एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!

Submitted by मी मधुरा on 18 September, 2013 - 01:19

'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली. Sad

आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!! Happy

ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. Happy

सध्या मिळालेली माहिती:

कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
ekalagnachi.jpgमहत्वाचे:

इथे भांडत बसू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सीरिअल चे मातेरे करु नये एवढीच माफक अपेक्षा, कारण पटकथा लेखक. बाकी मालिका सुरु झाल्यावर कळेल.

मराठी मालिका अपवाद वगळता पाहिल्या नाहीत आणि पहायची इच्छा नाही. ए ल दु गो च्या नावाशी साम्य असल्यामुळे या मालिकेबद्दल उत्सुकता वाटली म्हणुन हा धागा उघडला आणि अगदीच विरस झाला. कारण एक - या मालिकेबद्दलचा फीडबॅक आणि त्यातुन थोडी कथा कळेल अशी अपेक्षा होती, तर मालिका सुरुच झाली नाहीए. कारण दोन आणि अगदी महत्वाचं म्हणजे चिन्मय मांडलेकर. त्याच्या ख्यातीप्रमाणे ही कथा अगदीच टुकार, ताणलेली आणि लुज एंड्स सोडलेली असणार आहे.
चला आयुष्यातली रोजची ३० मिनिटं वाचणार आहेत. Happy

उमेश आणि स्प्रुहाची जोडी चांगली दिसेल. मालिका लिमिटेड एपिसोडची असेल तर रंगतदार होईल, नाहितर काही सांगता येत नाही.

nshelkeना अनुमोदन.

खाली ते 'महत्त्वाचे' डिस्क्लेमर टाकलेस, ते चांगलं केलंस मधुरा! हुशार झाली आता एक मुलगी.. ऐसाईच करना मांगता इधर.. Proud

इथे बसून भांडू नये?

अहो, मला अनेक भांडणं भांडायची असतात. एका धाग्यावर बसायला वेळ कुठला? तेव्हा या धाग्यावर गरज पडलीच तर उभ्या उभ्या भांडून जाईन. आता हेडर बदलू नका हां.

खाली ते 'महत्त्वाचे' डिस्क्लेमर टाकलेस, ते चांगलं केलंस मधुरा! हुशार झाली आता एक मुलगी.. ऐसाईच करना मांगता इधर..>>>>> क्या करे? लिखना पडता है |
नाहितर सगळे भांडत बसतात, नंतर admin धागा 'वाहता' करतात..आणि मग मालिका सुरु झाल्यावर परत सगळे म्हणतात, कि हि मुलगी वाहता धागा काढते नेहमी!!!

खाली ते 'महत्त्वाचे' डिस्क्लेमर टाकलेस, ते चांगलं केलंस मधुरा! हुशार झाली आता एक मुलगी.. ऐसाईच करना मांगता इधर..
>>>>
सानी, त्यामुळेच इथे सगळी गोड मिट्टं चर्चा होणारेय बघ Wink
बघेन नाही तर मीच एक टिपलेस/ढिस्केमर्लेस धागा काढेन म्हणते Wink

बघेन नाही तर मीच एक टिपलेस/ढिस्केमर्लेस धागा काढेन म्हणते >>>>.खुशाल काढ!!
चर्चा अर्थात मालिका बघितल्यावरच करणार आहोत आम्ही. पण तरीही,
तुला कडवट आणि मालिकेची फक्त निंदा करण्याकरता धागा काढायचा असेल तर 'गो अहेड!!'
कारण आम्ही चांगल्या मालिकेला चांगलचं म्हणणार...उगाचच काहीतरी चुका काढून सतत मालिकेची निंदा करण्यात मला इंटरेस्ट नाही. जे आवडतं , ते आवडलं असं म्हणायला हिंमत लागते....कारण स्तुती करणे खरंच कठीण गोष्ट असते!!!

जे आवडतं , ते आवडलं असं म्हणायला हिंमत लागते....कारण स्तुती करणे खरंच कठीण गोष्ट असते!!!>> आणि नाही आवडली तर?

टिपा आणि डिस्क्लेमर टाकणारी व्यक्तीच वाद घालतेय Lol

नवीन धागा काढण्याचे कारण म्हणजे पहिले 'ए.ल.दु.गो.' साठी काढलेल्या धाग्यांवर २००० पोस्टची मर्यादा ओलांडली आहे.
>>> आँ?? एलदुगोवर एलतिगोच्या गोष्टी कशासाठी कोणी का करेल??

नाही आवडली म्हणायचं.>> अनिश्का, ते मान्य करणं स्तुती करण्यापेक्षाही अवघड असतं ना पण Wink

काय रे देवा..

जुन्या जाणत्या माबोकरांनो.. मालिकांच्या धाग्यावर वाद घालता येतो हे तुम्हाला कधी महिती होते का? ऑ?
मधुराताईंनी हे दाखवुन दिले कि.. Happy

छे! नाही आवडली तर एकदा इथे नाही आवडली असं म्हणून तर बघा.....मग कळेल काय ते
संदर्भ : दुनियादारीचे बाफ!

मधुरा ये आता परत पदर खोचुन Proud

पियू, थोडासा बदल कर तुझ्या पोस्टीत -
मालिकांवरही उगाचच वाद घालता येतो हे तुम्हाला माहित होतं का असं लिही Wink

मग काय.....
तीनेच तर एकदा सांगितलेलं तिला माझ्याशी भांडायचय
सध्या काही काम नाहीये हापिसात सो टाईमपास नको? Wink

<नाहितर सगळे भांडत बसतात, नंतर admin धागा 'वाहता' करतात..आणि मग मालिका सुरु झाल्यावर परत सगळे म्हणतात, कि हि मुलगी वाहता धागा काढते नेहमी!!!>

अ‍ॅडमिनवर भलते सलते आरोप करू नका. अ‍ॅडमिननी एखादा धागा भांडणे होतात म्हणून वाहता केल्याचे मी कधीही पाहिलेले नाही. ते एकतर धाग्यावर ताकीद देतात, प्रतिसाद उडवतात, फारच झाले तर आयडी उडवतात , धाग्याला कुलूप लावतात ( नवे प्रतिसाद देता येणार नाही असे) किंवा धागाच उडवतात. (अदृश्य करतात). जिथे दगड, विटा, भाले. तलवारी, वाघनखे, इ.इ. घेऊन भांडणे होतात त्या धाग्यांवरच असे होते.

त्यापुढे मालिकांच्या धाग्यावरची भांडणे म्हणजे फुसके कागदी बाण आणि कागदाचे बोळे करून मारणे. ( सॉफ्ट टारगेट निवडायचे म्हणजे अस्त्रही तसेच सॉफ्ट हवे ना?) इथे अ‍ॅडमिन कशाला येताहेत? केर काढायला?

Happy
पुरे...पुरे...!

आता मालिकेबद्दल...

उमेश कामत ने सध्याच ट्वीट केलंय...टायटल सॉंगचं शुटींग सुरु आहे ए.ल.ति.गो. च्या सेट वर!!!

मस्त न्यूज आहे कि नाही.. Happy
------------------------------------------------------------------
अवांतर:

नाही आवडली तर बिनधास्तपणे सांगा!!! नॉ प्रॉब्लेम!!कारण मी मालिका बनवलेली नाहीये....सो फील फ्री!! Happy

@रिया/प्रिया/प्रियांका:
मान्य आहे कि मी दुनियादारी पुस्तकावर चांगलीच चिडले होते....अग पण अपेक्षा भंग झाला ग....बाकी काही नाही.... म्हणून चिडचिड झाली. पण जाऊ देत न.....तुला आणि कोणालाही या मालिकेबद्दल काहीही बोलायचं असेल तर ते तुम्ही बोलूच शकता... आणि मी नाही भांडणार!!! खरंच!!! Happy

एकच नाव पुरे, मालिका सुरू होऊ देत मग बघायला येते. सध्या भांडायला माझ्याकडे असंख्य मुद्दे आहेत पण नको जाऊ देत!
बक्ष दियातेरेको Proud

भरतदादा, होणार सुन मी या घरची आधी नॉर्मल धागा होता, मग त्यावर भांडण / वाद झाले, मग तो धागा वाहता झाला ( मी कित्ती काही लिहिलेलं त्याच्यावर Sad ) आणि मग नंतर पुन्हा त्याला बांध घातला गेला Happy

Pages

Back to top