Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46
झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'
इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज शेवटी मतदानासाठी आवाहन
आज शेवटी मतदानासाठी आवाहन करताना, जान्हवी पिवळ्या साडीत होती आणि श्रीपण शेरवानीत होता आणि पाठीमागे लग्नाचा सेट होता म्हणजे लवकरच शुभमंगल सावधान (हा स्वप्नातला शॉट नसूदे म्हणजे मिळवलं).
ओह थँक्यू काका
ओह थँक्यू काका
मस्त भाग. श्री चे कॅरेक्टर
मस्त भाग. श्री चे कॅरेक्टर सुरेख रंगवले आहे. व अभिनय देखील. आजींचे स्वगतही अगदी फुल टू १००% परफेक्ट दा खवले आहे. " आज हे हवे होते, पाठीव रून हात फि रवला अस्ता समजून घेतले असते" पासूनचे पूर्ण स्वगत अगदी ज स्ट राइट. अश्या भावना तंतोतंत ब र्याच प्रसंगी मनात आलेल्या आहेत. कर्ती बाई घरातल्यांना कधी कधी क ठो र वाटते पण तिच्यावर घर संसाराचे बाहेरच्या त्रासां पासून संरक्षण करायची मोठी जबाबदारी प डलेली असते. जे एखाद्या पुरुषा कडून सर्व ऐकून घेतील ते तिचे म्हणणॅ नेहमी ऐकूनच घेतले जा ते असे नाही. बरे घर चे काही बोलले तर ते त्रास शेअर करायला प ण को णी नसते. अश्या प्रसंगी बेड रूमा त
बसून रडणे हे अगदी स्वा भाविक. संवाद लेखकांना फुल मार्क्स. श्री जानव्ही अश्रुपात पण फार गो ड प्रसंग.
परचुरे आवडतात मला.
मला वाटतं की असं काहीतरी घडेल
मला वाटतं की असं काहीतरी घडेल की जान्हवीच्या नकळत आईआजीला तिचा स्वभाव कळून येईल. म्हणजे उदा. जान्हवी नसताना आईआजी बँकेत जातील आणि त्यांच्या समोर सर्व जान्हवीची स्तुती करतील किंवा त्यांच्या उपस्थितीत असा काही प्रसंग घडेल की जान्हवीची हुशारी आणि स्वभाव कळून येईल.
बघुया काय होतंय ते! घोडामैदान जवळच आहे!
जान्हवीचे श्रीला समजावतानाचे युक्तिवाद देखील चांगले होते!
आई आज्जींना बाबा अजोबांची
आई आज्जींना बाबा अजोबांची आठवण आली ते असते तरी भागीरथी बाईंनी त्यांना घरात ठेवले असते का?
अमा +1 कित्येकदा जेव्हा
अमा +1
कित्येकदा जेव्हा समोरचा काही ऐकूनच घेत नाहीये पण आपला मुद्दा अचूक असण्याच्या नादात तावातावाने बरंच बोललं जातं. वय, आदर, नाती मागून आठवतात तेव्हा घडलेल्या गोष्टी पुसून टाकाव्याशा वाटतात. पण तसे होत नाही दुर्दैवाने दोन्ही व्यक्ती ते कधीच विसरू शकत नाहीत माफ केले तरी. काल आजी व नातवाचे दु:ख वास्तव वाटले.
दुसर्या रुममध्ये नर्मदा धाय
दुसर्या रुममध्ये नर्मदा धाय मोकलून रडताहेत>>>>> या नर्मदा आई अशा पद्धतीत रडत असतात की घरात कोण तरी गेल आहे. काल तर मला जरा अती वाटल ते रडण......
ते असते तरी भागीरथी बाईंनी त्यांना घरात ठेवले असते का?>>>>>> आदिती ते असते तर आईआजी गोखले गृहउद्योग स्वकर्तुत्वावर उभी करु शकल्या नसत्या आणि परीणामतः श्री आणि जानुच्या लग्नातला अडथळा निर्माणच झाला नसता..... कारण जनरली अशा गुडी गुडी घरातले आजोबा प्रकरण सगळ्यात जॉली असलेले दाखवले आहे आजपर्यंतच्या मालिकांमधुन (उदा. कळत नकळत - ऋजुता देशमुखची मालिका)
जान्हवी आणि श्रीच शुभमंगल
जान्हवी आणि श्रीच शुभमंगल सावधान हे पहा
http://www.youtube.com/watch?v=cspD8R8gmac
जान्हवीने श्रीला छान
जान्हवीने श्रीला छान समजावले.....मला वाटले कि इतर ठिकाणी दाखवतात तसे करतिल कि जानू म्हणेल आता घरचे नाही बोलतात तर आपण नाही भेटायचे वगैरे वगैरे
मला वाटते जानूचा मामा येईल आणि अनिलचा बंदोबस्त करेल मग जानूची आई आजीला पुन्हा भेटून सांगेल कि अनिलने धमकी दिल्यामुळे तिला असे वागावे लागले. जानूच्या आईमुळे आजीचा गैरसमज झालाय तर तिच्याकडून त्याचा खुलासा झाला तर जास्त चांगले.
"...मला वाटते जानूचा मामा
"...मला वाटते जानूचा मामा येईल आणि अनिलचा बंदोबस्त करेल ..." ~ असे होईलसे वाटते....झालं तर आनंदच आहे म्हणा.
आता मामा म्हणून कोणाला आणणार
आता मामा म्हणून कोणाला आणणार आहेत काय माहित? नंतर हेच मामा न आई दोघे मिळून जावईबापूकडून धनलाभ होण्यासाठी बराच प्रयत्न करतील.....(मालिका वाढवण्यासाठी)
विडीओ क्लिप बघून अगदी घरातलं
विडीओ क्लिप बघून अगदी घरातलं कार्य असल्यासारखं वाटलं.
आज त्या जानाव्हीच्या मामाच
आज त्या जानाव्हीच्या मामाच क्यारेक्टर इंट्रोड्यूस झालाय . पण तो सगळाच सीन इतका बोरिंग होता. इतकी छान मालिका चालल्येय. आणि आत्ता हे काय नवीनच ?
ते मामाच्या रोलमध्ये जनार्दन
ते मामाच्या रोलमध्ये जनार्दन लावंगारे आहेत ना
शुक्रवार दि.११ आक्टोबर २०१३ ~
शुक्रवार दि.११ आक्टोबर २०१३ ~ अपडेट
~ भलताच कंटाळवाणा एपिसोड. असे वाटू लागले की खुद्द दिग्दर्शकाला तरी माहीत होते का की नेमके आज आपण जे चित्रीत करणार आहोत ते प्रेक्षकांपुढे नीटपणे पोहोचणार आहे की नाही. भाग सुरू झाल्या झाल्या शाळेतून घरी रडत आल्यासारखा श्री कॉटवर बसला आहे. उजव्या बाजूला त्याच्या आईचे कालपासूनचे धो-धो रडणे चालूच आहे तर डाव्या बाजूला मोठ्या आईने तोच सूर धरलाय. रडतभेकत त्या श्री ला सांगतात आजीने दार बंद करून घेतले आहे, उघडत नाही, ती जेवलेली नाही....आता तूच तिला सांभाळ...वाचव...वगैरे.... नातू त्याच क्षणी जाणार नाही...आजची रात्र जाऊ दे, मग मी सकाळी तिची माफी मागतो व हा विषय बंद करतो. सकाळी मनाची तयारी करून चहा घेऊन तो आजीच्या खोलीकडे जातो....दिवसभर दार न उघडणारी आजी आता नातवाचा आवाज ऐकल्यावर उघडते दार आणि श्री आत येतो...मग ते मोठाले संवाद ज्यात मी चुकलो की तू चुकलीस... माझी चूक झाली आहे आणि मी तुझी माफी मागतो... त्यावर आजीने ठामपणे सांगणे, श्री मी माझ्या मुलांनाही माफ केलेले नाही. श्री ची युक्ती....पण तू जोपर्यंत मला माफ केले असे म्हणत नाहीस तोपर्यंत तुझे पाय मी सोडणार नाही....आणि खाली बसतो व आपल्या आजीच्या पायाला प्रेमाने मिठी मारून ते घट्ट धरतो....आजी सोड सोड म्हणतात...त्याला उत्तर म्हणून श्रीरंगराव नाही नाही....माफ केले म्हण हा धोशा लावतात...मग आजी विरघळतात....करतात माफ....झाले संपला विषय.
इकडे जान्हवीच्या घरात तीही चेहरा टाकूनच स्वयंपाकपाणी करीत असताना वडील तिची अस्वस्थता ओळखतात आणि स्वत:ची शपथ घालून काय झाले आहे याची चौकशी करतात. जान्हवी शपथेमुळे सांगून टाकते की श्री च्या आजीने मला सून म्हणून स्वीकारण्यास आतातरी तयार नसून त्याना माझ्याविषयी काही शंका आहेत ज्या श्री दूर करेल. बापाला हे समजत नाही की आपल्या मुलीविषयी त्या आजीला कुणी भडकावीले?
सुरुवातीला शशीकलाबाईंचा बीड येथील भाऊ आपले सामानसुमान घेऊन बहिणीच्या घरी आलेला दाखविला आहे. त्याला पिंट्या आणतो...पण हा मामा एकदम अस्सलच आहे. चाळीत आल्याआल्या केळीवाल्याच्या गाडीवरील केळ्याचा घड चोरतो आणि पिशवीत घालतो....पिंट्याला समजून चुकते की आपले वडील या मामाविषयी जे काही बोलत होते ते खरेच आहे.
उद्याच्या कार्यक्रमात हाच मामा आपल्या बहिणीसमवेत अनिल आपटेकडून तो मोबाईल कसा मिळवायचा याचा प्लॅन आखतील.
काय त्या आयांना काही कॉमन
काय त्या आयांना काही कॉमन सेन्स नाही का. श्री फोनवर कामाचे बोलतानाही त्याला जेवण्यासाठी विचारत होत्या.
रच्याकने श्री नेहमी एकच वाक्य बोलतो...मी मेल पाठवलीये किंवा मेल पाठवा.
पण तो सगळाच सीन इतका बोरिंग
पण तो सगळाच सीन इतका बोरिंग होता>>+१ ...उगाच मसाला मामा आणला आहे.
याची टोपी त्याला घालणारा आहे तर गोड बोलून आपलं काम करुन घेणार, ज्याला टाळणे अवघड आहे असा, साळसूद दाखवायला हवा होता. याला बघून वा इरिटेट होऊन लोकं आधिच चार हात लांब राहतील.
अनिलला बाजूला करण्यापुरता असेल तर ठिक आहे...पण सिरियलभर नाचवणार असतील तर फाष्ट फॉर्वड!
kharach to mama agadich bore
kharach to mama agadich bore aahe...... mala vatala hota konitari khuskhushit actor aantil itaki hava keli hoti tyachi..... girish oak mast watale asate.... etv marathivarchya eka maliket tyani ashach prakarcha character khoop chan play kela hota......
आणि ते क्यारेक्टर पण इरसाल
आणि ते क्यारेक्टर पण इरसाल दाखवताना घाणेरड पण दाखवलाय. दातात काड्या घालणार. कानात बोट घालणार. शी
अशोककाका, खरंच आज बोअर झाला
अशोककाका, खरंच आज बोअर झाला एपिसोड,
मामाबद्दल सुजाला अनुमोदन.
मामाबद्दल सुजाला अनुमोदन.
gokhalyanchya divankhanyat
gokhalyanchya divankhanyat jyotiba fulencha photo aahey ka??
mama baddal Mugdha yana anumodan..
मेरेको बिलकूल नही आवड्या आज
मेरेको बिलकूल नही आवड्या आज का एपिसोड..! तो मामा बेरक्या आहे हे दाखवण्याच्या नादात काहीच्याकाही दाखवतात हे लोकं... म्हणजे केळी काय उचलतो, शर्ट काय चोरतो? समोरच्या बाईशी गप्पा मारून ग्रहांची वक्रदृष्टी आहे काय सांगतो, ओळख पाळख नसताना आजच्या काळात कोणती बाई असं ऐकून घेते समोरच्याचं...पकाऊ आहे तो... देवस्थळींना सांगायला हवं आजचा भाग फारच गंडला होता...
जान्हवी अनुमोदन श्रीयु...
जान्हवी अनुमोदन
श्रीयु... अहोजाहो नको करुस. मी सुरुवातीला अहोजाहो करत होते तर काहिजणी वस्सकन अंगावर आल्या होत्या म्हाइतै? मी दिलेली पाकृपण करुन बघणार नाही अशी धमकी दिली होती त्यांनी अहोजाहो केल तर..... मी अस काही नाही करणार पण खरच नकोच ते अहोजाहो.... आपल्याला मैत्री करायची न मग मैत्रिणीला कधी अहोजाहो करतात का?
एका बर्यापैकी प्लेझन्ट
एका बर्यापैकी प्लेझन्ट मालिकेत(अगदी जान्हवीची ती आई आहे कधी कधी अनबेअरेबल ..........पण अॅक्टिंग छान करते! आणि त्या तिकडे ६ आयाही !) इतकं किळसवाणं कॅरेक्टर का टाकलंय? अगदी त्या मामामुळे मालिकेचं बेअरिंगच स्पॉइल झालंय!
विपुलश्री मासिकाचे ऑक्टोबरचे
विपुलश्री मासिकाचे ऑक्टोबरचे संपादकीय या मालिकेवर आहे. हा धागा पाहून लिहिल्यासारखेच वाटतेय.
मानुषी, अगदी ! अतिशयोक्ती
मानुषी, अगदी !
अतिशयोक्ती किती करायची त्यालाही काही लिमिट !
मामाने ती केळी चोरून आपल्या
मामाने ती केळी चोरून आपल्या पिशवीत ठेवणे, वाळत घातलेला शर्ट चोरणे, चाळीतील स्त्रियांच्यासमवेत आगाऊपणा करणे हे प्रकार अक्षरशः केविलवाणे वाटले. बीडहून आलेले हे गृहस्थ, आपण मुंबईत येऊन असला चोरीचा प्रकार करत आहोत आणि भाचा ते पाहात आहे....त्याला काय वाटत असेल याचा विचारच नाही.
परवादेखील शशीकलाबाई त्या दुकानात जाऊन तासभर फोन करतात आणि बिल ५७ रुपये झाले असताना १० देतात...इतकेच नव्हे तर त्या दुकानदारावर वस्सदिशी ओरडतात....काय म्हणावे या प्रकाराला ? मुंबईतील धंदेवाईक दुकानदार....आपले बिल असे सुखासुखी सोडेल का ? साध्या कोथिंबिर, कडीपत्त्याचे दोन रुपये कुणी सोडत नाही, आणि इथे तर फोनचे ५७ रुपये...... दिग्दर्शकाने किती म्हणून स्वातंत्र्य घ्यावे ! अगम्य आहे.
गेल्या तीनचार भागात तर जान्हवीला टिकलीपुरतेच कॅमेर्यासमोर आणल्यासारखे वाटले.....काहीही लक्षणीय काम नव्हतेच तिला.
मामा म्हणुन जनार्दन लवंगारे
मामा म्हणुन जनार्दन लवंगारे यांना आणले आहे.
लोक्स.. वोटिंग केले का?
आजपासुन झी मराठी ला वोटिंग सुरु झाले.. मी करुन आले.. नंदन ला वोट
(परचुरेंचा अभिनय ऑलरेडी सगळ्यांनी पाहिलाय. नवीन कलाकाराला वाव द्यावा थोडासा).
पियु.... व्होटिंगविषयी
पियु.... व्होटिंगविषयी टीव्हीवर पाहिले आहे.....पण मी इथून नेटवरून करू शकतो ना ? गाईड कर, प्लीज.
Pages