नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिल हा कुठल्यातरी सासूचा नवरा असेल असा संशय आहे मला
अवल.......हे भारीये!
जान्हवीची आई झालेल्या बाई "गुंतता र्‍हदय हे"(पल्लवी सुभाष, संदीप कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी) मधे पण होत्या. त्यातही संशयास्पद अशी स्वयंपाकीणबाई लताबाई नावाचं पात्र त्या करत. तेही छानच करायच्या.

होय..... जान्हवीच्या आईचे काम आशा शेलार यानी केले आहे. छान अभिनय केला आहे. टीव्हीवरील मुलाखतीत मात्र दोघी अगदी हसतखेळत आनंदाने एकमेकीच्या गळ्यात पडून बोलत होत्या. तिचा पिंट्या नामक भाऊही दाखविला आहेच.

आता ती 'सायली' नामक इच्छुक वधू काहीतरी गोंधळ घालणार अशी लक्षणे दिसत आहेत. आजच्या प्रोग्राममध्ये श्री आजीला सांगताना दाखविले आहे की "आमच्या दोघातील वाद मिटला....सारे काही सुरळीत होणार...." आणि नेमकी सायली घरी येऊन असेच काही सांगून गेली आहे. या संवादाचा अर्थ आजी असा लावणार की श्री ने शेवटी सायलीला स्वीकारले.

गुंतागुंतच सारी !!

मला अतुल परचुरे कुठल्यातरी सासूचा कुणीतरी असं वाटत होतं सुरुवातीला. नाहीतर एवढा मोठा अभिनेता बॉसच्या भूमिकेत कशाला ? पण हल्ली तो त्याच्या बायकोबरोबर जरा जास्तच बोलताना दाखवतात, त्यामुळे ती शंका ढेपाळली आहे Lol

जान्हवीला श्रीचे पूर्ण नाव माहिती नाहिये का? माहिती असेल तर मग तोच मालक आहे हे तिच्या लक्षात कसं आलं नाही अजून?

जान्हवी 'श्री' ला केवळ श्री या नावानेच ओळखते असे दाखविले आहे आणि तो 'गोखले उद्योग गृह' इथे अकांउंटंट म्हणून काम करीत आहे. एकदा फोनवर दोघे बोलतात, त्यावेळी ते प्रत्यक्षात एकमेकाला भेटलेले नसतात, पण श्री ने तिला रस्त्यावर एकदा दुसर्‍या इसमाला तडफदार उत्तर देताना पाहिलेले असते. त्यामुळे तो तिच्यावर खूष असतो शिवाय मॅनेजर बोरकर याने 'तुमच्या संस्थेच्या अकांउंटची फाईल आमच्या जान्हवी सहस्त्रबुद्धे हिने तयार केली आहे" असे सांगितलेले असते. पुढे तशाच संदर्भात फोनवर जान्हवी आपले नाव सांगून "मला तुमच्या अकांउंटंटशी बोलायचे आहे" हे श्री ला सांगितल्यावर हा पठ्ठ्या 'बोला बोला, मीच अकांउंटंट आहे" अशी बात मारून वेळ काढतो. तिथून या दोघांची ओळख त्याच नात्याने सुरू होते. त्यामुळे श्री हाच 'मालक' आहे ही बात जान्हवीच्या ध्यानात आलेली नाही.

ओके. शंकानिरसनाबद्दल धन्यवाद!

रच्याकने, श्री हा एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक, सगळा कारभार व्यवस्थित सांभाळणारा, मग आजीने दिलेल्या सोन्याच्या बांगड्या गहाळ झाल्या आहेत हे अजून ल़क्षात आलं नाही याच्या? बांगड्या सांभाळून ठेवता येत नाहीत तर कंपनीचा कारभार कसला सांभाळणार हा? Happy

होणार सून मी या घरची >>> हाऊ सून?

श्रीला मित्र मंडळी नाहीत?

अतूल परचुरे बॉस वाटतो? विनोद !

चीकू....शंकानिरसन क्रमांक २

~ श्री समजत असतो की त्याने जान्हवीला त्या बांगड्या दिलेल्या आहेत. जान्हवीने त्या स्वीकारलेल्या नाहीत अन् एके दिवशी ती त्याच्या ऑफिसमध्ये येऊन त्याच्या टेबलवर नकळत त्या ठेवून जाते. त्यावेळी श्री मुख्य खुर्चीवर न बसता बाजूला 'अकांउंटंट' या नात्याने अंग चोरून उभा राहिलेला असतो. पुढे जान्हवी तिथून गेल्यावर श्री ची मैत्रीण सायली तिथे येते आणि ती त्या बांगड्या जणू काही आपल्यासाठीच श्री ने तिथे ठेवल्या आहेत या समजुतीने घेते आणि घालते. श्री त्यावर काही बोलत नाही.....काल त्याच बांगड्या घालून सायली गोखले मातांना भेटायला घरी आल्याचे दाखविले गेले आहे.

श्री त्यावर काही बोलत नाही <<< म्हणजे श्रीला कळत पण तो काही बोलत नाही? मला वाटत तो गेल्यावर सायली टेबलावरच्या बांगड्या उचलते.

आजच्या एपीसोड मधे अनिल अगदी इरीटेटींग दाखवला आहे जान्हवीच्या आईशी बोलतांना

कालचा एपिसोड छान होता...नेहमीप्रमाणे तो अनिल आपटे डोक्यात गेला. जान्हवी हिरव्या साडीत छान दिसत होती. आता शनिवारी महएपिसोड आहे त्यामध्ये श्री तिला प्रपोज करणार आहे!!

"...आता शनिवारी महएपिसोड आहे त्यामध्ये श्री तिला प्रपोज करणार आहे!!...." ~
असेही असू शकेल; पण हे श्री महाशय कालपासून जाहिरातीमध्ये प्रेक्षकांना आवाहन करीत आहेत की, "मला तिला हे कसे सांगायचे ते कळत नाही, तर तुम्हीच मला काहीतरी मार्ग सुचवा...." म्हणजेच याचा अर्थ असाही होऊ शकतो की झी टीम काहीतरी स्पर्धा समोर ठेवणार प्रेक्षकांच्यापुढे.

युक्तीच काहीतरी लोकप्रियता वाढविण्यासाठी असू शकेल. बाकी श्री आणि जान्हवी यांची विघ्नेश्वर देवालयासमोरील गाठभेट प्रसन्न करणारी वाटली. विघ्नेश्वर पावो जोडीला.

श्री महाशय कालपासून जाहिरातीमध्ये प्रेक्षकांना आवाहन करीत आहेत की, "मला तिला हे कसे सांगायचे ते कळत नाही, तर तुम्हीच मला काहीतरी मार्ग सुचवा...." म्हणजेच याचा अर्थ असाही होऊ शकतो की झी टीम काहीतरी स्पर्धा समोर ठेवणार प्रेक्षकांच्यापुढे.
।<<< अशी खरंच स्पर्धा असेल तर मी नक्की भाग घेईन. Proud

प्राची, सीरीयल आहे ना ती? मग तिकडे चालतंय की क्रमश:. उलट प्रोपोजलसाठी तीन चार महाएपिसोड टाकले तर केवढ्या जाहिराती मिळतील बघ. आपण मधेमधे दहा बारा बॉलीवूड गाणी पण वाजवायची ना. म्हणजे प्रेक्षक कंटाळणार नाहीत. Happy

नहीऽऽऽऽ Sad Proud

".....की तिथेही क्रमशः?....."

~ वॉव्व.... प्राची चा हा षटकारच नंदिनीसाठी. पण नंदिनी तशी स्पर्धा जर असलीच तर तुम्ही जरूर भाग घ्या. [म्हणजे दुसरे कुणी धाडस करणारच नाही......दॅट्स शुअर !]

नंदिनी....ते खरंच घे गं भाग.
तुझ्या एका "शब्द" कथेमध्ये रेहानने(?) कसलं भारी प्रपोज केलंय नायिकेला ती दिवाळीसाठी घरी जात असते तेव्हा. तुझ्याच डोक्यातून असल्या भारी भारी आयडिया निघतात.

त्या अनिल ला माहीत नाही ना श्री हाच गोखले आहे?
मग त्या accountant च्य घरी जाउन आरडा ओरडा का नाही करत? ह्यांच्याकडेच का येतो?

त्या अनिल आपटेकडे कपड्याचा एकच जोड आहे वाटतं, ब्राउन सफारी. कि मी जे एपिसोडस बघतो त्यावेळेस हा तेच कपडे घालुन येतो??? Happy

त्याला accountant ची नोकरी घालवायची असते ना...म्हणून तो भागिरथींकडे जातो...( बहुतेक त्याला आतून खबर मिळाली असेल कि बाहेर लफडं असणा-या माणसाला भागिरथीबाई कामावरुन काढून टाकतात....तो काम कसे करतो याला काहिच महत्व नाही)

मला काही प्रश्न पडले Proud

श्री रात्रभर बसस्टॉपवर राहिला तेव्हा त्याच्या सगळ्या आयांनी श्री रात्रभर घरी कसा आला नाही म्हणून कलकलाट कसा नाही केला. दुसरा की हा अनिल डायरेक्ट गोखल्यांच्या बंगल्यात शिरतो कसा? एवढे मोठ्ठे उद्योजक, देऊळ वगैरे मालकीचे असणारे, ह्यांच्या बंगल्याला एक वॉचमन नसावा Uhoh

त्या अनिल आपटेकडे कपड्याचा एकच जोड आहे वाटतं, ब्राउन सफारी.
>>
त्याचा युनिफॉर्म असावा तो Biggrin

श्री रात्रभर बसस्टॉपवर राहिला तेव्हा त्याच्या सगळ्या आयांनी श्री रात्रभर घरी कसा आला नाही म्हणून कलकलाट कसा नाही केला.>>त्याने आजीला फोन करुन सांगितले असते कि ऑफिसमधे खूप काम आहे....तरिपण आई फोन करून विचारते कि घरी कधी येणार...तो सांगतो कि ऑफिसमध्ये थांबावे लागेल.

दुसरा की हा अनिल डायरेक्ट गोखल्यांच्या बंगल्यात शिरतो कसा? >>श्रीची आई विचारते कि तुम्ही कोण आणि आत कसे आलात?.....तर हा परत बाहेर जातो दार ओढून घेतो आणि मग पुन्हा दार ढकलून आत येऊन म्हणतो कि 'असा आत आलो'

अरे हो पण त्या दारा आधी गेट बिट नाही? Uhoh फक्त थेट दरवाजा आणि एकही वॉचमन नाही? ह्या ६ आया म्हणजे ६ पहारेकरी आहेत खरं तर... पण दरवाज्याच्या आत Proud
नुसतं घरात बसून काळज्या करायच्या.. बाहेर जाण्याची धमक एकित सुद्धा नाही ती कशी

त्या अनिल आपटेकडे कपड्याचा एकच जोड आहे वाटतं, ब्राउन सफारी.
>>
त्याचा युनिफॉर्म असावा तो
>>>>>>>>>>>

त्याच्याकडे अजून एक राखाडी रंगाचा सफारी आहे. बसस्टॉपवर जान्हवीचा हात धरला त्यावेळी तो घातला होता. Happy

अरे हो पण त्या दारा आधी गेट बिट नाही? फक्त थेट दरवाजा आणि एकही वॉचमन नाही?

>>>>>>>>>>>>
आणि दार आतून लॉक नाही, सरळ दरवाजा ढकलून कोणीही आत येऊ शकते?

Pages