फोटोग्राफी स्पर्धा.. सप्टेंबर..."अँगल" "वैशिष्ट्यपुर्ण कोन" निकाल

Submitted by उदयन.. on 2 September, 2013 - 09:33

नमस्कार,

दरमहिन्या प्रमाणे " सप्टेंबर " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.

यंदाचा विषय आहे... "अँगल" "वैशिष्ट्येपुर्ण कोन"

निकालः-

पहिला क्रमांकः- अजय पडवळ

1st ajay padwal.JPGविषयाला अनुरुप, योग्य फ्रेम आणि महत्वाच म्हणजे डेप्थ ऑफ फिल्ड उत्तमरीत्या कॅप्चर केली आहे.

द्वितीय क्रमांकः- इन्ना

2nd inna.JPGयात सगळ्यात जास्त आवडली ती फ्रेम. नुसताच पाईप ऑर्गन कव्हर न करता वरील बाजुची लाकडी चौकट कॅप्चर केल्या मुळे फोटोला एक नॅचरल फ्रेम मिळाली आहे त्यातिल गोल आकार फोटोला आणखी उठावदार बनवतो.

तृतिय क्रमांक :- १) प्रसन्ना - दीपमाळ

3rd prasanna deep mal.jpg२) सौरभः- सुर्याचा बल्ब

3rd saurabh.jpgविषयाचा विचार केला तर आम्ही तो असा गृहित धरला होता.... "अश्या कोनातुन काढलेला फोटो जो कोन त्या वस्तु/व्यक्ती/प्रसंगा चा फोटो काढतांना विचारात घेतला जात नाही".... हे दोन्ही फोटो या कल्पनेत योग्य बसतातच पण त्या बरोबर ते एक वेगळा आकार/अनुभुती निर्माण करतात म्हणुन यांची निवड केली आहे.
सौरभ यांनी अचुक टायमिंग साधुन तो फोटो बनवला आहे.. हा सुध्दा एक मुद्दा लक्षात घेतलेला आहे

उत्तेजनार्थः-

१) झकासरावः-

uttejanarth zakas.JPGडोस्याचा मस्त अँगल घेउन घेतलेला फोटो.. त्यामुळे त्या खाद्यपदार्थाकडे बघण्याची वेगळीच दृष्टी मिळते

२) तृष्णा:-

uttejanarath trushna.JPGअँगल अ‍ॅडजेस्ट करुन घेतलेला फोटो आहे... टॉवर चे अगदी सुरवातीचे टोक सुध्दा पुर्ण येईल याची काळजी घेतली आहे...

अश्या पध्दतीचे एक वेगळ्याच फोटोंच्या दुनियेतुन घ्या फोटो.... नेहमी पाहणार्या वस्तुकडे आता वेगळ्याच कोनातुन पाहण्याचा प्रयत्न करा....

यावेळी आपल्याला शक्य असल्यास ( शक्य कराच ) कॅमेर्‍याची सेटींग्स याचा सुध्दा उल्लेख करावा...... जेणे करुन इतरांना सुध्दा माहीती होईल फोटो काढण्यासाठी काय काय करावे....

जिप्सी, शापित गंधर्व आणि मार्को पोलो ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...

नियमः-

१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......

"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..

चला तर करुया सुरुवात

***********पिकासा वरुन मायबोलीवर फोटो कसे अपलोड करायचे या माहीती साठी खाली*********************.

http://www.maayboli.com/node/43465

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सूर्याचा नैर्सार्गिक बल्ब….

Natural Bulb copy.jpg
ठाकुर्ली नजीक रेल्वेलाईन च्या बाजूला एका विशिष्ट अँगल ने काढलेला हा फोटो.

" भारत माता कि जय "
IMGA0492 copy.jpg
श्रीवर्धन जवळ एका स्पॉट ला दोन डोंगरांच्या मधे तयार झालेला हा भारताचा अर्धा नकाशा माझ्या अँगल ने …

अश्या पध्दतीचे एक वेगळ्याच फोटोंच्या दुनियेतुन घ्या फोटो.... नेहमी पाहणार्या वस्तुकडे आता वेगळ्याच कोनातुन पाहण्याचा प्रयत्न करा....>> या सुचनेनुसार दिनेशदांचे फोटो अगदी perfect वाटतात..

जामी मस्जिद्,अहमदाबाद

mas11.jpg

२०१०मधे अहमदाबाद भेटीत जामी मस्जिद आणी अडालज या स्टेप वेल बद्दल् माबो वर लिहिलं होतं,..पुन्हा रिट्रिव केला हा माझा ,मी काढलेला सर्वात आवडता फोटो:)

स्पर्धेच्या पानावर वानगीदाखल दिलेले फोटो पिकासामधुन असल्याने दिसत नसल्याने मायबोलीसुविधा न वापरता बाहेरून फोटो टाकल्याबद्दल निषेध !

गॉगल मध्ये प्रकाशाचे रिफ्लेक्शन आहे का?>>>
चन्द्र>>>
Proud

थोड अजुन गेस करा.. Happy
गटगला उपस्थित लोकानीदेखील डोस्कं खाजवावं.

झक्या खाजवा खाजवी नको करुस्...ही फोटोग्राफीची स्पर्धा आहे.... ओळखा पाहु ची नाही Proud
बाकी डोस्याचा फोटो परफेक्ट मस्त आलाय.

माझी स्पर्धे साठीची प्रचि Happy
१) चर्च च्या बेल टॉवर मधून खाली दिसणारा पाईप ऑर्गन.
२) ब्रुसेल्स ( उच्चार बरोबर जो आहे तो आपापला करावा Wink ) मधिल अ‍ॅटॉमियम च्या अतिजलद लिफ्ट मधून उर्ध्वगमन !DSCN0519.JPGDSCN0887.jpg

इन्ना..खूपच सुंदर छायाचित्र...
इतर सर्वांचीही मस्त फोटोग्राफी...

पहिला फोटो बदलून हा टाकतो आहे, पुण्याजवळ निळकंठेश्वर येथे मावळता सुर्य बरोबर बुध्दाच्या डोक्यामागचे वलय दिसेल असा काढलेला हा फोटो
Nilkantheshwar Budhdha.jpg

आणि हा उत्तरांचल येथे काढलेला

खासच आहेत सगळेच प्रचि Happy

@इब्लिस : डॉक, तुमचा दुसरा फोटो पाहताना मला ती जाहीरात आठवली. त्यात बघा सुर्य सगळ्या माणसांच्या डोक्यातली उर्जा शोषत असतो. (कशाची होती ते आठवत नाहीये आता) आणि त्या दुसर्‍या रांगेतील सदगृहस्थांच्या डोक्यातून तो काळा डिसप्ले कसला बाहेर आलाय? Wink

Pages