकोण तिला सांगितला होताच. त्यानंतर कुठेही सहलीला फिरायला बाजाराला बाहेर पडताना नेहा [सून] सलवार कुडता याच ड्रेसवर असते....कुणालाही ते खटकत नाही....आणि शेवटी तोही भारतीय ड्रेसच आहे ना !

तोही भारतीय ड्रेसच आहे ना !>>>>>>>>. आणि मुख्य म्हणजे अंगभर!>>>>>>>>हो साडीपेक्षा ही जास्त अंगभर...

<<<<तोही भारतीय ड्रेसच आहे ना !>>>>>>>>. आणि मुख्य म्हणजे अंगभर!>>>>>>>>हो साडीपेक्षा ही जास्त अंगभर...>>>>>

शनिवार दि. ९ नोव्हेंबर २०१३ : अपडेट

~ "आई मी साडीऐवजी ड्रेस घालून इथे वावरू का ?" या एकाच प्रश्नाभोवती आजचा भाग....जो अत्यंत रटाळपणे साकारला आणि संपला असे म्हणावे लागेल. नर्मदाबाई, शरयू आणि सरस्वती या तिघी आता जान्हवीच्या प्रेमात पडल्या आहेत. तिच्याशी अगदी हसतमुखाने त्यांचे व्यवहार सुरू आहेत. पण आता कथानकाची गाडी पुढे तर सरकायला हवी ना....म्हणून स्वयंपाकघरात जान्हवीसोबत या तिघीही उंची उंची साड्या नेसूनच नित्याचे काम करीत आहेत, चेष्टामस्करी चालूही आहे....शरयूचा खेळकरपणाही सोबतीला आहेच....आणि मग त्यातच कपाटातील साहित्य घ्यायला गेलेल्या जान्हवीचा पाय तिच्याच साडीत अडकतो आणि ती अडखळते....ते या तिघी पाहतात, सावरायला जातात. नंतर जान्हवी ती संधी साधते आणि ’मी साडीऐवजी ड्रेसवर इथे राहिले तर चालेल का ?" या प्रश्नाला शरयू लागलीच होकारार्थी उत्तर देते....आणि तेही हस-या चेह-याने. पण सासूबाई ’जान्हवी, माझीही काही ना नाही तू ड्रेसवर इथे वावरायला, पण आता आजी घरात आहेत, त्याना सांगून मी परवानगी घेते...त्या देतीलच...." असे म्हणत ती आजीच्या खोलीकडे जाते. तिथे आजी आणि बेबीआत्या नेहमीप्रमाणे सा-या जगाचे ओझे आपल्या डोक्यावर येऊन पडले आहे असाच चेहरा करून तिथे बसल्या आहेत आणि बेबीआत्याचे ’काय होणार आपल्या घराचे ?" हा भुंगा चालूच. नर्मदाबाई आल्याचे आजी पाहतात. जान्हवीने मागितलेल्या ड्रेसच्या परवानगीचा मुद्दा नर्मदाबाई सांगतात. त्याला उत्तर म्हणून आजी बोलतात, "ही गोष्ट मला का विचारतेस तू मला नर्मदा ? मी आता विरक्त झाले आहे इथल्या सा-या घटनांतून....त्यामुळे जान्हवी जे काही विचारते त्याला तू होकार नकार दे, किंवा ती जे करू इच्छिते ते तिला करायला सांग." यालाच आजींचा होकार मानून नर्मदाबाई काहीशा समाधानाने तिथून बाहेर येतात आणि जान्हवीला ती आनंदाची बातमी सांगताना, ’पण ड्रेसवर वावरताना गळ्यात मंगळसूत्र घाल आणि कपाळाला कुंकवाचा टिळाही लाव बरे !" असाही सल्ला देतात, त्याला जान्हवीचा नकार नसतोच. ती म्हणते, "घरात तुम्ही म्हणाल त्यावेळी साडीच वापरीन, फ़क्त बाहेर जाताना ड्रेस घालीन..." यावर दोन्ही सासवा चमकतात. "बाहेर म्हणजे ?" "म्हणजे नोकरीला जाताना" या जान्हवीच्या उत्तराने नर्मदाबाईना पुन्हा घाम फ़ुटतो....कारण त्याना सूनबाई नोकरी करणार आहेत हेच माहीत नसते. त्या म्हणतात, ’आता परत आजीकडे जाऊन त्यांची परवानगी घ्यायची का ?" त्यावर जान्हवी म्हणते "ते श्री ला माहीत आहे त्यामुळे तो आजीना नक्की सांगेल..."

रात्री जान्हवी ही घडामोड श्री ला सांगते....त्यावर श्री म्हणतो, "तू नोकरी करण्याबद्दल माझीच काय पण आजीचीदेखील परवानगी असणार आहे, तेव्हा त्यांना विचारण्याचे काही कारण नाही.." पण जान्हवी आजीना विचारले पाहिजेच याच छानपैकी युक्तीवाद करते आणि श्री ही मग प्रसन्न चेह-याने त्याप्रमाणे करू या असे सांगतो.

उद्याच्या भागात जान्हवी पंजाबी ड्रेस घालून पाय-या उतरत आहे....दोन्ही सासवा तिला पाहतात आणि त्यानाही आनंद झाल्याचे दिसते....पण समोरच्या कोचवर आजी पेपर वाचत बसल्या आहेत, त्याना पाहून जान्हवी जिथे आहे तिथेच थांबते.

जान्हवीने नोकरी करण्याबद्दल श्री आणि जान्हवी यांच्यातले संवाद फार छान होते. कालच्या भागातला माझ्या नजरेतून हाय पॉइंट.
लग्न झाल्यानंतर लगेचच्या एका भागात श्रीने जान्हवीला आता तुला साड्याच नेसल्या पाहिजेत असे नाही. उलट रोज साडी नेसल्याने त्यातली गंमत निघून जाईल असे सांगितले होते. तसेच कालही जान्हवीला साडीत अडखळताना पाहून आयांनीच तिला साडीची सवय नाही तर ड्रेस नेस असे सांगितले.
आधीच्या एका भागातला शरयू आणि जान्हवी यांच्यातला प्रसंग अत्यंत हृद्य होता.

ही सिरीयल बघून एखाद्या घरातून सुनेला पंजाबी ड्रेस घालण्याची परवानगी मिळाली तर ह्या सिरीयलच्या आजच्या एपिसोडचा उद्देश पूर्ण होईल! बाकी श्री आणि जान्हवी इतकं सहज आणि सुरेख काम करतात की त्यांच्यासाठी सिरीयल पाहिली जाते. आणि hats off to लीना भागवत! तिने तिच्या रोलला believable बनवलं आहे. Nobody else could have pulled off this character as she has!

भरत आणि जिज्ञासा.....

"लीना भागवत" च्या शरयू या पात्राविषयी तुम्ही दोघांनीही आपुलकीने कौतुकाने लिहिले आहे, ते अतिशय योग्य आहे. शरयू अशी एकमेव व्यक्तिरेखा आहे [स्त्री पात्रांतील] जी स्वतःहून अगदी जान्हवीचा विवाह ठरण्यापूर्वीही तिच्याच बाजूने बोलत असते....जान्हवीला शरयूने एकदा भाजीमार्केटमध्ये वृद्ध स्त्री ला मदत करताना पाहिलेले असते, तेव्हापासून ती तिच्या मनात वसलेली आहेच. तार्किकदृष्ट्या विचार केला तर शरयूला संसारात जे जे करता आलेले नाही, ते सारे ती जान्हवीला मिळावे अशीच अपेक्षा धरीत आहे आणि तसेच व्हावे यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच रांगोळी प्रसंगी शरयू स्वतः होऊन जान्हवीला 'मी सासू आणि तू सून हे नाते विसरून आपण मैत्रिणी म्हणून इथे वावरू या....' असे जे सांगत त्यातच तिला जान्हवीविषयी वाटणारे प्रेम प्रगट होते. पुढेही बेबीआत्या 'चाळ' उच्चारून जान्हवीला रडवेली करते त्यावेळी तिच्या खोलीत शरयू जावून सांत्वन करीत असलेला प्रसंग फार काव्यात्मक झाला होता....त्यातही अश्रू ढाळणा-या जान्हवीला आपल्या कुशीत घेऊन तिचे दु:ख कमी करणारी शरयू थोरच.

जिज्ञासा : "...Nobody else could have pulled off this character as she has!..." तुमचे हे वाक्य फार बोलके आहे.

सुंदर !

आज त्या मावशींच्या मना तली आपल्यालाही नवरा असावा ही इच्छा व्यक्त झाली. अगदी कसेतरी झाले मला. अश्याही स्त्रीया असतात. कोणी लग्नाचे बघतच नाही तर मग कसे? श्री च्या आईची ही सासू आणि मुलगा
या दोघांच्यात घुसमट होत आहे.

अश्विनीमामी..... ज्या अर्थी मावशीच्या मनातील लग्नाचा विषय काल निघाला आणि जान्हवीने तिच्या अपेक्षाबद्दलही विचारले....त्याअर्थी [मला वाटते] की ही नवी आलेली सूनबाई घरात असलेल्या चार स्त्रियांच्या आयुष्याची दिशा नक्की करणार......१. मावशीचे लग्न......२. शरयूच्या नव-याचे आगमन आणि शरयूच्या संसाराची सुरुवात.....३. बेबीआत्याच्या नव-याला घरी परत बोलावून तिचीही स्वतंत्र वाटचाल......४. श्री च्या वडिलांना भारतात परत आणून आपल्या सासूच्या चेह-यावर परत हास्य आणणे.

कथानक असेही फ़ुलविले जाईल....अर्थात असा माझा अंदाज आहे. अन्यथा रोज ती साडी आणि ड्रेस आणि जान्हवीची नोकरी....यावर भट्टी किती दिवस चालविणार देवस्थळी ?

आईआज्जीचाही बँड वाजवा म्हणाव जमले तर जाता जाता. तसही हल्ली एका कोणत्यातरी खोलीत डोल बाई डोलाची करत बसलेली असते ती Happy

Nobody else could have pulled off this character as she has!>>>>> +१,

मला उगिचच हिरो नंबर वन या सिनेमाची किंवा बावर्चीची गोष्ट आठवतेय इथे. ती एक बिन लग्नाची मावशी आहे. तिचं लग्न का राहिलंय अजून? आणि भागिरथी बाईंनी स्वत:चे निर्णय का लादलेत लोकांवर?

मला उगिचच हिरो नंबर वन या सिनेमाची किंवा बावर्चीची गोष्ट आठवतेय इथे. ती एक बिन लग्नाची मावशी आहे. तिचं लग्न का राहिलंय अजून? आणि भागिरथी बाईंनी स्वत:चे निर्णय का लादलेत लोकांवर?>>>.नाही,मावशी साठी भागिरथी बाईंनीपण स्थळे पाहिलेली असतात(सरु मावशीचे आई वडिल वारल्यावर भागिरथी बाईंनीच तीला गोकुळ मधे आणलेले असते) पण तिचे लग्न जमत नाही.

जान्हवीने नोकरी करण्याबद्दल श्री आणि जान्हवी यांच्यातले संवाद फार छान होते.......++१,
नविन लग्न झालेल्या मुलीनी यातल थोड जरी Follow करायचा प्रयत्न केले तर सोने पे सुहागा. Happy

जान्हवीने आधी बेबी आत्याचा संसार सुरळीत करावा. जेणे करुन तिचा होणारा विरोध मावळेल आणि आजीबाई खुश.

शरयुच्या नवर्‍याला परत घरात आणणे म्हणजे आजीबाई अजुन भडकणार कारण त्यांनीच त्याची हकालपट्टी केली असते.

सरु मावशीचे लग्न ही त्यातल्या त्यात सोपी आणि फार अडचणीची न ठरणारी टास्क आहे. तेव्हा आता लवकरच गोकुळ मध्ये पुन्हा लवकरच एक लग्न लागेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

Pages