फोटोग्राफी स्पर्धा.. सप्टेंबर..."अँगल" "वैशिष्ट्यपुर्ण कोन" निकाल

Submitted by उदयन.. on 2 September, 2013 - 09:33

नमस्कार,

दरमहिन्या प्रमाणे " सप्टेंबर " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.

यंदाचा विषय आहे... "अँगल" "वैशिष्ट्येपुर्ण कोन"

निकालः-

पहिला क्रमांकः- अजय पडवळ

1st ajay padwal.JPGविषयाला अनुरुप, योग्य फ्रेम आणि महत्वाच म्हणजे डेप्थ ऑफ फिल्ड उत्तमरीत्या कॅप्चर केली आहे.

द्वितीय क्रमांकः- इन्ना

2nd inna.JPGयात सगळ्यात जास्त आवडली ती फ्रेम. नुसताच पाईप ऑर्गन कव्हर न करता वरील बाजुची लाकडी चौकट कॅप्चर केल्या मुळे फोटोला एक नॅचरल फ्रेम मिळाली आहे त्यातिल गोल आकार फोटोला आणखी उठावदार बनवतो.

तृतिय क्रमांक :- १) प्रसन्ना - दीपमाळ

3rd prasanna deep mal.jpg२) सौरभः- सुर्याचा बल्ब

3rd saurabh.jpgविषयाचा विचार केला तर आम्ही तो असा गृहित धरला होता.... "अश्या कोनातुन काढलेला फोटो जो कोन त्या वस्तु/व्यक्ती/प्रसंगा चा फोटो काढतांना विचारात घेतला जात नाही".... हे दोन्ही फोटो या कल्पनेत योग्य बसतातच पण त्या बरोबर ते एक वेगळा आकार/अनुभुती निर्माण करतात म्हणुन यांची निवड केली आहे.
सौरभ यांनी अचुक टायमिंग साधुन तो फोटो बनवला आहे.. हा सुध्दा एक मुद्दा लक्षात घेतलेला आहे

उत्तेजनार्थः-

१) झकासरावः-

uttejanarth zakas.JPGडोस्याचा मस्त अँगल घेउन घेतलेला फोटो.. त्यामुळे त्या खाद्यपदार्थाकडे बघण्याची वेगळीच दृष्टी मिळते

२) तृष्णा:-

uttejanarath trushna.JPGअँगल अ‍ॅडजेस्ट करुन घेतलेला फोटो आहे... टॉवर चे अगदी सुरवातीचे टोक सुध्दा पुर्ण येईल याची काळजी घेतली आहे...

अश्या पध्दतीचे एक वेगळ्याच फोटोंच्या दुनियेतुन घ्या फोटो.... नेहमी पाहणार्या वस्तुकडे आता वेगळ्याच कोनातुन पाहण्याचा प्रयत्न करा....

यावेळी आपल्याला शक्य असल्यास ( शक्य कराच ) कॅमेर्‍याची सेटींग्स याचा सुध्दा उल्लेख करावा...... जेणे करुन इतरांना सुध्दा माहीती होईल फोटो काढण्यासाठी काय काय करावे....

जिप्सी, शापित गंधर्व आणि मार्को पोलो ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...

नियमः-

१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......

"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..

चला तर करुया सुरुवात

***********पिकासा वरुन मायबोलीवर फोटो कसे अपलोड करायचे या माहीती साठी खाली*********************.

http://www.maayboli.com/node/43465

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लै भारी! असेच वेगळे विषय द्या. मस्त मस्त प्रचि बघायला मिळतील. आता उद्यापासून सगळे माना वेड्यावाकड्या करत फोटो काढतील..... Happy

आता उद्यापासून सगळे माना वेड्यावाकड्या करत फोटो काढतील..>> अहो नुसत फोटो काढतानाच नाही तर फोटो बघताना सुद्धा माना वेड्यावाकड्या कराव्या लागतील Happy

आता उद्यापासून सगळे माना वेड्यावाकड्या करत फोटो काढतील..... स्मित <<< असे फोटो काढणार्‍यांचे फोटो काढलेत तरी चालतील स्पर्धेला Happy

चला मी करतो सुरुवात Happy
१) जंजिर्‍याच्या एका कोनाड्यातुन साधलेला हा कोन:
IMG_5547_0.JPG

२) Waiting For Someone Happy
IMG_3486.JPG

१) खादाडीचा एक कोन Wink

हा पिंची मधील एका गटग च्या वेळी काढलेला फोटो.

साइझ कमी केला.

1

एफ ४.५
एक्सपोजर १/८०
आयएसओ ४००
फोकल लेन्थ ७८
कॅमेरा तोच तो जुना सोनी एच ७

बा द वे, डोस्याच्या मागे चन्द्रासारखं काही आहे का नाही ते निरखुन पहा.
असल्यास काय असेल गेस करा..

२) शिवनेरी हत्ती दरवाजा वरील खिळे

1

एफ ४
एक्सपोजर १/४०
आयएसओ १००
फोकल लेन्थ ५.२
कॅमेरा तोच तो जुना सोनी एच ७

खादाडी कोन मस्त आहे. > +१

विषय आवडला.. चला वैशिष्ट्यपुर्ण फोटो येऊ द्या.

मस्त विषय आणि फोटो पण, जजेस आणि आयोजक यांना दाद द्यायला हवी, एकदम प्रोफेशनल स्पर्धांसारखं विषयात वैविध्य येतय. काढावेत आत्ता फोटू Happy

खादाडी कोन भारीय..

बाकी सगळेच फोटो मस्त आहेत

झकासराव खादाडीचा फोटो पिन्चि गटग(भक्ती-शक्ती) चा आहे ना.>>>>>> हो

उदय, फक्त दोनच फोटोंची मर्यादा शिथील कर ना. नेमके दोन कोणते द्यावेत हेच कळत नाही. Uhoh Proud

मस्त विषय....

हा हेलिकॉप्टर मधून काढलेला नायगरा धबधब्याचा फोटो. फोटो लेकीने काढला आहे ( वय १२ वर्षे)

DSC04401.JPG

दूसरा नंतर शोधुन टाकते....

ह्याची हाइट विड्थ कशी बदलायची????>>> फोटो देण्यासाठी तुम्ही जी लिंक वापरता आहात त्यात एका ठीकाणी साईझ दिलेली असते. ती कमी केलीत की फोटो छोटा होतो.
उदा. - खाली दिलेल्या लिंक मधे /s640/ ही साईझ आहे. तुमच्या फोटोच्या लिंक मधे ती बहुदा /s800/ असावी.

img src ="https://lh6.googleusercontent.com/-t59v9pju67U/TwKuIKJT2EI/AAAAAAAABLs/L.../s640/34.jpg"

शापित गंधर्वः- तो खांबांचा फोटो कुठला आहे?>>>> नान हुआ - चायनिज बुध्द मंदिर

Pages