"दोघी", "दहावी फ", "देवराई", "वास्तुपुरूष", "नितळ" आणि "घो मला असला हवा" अशा वेगवेगळ्या विषयांवरच्या दर्जेदार चित्रपटानंतर जेंव्हा मायबोलीवर "सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर" यांच्या "संहिता-The Script" या चित्रपटाची घोषणा झाली तेंव्हाच अजुन एक सुंदर आणि उत्कृष्ठ मराठी चित्रपट रसिकांना पहायला मिळणार असं मनापासुन वाटलं आणि काल प्रिमिअर पाहिल्यावर याची अनुभुती मिळाली.
देविका दफ्तरदार, मिलिंद सोमण, राजेश्वरी सचदेव, उत्तरा बावकर आणि ज्योती सुभाष यांचा अभिनय, सुमित्रा भावे यांचे लेखन, सुनिल सुकथनकर यांची गीते, शैलेंद्र बर्वे यांचे संगीत आणि आरती अंकलीकर यांच्या स्वर या सार्याच गोष्टींमुळे हा चित्रपट एक वेगळीच पातळी गाठतो. देविका दफ्तरदार या आवड्त्या अभिनेत्रींपैकी एक ("नितळ" मधील डॉक्टर, "शाळा" मधील मास्तरीण बाई आणि आत्ता "मालविका जहागिरदार/रेवती साठे :-)). खरंतर सगळ्यांचाच अभिनय उत्कृष्ठ आहे. देविका यांनी रंगवलेली मालविका/रेवती, मिलिंद सोमण यांचा सत्यशील/रणवीर, राजेश्वरी यांची भैरवी/हेमांगिनी, ज्योती सुभाष यांने रंगवलेली भैरवीची आई/शिरीन हि सारी पात्रे अप्रतिम आहेत. चित्रपटातील सगळीच गाणी अतिशय सुरेल आहेत. चित्रपटातील गाणी ऐकताना/पाहताना एखादी "मैफिल" अनुभवतोय असं काहिसं वाटत होतं. सुनिल सुकथनकरांनी लिहिलेल्या गीतांना संगीत दिले आहे शैलेंद्र बर्वे यांनी आणि स्वरसाज चढवला आहे आरती अंकलीकर टिकेकर यांनी. चित्रपटगृहात जाऊन, मोठ्या पडद्यावरच या मैफिलीचा अनुभव घ्या.
सदर चित्रपट १८ ऑक्टोबरपासुन सर्वत्र प्रदर्शित होत आहे, आवर्जुन पहा. खात्री देतो चित्रपट नक्कीच आवडेल.
मला स्वतःला :"संहिता" खुप आवडला. पुन्हा एकदा पाहणार
अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांमध्ये गाजलेला, दोन राष्ट्रीय व विसाहून अधिक इतर पारितोषिकं पटकावलेला एका नितांत सुंदर चित्रपटाचा प्रिमियर पाहण्याची संधी मायबोली आणि चिनूक्स यांनी दिल्याबद्दल मनापासुन आभार.
सर्वात सुखद धक्का म्हणजे मायबोलीकर "चिनूक्स" यांचे "संहिता" चित्रपटात झालेले अनपेक्षित दर्शन.
मायबोली माध्यम प्रायोजक असलेल्या "संहिता" या चित्रपटाचा प्रिमिअर सिटिलाईट, मुंबई येथे पाहण्याचा योग आला. यावेळेस भारतीताई, साधना, जाई., मंजुडी, इंद्रधनुष्य, घारूअण्णा, अश्विनी के, जिप्सी इ. मायबोलीकर उपस्थित होते. सदर प्रिमियरचा हा फोटो वृतांत.
=======================================================================
=======================================================================
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
सुमित्रा भावे
प्रचि ०४
सुनिल सुकथनकर
प्रचि ०५
मिलिंद सोमण
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
देविका दफ्तरदार
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
राजेश्वरी सचदेव
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
संगीतकार शैलेंद्र बर्वे
प्रचि १७
प्रचि १८
टिम "संहिता"
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
वरूण आणि राजेश्वरी
प्रचि २९
प्रचि ३०
मायबोलीकर अश्विनी के आणि नायक मिलिंद सोमण
प्रचि ३१
गुर्जी ...........काय झ्याक
गुर्जी ...........काय झ्याक फोटो काढलासा बगा!
सोमणांचा मिलिंद परवाच पुणे युनिवर्सिटीत खड्डा कॅन्टीनला समोरच होता.
डोक्यावरच्या सॉल्ट पेपरसह अजूनही हॅन्डसमच बाकी!
देविका आणि राजेश्वरीचे फोटो अप्रतीमच!
मिसो खरंच खूप गंभीर अन छान
मिसो खरंच खूप गंभीर अन छान दिसत होता,
अगदी साधेपणानं वावरत असूनही त्याचं पेज
थ्री व्यक्तिमत्व सगळ्यापलीकडे असल्यासारखं
होतं.>>>>> तो आय candy आहे ग
आठव त्याला माझ नाव ऐकून आश्चर्य वाटल ते
मस्त फोटो. हाय मिसो..
मस्त फोटो.
हाय मिसो..
त्याला माझ नाव ऐकून आश्चर्य
त्याला माझ नाव ऐकून आश्चर्य वाटल ते>>>> का म्हणे?
अग जाई हे नाव त्याने ऎकल
अग जाई हे नाव त्याने ऎकल नव्हत म्हणे
त्याच् मराठी bad आहे ग
मग त्याला इंग्लिश मधून सांगितला अर्थ
ग ग ग! कठीण आहे! पण तो मिसो
ग ग ग! कठीण आहे! पण तो मिसो असल्याने माफ!
मी पण मिसोची पंखी आहे....
मी पण मिसोची पंखी आहे.... त्याच्यासाठी तरी संहिता बघणारच...
पण तो मिसो असल्याने माफ!>>>>>
पण तो मिसो असल्याने माफ!>>>>> वत्सला हजारो मोदक तुला
जाईला तो झाई म्हणत होता मग मी
जाईला तो झाई म्हणत होता मग मी 'जाईजुईतली जाई ' असं सांगितल्यावर 'ओह जस्मिन ' असं म्हणाले रावबहादूर !
अग अगं .माझा मिसो गं तो..
अग अगं .माझा मिसो गं तो.. राजेश्वरी ही खास दिसतेय..
कलाकारांबरोबर मायबोलीकरांचा
कलाकारांबरोबर मायबोलीकरांचा ग्रुप फोटो पण पाहिजे होता, जिप्सी
जाईला तो झाई म्हणत होता मग मी
जाईला तो झाई म्हणत होता मग मी 'जाईजुईतली जाई ' असं सांगितल्यावर 'ओह जस्मिन ' असं म्हणाले रावबहादूर >>> असू देत. मिसो आहे तो. त्याने काहीही म्हटलं तरी चालेल.
जाईला तो झाई म्हणत होता मग मी
जाईला तो झाई म्हणत होता मग
मी 'जाईजुईतली जाई ' असं सांगितल्यावर
'ओह जस्मिन ' असं म्हणाले रावबहादूर >>> lol भारती ताई
जस्मिन अगदी ख़ास ग
असू देत. मिसो आहे तो. त्याने
काहीही म्हटलं तरी चालेल.>>>>> अल्पना अगदी ग
जिप्सी, खूप सुंदर
जिप्सी, खूप सुंदर फोटो!
राजेश्वरी आणि देविका आवडल्या. एलिगंट दिस्तात! मिलिंद सोमणांचा, पहिला, स्टलॉनी स्मितमुद्रेचा फोटो सोडून बाकी आवडले.
सोमणांच्या फोटोपुढे बाकीच्यांचे फोटो इतके लक्षं देऊन बघितले नाहीत हे प्रतिसाद देताना लक्षात आलं.
केश्वीचा मिसोफाइड फोटो मस्तं!
मस्तच. मिलिंद, देविका,
मस्तच. मिलिंद, देविका, राजेश्वरी तिघेही सुंदर.
मस्त वृत्तांत आणि फोटो.
मस्त वृत्तांत आणि फोटो.
सर्वच फोटो सुरेख. सगळेच छान
सर्वच फोटो सुरेख. सगळेच छान आणि एलिगंट दिसतायत
छान फोटो. मराठी चित्रपटांसाठी
छान फोटो. मराठी चित्रपटांसाठी नेटफ्लिक्ससारखी पेड ऑनलाइन स्ट्रीमिंग सुविधा कधी होणार?
मस्त फोटो. देविका दफ्तरदारचे
मस्त फोटो.
देविका दफ्तरदारचे छान आलेत फोटो. राजेश्वरीचा चेहरा किती photogenic आहे आणि अगदी प्रसन्न हास्य!
फोटो क्रमांक २० मध्ये निळा
फोटो क्रमांक २० मध्ये निळा चौकड्यांचा शर्ट घातलेली व्यक्ती कोण?
फोटो न २६ मधले कोण आहेत ? क्राईम पॅट्रोल मध्ये कधी कधी इन्स्पेक्टरची भुमिका करतात.
अगगई! मिलिंद सोमण बर्याच
अगगई! मिलिंद सोमण बर्याच दिसांनी दिसला, पण दिसला. हाच का तो देखणा मॉडेल, जो अलिशा चिनॉयच्या मेड इन इंडिया गाण्यात होता? ( ओळखतेय, पण स्वरुप बरेच बदललयं) ( देवा मराठीत मिलिंद सोमण, समीर धर्माधिकारी आणी मिलिंद गुणाजी हेच फकस्त देखणे आहेत का? )
अश्विनी के सो लक्की! बाकी माबोकर मि.इंडिया स्वरुपात होते की काय? राजेश्वरी मस्त दिसतेय.
२० मधे आहेत ते डॉ. शेखर
२० मधे आहेत ते डॉ. शेखर कुलकर्णी!! ते 'नितळ' या चित्रपटात प्रमुख भुमिकेत होते!!
जबरी
जबरी
सगळ्यांचेच प्रतिसाद
सगळ्यांचेच प्रतिसाद
कलाकारांबरोबर मायबोलीकरांचा ग्रुप फोटो पण पाहिजे होता,
बाकी माबोकर मि.इंडिया स्वरुपात होते की काय>>>>सगळे त्या मिसोच्या मागे कितीवेळा म्हणालो कि ग्रुप फोटो काढुया, अगदी जातानाही विचारत होतो, पण कुणीच ऐकलं नाही.
२० मधे आहेत ते डॉ. शेखर कुलकर्णी!! ते 'नितळ' या चित्रपटात प्रमुख भुमिकेत होते!!>>>>येस्स
अरे मग मिसो च्या भोवती तरी
अरे मग मिसो च्या भोवती तरी काढायचा.
अगदीच काही नाही तर एकेकाचा काढून घ्यायचा मिसो, रास किंवा देद पाशी .. आहे काय न नाही काय
>सगळे त्या मिसोच्या
>सगळे त्या मिसोच्या मागे
कितीवेळा म्हणालो कि ग्रुप
फोटो काढुया,
अगदी जातानाही विचारत होतो, पण
कुणीच ऐकलं नाही.>>>>>>>>
जिप्सी सगळ्याचॆ अवस्था दिसला ग बाई दिसला अशी होती रे
मिसो ला सांगायचं फोटो काढ
मिसो ला सांगायचं फोटो काढ म्हणून, सगळे नक्की उभे राहिले असते
अरे मग मिसो च्या भोवती तरी
अरे मग मिसो च्या भोवती तरी काढायचा.>>>मिलिंदा, काढलाय तसा फोटो, पण इथे नको प्रदर्शित करू असं सांगितलंय कुणीतरी. (जाई, तुझं नाव घेतलं नाही हां )
मिसो ला सांगायचं फोटो काढ म्हणून, सगळे नक्की उभे राहिले असते>>>>अगदी अगदी.
मिलिंदा केश्विचा फोटो आहे ना
मिलिंदा केश्विचा फोटो आहे ना वरती
जिप्स्या
जिप्सी मला तरी वगळ या
जिप्सी मला तरी वगळ या आरोपातून , मी जातानाही ग्रूप फोटो काढूया म्हणत होते, केश्विनी म्हणाली आता आणखी कसले फोटो ?!
पण त्या लाईट फेल्युअरमुले लोक्स उशीर करायच्या मूड मध्ये नव्हते हे खरं कारण .
Pages