"संहिता" - प्रिमियर फोटो वृतांत

Submitted by जिप्सी on 17 October, 2013 - 00:57

"दोघी", "दहावी फ", "देवराई", "वास्तुपुरूष", "नितळ" आणि "घो मला असला हवा" अशा वेगवेगळ्या विषयांवरच्या दर्जेदार चित्रपटानंतर जेंव्हा मायबोलीवर "सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर" यांच्या "संहिता-The Script" या चित्रपटाची घोषणा झाली तेंव्हाच अजुन एक सुंदर आणि उत्कृष्ठ मराठी चित्रपट रसिकांना पहायला मिळणार असं मनापासुन वाटलं आणि काल प्रिमिअर पाहिल्यावर याची अनुभुती मिळाली. Happy

देविका दफ्तरदार, मिलिंद सोमण, राजेश्वरी सचदेव, उत्तरा बावकर आणि ज्योती सुभाष यांचा अभिनय, सुमित्रा भावे यांचे लेखन, सुनिल सुकथनकर यांची गीते, शैलेंद्र बर्वे यांचे संगीत आणि आरती अंकलीकर यांच्या स्वर या सार्‍याच गोष्टींमुळे हा चित्रपट एक वेगळीच पातळी गाठतो. देविका दफ्तरदार या आवड्त्या अभिनेत्रींपैकी एक ("नितळ" मधील डॉक्टर, "शाळा" मधील मास्तरीण बाई आणि आत्ता "मालविका जहागिरदार/रेवती साठे :-)). खरंतर सगळ्यांचाच अभिनय उत्कृष्ठ आहे. देविका यांनी रंगवलेली मालविका/रेवती, मिलिंद सोमण यांचा सत्यशील/रणवीर, राजेश्वरी यांची भैरवी/हेमांगिनी, ज्योती सुभाष यांने रंगवलेली भैरवीची आई/शिरीन हि सारी पात्रे अप्रतिम आहेत. चित्रपटातील सगळीच गाणी अतिशय सुरेल आहेत. चित्रपटातील गाणी ऐकताना/पाहताना एखादी "मैफिल" अनुभवतोय असं काहिसं वाटत होतं. सुनिल सुकथनकरांनी लिहिलेल्या गीतांना संगीत दिले आहे शैलेंद्र बर्वे यांनी आणि स्वरसाज चढवला आहे आरती अंकलीकर टिकेकर यांनी. चित्रपटगृहात जाऊन, मोठ्या पडद्यावरच या मैफिलीचा अनुभव घ्या.

सदर चित्रपट १८ ऑक्टोबरपासुन सर्वत्र प्रदर्शित होत आहे, आवर्जुन पहा. खात्री देतो चित्रपट नक्कीच आवडेल. Happy

मला स्वतःला :"संहिता" खुप आवडला. पुन्हा एकदा पाहणार Wink

अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांमध्ये गाजलेला, दोन राष्ट्रीय व विसाहून अधिक इतर पारितोषिकं पटकावलेला एका नितांत सुंदर चित्रपटाचा प्रिमियर पाहण्याची संधी मायबोली आणि चिनूक्स यांनी दिल्याबद्दल मनापासुन आभार.

सर्वात सुखद धक्का म्हणजे मायबोलीकर "चिनूक्स" यांचे "संहिता" चित्रपटात झालेले अनपेक्षित दर्शन. Happy Happy

मायबोली माध्यम प्रायोजक असलेल्या "संहिता" या चित्रपटाचा प्रिमिअर सिटिलाईट, मुंबई येथे पाहण्याचा योग आला. यावेळेस भारतीताई, साधना, जाई., मंजुडी, इंद्रधनुष्य, घारूअण्णा, अश्विनी के, जिप्सी इ. मायबोलीकर उपस्थित होते. सदर प्रिमियरचा हा फोटो वृतांत.
=======================================================================
=======================================================================

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३
सुमित्रा भावे

प्रचि ०४
सुनिल सुकथनकर

प्रचि ०५
मिलिंद सोमण
प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९
देविका दफ्तरदार
प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३
राजेश्वरी सचदेव
प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६
संगीतकार शैलेंद्र बर्वे
प्रचि १७

प्रचि १८
टिम "संहिता"
प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८
वरूण आणि राजेश्वरी
प्रचि २९

प्रचि ३०
मायबोलीकर अश्विनी के आणि नायक मिलिंद सोमण Happy
प्रचि ३१

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सी,
धन्यवाद या सुंदर फोटोंबद्दल Happy 'संहिता'च्या टीमला आवडले.
देविकाताईला तू काढलेले फोटो अतिशय आवडले. तिच्या खाजगी संग्रहासाठी तू अजून काही फोटो कृपया पाठवू शकशील का?

अरेरे, हे मिसच झालं माझ्याकडून. होते त्यादिवशी मुंबईत आणि शक्यही होतं. बघायला हवा होता हा बीबी.

वयाच्या २५ नंतर पण माझं काही व्यक्तींमुळे क्रशनं सुरु आहे त्यातल्याच एक देविका दफ्तरदार यांचे खुपच सुंदर फोटो दाखवल्या बद्दल जिप्स्याचे आभार... Happy

सर्वच फोटो सुंदर.
राजेश्वरी अजुनही आयत्या घरात घरोबाच्या सिक्वेल मध्ये तोच रोल करु शकेल. Happy

सर्वच फोटो सुंदर.
संगीतकार बर्वे यांची पर्सनॅलिटी आवडली.
सुमित्राजी आणि सुनीलजी नेहमीच फ्रेश आणि प्रसन्न दिसतात.

चित्रपट नक्कीच बघणार.. Happy

मिसो ला सांगायचं फोटो काढ म्हणून, सगळे नक्की उभे राहिले असते >>> Biggrin

देविकाताईला तू काढलेले फोटो अतिशय आवडले. तिच्या खाजगी संग्रहासाठी तू अजून काही फोटो कृपया पाठवू शकशील का?
>>> जिप्स्या, खबरदार जर याला 'नाही' म्हणालास तर... Wink

तू अजून काही फोटो कृपया पाठवू शकशील का?>>>>नक्कीच Happy उद्यापर्यंत ईमेल करतो तुला. Happy

जिप्स्या, खबरदार जर याला 'नाही' म्हणालास तर...>>>>हमारी ऐसी जुर्रत कहां Happy Happy

देविकाचा हा लुक पण मस्तं , एलेगन्ट !!
माझा चॉइस एकदम मॅच होतोय तिच्या स्टाइलशी Proud
रागेश्वरी पण एलेगन्ट दिसतेय , ती-वरुण अतिशय आवडतं अ‍ॅक्टर कपल .. दोघांचा अभिनय आवडतो ( रागेश्वरी डान्सर म्हणून पण ग्रेट आहे!)
पोस्टर मधे रागेश्वरी दुर्गा जसराजच वाटली आधी :).
छान आलेत सगळे फोटोज ..

Pages