नमस्कार,
दरमहिन्या प्रमाणे " सप्टेंबर " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.
यंदाचा विषय आहे... "अँगल" "वैशिष्ट्येपुर्ण कोन"
निकालः-
पहिला क्रमांकः- अजय पडवळ
विषयाला अनुरुप, योग्य फ्रेम आणि महत्वाच म्हणजे डेप्थ ऑफ फिल्ड उत्तमरीत्या कॅप्चर केली आहे.
द्वितीय क्रमांकः- इन्ना
यात सगळ्यात जास्त आवडली ती फ्रेम. नुसताच पाईप ऑर्गन कव्हर न करता वरील बाजुची लाकडी चौकट कॅप्चर केल्या मुळे फोटोला एक नॅचरल फ्रेम मिळाली आहे त्यातिल गोल आकार फोटोला आणखी उठावदार बनवतो.
तृतिय क्रमांक :- १) प्रसन्ना - दीपमाळ
२) सौरभः- सुर्याचा बल्ब
विषयाचा विचार केला तर आम्ही तो असा गृहित धरला होता.... "अश्या कोनातुन काढलेला फोटो जो कोन त्या वस्तु/व्यक्ती/प्रसंगा चा फोटो काढतांना विचारात घेतला जात नाही".... हे दोन्ही फोटो या कल्पनेत योग्य बसतातच पण त्या बरोबर ते एक वेगळा आकार/अनुभुती निर्माण करतात म्हणुन यांची निवड केली आहे.
सौरभ यांनी अचुक टायमिंग साधुन तो फोटो बनवला आहे.. हा सुध्दा एक मुद्दा लक्षात घेतलेला आहे
उत्तेजनार्थः-
१) झकासरावः-
डोस्याचा मस्त अँगल घेउन घेतलेला फोटो.. त्यामुळे त्या खाद्यपदार्थाकडे बघण्याची वेगळीच दृष्टी मिळते
२) तृष्णा:-
अँगल अॅडजेस्ट करुन घेतलेला फोटो आहे... टॉवर चे अगदी सुरवातीचे टोक सुध्दा पुर्ण येईल याची काळजी घेतली आहे...
अश्या पध्दतीचे एक वेगळ्याच फोटोंच्या दुनियेतुन घ्या फोटो.... नेहमी पाहणार्या वस्तुकडे आता वेगळ्याच कोनातुन पाहण्याचा प्रयत्न करा....
यावेळी आपल्याला शक्य असल्यास ( शक्य कराच ) कॅमेर्याची सेटींग्स याचा सुध्दा उल्लेख करावा...... जेणे करुन इतरांना सुध्दा माहीती होईल फोटो काढण्यासाठी काय काय करावे....
जिप्सी, शापित गंधर्व आणि मार्को पोलो ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...
नियमः-
१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......
"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..
चला तर करुया सुरुवात
***********पिकासा वरुन मायबोलीवर फोटो कसे अपलोड करायचे या माहीती साठी खाली*********************.
सूर्याचा नैर्सार्गिक बल्ब….
सूर्याचा नैर्सार्गिक बल्ब….
ठाकुर्ली नजीक रेल्वेलाईन च्या बाजूला एका विशिष्ट अँगल ने काढलेला हा फोटो.
" भारत माता कि जय "

श्रीवर्धन जवळ एका स्पॉट ला दोन डोंगरांच्या मधे तयार झालेला हा भारताचा अर्धा नकाशा माझ्या अँगल ने …
कुल फटू रे सौरभ बल्ब चा तर
कुल फटू रे सौरभ
बल्ब चा तर कहर आलाय
सेम झिरो चा वाटतोय
बल्ब आवडला सौरभ ! झकास,
बल्ब आवडला सौरभ !
झकास, डोस्यामागे चंद्र आहे का ?
अश्या पध्दतीचे एक वेगळ्याच
अश्या पध्दतीचे एक वेगळ्याच फोटोंच्या दुनियेतुन घ्या फोटो.... नेहमी पाहणार्या वस्तुकडे आता वेगळ्याच कोनातुन पाहण्याचा प्रयत्न करा....>> या सुचनेनुसार दिनेशदांचे फोटो अगदी perfect वाटतात..
जामी
जामी मस्जिद्,अहमदाबाद
२०१०मधे अहमदाबाद भेटीत जामी मस्जिद आणी अडालज या स्टेप वेल बद्दल् माबो वर लिहिलं होतं,..पुन्हा रिट्रिव केला हा माझा ,मी काढलेला सर्वात आवडता फोटो:)
हा फोटो कदाचित पूर्वी टाकला
हा फोटो कदाचित पूर्वी टाकला असेल माबोवर, आठवत नाही.


असे कैक फोटो आहेत माझ्याकडे
टाऽकूऽऽ? ट्टाक्कतोच्च 
झक्या गॉगल मध्ये प्रकाशाचे
झक्या गॉगल मध्ये प्रकाशाचे रिफ्लेक्शन आहे का?
लिंबू, मनोर्याचा फोटो खास
लिंबू, मनोर्याचा फोटो खास आलाय.
स्पर्धेच्या पानावर वानगीदाखल
स्पर्धेच्या पानावर वानगीदाखल दिलेले फोटो पिकासामधुन असल्याने दिसत नसल्याने मायबोलीसुविधा न वापरता बाहेरून फोटो टाकल्याबद्दल निषेध !
१००
१००
गॉगल मध्ये प्रकाशाचे
गॉगल मध्ये प्रकाशाचे रिफ्लेक्शन आहे का?>>>

चन्द्र>>>
थोड अजुन गेस करा..
गटगला उपस्थित लोकानीदेखील डोस्कं खाजवावं.
चमचा?????? चंद्र>> डोस्कं>>>
चमचा??????
चंद्र>> डोस्कं>>>
खिश्यातला मोबाईल?????
झक्या खाजवा खाजवी नको
झक्या खाजवा खाजवी नको करुस्...ही फोटोग्राफीची स्पर्धा आहे.... ओळखा पाहु ची नाही
बाकी डोस्याचा फोटो परफेक्ट मस्त आलाय.
हे माझ्याकडून
हे माझ्याकडून
प्राची, डोस्याचा फोटो अगदी
प्राची,
डोस्याचा फोटो अगदी झक्कास.....
लोहगड
लोहगड
छान फोटो आलेत
छान फोटो आलेत
झकोबाने टाकलेले फोटो मला दिसत
झकोबाने टाकलेले फोटो मला दिसत नसल्याने झकोबाचा जाहीऽर निषेध
माझी स्पर्धे साठीची प्रचि १)
माझी स्पर्धे साठीची प्रचि
) मधिल अॅटॉमियम च्या अतिजलद लिफ्ट मधून उर्ध्वगमन !

१) चर्च च्या बेल टॉवर मधून खाली दिसणारा पाईप ऑर्गन.
२) ब्रुसेल्स ( उच्चार बरोबर जो आहे तो आपापला करावा
मस्त..
मस्त..
इन्ना..खूपच सुंदर
इन्ना..खूपच सुंदर छायाचित्र...
इतर सर्वांचीही मस्त फोटोग्राफी...
झक्या... मोबाईलचा लाईट आहे का
झक्या... मोबाईलचा लाईट आहे का तो? किंवा स्क्रीन??
ए भो, मी बी! प्लेझरच्या सीटवर
ए भो, मी बी!
प्लेझरच्या सीटवर बसलेली माशी.
नियमात २ च फोटू बसत्यात म्हणून मोठी माशी काढून टाकली आहे.
या अँगल साधण्यातली गम्मत
या अँगल साधण्यातली गम्मत सांगा.
फोटोमधले काहीही एडिटले नाहिये.
इथे फक्त २च फोटो द्यायची
इथे फक्त २च फोटो द्यायची परवाणगी आहे......................
कृपया ............तेवढेच द्यावे ..................
इन्ना मस्त आहेत दोन्ही प्रचि.
इन्ना मस्त आहेत दोन्ही प्रचि.
उदयन , स्पर्धे साठी २च आहेत
उदयन , स्पर्धे साठी २च आहेत
बाकीचे फोटो नुसतेच विषयानुरूप वाटले म्हणून.
पहिला फोटो बदलून हा टाकतो
पहिला फोटो बदलून हा टाकतो आहे, पुण्याजवळ निळकंठेश्वर येथे मावळता सुर्य बरोबर बुध्दाच्या डोक्यामागचे वलय दिसेल असा काढलेला हा फोटो

आणि हा उत्तरांचल येथे काढलेला

खासच आहेत सगळेच प्रचि
खासच आहेत सगळेच प्रचि
@इब्लिस : डॉक, तुमचा दुसरा फोटो पाहताना मला ती जाहीरात आठवली. त्यात बघा सुर्य सगळ्या माणसांच्या डोक्यातली उर्जा शोषत असतो. (कशाची होती ते आठवत नाहीये आता) आणि त्या दुसर्या रांगेतील सदगृहस्थांच्या डोक्यातून तो काळा डिसप्ले कसला बाहेर आलाय?
विशाल
विशाल
Pages