ब्रम्हकमळ ( गावठी )

Submitted by अवल on 4 August, 2013 - 01:17

आपण ज्याला ब्रम्हकमळ म्हणतो, पण जे प्रत्कक्षात एक कॅक्टस आहे ते
आमच्या वाबळे मावशींच्या टेरेस मध्ये ते असे फुलले होते, मोजा बरं Happy

IMG_5471 copy copy.jpg

अन त्यातल्या एकाचा हा क्लोज अप

IMG_5475 copy copy.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच..............

निवडुंगमधल्या एका जातीच्या झाडाला ही फुल येतात......

आतिशय सुरेख!झाडावर एवढी फुले पाहून खूप छान वाटले असेल ना.माझ्या शेजार्‍याने रात्री १० वाजता ब्रम्हकमळ आणून दिल्यावर मी खूप चिडले होते (मनात) की यांना रात्रीचे फूल तोडवले कसे?आमचे ब्रम्हकमळ
यावर्षी रुसून आहे.

मस्तच! काय सुंदर आहे आणि किती उंच ! माझ्या आईकडे पण होते पण एवढे उंच नव्हते. त्याचा वास तर खुपच सुंदर असतो. एकाचवेळी फुलल्यावर तर मस्त धमधमाट सुटतो.

पुर्वि ब्रम्हकमळ पहायला मिळ्णे दुर्मिळ होते. आता ते बहुतेक ठिकाणि पहायला मिळ्ते.फोटो खुपच सुंदर आहेत.

एकदम छान ..एकदम उमललेली असली कि तो धुन्द सुगन्ध ..अहाहा...मी खुप मिस करतेय Sad माझ्यकडेहि असेच फुलत होते ..एक वेळी २७ ...

सुंदर आहेत फुल आणि फोटो.....
सगळ्यांना विनंती "आता समजल आहे ना की ही एक निवडुंगाची जात आहे तर मग परत परत ब्रह्मकमळ कशाला म्हणता आहात? ब्रह्मकमळ हे फक्त हिमालयासारख्या थंड प्रदेशातच येत अस मी वाचल आहे. एकदा सकाळ पेपरात आलं होतं. दुसर काहितरी नाव असेल याला ते शोधा"

आणि राग आला असेल तर मला माफ करा Happy

छानच बहरलंय गं झाड. लगडलेली फुलं खुप सुंदर दिसतायत. चांगलं उंच झाड आहे आणि विस्तारही बर्‍यापैकी आहे त्यामुळे त्याला फुलांचा भार पेललेला दिसतोय. काही वर्षांपूर्वी माझ्या गच्चीतल्या ५-६ फुटाच्या छोट्या झाडाला अशीच एकावेळी १६ आलेली आणि झाडाला वेगवेगळ्या बाजूंनी दोर्‍या बांधून, काठी लावून आधार द्यावा लागला इतकं ते वाकलं होतं. दुर्मिळ दुर्मिळ म्हणतात पण त्या अख्ख्या वर्षात ५८ फुलं आली. नंतर नंतर तर चुकून कधी आमचं लक्ष गेलं नसेल तर तो धुंद सुगंधच फुल फुलल्याची बातमी कळवायचा Happy

@अवल | 4 August, 2013 - 09:17
आपण ज्याला ब्रम्हकमळ म्हणतो, पण जे प्रत्कक्षात एक कॅक्टस आहे <<

मग खर्‍या ब्रम्हकमळाच्या झाडाचा आणि फुलाचा फोटो यांची लिन्क कोणी देईल का?