नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Honar Sun Me Ya Gharchi.jpg

अशोककाका मी रात्री आवर्जून वाचते तुम्ही लिहिलेले, कौतुक आहे तुमचे सर्व मुद्देसूद मांडता.

भरतजी करेक्ट, मलापण तो संवाद खटकला, एवढे लक्ष दयायलाच हवे, हल्ली बऱ्याचदा चुकीचे मराठी बोलले जाते पण मालिकेत ह्या चुका टाळायला हव्यात.

झी मालिकांमधील सर्वात मठ्ठ / बावळट व्यक्तिरेखा :नामांकनं सगळ्यांना माहित आहेतच>>> Happy
सगळ्या मालिकां मधले खलनायक सोडून उरलेले.

मुग्धा.... साड्यासंदर्भात मी काही स्पष्टीकरण द्यायचे असेल तर इतकेच म्हणेन की, 'होणार...' मधील एकजात सार्‍या स्त्रिया या ना त्या कारणाने दु:खी वा पीडित आहेत [एकीचा पती देश सोडून गेला आहे, दुसरीचा वारला आहे, तिसरीच्या पतीला घराबाहेर काढले आहे, चौथी आपल्या पतीला सोडून माहेरी आली आहे, तर पाचवीचे आईवडील वारल्याने तिला अन्य घर नाही म्हणून ती आपल्या बहिणीकडे राहायला आली आहे...असा सारा कारभार आहे]....शिवाय 'गोकुळ' ची मालकीण सर्वार्थाने आजी दाखविल्या आहेत....तेव्हा साहजिकच त्यांच्यासमोर महाराष्ट्रीयन संस्कृतीनुसार पाचही स्त्रिया साड्यातच दाखविणे एकप्रकारे उचित मानावे लागेल.

त्यातल्यात्यात बेबीआत्याच पंजाबी ड्रेस घालू शकल्या असत्या....कारण त्या माहेरच्याच असून तशा लहानही आहेत....पण त्यानाही कायमपणे साडीतच दाखविले गेले आहे.

श्री च्या आज्जीबाई इतक्या कर्तबगार आणि मोठ्या घराण्यातल्या.. बिझनेस वगैरे केलेल्या असून. एखाद्या शपथेला त्यांनी इतकी भीक घालावी हे काही पटले नाही. सारासार विचार म्हणा किंवा एक अनुभव सिद्ध आयुष्य जगलेल्या बाईला विचारांना किंवा आपण ऐकलेल्या गोष्टीला गाळणी लावता येऊ नये? शशीकला बाई ही उपटसुंभ पण आपला नातू तर आहे ना वर्षानुवर्ष पाहिलेला? त्याच्या चॉईसवर इतका ही विश्वास नाही? Uhoh

अशोककाका मी रात्री आवर्जून वाचते तुम्ही लिहिलेले, कौतुक आहे तुमचे सर्व मुद्देसूद मांडता. ... +1

अशोक मामा मी नुसत या मालिकेबद्दल नाही तर एकुण सगळ्याच मालिकांबद्दल बोलत आहे आणि आई, आज्जी, काकु, मामी या पात्रांनी साड्या नेसण्याबद्दल नाही तर त्या मालिकेतील मुख्य पात्र जे लग्नाआधी पंजाबी ड्रेस मध्ये वगैरे दाखवले असते आणि लग्नानंतर फक्त साडी म्हणजे साडी....... चुकुन कधी पंजाबी ड्रेस घालायचा असा प्रसंग दाखवलाच तर नायिकेच्या चेहर्‍यावरचे भाव इतके अवघडलेले दाखवतात की तिला पंजाबी ड्रेस कसा घालतात हे सुद्धा माहित आहे की नाही अस वाटत..... त्या नायिकेचा नवरा पण तिच्याकडे अस बघताना दाखवतात की जशी काही त्याने तिला पहिल्यांदाच पंजाबी ड्रेस मध्ये बघितल आहे........ अस होत नाही ना कुठेच.....

अश्विनीमामी, बरेच दिवसांनी माबोवर? कुठे होता इतके दिवस? अहो या बायका झोपताना पण विथ मेकअप, विथ ज्वेलरी आणि विथ हेअरस्टाईल झोपतात. रात्रभर झोपुन उठल्या तरी डोक्यावरचा एक केस हललेला नसतो..... बेडमध्ये उठुन बसल्या बसल्याच इतक्या फ्रेश दिसतात की अंघोळ वगैरे उरकुन बेडवर पांघरुण घेउन बसल्या आहेत अस वाटत रहात......... कै च्या कैच अगदी

माझे पण साडी बाबतीत अनुमोदन. लग्न झाले कि नायिका ताबडतोब साडीत आलीच . ( मंजिरी/राधा/ आणखीन बर्याच असतील )काही मालिका अपवाद असतील पण जास्तीत जास्त मालिकांमध्ये लग्न झाल कि साडी मस्ट. हा काय वेडेपणा. आजकाल तर सगळ्याजणी लग्न झाल तरी हाफ प्यान्ट ( ३/४ ) आणि वरती टी शर्ट असतो Happy Proud

हो अग सुजा असच दिसतय..... साडित दाखवा एकवेळ पण तिला बाकीच्या नायिकांसारखी रडी दाखवु नका... नाहितर लग्नाआधी तडफदार दाखवलेल्या नायिका नंतर एकदम भिगी बिल्ली होउन बसतात.... आत्ता जशी कॉन्फीडंट आहे तशीच दाखवा नंतर पण म्हणजे मिळवली.

Mughdha la anumodan.

Tya manjiri cha asa h zala. Chikhal udavnaryla thobadit marnari ti manjiri lagna nantar paaaaar badloon geli. Ata nustach ti aho... tumhi asa kai boltay...... tumhala kahi kaltay ka? Evdhach bolte ragavli ki.

marathi madhe type hot nahiye. Ka kon jaane.

बुधवार दि.९ आक्टोबर २०१३ ~ अपडेट...

~ आज श्रीरंग गोखले यानी भागीरथीबाई याना त्या कशा 'डिक्टेटर' बनत चालल्या आहेत याची स्पष्ट शब्दात जाणीव करून दिली. "मी गेली २८ वर्षे माझ्या आजीशी बोलत होतो पण जान्हवी प्रश्नावर तू जी आडवी भूमिका घेतलेली आहेस ती पाहता तू आजी नसून भागीरथीबाई गोखले झाली आहेस....". आजीनी निग्रहाने 'मला गोखले घराण्याची सून म्हणून जान्हवी चालणार नाही....अन् माझी इच्छा डावलून तू जर तुझा लग्नाचा हट्ट कायम धरणार असशील तर मग....एकच निर्णय होईल....जान्हवी ज्यावेळी उंबर्‍याच्या आत येईल, त्यावेळी मी हा उंबरा ओलांडून कायमची बाहेर पडेन....". अशा भावनिक वाद-प्रतिवाद, मुद्दा-गैरमुद्दे, युक्ती-प्रतियुक्ती आदी संवादांनी ओतप्रोत भरलेली आजची मालिका खर्‍या अर्थाने प्रभावी केली ती श्री च्या भूमिकेतील शशांक केतकर यानी. त्या कलाकारात 'शशांक' नव्हताच मुळी....होता तो 'श्री' आणि जो जान्हवीशी आपण लग्न का करणार आहे हेच पोटतिडिकेने आजी आणि बाजूला पुतळ्यागत उभ्या असलेल्या बाकीच्या पाच आयांना सांगत होता. जशा आजी आपल्या निर्णयाशी ठाम तितकाच श्री देखील. शेवटी तर दिवाणखान्यातून बाहेर पडताना श्री सांगतोच...."आजी तुझा निर्णय काय असायचा तो असू दे, पण आता माझा ऐक....जर जान्हवीशी मला लग्नाची परवानगी मिळाली नाही तर मी इथे राहाणार नाही..." तिथून जातो तो.

आजच्या २०-२२ मिनिटांपैकी जवळपास २० मिनिटे याच दोघांवर कॅमेरा आणि संवाद बेतले होते, जे त्यानी उत्कृष्टपणे सादर केले....खूप ताणही आला होता वातावरणात. अर्थात निर्णय काही झालेला नाहीच.

या दरम्यान जान्हवी श्री ला फोन करते, पण तो स्वीच ऑफ करतो....जान्हवी तणावात आणि गीताशी बोलताना तिला सांगते की आज आमच्या लग्नाच्याबाबतीत श्री आजीशी बोलणार होता....त्याबाबतच तिथे काही घडत असेल का ? त्या जाणीवेने आलेल्या मानसिक दबावाला ती सोसू शकत नाही. आज फार अल्पकाळ तिला काम होते....साहजिकच.

बाकी एवढ्या मोठ्या संवाद प्रकरणात श्री आजीला एक बिनतोड प्रश्न विचारतोच...."आजी, जान्हवीच्या चारित्र्याविषयी कुणीतरी तुला येऊन सांगतो आणि तू ते सारे खरे मानतेस ? आणि मी जो जन्मापासून तुझ्याबरोबर आहे, तो इतक्य विश्वासाने त्या मुलीविषयी सांगत असताना माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस हे सारे अनाकलनीय आहे..." याला आजीकडे काहीच उत्तर नसले तरी त्या आपल्या हट्टाला चिकटून आहेत.

आजी माणसांची पारख असल्याचा दावा करतातना मग जान्हवीच्या आईची आधी पारख होते त्यांना देवळात आणि तिने मुलीबद्दल सांगितलं ते खरे वाटते त्यांना.

श्रीने आजीला खरंच बिनतोड प्रश्न विचारला.

साडीबाबत अनुमोदन, लग्नानंतर मोठ्या शहरात जवळ-जवळ १५-२० वर्षे ज्यांच्या लग्नाला झाली आहेत त्या साड्या क्वचितच नेसतात. मालिकेत मात्र आधी jeans घालणाऱ्या मुलीपण लग्नानंतर साड्यात दाखवतात.

Aaji tiche 'resources' vaaparun ya baatamichi khatarjama ka karun ghet nahi?

बघ ना चीकू.... एरव्हीच्या बाबतीत रीसोर्सेसची टीमकी वाजवायची आणि एक स्त्री आपल्या मुलीसंदर्भात अशी बातमी घेऊन आली असेल तर तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी निदान नातवासाठी तरी सूनेची खोलवर चौकशी करता आली असती....आणि मग आजचा आजीचा आक्रस्ताळेपणा दाखविण्याची गरज नसती.

मला तर भिती वाटत होती की श्री. आजी समोर backout करेल आणि जान्हवी ला बिचारीला एकटं सोडून देइल. पण श्री. ने चांगलच निभाउन नेलं की.
आजींचा आक्रस्ताळेपणा मात्र चीड आणणारा आहे.

अशोककाका, बहोत खूब... आणि मनापासून धन्यवाद. किती सुर्रेख लिहिता हो अपडेट.
(अगदी मालिकेतल्या कलकारांनीही वाचावं.. त्यांचं बघायचं राहिलं असल्यास Happy ... बाकीचेही प्रतिसाद त्यानिमित्तानं वाचले तर बरच होईल... मलिकेचं )

मला काल पहिल्यांदा इतर पाचही बायकांचे हावभाव आवडले. त्यांच्या भूमिकेच्या पार्श्वभूमीला समर्पक. उदा. बेबीआत्याकडे रोख वळतो तेव्हा अपमानित, नाराज अन मग श्रीने सडेतोड उत्तर देताच समाधानी.

Pages