नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मान्य सोनाली.... त्याला माहीत नसल्याने तो फोन कुणीतरी आगाऊपणे केला असेल असे आपटे मानतो. पण मुद्दा असा की डीएसपी ऑफिसमधून तक्रारीसंदर्भात थेट त्या व्यक्तीला फोन केला जातो का ? बहुधा नसावे.... कारण आरोप आहे गुन्ह्याचा....तोही एका तरुणीच्याबाबतीत....इतक्या हलकेपणाने डीएसपी पातळीवरील अधिकारी हे प्रकरण हाताळणार नाही.... तरीही, बेटर वेट अ‍ॅण्ड सी.

@ स्वरुप ~ बाप रे !! तेजश्री प्रधानचे वेगळे रुप आहे "लग्न..." मध्ये ? खलनायिकेचे ? मग आम्हाला नकोच हा चित्रपट....आम्ही तिला 'जान्हवी' म्हणूनच ओळखतो, त्यामुळे तिच ओळख राहू दे.

ashokji khalanayika nahi vegala roop mhanje vegala look.... promos madhye pahila aahe tya picturemadhe tine modern mulucha role kela aahe....... Janhavichya imagechya ekdam opposite

shree chi acting pan khup chan aahe,disto hi god.Mature,responsible yet romantic,dialogs hi chan aahet.Serial miss jari zali tari Ashok kakanch review vachte,thnx kaka Happy

मुग्धा....तू म्हणतेस तसेही असेल....पण आता तेजश्रीला 'जान्हवी' च्या रुपात पाहून इतकी सवय झाली आहे की तिला अन्य रोलमध्ये स्वीकारताना जडच जाईल....किमान "सून...' मालिका संपेपर्यंत.

@ रानभुल ~ थॅन्क्स.... गंमत म्हणजे उलटपक्षी मलाच हे अपडेट्स लिहिणे आवडत चालले आहे.... बाकी शशांक केतकरने साकारलेला 'श्री' सर्वांच्या हृदयात घर करणारा आहेच आहे....सर्वार्थाने सज्जन, सुशिक्षित, सुसंस्कृत युवक.....जवळपास ७० एपिसोड्स झाले असतील पण एकातही श्री ने वक्र अभिनय केलेला दिसत नाही....असे बेअरिंग सांभाळणे, टिकवून ठेवणे कठीण काम असते.

अशोककाका.. फेसबुकवर आहे तेजश्रीचे प्रोफाइल..

(अजुनतरी).. आपण तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवु शकतोय.. तिला तुमची लींक पाठवते.. Happy

मालिकेच्या सगळ्या पंख्यांसाठी...

हे तर झाल अगदी साग्रसंगीत "तु मला मी तुला गुणगुणु लागलो" वगैरे गाउन.....Marathi serial2.jpg

आता लवकर लवकर या दोघांचे हे रूप पाहायला मिळो रे बाबा!
Marathi serial1.jpg

आणि नंतर हे
Marathi serial3.jpg

हो काका, खरय तुमच्,म्हणुनच श्री आवड्तोय सगळयाना.अजुन तरि छान पकड घेतलिये मालिकेने,तेजश्री च पण् काम छान आहे.

अगं पियू.... पण मी फेसबुकचा सदस्य नाही ना !! अडचणच आहे म्हणायची मग.

>> कोणीतरी असेल कि घरातले.. किंवा भाची तर नक्की असेल तुमची.. Happy

सोमवार दि.७ आक्टोबर २०१३ ~ आजचा एपिसोड

~ अगदी प्रसन्न करणारे वातावरण....सारा ताणतणाव हलका वा निघून गेल्याचे दिसत असल्याने आज श्री आणि जान्हवी जोडी मस्त मजा करीत आपल्या लग्नाविषयीची स्वप्ने पाहात होती.....अर्थात त्यांच्या दृष्टीने हे साहजिकच; पण ते इतके सहजासहजी शक्य झालेले नाही. सुरुवातीलाच श्री आपला शिपाई नंदनला लग्नाविषयी माहिती देतो त्यावेळी आनंदलेला नंदन सर्वांसाठी मिठाई आणतो असे सांगून बाहेर पळण्याच्या तयारीत असतो. श्री त्याला थांबवितो...म्हणतो, "अरे इतक्यात घाई करू नकोस. अजून काही अडथळे आहेतच, त्यातील प्रमुख म्हणजे सायली..." असे म्हणताक्षणीच दरवाजा उघडून सायली आत प्रवेश करते. श्री समोर उग्रपणे उभे राहून त्याला त्याच्या वर्तनाचा जाब विचारते. श्री ला माहीत झालेले आहेच की सायलीने आपल्या अस्तित्वातच नसलेल्या प्रेमाचा अतिरंजीत पाढा सहाही स्त्रियांसमोर वाचला आहे....त्यानी श्री देखील त्या प्रेमात सामील असल्याचे गृहित धरले आहे. ही बाब लक्षात ठेवून श्री संधी साधतो आणि सायलीला नकळत मोबाईलमधील टेपरेकॉर्डर चालू करून तिच्याशी असे संवाद करतो की त्यातून हे सिद्ध होते की सायली आपल्या प्रेमाची कबुली देते पण श्री प्रेमाला साथ का देत नाही हा प्रश्नही आपल्याला पडला आहे हे कबूल करते. श्री ला नेमके हेच हवे असते.....नंतर बस स्टॉपवर तो जान्हवीला ती टेप ऐकवितो....तिच्या नजरेतही आता श्री फक्त आपल्याशीच प्रेमाच्याबाबतीत प्रामाणिक आहे हे उमटते....ती अर्थातच खूष.

इकडे आजी बंगल्यावर त्या द्विधा मनस्थितीत एकट्याच बसल्या आहेत....पहिलाच एपिसोड असेल की जिथे अन्य पाच स्त्रिया गैरहजर दाखविल्या आहेत. श्री आत प्रवेश करतो आणि आजीजवळ जातो...तिच्या तब्येतीविषयी चौकशी करतो....चिंतेचे कारणही विचारतो....आजी त्याला सांगते, "जर मी तुला जान्हवीबरोबर लग्न करू नकोस असे सांगितले तर तू ऐकशील...?" या प्रश्नावर श्री अजिबात संतापत नाही. तो खूप संयतपणे हा प्रश्न स्वीकारतो आणि आजीला सांगतो की हे विचारण्यामागे तुझी भूमिका मला सांग. जर तुझा गैरसमज झाला असल्यास तो मी दूर करण्याचा प्रयत्न करतो....आजी त्याला उद्या सारे सांगते असे आश्वासन देतात आणि तिथून निघून जातात.

अनिल आपटे चाळीत फेर्‍या मारत असतानाच पोलिस व्हॅन तिथे येते....दोन पोलिस उतरतात. ते पोलिस 'तुम्हीच अनिल आपटे का ?" असे विचारल्यावर आपटे त्यानाही गुर्मीत उत्तर देण्याचा प्रयत्न करतो तर त्याला उचलून गाडीत घातले जाते. दुसर्‍या दिवशी जान्हवी व श्री बस स्टॉपव गप्पा मारीत उभे असताना दुसर्‍या बाजूने अनिल आपटे येतो....श्री जान्हवीला बाजूला करतो आणि त्याला सामोरे जातो...पण आपटे अगदी खालच्या आवाजात 'मला जान्हवी मॅडमशी बोलायचे आहे...' अशी विनंती करतो....ही दोघेही चकीतच होतात. जान्हवी पुढे येताच आपटे तिची झाल्या सार्‍या प्रकाराबाबत क्षमा मागतो आणि माझा मुलगा अजुनी लहान आहे, त्याला काही त्रास होणार नाही म्हणून तुम्ही परत एकदा डी.एस.पी.सरांना फोन करा...' अशी याचनाही करतो. जान्हवीला हे सारे आश्चर्याचा धक्का देणारे प्रकरण वाटते.....आपटे मान खाली घालून गेल्यावर ती श्री ला ही डीएसपी काय भानगड ? असेही विचारते....श्री खांदे झटकून जणू काही आपल्याला त्यातील माहीतच नाही असा आव आणतो आणि स्मितहास्य करतो.

जोडी मजेत आहे आता.

Dhanyavaad Ashok mama Happy Ekun gaadi rulavar yetay asa disatay tar!

पियू.... येस्स... एक भाचा आहे फेसबुकवर... त्याच्या अकौंटचा अ‍ॅक्सेस मला करता येतो ?

चीकू... तसं दिसतंय खरं....पण अजून गाडी रुळावर आली आहेच असेही नसते....कायबाय डोक्यात येत असते या निर्माता दिग्दर्शकांच्या....आयत्यावेळी लेखकाला प्लॉट बदलायला लावतात...टीआरपी जबरदस्त मिळाला आहे ना या मालिकेला....त्यामुळे लोकप्रियता एनकॅश करून घेतात ही मंडळी.

अशोककाका मस्त, आज मी वाट बघतच होते तुमच्या अपडेट्सची कारण आजचा एपिसोड मी बघितला नव्हता, धन्यवाद.

खुद्द श्री कडून कळालेली बातमी.. दसऱ्याला लग्नाचा बार! मार्क युवर कॆलेंडर्स! Happy (आता त्याने आम्हालाही शेंडी लावली असेल तर माहीत नाही हां. पण ज्या गतीने घटना घडतायत त्यावरून दिल्ली अब दूर नहीं)—

जो_एस.....

रात्री ८ वाजता "होणार सून..." एपिसोड पाहिल्यावर काही वेळ घरातील [आणि शेजारच्या फ्लॅटमधील जोडपे, जे आमच्याकडे हा कार्यक्रम पाहायला येते] मंडळीसमवेत भागाविषयी इकडचीतिकडची चर्चा झाल्यावर महिला वर्ग आपआपल्या कामाकडे जातात, मुले अभ्यासाला वगैरे....मी कॉम्प्युटर रूममध्ये परततो.... मग डोक्यात विषय ताजा असल्याने तो लागलीच टंकून घेतो....मात्र इथे पोस्ट करतो ते रात्री ११ वाजता रीपिट टेलिकास्टिंग झाल्यानंतरच...कारण इथले काही सदस्य असेही आहेत की, जे रात्री ११ चा एपिसोड पाहतात. त्यांचा मालिकेतील आनंद कमी होऊ नये म्हणून ११.३० नंतर कथानक पोस्ट करतो.

आशुडि,तु श्रीला ओळखतेस्...त्याला म्हणाव..मस्त काम करतोस

आशूडी.... तुमची श्री बरोबर ओळख आहे ? व्वॉव ! ग्रेट देन.....भेटल्यावर आपल्या ह्या धाग्याची त्याना जरूर माहिती द्या..... लग्नाची बातमीदेखील खरंच खरी ठरावी.....आता त्या जोडीपेक्षा आम्हालाच घाई झाली आहे. होऊ दे एकदाचे लग्न....आणि येऊ दे जान्हवी त्या 'गोकुळ' बंगल्यात सून म्हणून...बाकी पुढचे पुढे !

लोक्स, माझी नाही, माझ्या ठाण्याच्या काकांची आहे. तो लहान असल्यापासून त्याच्या आई वडीलांशी. या धाग्याची लिंक पाठवेन त्याला. Happy

जरूर पाठवा लिंक.... तसे पाहिले गेल्यास हल्लीच्या काळातील सुशिक्षित युवा वर्ग आय.टी. संलग्न असतोच, त्यामुळे आपण करीत असलेल्या भूमिकेसंदर्भात जालीय जगात काही लिखाण येत असेल तर ते ही मंडळी मिळवून वाचतातच..... तरीही 'मायबोली' चा संदर्भ श्री ला मिळाला तर चांगलेच आहे.

या धाग्यामधे वरति जो फक्त जान्हविचा फोटो आहे, तिथे त्या दोघान्चा असलेला फोटो टाका ना प्लिज ...
या मालिकेचा मेन दुवा श्री देखिल आहे.. मग त्याचा पण फोटो हवा ना.. Uhoh

माझ्या मते आयांचे एकावर एक होणारे गैरसमज बघता श्री आणि जान्हवी पळून जाऊन लग्न करणार आणि डायरेक्ट आशीर्वादासाठी उभे राहणार घरच्यांसमोर Happy
गेले काही दिवस तशी हिंट सुद्धा देतोय श्री त्याच्या बोलण्यातून.

आणि लग्नाआधीच सगळे गैरसमज मिटवले तर , जान्हवीला सासवांचा काही त्रास भोगावा नाही लागणार , मग टी आर पी कमी होइल ना

अगो....

नाही....तसे होणार नाही, कारण ना श्री ना आजी अत्यंत आग्रही स्वभावाचे दाखविले आहेत. दोघेही कुठलाही विषय तुटेपर्यंत ताणायचा नाही अशाच प्रवृत्तीची रंगविली आहेत. त्यामुळे आजीच्या मनी जान्हवीविषयी जरी किंतू आला असला तरी [जान्हवीची चूक नसतानाही] श्री तिची योग्य रितीने समजूत काढेल आणि मग एक दोन एपिसोड्स नंतर आजीच्या मनात जान्हवीविषयी प्रेम निर्माण होईलच, असे वाटते.

आणि लग्नाआधीच सगळे गैरसमज मिटवले तर , जान्हवीला सासवांचा काही त्रास भोगावा नाही लागणार , मग टी आर पी कमी होइल ना>>>>> नाही होणार आजी सोडुन सगळ्या सासवांना सासरे (म्हणजे त्यांना त्यांचे नवरे आणि स्वतःला सासरे) मिळवुन द्यायचे आहेत नं जानुला????

स्नेहा.... फोटो बदलाचा अधिकार हा धागा सुरू केलेल्या मधुरा कुलकर्णी यांच्याकडेच असणार....त्याच चित्रात वा मजकुरात संपादन करू शकतात.

धन्यवाद अशोक काका. Happy

@ मधूरा.. जर तुम्हाला योग्य वाट्ले तर प्लिज श्री आणि जान्हवि दोघान्चा सोबत असलेला फोटो टाका ना...

अशोकजी तुमचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे.

दसऱ्याला लग्नाचा बार! मार्क युवर कॆलेंडर्स! >>> म्हणजे त्याच्या आत सगळे गैरसमज दूर व्हावे लागतील....

Pages