कॉपर एनॅमलींग बोल्स
आज एका वर्कशॉप मध्ये दोन कॉपर एनॅमल्ड बोल्स बनवले.
पहिल्या बोलसाठी आधी बाहेरून बेसकोट लावून फायर केलं. नंतर त्याच तांब्याच्या या भांड्याला आतून ट्रांसपरंट कलर लावून फायर केलं. त्यानंतर भांडं आतून बर्यापैकी काळं झालं होतं, त्याला स्वच्छा घासून काढलं. त्यानंतर त्यावर अजून एका फ्ल्क्सची लेयर देवून ती लेयर वाळल्यावर डिझाइन कोरलं. (मी ट्री ऑफ लाईफ आणि २ वारली ह्युमन फिगर्स आणि झोपड्या कोरल्या होत्या). यानंतर परत फायर केलं. पुढच्या स्टेपमध्ये बांड्याला बाहेरून रंग लावून वाळू दिलं. भांडं वाळल्यावर त्याला आतल्या बाजूने एक ग्लु लावून त्यावर ट्रांसपरंट ज्वेलरी एनॅमल रंगाच्या २-३ पावडर हलक्या हाताने भुरभुरवल्या. हे वाळल्यावर भांडं परत एकदा फायर केलं.
यावेळपर्यंत खरंतर भांडं तयार झालं होतं. पण मला मागच्या बाजूचा मोरपंखी निळा रंग तितकासा आवडला नाही म्हणून मी त्यावर परत एकदा पोपटी रंगाची पातळ लेयर लावली. आतल्या बाजूने पण फायर झाल्यावर माझ्या वारली फिगर्स तितक्याश्या उठून दिसत नव्हत्या. पण त्याला काहीही न करता फक्त मागच्या बाजूने पोपटी रंग लावून फायर केलं. बाहेर काढल्यावर दिसलं ...माझ्या वारली फिगस चक्क निळसर रंगात दिसायला लागल्या.
या दुसर्या बोलसाठी पुर्ण वेगळं टेक्निक वापरलं. आधी बोलला दोन्ही बाजूंनी बेसकोट (एकानंतर एक )लावून फायर केलं. नंतर मागच्या बाजूने हवा तो रंग लावून परत फायर केलं. त्यानंतर आतल्या बाजूने काळा रंग लावून फायर केलं. यानंतर त्यावर क्रॅकींग पांढर्या रंगाचा एक लेयर दिला. तो वाळल्यावर त्यात डिझाइन कोरले. मी मासा आणि काही झुडूपं कोरली होती. हे फायर केल्यावर पांढर्या रंगावर थोडासा क्रॅकींग इफेक्ट आला. बर्याच जणांचा रंग या प्रोसेसमध्ये उडून एकदम वेगळी डिझाइन्स आपोआप तयार झाली. नंतर त्या तयार डिझाइन्सवर परत हवे ते रंग लावून फायर केले.
वॉव. खूप मस्त.
वॉव. खूप मस्त.
मस्त दिसतंय.
मस्त दिसतंय.
थँक्स. हे करायला मला खूप मजा
थँक्स.
हे करायला मला खूप मजा आली. प्रत्येक स्टेजला भांडी वेगळी दिसत होती. प्रत्येक फायरींगनंतर डिझाइन्स बदलत होती, इफेक्ट बदलत होते. अगदी मनात होते तसं डिझाइन तर कुणाचच आलं नाही. पण तरीही आपोआप काहीतरी इंटरेस्टींग डिझाइन तयार होत होतं. माझं डिझाइन त्यामानाने खूप कमी बदललं. पण बर्याच जणांचं डिझाइन अगदी पूर्ण बदलून गेलं होतं फायरींगमध्ये.
हे आज शिकताना केलेलं आहे. पुढच्या महिन्यामध्ये मी स्वतः अजून काही पिसेस (ज्वेलरी, बोल्स, नुसते छोटे चौकोन) करायच्या विचारात आहे.
आणि हो वर या भांड्यांची साइझ लिहायची विसरले मी. साधारणतः ५" * ५" च्या आसपास साइझ आहे.
मस्त आहे रूनी पॉटर च्या
मस्त आहे
रूनी पॉटर च्या मातीच्या भान्ड्याची आठवन झाली
वॉव! मस्त जमलयं!
वॉव! मस्त जमलयं!
मस्तं दिसतंय. पहिलं जास्तं
मस्तं दिसतंय. पहिलं जास्तं आवडलं.
फायर करतात म्हणजे नेमकं काय करतात?
लेखाच्या दुसर्या ओळीत फारय झालंय.
फायर करतात म्हणजे ओव्हनमध्ये
फायर करतात म्हणजे ओव्हनमध्ये ७५० ते ८००/८२० डिग्री सेल्सियस तापमानावर त्या पीसला साधारणतः १-२ मिनीटांसाठी गरम करतात. (रेड हॉट होईपर्यंत) हे जे एनॅमल कलर्स असतात ते पातळ होवून त्याची काचेसारखी (खरतर काचच..कारण यात ग्लास पार्टिकल्स असतात...मला त्यातलं अजून जास्त टेक्निकल माहित नाहीये) लेयर तयार होते मेटलवर.
दुसरा पीस पण छान झालाय, पण ते रंग आणि त्याचे डिटेल व्यवस्थित आले नाहीयेत. द्सर्या भांड्यासाठी मी रंगांचा जलरंगांसारखा इफेक्ट येवू द्यायचा प्रयत्न केलाय कारण त्याआधीच्या लेयरमध्ये थोडासा क्रॅक्ड इफेक्ट आला होता. रंगाला बारीकसे क्रॅक गेलेत आणि एक वेगळा इफेक्ट आलाय. तसंच पहिलं भांडं हाताला आतून जवळपास एकसारखं जाणवतं तर दुसर्यामध्ये काळा भाग जास्त खोलगट आहे.
मला परवा जमलं तर त्या क्रॅक इफेक्टचा जवळून फोटो टाकेन.
माझ्याबरोबरच्या बाकीच्यांच्या पीसेसचे फोटो मिळाले तर तेही टाकेन नंतर...म्हणजे अजून लक्षात येईल. बहूतेक स्टेप बाय स्टेप फोटो पण काढलेत १-२ पीसेसचे. ते उद्या मिळवायचा प्रयत्न करते.
उद्या सिल्व्हर ज्वेलरी शिकणार आहे. चांदीवर एनॅमलींग करून. त्याचे फोटो पण येतिलच इथे.
सिरॅमिक आणि याचे रंग
सिरॅमिक आणि याचे रंग बर्यापै़की सारखे असल्यामूळे रुनी माझ्यापेक्षा जास्त सांगू शकेल याबद्दल बहूतेक.
यात आम्ही बहूतांशी इंडस्ट्रियल एनॅमल कलर्स वापरलेत. याच्या पावडर्स पाण्यामध्ये मिक्स करून वापरायचे असतात हे रंग. फक्त त्या पहिल्या भांड्यामध्ये आतल्या बाजूला पावडर फॉर्ममधले ज्वेलरी एनॅमल रंग वापरले आहेत.
ही भांडी आहेत?? मला पेन्डन्ट
ही भांडी आहेत?? मला पेन्डन्ट वाटताहेत. मला एक भेट दे असं सांगणार होते.
जे काय आहे ते खूप मस्त आहे. चौकोनी भांडं जास्त आवडलं. मस्त झालं आहे.
ही आपल्या रोजच्या वापरातल्या
ही आपल्या रोजच्या वापरातल्या वाटीपेक्षा थोड्या मोठ्या आकारातली भांडी आहेत.
मी करणार आहे अश्या मध्ये पेंडंट्स लवकरच. थोडं कलेक्शन झालं की, सांगेन तुला मंजू.
मस्त वारली भांडी पण टाक इथे.
मस्त वारली भांडी पण टाक इथे.
अगं, मी नाही केली वेगळी वारली
अगं, मी नाही केली वेगळी वारली भांडी. वरच्या त्या ट्री ऑफ लाइफच्या भांड्यावरचं, त्या झाडाच्या बुंध्यापाशी एका बाजूला दोन वारली बायका आणि एका बाजूला दोन झोपड्या स्क्रॅच केल्या होत्या. पण त्यावर थोडा ग्लेझ देवून फायर करताना आधी त्या पूर्ण झाकल्या गेल्या. दुसर्यांदा भांडं भाजताना परत निळसर रंगात उगवल्या आपोआप. अगदी बारकाईनं बघितलं तर दिसताहेत.
मस्त आहेत भांडी. वारली बायका
मस्त आहेत भांडी. वारली बायका ,झोपड्या बोलच्या खालच्या बाजुला दिसत आहेत. तुझे अगदी बरोबर आहे. आपण ठरवतो तो रंग तसाच येत नाही. मी जास्त नाही काम केले त्यावर. पण रुनी सारख्या तरबेज कलाकारांना ते शक्य होत असेल.
मस्तच.
मस्तच.
मस्तच!
मस्तच!
मस्त
मस्त
जबरी आहे अल्पना.
जबरी आहे अल्पना.
सगळ्यांना खूप खूप
सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.
विद्याक, खरंच आधीचे रंग आणि फायर केल्यानंतरचे रंग यात चक्क जमीन-अस्मानाचा फरक दिसतो. आअज आम्ही ज्वेलरी एनॅमल्स वापरले पुअर सिल्वर वर. तर सिल्व्हरवर लाल्/ऑरेंज रंग वापरला होता मी . फायर झाल्यवर तो चक्क आधी ब्राउन दिसायला लागला. दुसर्यांदा ज्यावेळी फायर केलं त्यावेळी तो चक्क काही ठिकाणी ब्राउन आणि उरलेल्या ठिकाणी क्रोम यलो दिसायला लागला होता.
इंस्ट्रक्टरनी सुरवातीलाच हा रंग बदलून ब्राउन सारखा दिसतो म्हणून सांगितल्याने अगदी हिरमोड नाही झाला तयार पीस बघून.
अल्पना तु गुड्गाव ला याच
अल्पना तु गुड्गाव ला याच कोर्स साठी जाणार होतिस ना?? मस्तच बनवलि आहेस. तुझं पेन्डण्ट आणि इअर रिंग चं कलेक्श्न झाल की सांग .
हो सुखदा. याचसाठी गेले होते
हो सुखदा. याचसाठी गेले होते तिन दिवस गुडगावला.
आता पुढच्या महिन्यापासून गुडगावच्या त्या इन्स्टिट्युटच्या स्टुडिओमध्ये जाईल दर रविवारी काम करायला. २-३ महिने लागतिल थोडं कलेक्शन तयार व्हायला.
अल्पना, फारच मस्त दिसताहेत हे
अल्पना, फारच मस्त दिसताहेत हे बोल्स. मला खूपच आवडलेत.
भारीच आहे हे!
भारीच आहे हे!
मामी, पुढचे लॉट तयार झाले,
मामी, पुढचे लॉट तयार झाले, थोडं कलेक्शन झालंझालंइथे जाहिरातींमध्ये जाहिरात देवून ऑर्डर्स घ्यायला लागेन. आय होप नविन वर्ष सुरु व्हायच्या आत थोडं कलेक्शन तयार होईल.
अल्पना, मस्तच काम आहे हे!
अल्पना, मस्तच काम आहे हे!