लेह - सार्चू - मनाली - चंदिगढ हा ७५० कि.मी. पेक्षा जास्त असा परतीचा प्रवास होता. त्यामुळे अकरा पैकी ७ मेंबर लेह वरुन माघारी परतले. संदिप, गिरी, जिप्सी आणि मी असे चार जण परतीच्या प्रवासाला निघालो. चारच मेंबर कमी झाल्यामुळे टुर ऑपरेटला टेंपो ट्रॅव्हलर ऐवजी INNOVA पाठवण्याची विनंती केली आणि त्याने ती लगेच मान्यही केली.
आज आम्हाला लकीची सोबत होती. आम्ही मुंबईचे आहोत हे कळल्यावर स्वारी जाम खुष झाली. शाहरुख, सलमान से मिलना है.. उसके लिए बॉलीवुडमे व्हिलन बनने को भी तैयार है... लकी एकदम जोष मधे सांगत होता.
प्रचि १
आजचा लेह ते सार्चु हा प्रवास २५१ कि.मी. चा होता. NH-21 वरुन निघाल्यावर वाटेत शे, थिकसे, कारु करत उपशीला पोहचलो. रुमस्ते गावानंतर पुढे क्याम लुंग्पा दिसतो. त्यापुढे घाट सुरु झाला... घाट संपल्यावर डावीकडे त्सोकारला जाणारा कच्चा रस्ता दिसला. पण वेळे अभावी तिकडे जाणे शक्य नव्हते.
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५ 'टांगलान्गला'चा घाट रस्ता
प्रचि ६
प्रचि ७ टांगलान्गला
प्रचि ८
प्रचि ९
मनाली लेह रस्त्यावर वाहनांची तुरळक वर्दळ असते... बाकी सगळा सन्नाटा. टांगलान्गला पार केल्या नंतर मुर प्लेन्स दिसू लागले. दोन डोंगरांच्या पठारी भागातुन एक सरळसोट रस्ता जातो.. अगदी F1 च्या Track सारखा..
प्रचि १०
प्रचि ११
या रस्त्याच्या दुतर्फा निसर्गाने अफलातून किमया केली आहे.
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
मुर प्लेन्सचा रस्ता संपला की समोर अचानक पांगची दरी आवासून उभी असते. या रस्त्यावरील निसर्गाच्या वैविध्याने डोळे दिपुन गेले. पांगचा घाट उतरुन खाली आल्यावर जेवणासाठी थांबलो.
प्रचि १५
जेवुन निघालो... वाटेत फारस कोणीच दिसत नव्हत... एखाद दुसरा मालवाहू ट्रक दिसला तर... बाकी सन्नाटा!!!
प्रचि १६
प्रचि १७
संध्याकाळी पाचच्या सुमारास आम्ही १६,५९८ फुटांवरील लाचुलुंगला वर पोहचलो..
प्रचि १८
लाचुलुंगा उतरायला सुरवात करणार तोच समोरुन एक फॉरच्युनरवाला आला आणि पुढिल रस्त्याची विचारपुस करु लागला. त्याच्या गाडीत काही तरी बिघाड झाला होता आणि त्यामुळे गाडीतील तीन चार मंडळी त्या भयाण वातावरणात तो घाट चढून येत आहेत असे कळले. पुढे दोनशे मिटर वर ती मंडळी आम्हाला भेटली. संदिप आणि मी गाडीतून उतरलो आणि त्या दमलेल्या जिवांना जागा करुन दिली. ड्रायव्हरने त्या अरुंद घाटात युटर्न घेउन त्या मंडळींना वर सोडून आला. त्या मधल्या दहा एक मिनिटांत अनुभवलेली ती भयाण शांतता अक्षरशः अंगावर आली होती. गाडी येई परत पर्यंत हुडहुडी भरली होती.
प्रचि १९ नकीला
प्रेत्येक 'ला'च्या आजुबाजुला अक्राळ विक्राळ डोंगर रांग पसरलेली असे... ओसाड आणि निर्जन.
प्रचि २०
प्रचि २१
प्रचि २२
आता मात्र त्या निर्जन प्रवासाचा कंटाळा येऊ लागला होता. डोंगर आणि रस्ता बघुन जीव विटला होता.. कधी एकदाचा हा प्रवास संपवतोय असे झाले होते. ड्रायवरकडे चौकशी केली तर त्याचे ठरलेले उत्तर... ''बस अभी आ जायेगा सार्चू"... पण सार्चूचा सर्च काही केल्या संपत नव्हता. नागमोडी Gata Loops, Whiskey Bridge, Tsarap Chu नदीच्या विस्तिर्ण पात्रा वरिल Elephant Head... सगळंच अद्धुभत होत यात काहीच वाद नाही... पण त्या साठी करावा लागणार प्रवास मात्र थकवणारा होता. सहनशितलेचा अंत पहात होता.
सुर्य अस्ताला जायच्या आधी काही मिनिट आम्ही सार्चूच्या सनड्रॉप कँपवर पोहचलो. गाडीतून उतरताच बोचरी थंडी उंगात शिरु लागली. कस बसं सामान तुंबू मधे टाकलं आणि गरमा गरम चहा पिण्यासाठी बाहेर पडलो. बाहेर पडल्यावर मात्र चहा नको पण थंडी आवर अशी अवस्था झाली. बाहेरील थंडीचा जोर बघता जेवणा साठी तुंबुतून परत बाहेर पडायला नको म्हणून चहाच्या खेपेतच जेवणाचाही कार्यक्रम उरकून टाकला.
प्रचि २३
वार्यावर फडफडणार्या तंबुत रात्री झोप लागणे कठिण होते. रात्रभर भणभणारा वारा पहाटे शांत झाला तेव्हा आपसूक डोळा लागला. सकाळी उठवल्यावर पाण्याशी हात मिळवणी करणे शक्यच नव्हते. तुंबुतून बाहेर डोकावून बघितले.. समोर गरम पाण्याची सोय दिसली. तरिही मनाला आंघोळीचा विचार अजिबात शिवला नाही. मुखमार्जन करुन न्याहरी साठी बाहेर पडलो. वारा कमी असला तरी तापमान ३-४ डिग्रीच्या आसपास होतं. नाष्टा लागे पर्यंत कॅंम्पच्या मालकाशी गप्पागोष्टी सुरु झाल्या. या कँम्पची सगळी रसद मनाली वरुन येते. कामगार नेपाळ, तिबेट नाहितर बिहार मधुन येतात. या भागात प्रथम येणारा कामगार हमखास आजारी पडतो. एकदा का या विचित्र हवामानाची सवय झाली की मग कामाला लागतो.
प्रचि २४
नाष्ट्याला नुकतेच तयार केलेले थंडगार पोहे होते. ब्रेड साठी गरम करुन ठेवलेल बटर ब्रेड वर घेताच काही क्षणात त्याची चपाती बनत होती. न्याहरी आटोपताच सगळ्यांनी तिथून धूम ठोकली.. गाडीत स्वतःला कोंडून घेतल्यावर बरं वाटलं.
प्रचि २५
समोर ५०४५ मि. उंचीवरचा 'बारालाचा'ला डोक्यावर शुभ्र मलमलीत टोपी चढवुन आमची वाट पहात बसला होता.
प्रचि २६
प्रचि २७
प्रचि २८
हा पहाडेश्वर तर चक्क गळ्या भोवती मलफर गुंडाळुन ध्यानस्त बसला होता.
प्रचि २९
प्रचि ३०
प्रचि ३१ सुरजताल
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
दगड मातीच्या डोंगराची जरब आता कमी झाली होती. खुरटी झुडपे डोंगर माथ्यावर टकामका बघत होती.
प्रचि ३५
प्रचि ३६
प्रचि ३७
प्रचि ३८
निसर्गाच आपसूक बदलणार रुप मनमोहक होतं. त्याचा आनंद घेत जिप्साच्या वाटेवरील दिपक ताल पार केला. आता 'त्सो' आणि 'ला'चे रुपांतर 'ताल' आणि 'पास' मधे झाले होते. केलाँगच्या पुढे 'चंद्र-भागा'चा संगम दिसला.. .
मनाली ते लेह या रस्त्यावरचा टंडी हा शेवटचा पेट्रोल पंप, या नंतरचा पेट्रोल पंप थेट लेह मधेच ३६५ कि.मी. वर... त्यामुळे इथे जर पेट्रोल भरुन घेतले नाही तर पुढे ठणठणगोपाळा करत बसण्या शिवाय दुसरा मार्ग नाही.
प्रचि ३९
वाटेत हिमाचल प्रदेश परिवहनच्या बसेसची रहदारी दिसू लागली आणि रोहतांग जवळ आल्याची जाणीव झाली.
प्रचि ४०
प्रचि ४१
प्रचि ४२
प्रचि ४३
सिसु नंतर पुढे डाम्फुग आणि ग्राफु गावं मागे टाकत रोहतांगच्या दिशेने निघालो.. १३,०५० फुट उंचीवरचा रोहतांग पास धुक्यात हरवलेला होता.
प्रचि ४४
रोहतांग पास पार करुन हिमाचल प्रदेश मधे दाखल झालो. रोहतांगच्या 'रहाला' धबधब्यावर पर्यटकांची गर्दी ओसंडुन वहात होती. या पुढचा मार्ग अगदी बिकट होता. सततच्या पावसामुळे घाटातील अरुंद रस्ता चिखलमय झाला होता. त्यातुन गाडी चालवण म्हणजे फार मोठ कसब होतं.
प्रचि ४५
प्रचि ४६
प्रचि ४७
प्रचि ४८
प्रचि ४९
प्रचि ५०
प्रचि ५१
घाटातुन दिसणार पॅरॅग्लाइडींगचा बेस कॅम्प आहे. इथल्या शालिमार हॉटेल मधिल चणा मसाल्याची रुचकर चव कायम लक्षात राहिल.
प्रचि ५२
प्रचि ५३
जेवण आटोपुन एक तासात हॉटेल मार्बल व्ह्यु वर पोहचलो. कालच्या लेह ते सार्चु प्रवासा पेक्षा आजचा सार्चु ते मनाली हा प्रवास खुपच सुखावह होता. इतके दिवस हिरवळीच्या विरहात सुकलेले डोळे मनालीतील हिरवळ पाहुन पुन्हा एकदा तृप्त झाले होते.
प्रचि ५४
प्रचि ५५
हॉटेलच्या जवळच हिडिंबा मातेच मंदिर होतं.. गिरिच्या आग्रहस्ताव तिकडे भेट देण्यात आली.
प्रचि ५६
प्रचि ५७
संध्याकाळी मानालीच्या बाजारात फेरफटका मारुन खिसे हलके केले. हॉटेल मार्बल व्ह्यु मधिल रात्रीचे जेवण अगदी चटकदार होते. श्रीनगरच्या जेवणा नंतर थेट मनालीला आल्यावरच जिभेचे चोचले पुरवण्याचे समाधान मिळाले. कारगील ते सार्चुच्या दरम्यान जे काय जेवायचो ते केवळ उदरभरण असायचे.
११ ऑगस्ट टुरचा शेवट...
शेवटच्या दिवशी २९० कि.मी.चा मनाली ते चंदिगढ प्रवास करुन संध्याकाळी ६.३०चे परतीचे फ्लाईट पकडायचे होते. मनाली ते चंदिगढ प्रवासाठी १० ते १२ तास लागू शकतात असे ऐकले होते. त्यामुळे आम्ही सकाळी सहालाच निघायचा निर्णय घेतला.
प्रचि ५८
रात्रभर रिपरिपणार्या पावसामुळे वातावरणात कुंदपणा भरुन राहिला होता. अश्या वेळी लोणावळ्याची याद न येईल तरच नवल! आजच्या INNOVAचा सारथी धरमपाजीची NH-21 वरुन सुसाट निघाला होता.. ब्यास नदीला आंजारत गोंजारत जाणारा NH-21चा रस्ता मला फारच आवडला.
प्रचि ५९
एव्हाना धरमपाजीची टकळी सुरु झाली होती... आणि त्याच्या जोडीला गिरिची टाळी... मग काय सरफचंद ते शिमला करार या मधिल काहीच शिल्लक ठेवलं नाही. :p
प्रचि ६०
धरमपाजीच्या कृपेने (की इच्छेने) एका वळणावर सरफचंद खरेदी झाली. कुल्लू पार केल्यावर ब्यासच्या तिरावरील एका धाब्यावर सकाळचा नाष्टा झाला.
प्रचि ६१ डोंगराच्या कुशीत विसावलेल... कुल्लू
मंडी, पालमपुर मागे टाकुन टुर मधल्या शेवटच्या घाटात.. स्वार घाटात पोहचलो. स्वार घाटाच्या उजविकडे अस्ताव्यस्त पसरलेला गोबिंद सागर जलाशय दिसला. जलाशयाच्या पश्चिमेला बाक्रानांगल धरण आहे. वेळे अभावी आम्ही तिकडे भेट देण्याचे टाळले.
प्रचि ६२
प्रचि ६३
प्रचि ६४
प्रचि ६५
प्रचि ६६
गेले दहा दिवस पंख्या शिवाय रहाण्याची सवय झाली होती. चंदिगढ मधे दाखल होताच उन्हाळा जाणवू लागला. चंदिगढच्या रस्त्यावर जागोजागी लंगर लागले होते.
संध्याकाळची फ्लाईट पकडण्यासाठी मनाली वरुन लवकर निघालो होतो.. रस्त्याच कुठेच ट्राफिक न मिळाल्याने वेळे आधीच चंदिगडला पोहचलो होतो. हातात चार तास असताना काय करायचे हा प्रश्ण होता. मग काय 'हवेली'त भरपेट जेवुन आमच्या अविस्मरणिय लडाख टुरची सांगता केली.
प्रचि ६७
धन्यवाद
मस्तच
मस्तच
मस्त मस्त.
मस्त मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच जिप्य्सा, नेहमी नुसते
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिप्य्सा, नेहमी नुसते खादाडीचे फोटू टाकुन जळवतोस.
आता तर कुल्फी खाताना दाखवायची गरज होती का????????
मस्तच, तूम्हा सगळ्यांच्या
मस्तच,
तूम्हा सगळ्यांच्या लेखांची मालिका करायला अॅडमिनना विनंति करा बघू.
bhaaree!
bhaaree!
मस्त मस्त!!!
मस्त मस्त!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा खल्लास फोटो. वर्णन एकदम
व्वा खल्लास फोटो. वर्णन एकदम झकास.
मला पण घंटा वाजवायची आहे कारण
मला पण घंटा वाजवायची आहे कारण लेखन आणि प्रचि आवडली आहेत
माबोवर खरेच अशी सोय हवी ना ज्याने लेख लिहिला आहे त्याने उघडल्यावर जितके लाईक्स तितके 'टण्' असे आवाज...:)
aamhI he sagaLe misale
aamhI he sagaLe misale
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
मस्त प्रचि नेहमीप्रमाणेच..
मस्त प्रचि नेहमीप्रमाणेच..
लै भारी .. मस्तच झाली
लै भारी .. मस्तच झाली सफर...!!!
मस्त!!
मस्त!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त लिहिलंयस इंद्रा मनाली
मस्त लिहिलंयस इंद्रा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मनाली बेस्ट ठिकाण आहे. खुप आवडलं.
सगळंच अद्धुभत होत यात काहीच वाद नाही... पण त्या साठी करावा लागणार प्रवास मात्र थकवणारा होता. सहनशितलेचा अंत पहात होता.>>>>
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रचंड आवडले !
प्रचंड आवडले !
इंद्रा .. भारी फोटु... भन्नाट
इंद्रा .. भारी फोटु...
भन्नाट भटकंती .....
यो पुढच्या वर्षी जुले बुक करुया..
मस्त. १२ व १४ झकास...
मस्त.
१२ व १४ झकास...
१४, २६, ३० प्रचंड आवडले. २३
१४, २६, ३० प्रचंड आवडले.
२३ मधे मागच्या बाजूला एक उन्हाचा पट्टा दिसतोय. त्याचा क्लोज अप आहे का?
मस्तच झाली ही मालिका. जिप्सीची अळीमिळी का आहे?
धन्यवाद मंडळी माधव... त्या
धन्यवाद मंडळी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माधव... त्या कडाक्याच्या थंडीत क्लिक करताना हात थरथरत होते. प्रचि २३चा सुंदर क्लोज अप जिप्सी कडे आहे.
सुंदर. लेह लडाख, हिमाचल-
सुंदर. लेह लडाख, हिमाचल- कितीही फोटो टाकले तरी कमीच वाटतात. इन्द्रा, काही काही अप्रतिम फोटो काढले आहेस तू.
ग्रेट. तुम्ही ट्रिप पूर्ण केलीत आणि लेखमालाही. आता पुढची स्वारी कुठे?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा .. अप्रतीम फोटो
व्वा .. अप्रतीम फोटो आहेत..... रस्त्याचि तर ईथे बसुन पन भिती वाटत आहे..... मस्तच..
सुपर्ब प्रचि.. सगळे फोटो
सुपर्ब प्रचि.. सगळे फोटो भिंतीवर फ्रेम करून ठेवण्यासारखे. प्रचंड आवडेश.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लेह-लडाख एकदम जोरात आहेत सध्या माबो वर आणि सगळ्यांचे प्रचि, एक से एक आहेत