Submitted by उद्दाम हसेन on 3 September, 2013 - 15:03
तुझा विचार मनात येतो.
तो कधी गेलेला असतो ?
सवय. हं !!
पृष्ठभाग आलबेल असेल कि त्याखाली काय खदखदतंय तिकडे डोळेझाक करणं जमतं सवयीने.
पण खदखद राहतेच ना..
बाहेर बरं वाटतं.
दिवसा चकाचक सगळं आणि रात्री नेत्रदीपक रोषणाई.
पण या शहराच्या खाली एक शहर आहे.
या शहराची घाण वाहणारं.
आताशा ऐकवणार नाहीत वर्णनं.
पावसाळ्यात मेनहोल मध्ये तुंबून वाहू लागलं कि अस्तित्व दाखवतं.
तट्ट फुगून आलेल्या घुशी, कीडे, रोगजंतू
भटकी जनावरं...
बस्स !
मग पिवळ्या रेनसूट मधली पथकं आली कि हायसं वाटतं.
हे बाहेर आलेलं दाबून टाका.
दिसू देऊ नका. वर येऊ देऊ नका..
प्लीजच
भयंकर आहे ते !!
- Kiran..
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्म्म्म! आणखी खुललं असतं
ह्म्म्म! आणखी खुललं असतं का?
किरण आणि स्फुट हे दोन शब्द सोबत आल्याने पडलेला प्रश्न!
गै न
वाचत रहा. पुढचा भाग जरा
वाचत रहा. पुढचा भाग जरा सावकाशीने