"संहिता" - प्रिमियर फोटो वृतांत

Submitted by जिप्सी on 17 October, 2013 - 00:57

"दोघी", "दहावी फ", "देवराई", "वास्तुपुरूष", "नितळ" आणि "घो मला असला हवा" अशा वेगवेगळ्या विषयांवरच्या दर्जेदार चित्रपटानंतर जेंव्हा मायबोलीवर "सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर" यांच्या "संहिता-The Script" या चित्रपटाची घोषणा झाली तेंव्हाच अजुन एक सुंदर आणि उत्कृष्ठ मराठी चित्रपट रसिकांना पहायला मिळणार असं मनापासुन वाटलं आणि काल प्रिमिअर पाहिल्यावर याची अनुभुती मिळाली. Happy

देविका दफ्तरदार, मिलिंद सोमण, राजेश्वरी सचदेव, उत्तरा बावकर आणि ज्योती सुभाष यांचा अभिनय, सुमित्रा भावे यांचे लेखन, सुनिल सुकथनकर यांची गीते, शैलेंद्र बर्वे यांचे संगीत आणि आरती अंकलीकर यांच्या स्वर या सार्‍याच गोष्टींमुळे हा चित्रपट एक वेगळीच पातळी गाठतो. देविका दफ्तरदार या आवड्त्या अभिनेत्रींपैकी एक ("नितळ" मधील डॉक्टर, "शाळा" मधील मास्तरीण बाई आणि आत्ता "मालविका जहागिरदार/रेवती साठे :-)). खरंतर सगळ्यांचाच अभिनय उत्कृष्ठ आहे. देविका यांनी रंगवलेली मालविका/रेवती, मिलिंद सोमण यांचा सत्यशील/रणवीर, राजेश्वरी यांची भैरवी/हेमांगिनी, ज्योती सुभाष यांने रंगवलेली भैरवीची आई/शिरीन हि सारी पात्रे अप्रतिम आहेत. चित्रपटातील सगळीच गाणी अतिशय सुरेल आहेत. चित्रपटातील गाणी ऐकताना/पाहताना एखादी "मैफिल" अनुभवतोय असं काहिसं वाटत होतं. सुनिल सुकथनकरांनी लिहिलेल्या गीतांना संगीत दिले आहे शैलेंद्र बर्वे यांनी आणि स्वरसाज चढवला आहे आरती अंकलीकर टिकेकर यांनी. चित्रपटगृहात जाऊन, मोठ्या पडद्यावरच या मैफिलीचा अनुभव घ्या.

सदर चित्रपट १८ ऑक्टोबरपासुन सर्वत्र प्रदर्शित होत आहे, आवर्जुन पहा. खात्री देतो चित्रपट नक्कीच आवडेल. Happy

मला स्वतःला :"संहिता" खुप आवडला. पुन्हा एकदा पाहणार Wink

अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांमध्ये गाजलेला, दोन राष्ट्रीय व विसाहून अधिक इतर पारितोषिकं पटकावलेला एका नितांत सुंदर चित्रपटाचा प्रिमियर पाहण्याची संधी मायबोली आणि चिनूक्स यांनी दिल्याबद्दल मनापासुन आभार.

सर्वात सुखद धक्का म्हणजे मायबोलीकर "चिनूक्स" यांचे "संहिता" चित्रपटात झालेले अनपेक्षित दर्शन. Happy Happy

मायबोली माध्यम प्रायोजक असलेल्या "संहिता" या चित्रपटाचा प्रिमिअर सिटिलाईट, मुंबई येथे पाहण्याचा योग आला. यावेळेस भारतीताई, साधना, जाई., मंजुडी, इंद्रधनुष्य, घारूअण्णा, अश्विनी के, जिप्सी इ. मायबोलीकर उपस्थित होते. सदर प्रिमियरचा हा फोटो वृतांत.
=======================================================================
=======================================================================

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३
सुमित्रा भावे

प्रचि ०४
सुनिल सुकथनकर

प्रचि ०५
मिलिंद सोमण
प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९
देविका दफ्तरदार
प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३
राजेश्वरी सचदेव
प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६
संगीतकार शैलेंद्र बर्वे
प्रचि १७

प्रचि १८
टिम "संहिता"
प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८
वरूण आणि राजेश्वरी
प्रचि २९

प्रचि ३०
मायबोलीकर अश्विनी के आणि नायक मिलिंद सोमण Happy
प्रचि ३१

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२६ मधे कोणे? >> आडनाव कुलकर्णी आहे बहुदा..नाव आठवत नाहीये जाम. दोघी मधे दफ्तरदारचे ह्याच्याशी लग्न होते शेवटी.

मस्त फोटो!!!
मिसो तेव्हढाच हॅन्डसम दिसतो!!!
केश्वि, लक्की यु! Wink

झारा, Biggrin

देविकाचे फोटो अप्रतिम!
सुमित्रा भावेंचे फोटो आणि व्यक्तिमत्व झकास!

चित्रपट नक्की बघणार (पु ना गाडगीळांकडचे दागिने पण बघायचे आहेत ना!).
मायबोलीवर किंवा इतरत्र हा सिनेमा उपलब्ध आहे का? काही दिवसांनी कुठेतरी फुकटात बघायला मिळेलच पण तसे करणे खरच नको वाटते! तत्वतः पटत नाही... त्यामूळे बरेच चांगले चांगले मराठी/हिंदी सिनेमे बघायचे राहून जातात.

अहाहा जिप्सी, सुरेख फोटो आहेत सगळेच. मला राजेश्वरी आणि शैलेन्द्र बर्वेंच्या मुद्रा अतिशय आवडल्या.. राजेश्वरीच्या मोत्यांच्या कळ्या अप्रतिम टिपल्यायस Happy
बाकी सोमणांबद्दल क्या कहने? झाशीच्या राणीला पाहिजेत तितके मोदक... आई गं दिसतोय तो! नेहमीचा आणि संस्थानिकाच्या गेटपमध्येही. what a graceful aging really Happy

भारीच.

वर्षा, मी तैय्यार..............

काशी Rofl

अश्विनी... मी भेटले तर मिलिंद्ला बेसन लाडवांची गरज नाही ;).. ते लाडु etc तुमच्यासारख्याना सांगायला:)

मी भेटले तर मिलिंद्ला बेसन लाडवांची गरज नाही >>>

झारा Rofl हसून मरेन मी इथे ऑफिसमध्येच. आता तुझ्या ह्या वरच्या वाक्यावर काहीतरी बोलावेसे वाटतेय पण बोलणार नाही Wink :जे बोलावंसं वाटतंय ते कसंबसं कंट्रोल करणारी बाहुली:

त्या शिनुमात त्याच्या घरात लाडवाचा डबा भरलेलाच असतो.

बघ ना लले, एरव्ही फार कमी दिसणारी झारा आज मिसोला बघायला परत परत येतेय. काही खरं नाही हिचं Lol

राणी .. घोड्दौड जोरात Biggrin

अश्विनी के.. चक्क मिसो येवुन बोलला!! सो लक्की!!

आता मला पण जायचं पुण्यात... धागाच सापड्त नाहीय... भ्या Sad

झारा Lol

मिसोचे फोटो खरंच खूप मस्त आलेत पण.... त्याला म्हातारा वगैरे म्हटलं की मला लगेच वाईन आठवते!!! Happy

देविका दफ्तरदारचं एकंदर व्यक्तीमत्त्वच खूप सुंदर आहे, त्यामुळे ती पडद्यावर देखील उठून दिसतेच शिवाय फोटोमधेदेखील जबरदस्त दिसते. राजेश्वरीचे फोटो सुंदर आलेत (पण तिच्या पूर्ण साडीचा एकतरी फोटो टाकायला हवा होता नै? साडीचा रंग क्लास आहे!!!

त्या शिनुमात त्याच्या घरात लाडवाचा डबा भरलेलाच असतो>> फक्त लाडू?? चिवडा, चकल्या, कडबोळी, झालंच तर अनारसे नाहीत का? Wink

झारा, काशी, केश्वे Biggrin

मिसोचे फोटो खरंच खूप मस्त आलेत पण.... त्याला म्हातारा वगैरे म्हटलं की मला लगेच वाईन आठवते!!! >>>+ १०००००.....

सगळेच प्रचि छान आहेत.
अश्विनी के.. :एक जेलस बाहुली:

मिसो खरंच खूप गंभीर अन छान दिसत होता, अगदी साधेपणानं वावरत असूनही त्याचं पेज थ्री व्यक्तिमत्व सगळ्यापलीकडे असल्यासारखं होतं.
मला खूप आवडली ती दिग्दर्शकांची जोडी. त्यातूनही सुमित्राजींशी बोलायची संधी मी सोडली नाही.
अनेक मराठी सेलेब्रिटीज अवतीभोवती वावरत असल्याने आमची विमाने जरा वर उचलली गेली होती Happy कल्पना करा की आपण लिफ्टमधून नीला कुलकर्णी अन निखील रत्नपारखींबरोबर जातोय.
कसली गोड माणसं आहेत ही ! साधी अन दिमाखदार .

अगदी साधेपणानं वावरत असूनही त्याचं पेज थ्री व्यक्तिमत्व सगळ्यापलीकडे असल्यासारखं होतं. >>> +१०००

नीना कुलकर्णी प्रत्यक्षात खूप सुंदर आहेत आणि त्यांना मिळणार्‍या भूमिकांपेक्षा खूप तरुण दिसतात.

>>नीना कुलकर्णी प्रत्यक्षात खूप सुंदर आहेत आणि त्यांना मिळणार्‍या भूमिकांपेक्षा खूप तरुण दिसतात.
सहमत केश्विनी. मी अगदी तरुण वयापासून , हमीदाबाईची कोठीच्या दिवसापासून या शिवाजी पार्क स्थित सुंदरीचा तोरा पहातेय. मस्तच.

मस्त फोटोवृत्तांत जिप्सी! मिसो, देविका आणि राजेश्वरी यांचे फोटू खास आवडले!

मिसो बद्दलच्या कमेन्ट्स भारी!! Biggrin

Pages