नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>फक्त थेट दरवाजा आणि एकही वॉचमन नाही?>>>आणि दार आतून लॉक नाही, सरळ दरवाजा ढकलून कोणीही आत येऊ शकते?>> अरे ब्बाबा कित्ती प्रश्न Proud

>>तरिपण आई फोन करून विचारते कि घरी कधी येणार...तो सांगतो कि ऑफिसमध्ये थांबावे लागेल.>> सोनाली धन्यवाद.. माझा एवढा भाग चुकला बहुतेक Happy

Lol आजच्या भागात महासासू अनिलला म्हणाली की आता बाहेर पडला नाहीत तर वॉचमनला बोलवेन.. म्हणजे वॉचमन आहे नक्की. अनिल आत आला तेव्हा झोपला असेल बहुधा Wink
जान्हवीचे एक्स्प्रेशन्स भारी आहेत Happy
असो, उद्याचा भाग बघायचाच. मज्जा Happy

उद्याचा भाग ??? हुश्श....आज झलक दाखविली एकदाची आणि श्री महाशय बोलले तिला...."माझे नाव श्रीरंग गोखले...अन् मी गोखले गृह उद्योग संस्थेचा मालक...." आणि त्यावर जान्हवीचे थक्क होऊन त्याच्याकडे पाहाणे.

बस्स....! भरपूर झाले.

अशोक, इतक्यात हुश्श झालं? मालिका बघायच्या म्हणजे भरपूर पेशन्स ठेवावा लागतो. एका मालिकेतली बाई घर सोडून जात होती तर आठवडाभराचे एपिसोड्स तिने एकेका कुटुंबियाचा (याला हल्ली परिवार का सदस्य म्हणतात) निरोप घेण्यात खर्च पडले.

भरत आय अ‍ॅग्री. पण का कोण जाणे.... हा श्रीरंगबाबा कधी एकदाचे आपले रहस्य तिच्यासमोर उघडे करतो असे होऊन गेले आहे. ते एकदा का झाले की मग जान्हवीचे तिच्या होऊ घातलेल्या सासवांच्याबरोबरचे तू-तू-मै-मै कितीही चालेना...त्याच्याशी आपल्याला काही देणेघेणे नाही.

आता उद्याही काही ट्विस्ट नाही आला तर विघ्नेश्वर पावला....

हुश्श....आज झलक दाखविली एकदाची आणि श्री महाशय बोलले तिला.
अशोक, अगदी अगदी असच आलं मनात.
पण हे होईल उद्या एपीसोड संपता संपता. आधीच १/२ तास tp च असेल.
मग परत परवाच्या एपीसोड ची वाट बघा. जान्हवी कशी रीअ‍ॅक्ट करतीये ते बघायला.

मध्ये एका एपिसोडच्या प्रोमोमध्ये (तिचं लग्न ठरल्याचं कळाल्यावर) श्री घर सोडून जाताना दाखवला होता, तो खरंच तेव्हा गेला होता की आता आजीच्या विरोधामुळे सोडून जाईल?

तो अनिल इतका किळसवान बोलत असतांना ५ आया घाबरुन कोपर्‍यात उभ्या राहातात Happy
जान्हवी आणि श्री चा मंदीराचा सीन छानच

असो, उद्याचा भाग बघायचाच. मज्जा <<<+१

अगं दक्षिणा.... नाही बालिके, इतका घानेड्रा मुग्गा नाही आपला श्री. तो जितका स्वच्छ आहे स्वभावाने तितकाच वर्तणुकीनेही.....अग्गदी जान्हवी इतकाच.

कालच्या भागात अगदी जीव कंठाशी आला, कि बाबा रे , आता सांग तिला एकदाचे.
देवासमोर उभे असतानाचे जान्हवीचे एक्स्प्रेशन्स टु गुड.
श्री तर प्रेमात पडावे, लग्न करावे असाच आहे.

अनील आपटे झकास काम करतोय. पहिल्यांदा कधी पाहिले नाही ह्या नटाला. डेली सोप्स मधे चांगले अ‍ॅक्टर्स क्वचितच मिळतात बघायला.

'श्री'प्रेमी मला माफ करा. आधी मी फक्त प्रोमो बघत होते, त्यात तो छान दिसत होता. आता मालिका बघायला लागले आहे. त्यानंतरचं मत असं, की श्री जान्हवीपुढे 'चम्या' दिसतो अगदी Proud ती खूपच स्मार्ट आहे, जनरलीही आणि त्याच्यासमोर तर जास्तच. काल देवळात अकस्मात भेटतात तेव्हाचा सीन बघा- तो नुसताच गोड आणि खूप हसतोय, आणि ती- आनंद, आश्चर्य- सगळे भाव चेहर्‍यावर. श्री श्रींना अभिनयाच्या डिपार्टमेन्टमध्ये बरीच मजल गाठायची आहे अजून- असं माझं मत Wink

<तो नुसताच गोड आणि खूप हसतोय, आणि ती- आनंद, आश्चर्य- सगळे भाव चेहर्‍यावर>
वक्त का तकाजा है, सिच्युएशनची डिमांड आहे.

तशाही मालिका नायिकाप्रधानच असतात. त्यांनाच अभिनयाला जास्त वाव असतो. नायक एकतर रागोबा चिडके बिब्बे (मराठीतले) नाहीतर मेणाचे पुतळे. समानतेचे युग कधी येणार? Wink

ओह....!! तसं वाटत नाही, पौर्णिमा..... "श्री" जितका स्त्री वर्गात लोकप्रिय आहे तितकाच पुरुषवर्गातही. मी काही जास्त मालिका पाहिलेल्या नाहीत, पण ही मालिका आवर्जुन पाहतो, जरी त्यात "सून...." नामाला महत्व असले तरी श्री च्या रोलला चांगलाच वाव आहे आणि शशांकने त्या पात्राचे बेअरिंग चांगलेच सांभाळले आहे. जान्हवी झालेली तेजश्री जरी अभिनयात {त्यातही निष्पापपणे हसण्यात...} प्रवीण असली तरी शशांकने तितकाच समर्थ श्री रंगविला आहे.

अर्थात तुम्हासही मत स्वातंत्र्य आहेच म्हणा.....पण इथून पुढे तुम्हाला श्री ही आवडत जाईल...कारण आता त्याला जान्हवी संदर्भात तब्बल सहा आयांशी "फाईट" करायची आहे.

अशोक मामांची या धाग्यावारील पोस्टी पाहून धक्क्का बसला Wink
तुम्ही पण पाहू लागलात वाटत

बाकी ही सीरीयल त्या राधा ही बावरी ; मसाह तत्सम सिरीयल पेक्षा खुपच बरी आहे
लीना भागवत पण छान एक्टिंग करते

श्री तर छान दिसतो
पण दाढी कशाला ठेवालीये
नाहीतर अजुन चांगला दिसला असता

अगं जाई.... तुझ्यासारख्या एका भाचीनेच खूप आग्रह केला मला ही मालिका पाहाण्यासाठी.... अन् गंमत म्हणजे त्यावेळी त्याचे चार भाग झाले होते. जान्हवी आणि श्री यांचा 'फ्रेशनेस' मला फार भावला शिवाय आऊटडोअर शूटिंग तसेच कार्यालयीन कामकाजही तितकेच रंगविले गेले आहे.

अर्थात ही एकच मालिका पाह्यला मिळत्ये आजकाल.....जास्त वेळ टीव्हीसमोर बसूही देत नाहीत घरातील.

एक समजत नाही त्या कणखर, स्मार्ट, तडफदार, अंगात धमक असलेल्या आजीची एकही सून किंवा मुलगी तिच्यासारखी कशी नाही?

बिझनेस तिच्यानंतर एकदम श्रीकडे गेला? मधल्य पीढीतले कोणीच कसे नाही? मुलगे किंवा जावई गायब आहेत पण या बायकांपैकी कोणीच नाही?

अगदी तिच्याइतकी कर्तबगार नाही पण ऑफीसच्या रोजच्या कामात बर्यापैकी लक्ष घालणे फारसे अवघड नसावे गोखले ग्रुह उद्योग मधे.

मला मालिका आवडतेय आणि लीना भागवत... बाकी कोणी नाही.

भूषण प्रधान नवा असताना खूप आवडला होता, तसं या शशांक केतकरचं होत नाहीये.
तसंच ऋजुता जोशी (बायदवे, ही सध्या कुठे आहे?), क्षिती जोग, मुक्ता बर्वे जितक्या आवडल्या होत्या तितकी तेजश्री प्रधान आवडत नाहीये.

पौर्णिमा + १/२ Wink

श्रीच्या चेहेर्‍यावर सतत एक ओशाळल्यासारखा भाव असतो. जान्हवी स्मार्ट आहे जास्त. पण तरी दोघांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री मस्त आहे. मजा येते ते दोघं असलेले प्रसंग बघायला Happy

तेजश्री प्रधान एकदम फ्रेश वाटते. शिवाय, एक पॉझिटिव्हिटीचा ऑरा आहे तिच्याभोवती. (मराठी शब्द सुचत नाहीये.:अओ:) मला आवडते.
तो श्री आवडला मला. गोड हसतो. Happy

ऋजुता जोशी>>> देशमु़ख ना?

थॅन्क्यू थॅन्क्यू जाई...... बरं झालं झकोबाला फटकारलेस ते. च्यामारी कित्येक दिवसांनी एक मालिका बघायला सुरुवात केली तर ही भाचे मंडळी लागली कोकलायला.... असंच त्या दक्षिणालादेखील समजाव. तीही ओरडतेच.

Pages