आमचं बी पॅनिंग !

Submitted by रंगासेठ on 17 October, 2013 - 13:11

अमोलने टाकलेल्या धाग्याने आणि आशुचॅंपने दिलेल्या माहिती नंतर, बरेच दिवस टाकायचं राहिलेला लेख आत्ता टाकतोय. माझ्या आवडत्या टेक्निक पैकी ही एक, सोपी आणि मजा आणनारी. मासिकात्/आंतरजालावर पूर्वी सुसाट धावणार्‍या गाड्यांचे प्रचि पाहिले की वाटायचं किती भारी आहे, असलं काही तरी क्लिक करता आलं पाहिजे. नंतर कॅमेरा घेतल्यावर प्रयत्न सुरू केले आणि काही प्रचि काढता आले. तरी अजून बराच लांबचा पल्ला गाठायचाय.

आधी मॅन्युअल मोड मध्ये प्रचि काढायचो, पॅनिंगचे. नंतर 'शटर प्रायोरिटी' मोड मध्ये सुरू केलं, सोपं जातं. मी साधारण शटर स्पीड १/२०-१/२५ ठेवतो, म्हणजे मस्त बोके/ब्लरनेस मिळतो. जरा आणखी शटर स्लो करता येतं पण हातावर तेवढं नियंत्रण नाही जमत अजून. मी करतो ते स्टेप्स खालील प्रमाणे :

१) कॅमेरा 'शटर प्रायोरिटी' मोड वर न्यायचा आणि शटर स्पीड १/२०-१/२५ ठेवायचं. अ‍ॅपॅर्चेर ऑटोमॅटिक अ‍ॅडजस्ट होतं.
२) शटर रिलीस बटन अर्धवट दाबून, धावणारी गाडी/प्राणी/मनुष्य वर फोकस करायचा.
३) क्लिक करायचं आणि आत्ता कॅमेरा तसाच त्या ऑब्जे़क्टच्या मोशन मध्ये फिरवायचा, म्हणजे त्या ऑब्जे़क्टला फॉलो करायचा त्याच्या धावण्याच्या दिशेने आणि वेगानुसार.

प्रत्येक वेळी चांगला मनासारखा प्रचि मिळत नाही, कधी कधी रस्त्यावर लोकांना संशय येऊ शकतो की नेमकं हे बेणं काय करतय, असं गाडीचा फोटो काढत कॅमेरा का फिरवतयं!! Wink पण मजा येते पॅनिंग करताना. नक्की प्रयत्न करा. खाली काही प्रचि देत आहे.

प्रचि १

_MG_0414 (Small).JPG

प्रचि २

_MG_0439 (Small).JPG

प्रचि ३

_MG_0446 (Small).JPG

प्रचि ४, आपली आवडती यष्टी

_MG_0482 (Small).JPG

प्रचि ५

_MG_0506 (Small).JPG

प्रचि ६

_MG_6788 (Small).JPG

प्रचि ७

_MG_8098 (Small).JPG

प्रचि ८

_MG_6789 (Small).JPG

प्रचि ९

_MG_8598 (Small).JPG

प्रचि १०

_MG_8600 (Small).JPG

प्रचि ११

_MG_9317 (Small).JPG

प्रचि १२

_MG_9319 (Small).JPG

प्रचि १३

_MG_9322 (Small).JPG

प्रचि १४

_MG_9818 (Small).JPG

प्रचि १५

_MG_9827 (Small).JPG

प्रचि १६

_MG_9837 (Small).JPG

प्रचि १७, हा माझा पॅनिंगच्या पहिल्या काही फोटोंपैकी एक

IMG_2507 (Small).JPG

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !

प्रचि १० धामापुरचा तलाव आहे का? >> इंद्रा, हो तोच वाटतोय मला पण. तो मुलगा जिथे सायकल चालवतोय त्या जागी भरपूर सावली असते ना झाडांची? फोटोत लख्ख उन वाटतय.

छान !

जबरी!

Superb..
heypics kadhatana kuthala camera vaparala hota??
canon t3i madhe ha option available aahe ka?

सही आहेत फोटो.
शीर्षक वाचून मला ह्या धाग्यावर लडाखच्या कुठल्यातरी भागाचे फोटो असतील असे वाटले Proud

Pages