फोटोग्राफी स्पर्धा.. सप्टेंबर..."अँगल" "वैशिष्ट्यपुर्ण कोन" निकाल

Submitted by उदयन.. on 2 September, 2013 - 09:33

नमस्कार,

दरमहिन्या प्रमाणे " सप्टेंबर " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.

यंदाचा विषय आहे... "अँगल" "वैशिष्ट्येपुर्ण कोन"

निकालः-

पहिला क्रमांकः- अजय पडवळ

1st ajay padwal.JPGविषयाला अनुरुप, योग्य फ्रेम आणि महत्वाच म्हणजे डेप्थ ऑफ फिल्ड उत्तमरीत्या कॅप्चर केली आहे.

द्वितीय क्रमांकः- इन्ना

2nd inna.JPGयात सगळ्यात जास्त आवडली ती फ्रेम. नुसताच पाईप ऑर्गन कव्हर न करता वरील बाजुची लाकडी चौकट कॅप्चर केल्या मुळे फोटोला एक नॅचरल फ्रेम मिळाली आहे त्यातिल गोल आकार फोटोला आणखी उठावदार बनवतो.

तृतिय क्रमांक :- १) प्रसन्ना - दीपमाळ

3rd prasanna deep mal.jpg२) सौरभः- सुर्याचा बल्ब

3rd saurabh.jpgविषयाचा विचार केला तर आम्ही तो असा गृहित धरला होता.... "अश्या कोनातुन काढलेला फोटो जो कोन त्या वस्तु/व्यक्ती/प्रसंगा चा फोटो काढतांना विचारात घेतला जात नाही".... हे दोन्ही फोटो या कल्पनेत योग्य बसतातच पण त्या बरोबर ते एक वेगळा आकार/अनुभुती निर्माण करतात म्हणुन यांची निवड केली आहे.
सौरभ यांनी अचुक टायमिंग साधुन तो फोटो बनवला आहे.. हा सुध्दा एक मुद्दा लक्षात घेतलेला आहे

उत्तेजनार्थः-

१) झकासरावः-

uttejanarth zakas.JPGडोस्याचा मस्त अँगल घेउन घेतलेला फोटो.. त्यामुळे त्या खाद्यपदार्थाकडे बघण्याची वेगळीच दृष्टी मिळते

२) तृष्णा:-

uttejanarath trushna.JPGअँगल अ‍ॅडजेस्ट करुन घेतलेला फोटो आहे... टॉवर चे अगदी सुरवातीचे टोक सुध्दा पुर्ण येईल याची काळजी घेतली आहे...

अश्या पध्दतीचे एक वेगळ्याच फोटोंच्या दुनियेतुन घ्या फोटो.... नेहमी पाहणार्या वस्तुकडे आता वेगळ्याच कोनातुन पाहण्याचा प्रयत्न करा....

यावेळी आपल्याला शक्य असल्यास ( शक्य कराच ) कॅमेर्‍याची सेटींग्स याचा सुध्दा उल्लेख करावा...... जेणे करुन इतरांना सुध्दा माहीती होईल फोटो काढण्यासाठी काय काय करावे....

जिप्सी, शापित गंधर्व आणि मार्को पोलो ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...

नियमः-

१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......

"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..

चला तर करुया सुरुवात

***********पिकासा वरुन मायबोलीवर फोटो कसे अपलोड करायचे या माहीती साठी खाली*********************.

http://www.maayboli.com/node/43465

Group content visibility: 
Public - accessible to all site users

के. अंजली.. सप्टेंबर महिन्याची स्पर्धा आहे ना ही. महिना संपल्याशिवाय निकाल कसा लागणार?

नमस्कार मंडळी..

हे दोन माझ्यातर्फे...
१. पानगळ - पानगळीचा हंगाम आणि लाल, पिवळ्या, हिरव्या रंगाची उधळण... ह्या झाडांनी बहरलेले डोन्गर दुरुन पाहायला सुंदर वाटतात... ह्याच झाडांच्या खालून चालणे ही तितकेच मनमोहक वाटते. हा असाच चालताना घेतलेला फोटो

पानगळ

२. कन्यादान - कन्यादानाचा विधी आणि त्यातील नजाकत टिपण्याचा हा प्रयत्न... पित्याने कन्येच्या हातावरून जावयाच्या हातावर सोडलेले प्रतिकात्मक पाणी जमिनीलगतच्या कोनातून टिपलेले..

DSC_0646

माझा पहिलाच प्रयत्न....

U S Air Force Academy Colorado Springs, Colorado Cadet Chapel.....

बाजूच्या टेकडीवरून
CSAFACC1.jpg

आतल्या दालनातून
CSAFACC2.jpg

धन्यवाद..पियु परी, इंद्रधनुष्य, चैत्राली..पण छायाचित्र २-२ वेळा कसे आले ते मलाही नाही कळले. काढून टाकण्याचा प्रयत्न करतो..

आज चा शेवटचा दिवस......................................................

लवकरात लवकर..........आपले प्रकाशचित्र द्यावे.......................

धन्यवाद.........................................................................

खुपच छान विषय आणि सर्वानी अपलोड केलेले छायाचित्र सुद्धा तितकेच अप्रतिम आहेत.
मला तर आपल्या जजेस चे कौतुक तर वाटतेच पण दया सुद्धा येते कारण खरेच तारेवरची कसरत आहे विनर घोषित करायला...

खुप खुप शुभेच्छा !!!

आता "माझी छायाचित्रे" मी येथे अपलोड करतो...
सर्वाना आवडतील अशी आशा...

फोटो क्रमांक १ :

फोटो क्रमांक २ :

धन्यवाद

उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल........

सप्टेंबर महिन्याचा विषय इथे संपतो...........

ऑक्टोंबर महिन्याचा विषय थोड्यावेळात

सर्व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन.............

यंदा स्पर्धेत बरेच सुरेख फोटो आलेले त्यातुन निवडायला जरा वेळ लागलाच Happy

खुपच छान परिक्शण... आणि विश्लेशण पण...

बरेच जणान्चे फोटो सुन्दर होते पण थीम समजुन घेणे पण तितकेच महत्त्वाचे आहे हे पण आता सर्वाना कळून चुकेल.

विजेत्यान्चे अभिनन्दन...

विश्लेषण अगदी योग्य

विजेत्यांचे अभिनंदन!

खाद्यपदार्थाकडे बघण्याची वेगळीच दृष्टी मिळते>>> Lol
घ्या म्हणजे खाद्यप्रेम जजेसना पण कळालं म्हणायच Proud

विजेते फोटो अप्रतिमच आहेत.
पहिला तर वॉव!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

अभिनंदन विजेत्यांचे. Happy
जजेस आभार..

विजेत्यांचे मनापासुन अभिनंदन. सर्व विजेत्यांचे फोटो एकत्र पाहुन छान वाटले. सुंदरच आलेत. प्रथम क्रमांक फोटो तर अप्रतिम!!

Pages