रव्याचा केक- पारंपारिक पद्धतीने

Submitted by प्रज्ञा९ on 4 July, 2013 - 08:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

दीड वाटी रवा. बारीक किंवा उपम्याचा- कोणताही.
एक वाटी दूध
एक वाटी गोड दही
एक ते दीड वाटी साखर
अर्धी वाटी तूप किंवा लोणी.
अर्धा टीस्पून खायचा सोडा
रंग, इसेन्स आवडीनुसार
सुकामेवा

क्रमवार पाककृती: 

-रवा हलका भाजून घ्या. उपम्याला लागतो तितका जास्त नाही, नीट गरम झाला, शेकला गेला की गॅस बंद करा.
-दह्यात साखर घालून फेटून घ्या. आधी एक वाटी साखर घालून थोडं चाखून मग हवी तर अजून साखर घाला. दही गोड असेल आणि केकचा गोडवा बेताचाच हवा असेल तर एक वाटी साखर पुरेल.
-दही नीट एकजीव झाल्यावर त्यात शेकलेला रवा, दूध, तूप, खायचा सोडा घालून नीट मिसळून अर्धा तास मिश्रण मुरवत ठेवा.
-अर्ध्या तासाने रंग आणि इसेन्स घालणार असाल तर घाला. सुकामेवा केकमधे हवा तर मिश्रणात घाला.
-नॉन स्टिक पॅनला तुपाचा हात लावून मिश्रण त्यात ओता आणि मंद आंचेवर पॅन ठेवा. झाकण ठेवा. मधे मधे झाकण काढून जमा झालेली वाफ जाऊ द्या.
-खरपूस छान वास आला की केकमधे सुरी घालून बघा. सुरी कोरडी आली की केक तयार!

IMG_4472.JPG

वाढणी/प्रमाण: 
खाल तसा! :)
अधिक टिपा: 

-मी हार्ड अ‍ॅनोडईझ्ड पॅनमधे केला. तो पॅन एकदा तापला की सगळीकडूनच छान भाजला जातो केक आणि लवकरही होतो असा माझा अनुभव. त्यामुळे केकसाठी लागणारा वेळ पॅनवरही अवलंबून आहे (तरी २०-२५ मिनिटं अंदाजे). मी दिलेला वेळ तयारीसकट मला लागलेला वेळ आहे.
-सुकामेवा मला पॅनच्या तळाशी नीट सजवून वर मिश्रण घालायचं होतं, पण आयत्या वेळी विसरले. आणि सजावट नीट झाली तरी मिश्रण ओतल्यावर ती फिसकटली तर दुरुस्तीचा(!!!) व्याप होईल अशी भीती, म्हणून पुन्हा केला तेव्हा अस्साच केला! वरून काजू लावले फक्त. त्यामुळे इथे तुम्ही तुमची कल्पकता वगैरे वापरालच! Proud त्याचे फोटो तुम्हीच टाका.
-ही अगदी बेसिक आणि तरीही खूप मस्त पाकृ आहे!

माहितीचा स्रोत: 
आई, रुचिरा हे पुस्तक, दिनेशदांची अधिक माहिती आणि मी केलेले थोडेफार बदल.
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आजच केला. बेरीच्या भांड्यातच मिश्रण केल. पॅन मधेच- पण -गॅसवर तवा व त्यावर पॅन ठेवुन केला. छान वास आल्यावर गॅस बंद केला. केक फारच छान झाला. रव्याचा एवढा छान केक -- विनासायास- प्रथमच केला. वखाल्लाहि प्रथमच. हाताला तर अजुनहि छान वास आहे त्याचा. खुप खुप धन्यवाद .प्रज्ञा.

हायला! १०-१२ दिवसांनी आले तर इतक्या प्रतिक्रिया! Proud

आभार सगळ्यांचेच! Happy

उशीर झालाय उत्तर द्यायला....पण मी वाळू वापरली नाहिये. पॅनमधे थेट मिश्रण घातलं. आणि याच एका मेथडने केलाय, त्यामुळे कुकर, ओव्हन वगैरेबद्दल मी अंधारातच आहे! Wink

मी पण केला मायक्रोव्हेव मध्ये, चव छान आली पण थोड्यावेळाने कडक झाला
काय चुकल
तरी पण मुलांनी आवडिने खाल्ला.

मायक्रोवेव्हमध्ये कुकिंग प्रोसेस (पदार्थात निर्माण झालेल्या आंतरिक उष्णतेमुळे(?) मायक्रोवेव्ह ऑफ केल्यावरही काही वेळ चालूच राहते. त्यासाठी पदार्थ जरा अंडरकुकच करायचा.(म्हणूनच स्टँडिंग टाइम असतो)

मी पण मायक्रोवेव्हमध्ये ४०% पॉवरवर करून पाहिला. पण केक गोरा गोरा पान निघाला. बहुतेक साखर कॅरॅमलाइज झाली नाही. आता गॅसवर करून पाहणार.

मी केकच्या मापात काहीच पाप केलं नाही तरीही काय चुकलं?
ब्राऊन बेस अगदीच कडक झाला चव देखील शिर्‍यासारखी लागली.
मी देखील हार्ड अ‍ॅनोडईझ्ड पॅनमधे केक केला.
खालुन अगदिच करपल्यासारखा झाला. Sad
माझं काय चुकलं असेल?? Uhoh

सारीका, चव थोडी शिर्‍यासारखी असतेच.
करपल्यासारखा झाला म्हणजे तो जास्त वेळ भाजला गेला. जास्त खरपूस झाला. गॅसची आंच सर्वात कमी होती का? खमंग वास येऊन सुरी टेस्ट केली होती का? आणि हार्ड अ‍ॅनो. भांड्यात जास्त वेळ राहिला तर अजून जास्त वेळ भाजण्याची प्रक्रिया सुरू राहते, जरी गॅस बंद केला तरी. त्यामुळे सोनेरी रंग आणि सुरी टेस्ट करून बघून लगेच गॅस बंद केला तर करपणार नाही.

माझा एकदा थोडा करपायला लागला होता, कारण गॅस चुकून वाढला आणि जास्त भाजला गेला केक.

साबांना खुप आवडला केक म्हणुन मी आज पुन्हा करतेय, खाली तवा वापरुन करत आहे, दिड तास झाला तरी अजुन झाला नाही, मधल्या भागात शिजायला वेळ लागतो आहे बाकी कडेने व्यवस्थित शिजलाय.
सुगंधही छान येत आहे.
मागच्यावेळी देखील मधल्या भागात न शिजल्याने मी जास्त वेळ ठेवला तर तो थोडा काळपट झाला.

सारीका, तवा मध्यभागी खोलगट आहे का? केकच्या भांड्याच्या मधल्या भागाला आंच कमी लागतेय का बघा. नॉनस्टीकचे तवे कसे पूर्ण एकसंध सपाट असतात तसा तवा हवा. पोळीचा तवा मधे जऽरासा खोल असतो, त्यामुळे कदाचित मधे पुरेशी आंच न लागण्याची शक्यता आहे.

माझ्याकडचा हार्ड अनोडाइज्ड तवा मधून खोलगट आहे जरा. बरं झालं वेळेत वरची पोस्ट वाचली. उद्या करणार आहे हा केक. साध्या ओव्हनमधे किती टेंपरेचरला भाजता येईल?

हो गं मंजुडी, तवा जरासा खोलगट होता.
केक अज्जीबात जळाला नाही.
थोडासा कच्चा भाग सोडता, केक एकदम यम्मी झालाय.
पुढच्यावेळी वापरात नसलेला नॉनस्टीक तवा सत्कारणी लावेन.
धन्स प्रज्ञा एकदम सोप्प्या कृती बद्दल. Happy

मी परवा केला होता. खाली हार्ड अनोडाइज्ड तवा वापरला. १५ ते २० मिनिटांत झाला. खूप सुंदर झाला. लेकाने आणि त्याच्या मित्राने फस्त केला.

धन्यवाद प्रज्ञा.

साक्षी.

आत्ताच केक केला आहे खूप छान झालाय. तुप कढवलेल्या भांड्यातच सगळ मिश्रण फेटल आणी तुप आर्धी वाटी न वापरता १ चमचा घेतल.
३५० फॅ. वर ३० मिनिटे बेक केला.
धन्यवाद प्रज्ञा.

मी मध्यंतरी पुन्हा एकदा केला (पहिला थोडा जळला). ह्यावेळी कास्ट आयर्नचं पॅनच वापरलं पण खाली तवा ठेवला. खूप सुंदर झाला केक. केळं ही घातलं होतं. रंग, चव... सगळच अगदी सुर्रेख.
काव्य-साहित्याची मैफिल होती तिथे नेला. सगळ्यांनाच त्यांच्या आयांनी भारतात खाली वाळू ठेवून केलेल्या रव्याच्या केकची आठवण आली. अगदी माहेरच्या गोष्टी रंगेपर्यंत.
ह्या रेसिपीची लिन्क दिलीये.
प्रज्ञा, पुन्हा एकदा धन्यवाद.

मस्त दिसतोय केक

(हार्ड अ‍ॅनोडईझ्ड पॅन / सपाट भांडे -सपाट तवा या नेक्श्ट खरेदी लिस्ट मधे टाकाव्या Wink )

मी पण केला हा केक. बेरीच्या पॅनमध्ये. वाळूऐवजी मीठ वापरले (कुकरमधे केक करताना वापरून जे परत ठेवून देत असे ते). मस्त खुसखुशीत झाला. Happy

फार जपून ठेवली आहे मी ती आता. >>>

मी कायमच तव्यावर वाळू ठेवून केक करते. माझ्याकडची वाळू ऑलमोस्ट ८-१० वर्षांपूर्वी कुठूनतरी मिळवलेली आहे. त्यानंतर ३ वेळा घरं बदलली. पण ती वाळूची पिशवी मी अजिबात नजरेआड होऊ दिली नाही Proud

आता कुठल्यातरी टाऊनशिपमधे जाऊन प्ले एरीयामधली वाळू पिशवीत भरून आणली पाहिजे.

आमच्या दादरच्या अरबी समुद्रावरची वाळू काय घ्याल...

आधी कोणीतरी टाकलेल्या रेसिपीमध्य ४/५ तास मिश्रण ठेवायचे आहे लिहिले आहे. नक्की किती वेळ ठेवावे?

Pages