एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!

Submitted by मी मधुरा on 18 September, 2013 - 01:19

'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली. Sad

आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!! Happy

ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. Happy

सध्या मिळालेली माहिती:

कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
ekalagnachi.jpgमहत्वाचे:

इथे भांडत बसू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>जुनच दळण नव्याने दळणार असं दिसतय एकंदरीत चित्र

अपनी छत्री तुमको दे दे कभी जो बरसे पानी
कभी नये पॅकेट मे बेचे तुमको चीज पुरानी
फिर भी दिल है हिन्दुस्तानी

सुमित राघवनची 'सजन रे झूठ मत बोलो' ही मालिका मध्यंतरी कुठल्याशा चॅनलवर आली होती.
एलतिगो ही त्या मालिकेची मराठी आवृत्ती असल्याचे समजले. म्हणजे, त्या मुलाची फ्यामिली सगळीच खोटी असते म्हणे....
पहिल्या एपिसोडमध्ये शुभा खोटेचे आणि कामतचे डायलॉग ऐकून ती त्याची खरी आजी नाही हे समजले आणि वरच्या ऐकीव माहितीस दुजोरा मिळाल्यासारखे वाटले.
बाकी, डायलॉग सुमार वाटले.... स्पृहाला चिडण्याची अ‍ॅक्टिंग नीट जमली नाहिये...

स्पृहाला चिडण्याची अ‍ॅक्टिंग नीट जमली नाहिये... +१

काल चुकुन एक सीन पाहिला. त्यात ती स्पृहा उगाचच खुप मोठ्ठं स्माईल करत चिडल्याचे डायलॉग बोलत होती.

कबुल आहे कि तिची त्या सिरीयलमधली पहिली एंट्री होती ती.. पण बबली दिसायसाठी सारखं हसायची गरज नाही हे कधी कळणार ?

टायटल साँग सचिनने भयानक बेक्कार गायले आहे, इतका वाईट आवाजच हवा होता तर संखनेच गायला हरकत नव्हती!

सचिन तशीही सगळीच गाणी वरवरनंच म्हणतो कायम! त्याच्या गाणार्‍या आवाजाला डेप्थ नाही. त्याचे मराठी संवादही मला आवडत नाहीत. हिंदी संवाद त्यामानाने बरे वाटतात.

टायटल साँगबद्दल +१
त्या सलिल कुलकर्णीला त्या 'लालालाला.... तानाना दिंता तानाना' असल्या ललकार्‍यांमधून बाहेर काढा रे कुणी तरी...

त्या सलिल कुलकर्णीला त्या 'लालालाला.... तानाना दिंता तानाना' असल्या ललकार्‍यांमधून बाहेर काढा रे कुणी तरी...>>>>>>>>>>>> +१ Proud

ह्या सिरीयल मध्ये सगळ खोट खोट वाटत होत Happy ह्या पेक्षा खोट हसणारी जानव्ही वाटते Happy

पलंगाखाली झोपायचं प्रकरण हास्यास्पद होतं. शुभा खोटे (शुखो) आणि उका यांचा संवाद गंंमतीशीर होता. आधी शुखो उकाला सगळीकडे शोधत होत्या म्हणजे शोकेसच्या फळीवर पण(?). मग गजर वाजण्याचा फार्स झाला, नन्तर पलंगाखाली झोपलेल्या उकाची (झोपेतच) एन्ट्री. मग शुखो म्हणाल्या, "पलंगाखाली का झोपतोस?" यावर उकाचा प्रतिप्रश्न," रोज रोज हे का विचारता?" शुखोंना माहीत होतं हा असा झोपतो तर मग आधीच वाकून पहावं ना 'सुपरहिरो' उठले आहेत का नाही ते.

एकूण पहिला भाग सगळाच ओढूनताणून जमवलेला कृत्रिम वाटत होता. रच्याकने..ज्या घराच्या गेटातून उका बाईक घेऊन बाहेर पडला, ती एलदुगो तली काळेवाडी वाटली मला. खरं की काय?

यॅस, ते घर काळेवाडी चं होतं, थोडे बदल केले आहेत पण आपल्यासारखे चाणाक्ष प्रेक्षक कसे फसतील Wink

काय ती स्पृहा जोशी अहाहा जिथे तिथे झाशिच्या राणिसारखी तलवार उपसून लढाईला सुरू...
टिपिकल सुरूवात.. आणि खोटेपणावरून थोडा राडा होणारच की त्याशिवाय मालिकेला रंग कसा चढणार? चिमांला काय पाणीदार करायची सवय आहेच सगळं. :रागः

.ज्या घराच्या गेटातून उका बाईक घेऊन बाहेर पडला, ती एलदुगो तली काळेवाडी वाटली मला. खरं की काय?

>>>
+११११११११११११११११११११११११११

तरिही मला उका आवडतोच Proud

ललिता.... नाही ग सचिन चांगल गातो. उकाला त्याचा आवाज सुट नाही होत.... मला आवडतो सचिन इथे सगळ्यांना त्याचा इतका तिटकारा का आहे ते समजल नाही.....

तरिही मला उका आवडतोच..

>> मलाही.. पण काय फायदा? चिमा त्याची वाट लावणार असं दिसतंय सरळ सरळ Sad

मला का कुणास ठाऊक पण पहिल्यास भागात दोघेही हिरो हिरवीण अगदीच सुमार वाटले. राधा घनाची जी छाप पडली होती पहिल्या भागापासुन तसे कुठे भासले नाही.
असो पहिल्याच भागावरुन लगेच मत बनवणे चांगले नाही पण एकुणातच ओढुन ताणून वाद घालत असल्यासारखे वाटले.
मुक्ता वर्वेला डोक्यातुन बाजुला ठेवुन ही मालिका बघावी लागेल. Happy

शीर्षक गीताबद्दल नो कमेंटस

शिर्षकगीताबद्दल एकूणच मिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया ऐकू येत आहेत. माझ्या बहिणीला ते खूप आवडलंय. तिच्या मते सचिन फार उत्तम गायलाय. असो..

इथे सगळ्यांना त्याचा इतका तिटकारा का आहे ते समजल नाही.....>>>>मुग्धा तू एका पेक्षा एक बघतेस?

उलट त्याचा तिटकारा येउ नये म्हणून मी त्याचा कोणताच कार्यक्रम बघत नाही. (खुपते तिथे गुप्ते केवळ सुप्रिया त्यच्या बरोबर आली होती म्हणून पाहिला) पण या ना त्या कारणाने तो समोर येतोच.
टायटल साँग सचिनने भयानक बेक्कार गायले आहे, >>>+१०००००

स्पृहाचा अभिनय ओढून ताणून केल्यासारखा वाट्ला.. नैसर्गिकपणा अजिब्बात नाही.
आणि संवादात काय मार खातायत या सिरियल्स? Uhoh
परवा तो अनिल मी तुमच्या मुलिशी प्रेम करतो असं बोलला तर सध्या एलतिगो च्या एका प्रोमोत स्पृहा सारखं 'परवा माझा वाढदिवस असतो' असं म्हणताना दिसतेय सारखी..

स्पृहा हसत-हसत रागावल्यावर बोलायचे संवाद म्हणत होती, हे चुकीच वाटलं.
पण तिचा अभिनय चांगला असतो....कदाचित पहिल्यांदा हिरोईन बनल्याचा आनंद तिला आवरता आला नसावा.
उमेश पुढे तिचं जास्त छान अभिनय करते.
शिर्षकगीत सचिनच्या आवाजात नको होत, कारण उमेश कामतला तो आवाज सुट होत नाही.
बाकी पार्श्व संगीत ए.ल.दु.गो.चच वापरलं होत...ते मला आवडत.

उकाच्या घरी ती आजी नक्की कधी आली आहे? कधी घरात नवी असल्यासारखी दाखवतात तर तोंडी वेगळीच वाक्ये....

तो म्हातारा पण डोक्यात गेला. या वयातही आजीला त्रास देतोय...

Pages