नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षिणा मलापण बूट काढलेल्या हाताने पुजेचे ताट धरले ते आवडले नाही, मालिकेत ह्या गोष्टींचा विचार करायला हवा.

ऋजुता देशमुख जोशी(शिरीष जोशीची बायको, हा पूर्वी कागद-टंचाईवर गजरा होता त्यात होता आणि राऊ सिरीयलमध्ये होता).

ऋजुता 'एकदा पहावं न करून' ह्या नाटकात काम करतेय त्या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक योगेश सोमण माझे भाचेजावई आहेत (हे उगाचच अवांतर, वरती नाटकाचा उल्लेख झाला म्हणून).

पौर्णिमा नाटकाचे नाव 'एकदा पाहावे न करून' हे आहे.

शनिवारी मी सुहास डोंगरे हे नाव तुतिमीच्या नामावळीत वाचल.... कलाकार म्हणून नाही इतर काहीतरी

काल अन् आज १ तास लांबीची ती उत्कटता वाढविणारी दोघांची "डेट" दाखविली आणि श्री ने जान्हवीला अखेरीस "तू माझी सहचारिणी....अर्धांगिनी होशील का ?" असे विचारताना इंग्लिशमध्येही "लाईफ पार्टनर होशील का?" अशीही पुस्ती जोडलीच.....जान्हवी सुरुवातीला धक्क्याने हबकली...नंतर गोड गोड हसली आणि मग आनंदाने रडूही लागली.....मग जिवाची मुंबई देखील त्यानी केली....बेस्टच्या बसमध्ये....लेकविहार... कॅन्डललाईट डिनर...इ.इ.

झाले एकदाचे....आता मग ते नित्याचे अडचणीचे डोंगर उभे राह्यला सुरुवात होईलच. पण असो, मालिका मस्तपैकी रंगत आहे.

डेटचा भाग खूप मस्त आणि साधा. गुलाबी साडीत जान्हवी स्मार्ट दिसत होती. श्रीची प्रपोजल आयडिया जबरीच मजेशीर होती.
काल लीना भागवतचे काम खूप आवडले सहज सुंदर.

कालच्या भागात "गणपती बाप्पा मोरया" होतेच; पण जान्हवीने आईकडे रागाने पाहाणे {आईने पुन्हा आपटेचा विषय काढला म्हणून....} आणि त्या रागात उलथणे शिर्‍याच्या भांड्यावर थाडथाड आपटणे मस्तच होते. गोखले बंगल्यावर सारे महिला मंडळ "श्रीरंग" महाशयाची मोठ्या कौतुकाने आरतीच करत होते. त्यातही शरयूआत्या {लीना भागवत} आणि श्री या दोघांचा संवाद खूप आपुलकीचा तसेच भावनीकही होता. श्री ने शरयू आत्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणेदेखील अगदी छान रंगविले आहे.

मला वाटते शरयू ही एकमेव स्त्री अशी दाखविले आहे की जी जान्हवीची बाजू घेऊन इतरांसोबत बोलत असते.

ओके , शरयू काकू आहे ना मला वाटतं, बेबी आत्या आहे, २ काकू, १ मावशी , आई आणि आजी अशा ६ जणी बरोबर Happy

तशी मला जाणवण्यासारखी डायव्हर्सिटी कुठे वाटली नाही.....सार्‍या एकाच स्वभावाच्या असून त्यांच्यातील युनिटीचा सर्वात 'वीक पॉईन्ट' कुठला असेलच तर तो आहे त्यांची श्री वर असणारी अतोनात माया. तो एक धागा सर्वांना पकडून ठेवणारा दिसतो. शिवाय श्री देखील तितकाच लोभस आहे सर्वांसाठी....जान्हवीसह.

प्लीज कोणीतरी दररोज मालिकेत काय घडलं हे लिहित जा इथे.. वेळ असल्यास सविस्तरपणे Happy सध्या घरचा टीव्ही बंद आहे, अन कधी नव्हे ते बर्‍याच वर्षांनी टीव्ही बघायला सुरुवात केलेली या मालिकेकरता.. ऑफिसात बाकी कसलाच अ‍ॅक्सेस नसल्याने ऑनलाइन भाग बघता येणार नाहियेत

काल जान्हवी आपल्या बाबांना श्री आणि तिच्या डेट बद्दल सांगते तो भाग आवडला. दोघांची expressions छान होती

चिमुरी.....

तुझी विनंती योग्यच म्हणावी लागेल, इतकी ही मालिका सार्‍यांच्या कौतुकाचा विषय झाली आहे. त्याला कारण म्हणजे जान्हवी ही मुलगी अगदी तुमच्याआमच्या घरातीलच वाटते...विशेषतः तिचे मनमोकळेपणाने हसणे; शिवाय श्री हा जरी वेल-सेटल्ड बिझिनेसमन असला तरी त्याच्यातील निष्पापपणा आणि जान्हवीप्राप्तीसाठी तो करत असल्याचे प्रयत्न भावतात.

कालच्या भागात तर जान्हवीच्या भूमिकेत तेजश्री प्रधान हिने उत्कट अभिनयाची पराकाष्ठा केली होती. वडिलांना श्री ने मागणी कशी घातली हे सांगताना चेहर्‍यावर कधी हसू तर मागणीनंतर तिला कोसळलेले रडू हे भाव व त्या आवेगात वडिलांच्या खांद्यावर डोके टेकवून हमसाहमशी परत रडणे....हे सारे अभिनयाचा सुंदर नमुना म्हटले पाहिजे.

श्री च्या घरात गजाननाच्या आरतीनंतर सार्‍यांनी एकत्र बसून श्री कडून रीपोर्ट ऐकणे कार्यक्रम झाला. थोडक्यात दोन्ही कुटुंबात काल आनंदाचेच वातावरण होते.

तरीही शेवटच्या क्षणी तो नको असलेला अनिल आपटे डोकावला आहेच....पाहू या आता हे महाशय किती काड्या घालतात जान्हवीच्या होऊ घातलेल्या संसारात.

@ परन ~ सध्या तरी तो १ तासाचा विशेष भाग तुम्हाला यूट्यूब दिसेल असे वाटते. मात्र अन्य कोणत्यातरी लिंकवर सारेच भाग उपलब्ध असतील असे वाटते....पाहायला लागेल.

अशोक पाटील

मामा, धन्यवाद.. सविस्तर माहितीकरता Happy श्री ने तो जान्हवीची लग्न करतोय असं सांगितलं की, पुन्हा एकदा मोघम आम्ही लग्न करायचा निर्णय घेतलाय असं सांगितलं?

श्री ने त्या "मुली" विषयी सविस्तर माहिती घरातील सहाही स्त्रियांना दिली....पण तिचे नाव काही अजून त्याने घेतलेले नाही.....त्यामुळे ह्या सहा स्त्रियांच्या नजरेत 'ती' म्हणजे "सायली" च आहे. जान्हवीला तर आजीचा आणि इंदूचा विरोधच असणार....रहस्यच आहे सारे अजून.

लग्नाबद्दल तर त्याने थेट सांगितले....शरयूकाकी मात्र खूष दाखविल्या आहेत. दुसरीकडे जान्हवीने वडील आणि चाळीतील तिचा हितचिंतक मित्र मनिष याला श्री चे नाव घेऊन ही गोड बातमी सांगितल्याचे दाखविले आहे.

Happy

श्री जाम गोड आहे, अन जान्हवीचं हसु मस्त आहे, एक्दम फ्रेश वाटतं ती हसल्यावर Happy

कालच्या भागात "गणपती बाप्पा मोरया" होतेच; पण जान्हवीने आईकडे रागाने पाहाणे {आईने पुन्हा आपटेचा विषय काढला म्हणून....} आणि त्या रागात उलथणे शिर्‍याच्या भांड्यावर थाडथाड आपटणे मस्तच होते.>>>> अशोकजी त्या आधी साजुक तुपातल्या शिर्‍याचा हिशोब ऐकुन जान्हवीचे बाबा देवासमोर घंटा वाजवतात त्या सीन मधलं टायमिंग मस्त आहे अस मला वाटलं

एकूणात शिरेल आवडते कारण जान्हवीचे एकूण वागणे, घरचे वातावरण अगदी अगदी अकृत्रिम आहे.. आपल्याच घरात घडतय असं वाटतं Happy

"....त्या सीन मधलं टायमिंग मस्त आहे अस मला वाटलं....." ~ अरेच्या मुग्धा !!!.... हे निरीक्षण मस्तच आहे. मी टोटली मिस केले मग हे टायमिंग. बाकी जान्हवीच्या भावाने काजू घेऊन येणे....त्याने पेन ड्राईव्ह मागणे... तो देताना जान्हवीने कोणती फिल्मी गाणी गणपतीसमोर वाजवू नकोस हे सांगणे....ह्या बाबी सुरेखच होत्या, तिकडेच लक्ष लागून राहिले होते.

जाई....

वर नीलू यानी एक लिंक दिलेली आहे.....ती चेक कर....तिथे तुला तो पूर्ण एपिसोड मिळेल १ तासाचा. गाणे तिथेही ऐकता येईल; पण रेकॉर्ड होईल की नाही याबद्दल साशंक आहे.....स्पीड थोडा लो वाटतो लिंकचा....यू ट्यूबच्या तुलनेत.

मामा मला ते गाणे हवेय
ते एका लग्नाची दूसरी गोष्ट मध्ये ते "तुझ्याविना" गाण होत तसे हवे होते

Pages