गॉट लेह्ड ! लेह लडाख ! गेले अनेक वर्षे जिथे जायची इच्छा ( ३ इडियटच्या आधीपासून) होती ती जागा! १९९९-२००० च्या छोट्या युद्धामुळे जगात सगळ्यांना कारगिल माहिती झाले ते लडाख! हायस्ट मोटारेबल रोड इन द वल्ड असणारी जागा आणि सेकंड कोल्डेस्ट हॅबिटट इन द वल्ड असणारी जागा ! द लामा लॅण्ड ! द रूफ ऑफ द वल्ड !
२०१२ च्या सिझन मध्ये मला जायचे होते पण माझ्या येणार्या सर्व मित्रांनी टांग मारली व नेहमीप्रमाणे मी एकटाच उरलो. मग जावे की नाही? ह्यात नाहीचा जय झाला आणि २०१२ असेच गेले. २०१३ च्या सुरूवातीलाच मी कैलास मानसरोवर यात्रेसाठी नाव नोंदनी केली आणि योगायोगाने माझे सिलेक्शन बॅच नं ७ साठी झाले. मग तेंव्हा (एप्रिल मध्ये) असे ठरविले की ह्या वर्षी परत लेहला सुट्टी किंवा अगदीच सप्टे मध्ये मला १० दिवस वेळ आहे तेंव्हा. कैलासाच्या नादात लेह बाजूला पडले, पण ह्या वेळी कैलास होणे नव्हते कारण उत्तराखंडाचा महापूर! त्यात बॅच २ ते १० रद्द झाल्या. तो महिना होता जून. आणि मी जुलै मध्ये कैलाससाठी जाणार होतो. रद्द झाल्यामुळे परत एकदा 'लेह'च्या आशा पुनर्जीवित झाल्या आणि मी परत एकदा मित्रांना विचारायला सुरू केले. परत तेच, कोणीही यायला तयार नव्हते. पण ह्यावेळी मी हारणार नव्हतो. एकटा तर एकटा. नाहीतरी मी अनेक ट्रेक गेले वर्षभरात "सोलो" केले आहेत, त्यामुळे सोलो साठी मी तयार होतो. पण पूर आणि इतर अनेक कारणांमुळे घरचे मात्र मला जाऊ द्यायला तयार नव्हते. अनेक भांडणे झाल्यावर बायको यायला तयार झाली. ( कारण माझ्या पत्नीला रोडवरील प्रवास अजिबात आवडत नाही शिवाय सतत गोल गोल नागमोडी रस्त्यांचा तिला तिटकारा आहे) मग मुलांचे काय करणार? तर त्यांनाही घेऊ या अशी पुस्ती मी जोडली. मग परत घरच्यांच्या शिव्या, पुराची परिस्थिती असूनही मुलांना इतक्या दुर ते ही जवळपास ६५०० किमी होती आणि ते पण माउंटेन्स मध्ये अशी ट्रीप मी आखू देखील कशी शकतो ह्यावर चर्चा / वाद असे होत होत शेवटी मी ज्या दिवशी कैलासला जाणार होतो ( ४ जुलै ) त्याच दिवशी लेहला पण निघायचे असे ठरले. पण आदल्या दिवशी परत गोंधळ झाला कारण माझ्या लहान भावाला अशी ट्रिप ( सोलो किंवा फॅमिलीसहीत) करणे म्हणजे येडेपणा वाटत होता. मग परत चर्चा/ विचार विनिमय आणि माझे आश्वासन की काहीही होणार नाही ! आणि सरतेशेवटी ऑल वॉज गुड !
सगळ्यात महत्त्वाची होती गाडीची तयारी !
लेहला जाणार म्हणून काही गोष्टी ज्या अत्यावश्यक होत्या त्या मी घेतल्या त्या अशा.
स्पेअर डिझेल टँक
पंक्चर रिपेअर किट ( ट्युबलेसचा मिळतो)
सिगारेट लायटर मधून चालणारे एअर कॉंप्रेसर.
२ लिटर कुलंट
१ लिटर ब्रेक ऑईल.
सिगारेट लायटर मोबाईल चार्जर
गाडीचे पूर्ण सर्व्हिसिंग आणि सगळ्या लेव्हल्सचे टॉपप.
बाकी गाडी तशी नवीनच असल्यामुळे टायर्सला काही प्रॉब्लेम नव्हता.
ऑक्झिलरी लॅम्प बसवावेत अशी माझी इच्छा होती. (ज्यामुळे प्रकाश कमी पण गाडीला स्पोर्टी लुक येईल हा अंतस्थ हेतू होता) पण माउंटेन्स मध्ये मध्ये रात्री गाडी चालवायची नाही असा एक रुल मीच बनविल्यामुळे ऑक्झिलरी बसवले नाही. पण तत्पूर्वी चांगल्या थ्रो साठी मी तसेही HID ६०००के चे बसवून घेतले आहेत त्यामुळे "लाईट" चा प्रॉब्लेम सॉल्व झाला.
बाकी तयारी.
१. अनेकदा वाद घातले. ज्यामुळेच ही ट्रीप माझी न होता "आमची" झाली. त्यामुळे मी आनंदी आहे.
२. काका हलवाईवर धाड मारून जायच्या आदल्या दिवशी ( ३ जुलै) भरपूर खायचे सामान भरून घेतले.
३. गाडीचे सीट फ्लॅट करता येतात त्यामुळे अंथरुन आणि पांघरून व उश्या
४. बायकोला नवीन गाणे आवडतात त्यामुळे नवीन दोन तीन सिड्या.
५. आणि दुपारी २ नंतर जाऊनही BSNL चे पोस्ट पेड कार्ड - जे अत्यावश्यक आहे. लेह मध्ये एअरसेल, एअरटेल आणि BSNL ( सर्व पोस्ट पेड) चालतात. तर लेहच्या आजूबाजूला फक्त BSNL चालते. माझे एअरटेल असल्यामुळे मी तसा बिनधास्त होतो पण दुपारी मित्राचा फोन आला ( जो सहकुटूंब विमानाने लेहवरून आदल्यादिवशीच २ जुलैला वापस आला होता) त्याने सांगीतले की अरे BSNL इज मस्ट. मग काय गेलो सर्व कागदपत्र घेऊन आणि आणले कार्ड. जे खरच कामाला आले.
६. छोटे ऑक्सिजन सिलेंडर मी खूप शोधले पण मला मिळाले नाही. पुढे श्रीनगर मध्ये घेऊ असा विचार करून निघालो.
७ AMS साठी डायमॉक्स आणि इतर नेहमीची सर्दी, डोके, अंगदुखी, ताप ह्यावरी औषधे.
८ आणि मुलांसाठी आयपॅड वर अनेक नवीन गेम्स डाउनलोड केले. ( हे सर्व ३ जुलैला म्हणजे आदल्या दिवशी! )
होता होता ३ जुलै प्रचंड व्याप घेऊन आला नी गेला आणि रात्री गाडीत सामान ठेवून झाले. वाट होती ती फक्त चार वाजन्याची, जे तसेही वाजलेच असते. रात्र पूर्ण अशीच गेली आणि आम्ही तयार होऊन ५ वाजता निघालो.
संपूर्ण वृत्तांत येत आहे. तो पर्यंत हे टिझर्स. ( आय नो की फोटो त्यातल्या त्यात माझे, विल नॉट डू जस्टिस. )
द जुले लॅण्ड -
माय चीता - काईन्डा होम !
दे से - देअर आर रोडस अॅण्ड देअर आर रोडस. काही ठिकाणी अत्यंत सुंदर टार रोड आणि काही ठिकाणी केवळ टायर ट्रॅक्स दिसतात म्हणून रोड आहे असे म्हणायचे. To see that wild, raw, untouched nature you need to burn lot of diesel and need to have lot of will power and patience खूप ठिकाणी " स्लो अॅन्ड स्टेडी विन्स द रेस" त्यामुळेच लिहिले आहे.
क्रमशः
भाग एक
भाग दोन
भाग तीन
भाग चार
भाग पाच
भाग सहा
भाग सात
भाग आठ
भाग नऊ
मस्त..
मस्त..
फोटो आणि माहिती.... धाडसाचे
फोटो आणि माहिती.... धाडसाचे कौतुक वाटते...>>++११११
जस की हॉस्टेल डेज स विथ टू
जस की हॉस्टेल डेज स विथ टू किडस. >> ग्रेट!
आय अॅम शुअर ती खूप शिकली
आय अॅम शुअर ती खूप शिकली असेल फक्त तिला लगेच व्यक्त करता येणार नाही. ही ट्रीप नक्कीच तिच्या पुढच्या आयुष्यभर एक अनुभव म्हणून झिरपत राहिल. >>> वाह!!!
ग्रे ट सफर!!
तुमच्या धाडसाचे कौतुक वाटतेय ..
पुढचे भाग येऊ द्या पटापट
तु महान आहेस... केवळ जबरी
तु महान आहेस...
केवळ जबरी टिझर...
चित्ता वन्टास, खन्ग्री, रापचिक, जब्री वै वै दिसतोय...
ही ट्रीप नक्कीच तिच्या पुढच्या आयुष्यभर एक अनुभव म्हणून झिरपत राहिल>>> अगदी....
रोड ट्रीप बराच अनुभव देते.
स्वतः ड्राइव्ह करताना तर नक्कीच....
केदार फार मस्त वाटलं वाचुन.
केदार
फार मस्त वाटलं वाचुन. वाचूनच एवढी excitement जाणवतेय तर तुम्हाला किती मजा आली असणार!
तुमच्या धाडसाचे खरचं कौतुक वाटते.
(तुम्ही भाग तीन जी लिंक दिली आहे ती जरा दुरुस्त करणार का? एक http जास्त झाले आहे.)
माधवी. धन्यवाद. केली लिंक
माधवी. धन्यवाद. केली लिंक दुरूस्त.
मस्तच रे केदार!
मस्तच रे केदार!
ज ब र द स्त ! ! ! केदार
ज ब र द स्त ! ! !
केदार तुम्ही खूपच धाडसी आहात . फोटो सुंदर .
पुढील लेखांच्या प्रतिक्षेत .
प्रवासवर्णन आणि फोटो एकदम
प्रवासवर्णन आणि फोटो एकदम मस्त!
ग्रेट आहेस तु केदार!! हे अस
ग्रेट आहेस तु केदार!! हे अस करण भारतात शक्य आहे ? कॉलेजच्या ग्रुप बरोबर कोस्ट टु कोस्ट केलेले तेव्हा भारतातही असे करता आल तर कीती छान अस वाटल होत.
केदार, तुझे वरचे नवे प्रतिसाद
केदार, तुझे वरचे नवे प्रतिसाद ही आवडले
यामिनीला काहितरी लिहायला सांग तिच्या अनुभवांबद्दल
तिसरा फोटॉ जबरी आवडलाय
तिसरा फोटॉ जबरी आवडलाय
वॉव!! खाऊ वाढून ठेवलाय हा
वॉव!! खाऊ वाढून ठेवलाय हा सगळा... थॅंक्स, मजा येणारे हे सग्गळं वाचायला आणि फोटो बघायला..
मस्तच !
मस्तच !
मस्तच!!!!!!!!!!!!!
मस्तच!!!!!!!!!!!!!
निवांत वाचायचे म्हणून ठेऊन
निवांत वाचायचे म्हणून ठेऊन दिले होते. आज सुरुवात केली वाचायला.
तुमचे सगळ्यांचे खरच कौतुक आहे. खास करून आदित्यचे. सिटी ड्रायव्हिंग आणि अशी भटकंती यातला फरक मुलांना चांगलाच कळतो. सिटी ड्रायव्हिंग मध्ये फेस आणणारी मुले अशी भटकंती खूप सहजतेने एंजॉय करतात. पण तरी ४ वर्षाच्या जिवाने इतके दिवस गाडीत फिरणे खरच खूप कौतुकास्पद आहे.
लेक अजून लहान आहे आणि तू म्हणतोस तसे ही ट्रीप झिरपायला बराच वेळ लागेल. पण तिला पण लिहायला लाव या मालिकेत - तिला आलेले अनुभव, तिच्याच नजरेतून. मराठीत नसले तर इंग्रजीत पण चालतील, पण तिलाच लिहू दे.
आय नो की फोटो त्यातल्या त्यात माझे, विल नॉट डू जस्टिस. >> हे अजिबात पटण्याजोगे नाहीये
मस्त... तु एकदम "Live to
मस्त...
तु एकदम "Live to drive" वाला माणुस दिसतोस.
खूपच सुन्दर लगेच पुन्हा एकदा
खूपच सुन्दर लगेच पुन्हा एकदा लेह ला जाव वाटतय
TATA INDIGO MANZA AAHE 3 YEARS OLD CHALEL KA
TATA INDIGO MANZA AAHE 3
TATA INDIGO MANZA AAHE 3 YEARS OLD CHALEL KA >>>
मनाली ते लेह एकाने नॅनो मध्ये केलेले !! माझ्या समोरून पिवळी नॅनो येताना पाहून मला क्षणभर विश्वास बसला नव्हता. पण तो सोलो असल्यामुळे लोड झेपला असेल नॅनोला. तर मांझा कधीही करेल. आधी गाडीची तयारी मात्र नीट करा. पुढच्या वर्षी नक्की जा.
Pages