तसं पहायला गेलं तर मनामध्ये भक्ती रुपाने वसणार्या त्या गजाननाचा चराचरात वास असतो. आणि त्याची झलक तो अनेकदा अशाच अनपेक्षित स्थळी दर्शन देऊन आपल्याला दाखवतो.
झाडाच्या खोडात,पाषाणात, ढगात,नारळाच्या करवंटीत किंवा खोबर्याच्या वाटीत असे निसर्गात भासमान होणारे हे बाप्पा मग आपण कौतुकाने न्याहाळत रहातो, ते रूप प्रकाशचित्रात बद्ध करून इतरांनाही दाखवतो.
अशाच तुम्ही पाहिलेल्या बाप्पाच्या रुपाची झलक तुम्हाला माबोकरांना दाखवायची आहे.
त्या आधी जरा हे ही वाचा -
१. हा उपक्रम आहे. स्पर्धा नाही.
२. ह्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३.छाया/प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
४.माती, प्लॅस्टर ऑफ पॅरिस, कापड, लोकर, क्ले यांखेरिज कुठल्याही गोष्टी पासुन बनवलेले किंवा बनलेले बाप्पांचे फोटो इथे येणं अपेक्षित आहे.
५.फाईलचे आकारमान २०० KB पेक्षा जास्त नसावे व छायाचित्राची मोठी बाजू (लांबी/रुंदी) ७५० पिक्सेल इतकी असावी.
६.९ सप्टेंबर २०१३ या दिवशी हा उपक्रम सुरू होईल. तेव्हा, तोपर्यंत, भरपूर प्रकाशचित्रं जमवून ठेवा.
मग मंडळी!
तुमच्याकडे असे फोटो असतील तर माबोकरांसाठी आपलं दालन खुलं करा.
..आणि नसतील तर मनाची कवाडं खुली करा आणि घ्या शोध ... आपल्या लाडक्या बाप्पाचा!!!
वा! हे मस्त आहे.
वा! हे मस्त आहे.
संयोजक, सगळ्या वाहत्या
संयोजक, सगळ्या वाहत्या धाग्यांवर जो मजकूर टाकलाय त्यात " तसं पाहिला गेलं तर ... " असं लिहिले गेले आहे. कृपया शुद्धलेखन दुरुस्त कराल का ? प्रत्येक धाग्यावर ते अशुद्धलेखन डोळ्याला फार टोचतेय!
धन्यवाद मैत्रेयी, बदल केला
धन्यवाद मैत्रेयी, बदल केला आहे.
Mast upakram.
Mast upakram.
'मायबोली गणेशोत्सव २०१३'
'मायबोली गणेशोत्सव २०१३' ग्रूप कुठं आहे?
मी पण शोधतेय गृप .
मी पण शोधतेय गृप :).
मायबोली गणेशोत्सव २०१३ हा
मायबोली गणेशोत्सव २०१३ हा ग्रुप इथे आहे.
http://www.maayboli.com/node/45118
संयोजक, गणेशोत्सवाच्या
संयोजक, गणेशोत्सवाच्या होमपेजवरून या उपक्रमावर येण्याचा प्रयत्न केला तर 'पान हरवलेलं दिसतंय'चा प्रसाद मिळतोय.
मुख्य मजकुरातील तो फोटो
मुख्य मजकुरातील तो फोटो खरोखरच्या डोन्गराचा आहे का? कुठला आहे तो? मस्तच आहे
संयोजक, हा विषय अतिशयच
संयोजक, हा विषय अतिशयच स्पेसिफिक आहे. गणेशोत्सवात सगळ्यांना सहभाग घेता येईल अशा हेतूनं जर या विषयाचे काटेकोर नियम थोडे शिथिल केलेत तर इथेही प्रतिसाद मिळतील. शिवाय ही जर स्पर्धा नसेल तर झब्बुकरताही हा विषय (नियम शिथिल करून) वापरता येईल.
आणखी एक म्हणजे प्रत्येक धाग्याची सुरवात 'मायबोली गणेशोत्सव २०१३' अशी आहे. बर्याच टॅब्ज उघड्या असतील तर पटकन धागे सापडत नाहीत कारण सगळ्या टॅब्जची शीर्षकं सारखीच दिसतात. शिवाय, http://www.maayboli.com/node/45118 इथेही शीर्षकं वाचताना गोंधळ होऊ शकतो.
४.माती, प्लॅस्टर ऑफ पॅरिस,
४.माती, प्लॅस्टर ऑफ पॅरिस, कापड, लोकर, क्ले यांखेरिज कुठल्याही गोष्टी पासुन बनवलेले किंवा बनलेले बाप्पांचे फोटो इथे येणं अपेक्षित आहे.
लोहको नियम शिथिल करण्यात आले आहेत
आता येऊ देत तुम्ही पाहिलेलं बाप्पाचं रुप
माती, प्लॅस्टर ऑफ पॅरिस,
माती, प्लॅस्टर ऑफ पॅरिस, कापड, लोकर, क्ले यांखेरिज कुठल्याही गोष्टी पासुन बनवलेले किंवा बनलेले बाप्पांचे फोटो इथे येणं अपेक्षित आहे.
>>>> धत्तेरेकी! माझ्याकडे एकुलता एक टॉवेलचा गणपती होता. तो आता टाकता येणार नाही. मी बाकीच्यांनी टाकलेले गणपती बघेन.
गणपतीची चित्रं पण चालतिल क हो
गणपतीची चित्रं पण चालतिल क हो संयोजक?
चालणार असतिल तर एखादं रंगवायचा प्रयत्न करून बघता येईल.
अल्पना, मुद्दाम काढलेलं
अल्पना, मुद्दाम काढलेलं चित्रं नको
इथे आपल्याला अचानक तयार झालेलं बाप्पाचं रुप अपेक्षित आहे
-संयोजकांतर्फे!
(No subject)
प्रकाशचित्र सौजन्यः रुशाली
प्रकाशचित्र सौजन्यः रुशाली
एका झाडाच्या खोडात प्रकटलेले
एका झाडाच्या खोडात प्रकटलेले बाप्पा
संयोजक, कृपया सर्व
संयोजक, कृपया सर्व स्पर्धकांना स्पर्धेचे नाव शब्दखुणांमध्ये लिहायला सांगणार का? मी माझ्या धाग्याच्या शब्दखुणांमध्ये ' पत्र सांगते गूज मनीचे' असं लिहिले आहे तसे? त्यामुळे तिथे टिचकी मारली की सगळ्या प्रवेशिका एकत्र पाहता येतील.
अशाच प्रकारे पाककृती करताही पाककृती - तिखट, पाककृती - गोड अशा शब्दखुणा दिल्यास सगळ्या त्या त्या प्रकारच्या प्रवेशिका एकत्र मिळतील.
हा आहे स्फटीक रुपातला गणेश..
हा आहे स्फटीक रुपातला गणेश.. १५ वर्षापूर्वी अंजिठा वेरुळ च्या लेणी बघायला गेलो होतो तेव्हा तिथे सुरुवातीलाच असे स्फटीकचे दगड विकणारे म्हणून बरेच जण होते. एकाने हा दगड वडिलांना दाखवला तेव्हा त्यांना त्यात हे रूप दिसले..आणि आम्ही तो घेतला.. विकणार्याला काही कल्पना नव्हती.. अन्यथा विकतानाच गणेश म्हणून विक्री केली गेली असती..
मस्तय! निसर्गाचा चम्त्कार
मस्तय!
निसर्गाचा चम्त्कार