मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "निर्गुण तू, निराकार"
Submitted by संयोजक on 5 September, 2013 - 11:19
तसं पहायला गेलं तर मनामध्ये भक्ती रुपाने वसणार्या त्या गजाननाचा चराचरात वास असतो. आणि त्याची झलक तो अनेकदा अशाच अनपेक्षित स्थळी दर्शन देऊन आपल्याला दाखवतो.
झाडाच्या खोडात,पाषाणात, ढगात,नारळाच्या करवंटीत किंवा खोबर्याच्या वाटीत असे निसर्गात भासमान होणारे हे बाप्पा मग आपण कौतुकाने न्याहाळत रहातो, ते रूप प्रकाशचित्रात बद्ध करून इतरांनाही दाखवतो.
अशाच तुम्ही पाहिलेल्या बाप्पाच्या रुपाची झलक तुम्हाला माबोकरांना दाखवायची आहे.
त्या आधी जरा हे ही वाचा -
१. हा उपक्रम आहे. स्पर्धा नाही.
विषय: