"दोघी", "दहावी फ", "देवराई", "वास्तुपुरूष", "नितळ" आणि "घो मला असला हवा" अशा वेगवेगळ्या विषयांवरच्या दर्जेदार चित्रपटानंतर जेंव्हा मायबोलीवर "सुमित्रा भावे आणि सुनिल सुकथनकर" यांच्या "संहिता-The Script" या चित्रपटाची घोषणा झाली तेंव्हाच अजुन एक सुंदर आणि उत्कृष्ठ मराठी चित्रपट रसिकांना पहायला मिळणार असं मनापासुन वाटलं आणि काल प्रिमिअर पाहिल्यावर याची अनुभुती मिळाली.
देविका दफ्तरदार, मिलिंद सोमण, राजेश्वरी सचदेव, उत्तरा बावकर आणि ज्योती सुभाष यांचा अभिनय, सुमित्रा भावे यांचे लेखन, सुनिल सुकथनकर यांची गीते, शैलेंद्र बर्वे यांचे संगीत आणि आरती अंकलीकर यांच्या स्वर या सार्याच गोष्टींमुळे हा चित्रपट एक वेगळीच पातळी गाठतो. देविका दफ्तरदार या आवड्त्या अभिनेत्रींपैकी एक ("नितळ" मधील डॉक्टर, "शाळा" मधील मास्तरीण बाई आणि आत्ता "मालविका जहागिरदार/रेवती साठे :-)). खरंतर सगळ्यांचाच अभिनय उत्कृष्ठ आहे. देविका यांनी रंगवलेली मालविका/रेवती, मिलिंद सोमण यांचा सत्यशील/रणवीर, राजेश्वरी यांची भैरवी/हेमांगिनी, ज्योती सुभाष यांने रंगवलेली भैरवीची आई/शिरीन हि सारी पात्रे अप्रतिम आहेत. चित्रपटातील सगळीच गाणी अतिशय सुरेल आहेत. चित्रपटातील गाणी ऐकताना/पाहताना एखादी "मैफिल" अनुभवतोय असं काहिसं वाटत होतं. सुनिल सुकथनकरांनी लिहिलेल्या गीतांना संगीत दिले आहे शैलेंद्र बर्वे यांनी आणि स्वरसाज चढवला आहे आरती अंकलीकर टिकेकर यांनी. चित्रपटगृहात जाऊन, मोठ्या पडद्यावरच या मैफिलीचा अनुभव घ्या.
सदर चित्रपट १८ ऑक्टोबरपासुन सर्वत्र प्रदर्शित होत आहे, आवर्जुन पहा. खात्री देतो चित्रपट नक्कीच आवडेल.
मला स्वतःला :"संहिता" खुप आवडला. पुन्हा एकदा पाहणार
अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांमध्ये गाजलेला, दोन राष्ट्रीय व विसाहून अधिक इतर पारितोषिकं पटकावलेला एका नितांत सुंदर चित्रपटाचा प्रिमियर पाहण्याची संधी मायबोली आणि चिनूक्स यांनी दिल्याबद्दल मनापासुन आभार.
सर्वात सुखद धक्का म्हणजे मायबोलीकर "चिनूक्स" यांचे "संहिता" चित्रपटात झालेले अनपेक्षित दर्शन.
मायबोली माध्यम प्रायोजक असलेल्या "संहिता" या चित्रपटाचा प्रिमिअर सिटिलाईट, मुंबई येथे पाहण्याचा योग आला. यावेळेस भारतीताई, साधना, जाई., मंजुडी, इंद्रधनुष्य, घारूअण्णा, अश्विनी के, जिप्सी इ. मायबोलीकर उपस्थित होते. सदर प्रिमियरचा हा फोटो वृतांत.
=======================================================================
=======================================================================
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
सुमित्रा भावे
प्रचि ०४
सुनिल सुकथनकर
प्रचि ०५
मिलिंद सोमण
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
देविका दफ्तरदार
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
राजेश्वरी सचदेव
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
संगीतकार शैलेंद्र बर्वे
प्रचि १७
प्रचि १८
टिम "संहिता"
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
वरूण आणि राजेश्वरी
प्रचि २९
प्रचि ३०
मायबोलीकर अश्विनी के आणि नायक मिलिंद सोमण
प्रचि ३१
मस्त रे जिप्सी सुन्दर फोटो
मस्त रे जिप्सी
सुन्दर फोटो
छान फोटो आहेत जिप्सी!!!!!!
छान फोटो आहेत जिप्सी!!!!!!
मस्त फोटोज!!
मस्त फोटोज!!
मस्त फोटो सोमणदादा अजूनही
मस्त फोटो सोमणदादा अजूनही तितकेच हॅण्डसम दिसतात !
पण मला सर्वात आवडले ते देविकाचे फोटो.
जिप्सी.... इतक्या जलदगतीने
जिप्सी....
इतक्या जलदगतीने चित्रपटाच्या प्रीमिअरबद्दलचा वृत्तांत आणि त्यासोबत फोटोंची ही मालिका इथे दिल्याबद्दल तुमचे विशेष आभार मानले गेले पाहिजेत....काही वेळापूर्वी आम्ही कोल्हापुरकर संबंधित धाग्यावर "संहिता' वरच चर्चा करीत असताना जाई याना [ज्या कालच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या] खुलासे विचारीत होते. त्याच म्हणाला थोड्या वेळाने इथे मालिका प्रायोजकाकडून ती कार्यवाही होणार आहेच....आणि तसेच झाले.
लिखाण आणि प्रकाशचित्रांबद्दल तुमचे विशेष आभार.
पण मला सर्वात आवडले ते
पण मला सर्वात आवडले ते देविकाचे फोटो. >>> +१
सोमणदादा अजूनही तितकेच हॅण्डसम दिसतात ! >>> ह्येबी अगदी खरं
ह्या सिनेमाचा प्रिमियरला उपस्थित रहायची संधी दिल्याबद्दल मायबोलीचे आभार
संहिता खरच एक मैफिल आहे...
संहिता खरच एक मैफिल आहे... दर्दि रसिकांसाठी एक पर्विणी आहे.
सोमणदादा अजूनही तितकेच हॅण्डसम दिसतात !
पण मला सर्वात आवडले ते देविकाचे फोटो. > +१
ह्या सिनेमाचा प्रिमियरला उपस्थित रहायची संधी दिल्याबद्दल मायबोलीचे आभार > +१
मस्त फोटोज!! च्च च्च मिलिंद
मस्त फोटोज!!
च्च च्च मिलिंद सोमण किती म्हातारा झालाय!! :| (तरीही छान दिसतोय! )
मला सर्वात आवडले ते देविकाचे
मला सर्वात आवडले ते देविकाचे फोटो>>+11...फोटो बाकि छानच
वा! मस्तच फोटो जिप्सी.
वा! मस्तच फोटो जिप्सी.
पुढल्या आठवड्यात नक्कीच जाणार आहे बघायला.
मस्त फोटो. प्रचि २५-२६ मधले
मस्त फोटो.
प्रचि २५-२६ मधले लोक कोण?
मिसो बद्दल ललिता-प्रीतीला अनुमोदन
माझ्या ग्रीक गॉड चे अप्रतीम
माझ्या ग्रीक गॉड चे अप्रतीम फोटो टाकल्याबद्दल जिप्सी चे खास आभार... त्याला म्हातारा म्हणणार्यांच्या डोळयात दोष आहे आणि त्यांची कीव येते ;)..
अश्वीनी के... इतकी का खेटुन उभी आहेस त्याला.. बाजु हट
केश्वे, ते माझेच फोटो
केश्वे, ते माझेच फोटो दाखवतीयेस ना मिलूला?
मस्त फोटो!!! सिनेमा फारच
मस्त फोटो!!!
सिनेमा फारच सुंदर आहे.
डोकं शांत ठेवून, कान आणि डोळे उघडे ठेवून सर्वांनी आवर्जून सिनेमा बघा.
एक सुरेख कलाकृती बघितल्याचं पूरेपूर समाधान मिळेल याची खात्री!
ह्या सिनेमाचा प्रिमियरला
ह्या सिनेमाचा प्रिमियरला उपस्थित
रहायची संधी दिल्याबद्दल मायबोलीचे
आभार > +१
मस्त मस्त.. फोटो तर मस्तच पण
मस्त मस्त.. फोटो तर मस्तच पण चित्रपटही मस्त.
मला खुप उत्सुकता होती या चित्रपटाबद्दल आणि अपेक्षेप्रमाणे एक सुंदर चित्रपट पाहायला मिळाला. चित्रपटाची गाणीही तितकीच सुंदर आहे. आरती अंकलीकरांबद्दल नविन काही लिहायला नकोच. पण तरीही.. काय आवाज आहे... ऑडियो सिडी संग्रही असणे अगदी मस्टच....
आजच्या युगातल्या टोकाच्या व्यक्तीस्वातंत्र्याच्या भावनेवर अतिशय सुरेख भाष्य आणि त्याचवेळी व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर करत नाती टिकवण्याची अगदी पटेल अशी भुमिका या चित्रपटात मांडली आहे. मला खुप आवडला चित्रपट.
(रच्याकने, मला मिसो पेक्षा संगितकार बर्वेच जास्त आवडले. एकदम शिवाजी महाराज.. )
अश्वीनी के... इतकी का खेटुन
अश्वीनी के... इतकी का खेटुन उभी आहेस त्याला.. बाजु हट >>>
मी नेमकी त्यावेळी सुमित्राताई-सुनिलदादांशी बोलायला गेले, नाहीतर मिसोच्या डाव्या बाजूला मीही दिसले असते
सुमित्राताई-सुनिलदादाही सर्वांची आवर्जून दखल घेत होते. प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची उत्सुकता त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येत होती.
झारा, मामी मी खूप लांबून
झारा, मामी
मी खूप लांबून राजेश्वरी, देविका, सुमित्राताई आणि मिसोचे फोटु काढत होते. आणि अचानक मिसो डायरेक्ट माझ्यापाशी आला, हसला आणि अत्यंत इन्फॉर्मली ४ वाक्य बोलला, मी पण तेवढीच वाक्यं बोलले. मला खरंच वाटत नाहिये अजून. स्माईल दिल्यावर... मिसो - काय झालं? मी - मला कळतंच नाहिये फोटो येताहेत की नाही? नंतर अजून ३-३ वाक्यांची देवाण घेवाण. मग त्याने मला त्याचा मी काढलेला एक फोटो "दाखव दाखव, उघड तर खरं!" असं म्हणून उघडायला लावला. तेव्हाचाच आहे तो फोटो.
मलाही आधी माहित असतं की तो माझ्यापाशी येऊन बोलणार आहे, तर मी नीट तयार होऊन गेले असते. माझं काल ऑफिसला आल्यावर जायचं ठरल्यामुळे जल्ला त्या टिपिकल ऑफिसच्या अवतारात होते आणि कधी नव्हे ती बँक हॉलिडेची ट्रेन रश नसल्यामुळे साडी :कैच्याकै:
झारा, मामी, तुम्ही जेव्हा त्याला भेटाल तेव्हा त्याच्यासाठी बेसन लाडू घेऊन जा. मला कालच कळलं की त्याला अत्यंत आवडतात
चिन्मय आणि मीनू दिसले दोन शॉट्समध्ये. सही काम केलंय त्या दोघांनी
सिनेमा आवर्जून पहा. उच्च क्वालिटीचा आहे
झारा
झारा
बेसन लाडू 'अपने हाथोंसे बनाए
बेसन लाडू 'अपने हाथोंसे बनाए हुए' आवडतात की विकतचे चालतील?
जसे जमतील तसे.... बेसनचे
जसे जमतील तसे.... बेसनचे लाडू असल्याशी मतलब.
मीही संधी मिळताच मिसो बरोबर
मीही संधी मिळताच मिसो बरोबर फोटो काढून घेतला आणि थोडेफार बोलले देखील
अजुन पण स्मार्ट दिसतो तो
आयकैंडी अगदी
चित्रपट अगदी मस्त आहे
एकदा पाहावाच
अभिनय कथा निर्मितीमुल्य सगळ जमुन आलय
रच्याकाने जिप्सी फोटो कुठेय्यत
सहि वृ.... माझे थोडक्यात मिस
सहि वृ....
माझे थोडक्यात मिस झाले. मी चिनुक्स ला फोन ही केला होता, कारण मला काल १५ तारीख वाटत होती.
पण हा गोंधळ लक्षात आल्यावर त्याला सॉरी सांगितले.
पण तत्परतेनी माझ्याशी संपर्क साधल्याबद्दल चिन्मयची आभारी आहे.
खुप मिस केले मी.
सगळिच प्रचि उत्तम. पण कातील म्हणजे लास्ट पिक......!
फोटु लई जबरी काढलेस रे जिप्सी
फोटु लई जबरी काढलेस रे जिप्सी ......
केश्वे सह्ही फोटो. पण मिसो
केश्वे सह्ही फोटो.
पण मिसो म्हाताराच दिसतोय
पण सिनेमा नक्की पाहणार पिंचित
वरदा, २५ मधे निखिल रत्नपारखी
वरदा, २५ मधे निखिल रत्नपारखी आहे. 'टॉम आणि जेरी' मराठी नाटाकात आहे कादंबरी कदमबरोबर. आणि 'ओ माय गॉड' हिंदी सिनेमा आणि चिक्कार जाहिरातींमधून दिसतो हा.
२६ मधे कोणे?
२६ मधे कोणे?
वाह सर्व आवडते कलाकार
वाह सर्व आवडते कलाकार आहेत.थँक्स फोटूंसाठी.
सोमण अजूनही तितकेच हॅण्डसम दिसतात ! +११११
राजेश्वरी सचदेव वर्षानुवर्षे अशीच छान, नाजूक दिसतेय. मस्त.
नक्की पाहणार हा सिनेमा. त्यांचा नितळ हा मला अफाट आवडलेला सिनेमा आहे.
सर्वात सुखद धक्का म्हणजे
सर्वात सुखद धक्का म्हणजे मायबोलीकर "चिनूक्स" यांचे "संहिता" चित्रपटात झालेले अनपेक्षित दर्शन.
विकतचे चालतील?>> लले - तू
विकतचे चालतील?>> लले - तू तर अगदी माझ्याच पंथातली!
Pages