एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!

Submitted by मी मधुरा on 18 September, 2013 - 01:19

'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली. Sad

आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!! Happy

ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. Happy

सध्या मिळालेली माहिती:

कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
ekalagnachi.jpgमहत्वाचे:

इथे भांडत बसू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सो फार स्पृहाला टिपिकल पुण्याच्या मुलीचे बेअरिंग घेणे जमलेले नाही! जरा ओव्हर होतंय. जसं स्वप्नील जोशीचं मुं,पु,मुं. मध्ये झालं होतं. टिपिकल पुणेरी मुली कशा असतात हे एकदा पुण्याला जाऊन बघितलं पाहिजे स्पृहाने.
overall चांगला विषय आहे. जर डोक्यात न जाणारी मालिका झाली तर बघायला मजा येईल (मी सुमित ची मालिका बघितली नाहीये सो माझ्यासाठी तरी नवीन स्टोरी आहे)

sonalisl हो मी बघितल आहे एका पेक्षा एक.... सचिनच्या कमेंट्स कै च्या कै असतात हे मान्य आहे पण म्हणुन त्याला काहीच येत नाही हे म्हणण चुक आहे.

मी आज सकाळी रीपीट टेलीकास्ट पाहीला, तो पण एकच सीन.
त्या नंतर मी च्यानल बदलल. फार पकाउ वाटला. ती शुखो भांडत होती तो सीन.

होसुयाघ च्या टायटल साँग पुढे अगदीच साधं वाटल. सो या पुढे बघायच नाही अस ठरवलं आहे.

infact चिमां ची एकही सिरीयल न बघण्याची शपथ घेतलीये. तुतिमी ने खू..प अत्याचार केलेत. Lol

खरचं ना
ते स्पृहाचं कॅरेक्टर कसलं शहाणपाणा करत?
टोअम्णे मारत बोलताना हसत बोलायच?
तो दुकानदार म्हणतो तुझ्या आजोबांसाठी फंकी हवय? तर ती म्हणते तुझे आजोबा आहेत का माझे?
अरे कोणी उगाच असलं बोलतं का?
आणि हे सगळं हसत हसत.

उका कधीही बेस्ट!
स्प्रुहाची इशा जाम गंडलीये

सचिनच्या कमेंट्स कै च्या कै असतात हे मान्य आहे पण म्हणुन त्याला काहीच येत नाही हे म्हणण चुक आहे.>>> त्याला बरेच काही येते...पण तो अति करतो आणि खूप पकवतो.

पहिल्याच दिवशी इतकी डोक्यात गेली . काल बंदच करून टाकली. आणि फेबु वर बसले. म्हटलं या धाग्यावर येउन अपडेट्स घेइनच Happy

मलापण आवडली नाही हि मालिका. ती स्पृहा डोक्यात जाते, अजिबात चांगले काम केले नाही तिने पण उमेशने काम चांगले केलेय असे आत्तातरी वाटते.

हो तिच आहे...अनिता दाते....चांगली दिसते ती...पण पिक्चरमधे कॉमेडी वाटावे म्हणून दात पुढे दाखवलेत.

अरेच्चा! इथे कोणीच कौतुक करत नाहीयेत! मला तर छान वाटत्येय ही मालिका. Actually पुण्यात शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी येणाऱ्या मुलामुलींच्या खूप इंटरेस्टिंग स्टोरीज असतात ज्या छोट्या पडद्यावर फारशा आल्या नाहीयेत अजून! I like that they are tapping into this. PG म्हणून किंवा हॉस्टेलवर राहताना ही बाहेरून आलेली मुलंमुली हळूहळू पक्के पुणेरी कसे बनत जातात ते त्यांनाही कळत नाही! अगदी firsthand अनुभव आहे!

अर्थात अजून स्पृहाला सूर सापडला नाहीये. आणि काही सीन्स लाउड आहेत पण ए.ल.दु.गो. चे पण पहिले काही भाग बरेच लाउड होते. जसं नाटकाच्या काही प्रयोगानंतर जास्ती सफाई येत जाते तसं सिरीयलचं देखील होत असावं. थोडक्यात I haven't given up yet!

अनिता दाते: नाव माहिती नव्हतं पण गंध मधलं तिचं काम आवडलं होतं!

रच्याकाने, तिकडे होणार सून..मध्ये सुप्रिया काकूला विस्मृतीचा प्रॉब्लेम आणि ह्यात दिग्याकाकाला!

नाव ऐकून बघायची इच्छा खूप झाली होती पण इतक्या निगेटीव्ह प्रतिक्रिया वाचून आता बघणार नाही. चला वेळ वाचला .
धन्यवाद

त्या सलिल कुलकर्णीला त्या 'लालालाला.... तानाना दिंता तानाना' असल्या ललकार्‍यांमधून बाहेर काढा रे कुणी तरी...>>>>>>>>>>>> अगदी अगदी.. १०० टक्के

सचिन मलाही आवडत नाही. उ.काला आवाज नाही होत सुट बिलकूल...

सानी मला आलेली एक मेल आहे, तीच फॉरवर्ड करू का तुम्हाला? पण मग सगळा सस्पेन्स संपेल...

त्या सलिल कुलकर्णीला त्या 'लालालाला.... तानाना दिंता तानाना' असल्या ललकार्‍यांमधून बाहेर काढा रे कुणी तरी...>>>>>>>>>>>> अगदी अगदी.. १०० टक्के+१

काल तर ती फोनवर त्या ब्रह्मेंशी बोलताना अतिशय उद्धट दाखवलिये. डोक्यात गेला तो सिन :रागः

दक्शिणा, यक्क करण्यासारखं काय होतं उंमाझोत??? मालिका न आवडणं वेगळं... पण एवढी एक्ट्रिम घाणेरडी प्रतिक्रिया पाहून जरा आश्चर्य वाटलं.. तो एक काळ होता, फार जुना नाही, जेव्हा तुझ्या माझ्यासारख्या मुली अशा उजळ माथ्याने वावरु शकत नव्हत्या, शिकू शकत नव्हत्या, तेव्हा ह्या सुधारकांनी रक्ताचं पाणी केलं.. म्हणून आज हे दिवस दिसत आहेत.. याचंच चित्रण त्या मालिकेत होतं.. त्या काळात आपण जन्मलो असतो तर अशाच वातावरणात वाढलो असतो.. तुझ्या पणज्यापण वाढल्या असतील.. याचीच जाणीव या मालिकेने करुन दिली..

यक्क का दक्शिणा? चांगली होती की मालिका. आपल्याच कुणीतरी आपल्या सुधारणांसाठी जिवाच रान केलं होतं त्यांच्या अयुष्याचा मागोवा होता तो. स्प्रुहा आणि विक्रम दोघांनीही अतिशय सुंदर अभिनय केला होता. तुला आवडली नसली तरी तुतिमी, मसाह सारख्या मालिकांसारखे तिला यक्क म्हणु शकत नाही. तेवढी नक्केच चांगली होती ती.

सानी आणि सस्मित दोघींशीही सहमत आहे मी. यक्स म्हणण्याइतकी वाईट नव्हतीच.... रादर त्या मालिकेमुळेच स्पृहा जोशीकडुन चांगल्या अभिनयाची अपेक्षा होती एलतिगोमध्ये

Pages