रव्याचा केक- पारंपारिक पद्धतीने

Submitted by प्रज्ञा९ on 4 July, 2013 - 08:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

दीड वाटी रवा. बारीक किंवा उपम्याचा- कोणताही.
एक वाटी दूध
एक वाटी गोड दही
एक ते दीड वाटी साखर
अर्धी वाटी तूप किंवा लोणी.
अर्धा टीस्पून खायचा सोडा
रंग, इसेन्स आवडीनुसार
सुकामेवा

क्रमवार पाककृती: 

-रवा हलका भाजून घ्या. उपम्याला लागतो तितका जास्त नाही, नीट गरम झाला, शेकला गेला की गॅस बंद करा.
-दह्यात साखर घालून फेटून घ्या. आधी एक वाटी साखर घालून थोडं चाखून मग हवी तर अजून साखर घाला. दही गोड असेल आणि केकचा गोडवा बेताचाच हवा असेल तर एक वाटी साखर पुरेल.
-दही नीट एकजीव झाल्यावर त्यात शेकलेला रवा, दूध, तूप, खायचा सोडा घालून नीट मिसळून अर्धा तास मिश्रण मुरवत ठेवा.
-अर्ध्या तासाने रंग आणि इसेन्स घालणार असाल तर घाला. सुकामेवा केकमधे हवा तर मिश्रणात घाला.
-नॉन स्टिक पॅनला तुपाचा हात लावून मिश्रण त्यात ओता आणि मंद आंचेवर पॅन ठेवा. झाकण ठेवा. मधे मधे झाकण काढून जमा झालेली वाफ जाऊ द्या.
-खरपूस छान वास आला की केकमधे सुरी घालून बघा. सुरी कोरडी आली की केक तयार!

IMG_4472.JPG

वाढणी/प्रमाण: 
खाल तसा! :)
अधिक टिपा: 

-मी हार्ड अ‍ॅनोडईझ्ड पॅनमधे केला. तो पॅन एकदा तापला की सगळीकडूनच छान भाजला जातो केक आणि लवकरही होतो असा माझा अनुभव. त्यामुळे केकसाठी लागणारा वेळ पॅनवरही अवलंबून आहे (तरी २०-२५ मिनिटं अंदाजे). मी दिलेला वेळ तयारीसकट मला लागलेला वेळ आहे.
-सुकामेवा मला पॅनच्या तळाशी नीट सजवून वर मिश्रण घालायचं होतं, पण आयत्या वेळी विसरले. आणि सजावट नीट झाली तरी मिश्रण ओतल्यावर ती फिसकटली तर दुरुस्तीचा(!!!) व्याप होईल अशी भीती, म्हणून पुन्हा केला तेव्हा अस्साच केला! वरून काजू लावले फक्त. त्यामुळे इथे तुम्ही तुमची कल्पकता वगैरे वापरालच! Proud त्याचे फोटो तुम्हीच टाका.
-ही अगदी बेसिक आणि तरीही खूप मस्त पाकृ आहे!

माहितीचा स्रोत: 
आई, रुचिरा हे पुस्तक, दिनेशदांची अधिक माहिती आणि मी केलेले थोडेफार बदल.
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल मी परत केला केक. बेरीचा वापर करुनच. फक्त रव्या ऐवजी शिंगाड्याच पिठ घेतल. . त्यातच थोडस राजगिर्याच पिठ घातल. गॅसवर तवा ठेवुनच फ्रायपॅन मधे केला.अतिशय छान.[वर थोडे दाणे, ड्राय-फ्रूट घातल.] आमच्या यांना तर फारच आवडला मी सोड्या बरोबर थोडी[चिमुटभर] बेकिंग पावडर घातली.. त्याने अजुन हलका, नरम झाला. धन्यवाद.

आ म्ही केलेला... मस्त झालेला. तीन प्रकारे.
१. ओवन -३५० डीग्री फॅरेन्हाईट. ३० मिनिट्स.पीठ भिजवल्या भिजवल्या केला. नजरचुकीनं ३० मिनिट्स वाचायचं विसरले.
२. आप्पेपात्र, लो गॅस ४-५ मिनिट्स (पात्र थोड गरम करून घेतलेलं). नक्की वेळ माहित नाही, कारण बाळ रडाय्ला लागलं - आईनं पूर्ण केलं प्रोसेसिंग.
३. थोडी कणीक घालून धिरडं.

थँक्यू रेसिपीसाठी!

माझं काय चुकलं?

मी काल हा केक केला होता. पदार्थ, प्रमाण आणि वेळ जसं सांगितलं आहे तसाच केला होता. केकला रंग आणि चव खूप छान आली होती. मी तव्यावर नॉनस्टीक फ्रायिंग पॅन ठेवून केला आणि पाऊण तास लागला. पण खाताना सगळेजण असच म्हणत होते कि शिऱ्यासारखा लागतो आहे. असं का झालं असावं?

ह्या रेसिपीची लिन्क दिलीये.>> धन्यवाद दाद! Happy

आशिता, चव शिर्‍यासारखी असतेच जरा. कारण घटक पदार्थ बर्‍यापैकी शिर्‍यात घालतो तसे आहेत. दही हा मेजर फरक आहे, पण बाकी भरपूर तूप, दूध वगैरे आहेच.

धन्यवाद प्रज्ञा.

खरंतर मला स्वत:ला हा केक आणि त्याची चव खूप आवडली. पण सगळेजण शिऱ्यासारखा लागतो असे म्हणायला लागल्यावर मला असे वाटले कि माझे काही चुकले कि काय म्हणून मी विचारले. याच्यात बेकिंग पावडर टाकायची गरज आहे का?

rava cake.jpg

रेसिपी सोपी, सुटसुटीत आहे .. केक छान झाला .. धन्यवाद नवरत्न प्रज्ञा .. Happy

(पण मला मुळात ह्याला केक म्हणवत नाही आणि आवडतही नाही .. अहोंच्या आवडीखातर केला ..)

रेसिपीची प्रिन्ट आउट घरी नेली होती.
काल केला.
मी फक्त दह्यात साखर विरघळवणे एवढीच मदत केली.

माझा पोरगा आणि त्याचे दोन दोस्त ह्यानी कल्ला करत अटॅक केला. Lol
कट करेपर्यंत हातातुन हिसकाउन घेवुन खादाडी सुरु होती.

मस्त झालेला केकं. Happy

धन्यवाद.
खुप साधा सोपा आणि झटपट होणारा.. Happy

हॉईं! १३ प्रतिसाद वाचून धसकले! तरी बरं, नावात "सोप्पा" वगैरे नाहिये! Proud Light 1

सर्वांचे मनःपूर्वक आभार! Happy
मी बेरी वापरली नाहिये त्यामुळे मला ते प्रमाण माहिती नाही.

केक चवीला छान झाला पण कडक झाला.>> जास्त वेळ भाजला गेला.

याच्यात बेकिंग पावडर टाकायची गरज आहे का?>> नाही. मी नाही टाकत कधी.

सशल. फोटो मस्तच!

पण हा केक किती टिकतो? आणि फ्रीजमध्ये ठेवावा लागतो का टिकण्यासाठी?>>> फ्रीजच्या बाहेर खराब होतो त्यामुळे टेम्परेचर नॉर्मल झालं की जेवढा एका वेळी लगेच संपेल तेवढाच घेऊन बाकी फ्रिजात ठेवायला हवा. टिकत नाही जास्त. दही आणि दूध असल्यामुळे. माझा एकदा दिवसभर बाहेर राहिला, रात्रीला खराब झाला. अगदी थंडगार हवा असेल तर कदाचित टिकेल, पण खात्री नाही.

इथे कळवल्याबद्दल पुन्हा एकदा आभार! Happy

आजच केला(आता काल असे म्हणायला पाहिजे रात्रीचे १२ वाजून गेले). मी थोडा काकडीचा कीस आणि रव्याबरोबर अगदी थोडा मल्टीग्रेन आटा घातला, कन्वेक्शनमधे केला, आवडला नवऱ्याला म्हणजे चांगला झाला.

IMG_3268.jpg

आज मिशन केक सक्सेसफुल . आयुष्यात पहिल्यांदा केक केला आणि घरच्या चोखडंळ माणसाकडून दाद अय्यंगार बेकरीसारखा लागतो ही दाद मिळाली .

धन्य वाटले Happy

Pages