मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक मुलगा बाथटब मध्ये बसून अंघोळ करता करता अभ्यास करत असतो आणि तिथे अर्किमिडिज अवतरतो. आणि म्हणतो की मी माझी थियरी चेंज नाही करू शकत पण हे अल्पाईन समथिंग खा जे तुला बोरिंगपणा (??) सहन करण्याची ताकद देईल. Uhoh
किती चुकिची जाहिरात Sad अर्किमिडिज स्वतःच्याच थिअरीला बोरिंग म्हणतोय.. हे पटतं का?
कोण करतं असल्या जाहिराती? आणि पास कोण करतं? Angry

मला तर लईच आवडली ती अर्किमिडिजवाली अ‍ॅड! त्यातला बाथटबचा रेफर्न्स एकदम हुशार आहे

हर्ष छाया आणि टिस्का चोप्राची टायटन आय+ची जाहिरात पाहिली का? मला खूप आवडली..... हर्ष छाया टायटन आय+च्या शॉपमधे जातो आणि त्याला सुट आणि कम्फर्टेबल वाटणारी चश्म्याची फ्रेम खरेदी करुन बाहेर येतो आणि टिस्का चोप्राला म्हणतो चल निघुया... ती त्याच्या़कडे बघुन म्हणते खूप यंग दिसतो आहेस, तोही तिला म्हणतो तु पण खूप यंग दिसतेस.... त्यावर ती म्हणते की मी माझे २-३ तास पार्लरमधे घालवले आणि २००० रु. खर्च केले तरी पण तु माझ्यापेक्षा जास्त यंग दिसतोस.... त्यावर तो म्हणतो की जास्त काही केल नाही नवीन दुकान दिसल म्हणुन गेलो आणि हे खरेदी केल आणि किंमत तुझ्या पार्लरपेक्क्षा कमी...... वॉव दोघही खरच यंग दिसतात आणि मला खूप आवडतात.... चश्म्याच्या फ्रेमस पण छान आहेत.

हा माझा दोस्त आहे, वॉन्टेड मोस्ट आहे,
खुप मजेदार यारांचा यार..

सर्फ लिक्वीडची अ‍ॅड. मस्त आहे एकदम..जिंगल एकदम डोक्यात बसतं लगेच..

मार्केट्मध्ल्या प्रतिस्पर्ध्या.न्ची एक नविन

अ‍ॅड : कोलगेट आणि पेपसोडेन्ट

मला idea ची नविन जाहिरात फार आवडली. राखी आणि पोलिसची.>>>> खरच छान आहे.. ideaच्या सगळ्याच जाहिराती छान असतात.... नवीन विचार मांडला जातो नेहमी त्यांच्या जाहिरातीतून...

मार्केट्मध्ल्या प्रतिस्पर्ध्या.न्ची एक नविन

अ‍ॅड : कोलगेट आणि पेपसोडेन्ट
>>>>>>>> हो त्यामध्ये पेपसोडेन्ट कोलगेटपेक्षा १३०% जास्त परिनामकारक आहे अस काहीस आहे. अस चालत का ???

अरे, तनिष्कची नवी अ‍ॅड कळली नाही. तो नवरा ह्याच्यावर डिस्काउन्ट आहे का, त्याच्यावर आहे का विचारत असतो ती. ज्याच्यावर सवलत नाही असं काही घेऊन त्याला बायकोला इम्प्रेस करायचं असतं का?

व्होडाफोन च्या 'पहला प्यार' वर आधारित ती अ‍ॅड आहे त्यात एका शॉटमध्ये तो माणूस चार्जिंगला लावलेल्या फोनवर बोलताना दाखवलाय का? असेल तर ते चुकीचं आहे. चार्जिंगला लावलेल्या फोनवर बोलायचं नसतं.

तो नवरा ह्याच्यावर डिस्काउन्ट आहे का, त्याच्यावर आहे का विचारत असतो ती. ज्याच्यावर सवलत नाही असं काही घेऊन त्याला बायकोला इम्प्रेस करायचं असतं का?>>> नाही ग. Happy

'सगळ्या दागिन्यांवर डिस्काउंट' असे जाहिर केलेले असते. असं काही नसून हे दुकानदार आपल्याला उल्लू बनवत आहेत असं त्याचं म्हणणं असतं. ते सिद्ध करण्यासाठी तो प्रत्येक दागिना उचलून तो विचारत असतो. Happy त्याच भरात तो बायकोचीच अंगठी उचलून विचारतो आणि जेव्हा दुकानदार 'त्यावर डिस्काउंट नाही' असे म्हणतो तेव्हा खवचट हसतो. Proud

थोडक्यात त्या नवर्‍याचे बायकोकडे (तिच्य अंगठीकडे) अजिबात लक्ष नाही. म्हणजे ती तिची अंगठी ऑलरेडी आहे हे ही त्याला माहित नाही म्हणून चपापून हे पॅक करा म्हणतो.

ओह असं आहे होय, थॅन्क्स प्राची आणि दक्षिणा Happy

ती meritnation ची अ‍ॅड मला आवडत नाही. तो एक बुंदीचा लाडू किती लोकांच्या तोंडात जाता जाता राहतो. शी!

ब्रिटानिया चीजची अ‍ॅड मस्त आहे. तो मुलगा सुरवातीला कसल्या खून्नसमधे म्हणतो "तू चीज बडी है मस्त मस्त" Proud

सध्याची सर्वात जास्त आवडलेली जाहिरात टाटाटीची मंत्रीजी वाली जाहिरात. अनेक पातळीवर ही जाहिरात आवडली.

बायकोने चहा कर म्हटल्यावर उठून चहा करणारा मंत्री ही इमेजच कसली भारी घेतली आहे. त्यानंतर अर्थातच सरकार बनाभी सकती है गिरा भी सकती है हा अफलातून संदेश एकाच वेळेला राजकारण्यांना आणि स्त्रियांना. राजकारण या विषयावर एकंदरीतच स्त्रियांमधे जी अनास्था आहे, त्याला ही जाहिरात बरोबर टारगेट करते. जाहिरातीमधली कलाकारांचे काम पण भारी आहे.

airtel ची 'इतनी सी खुशी इतनी सी हसी' वाली ad किती मस्त आहे. ती मुकी लहान मुलगी काय मस्त हावभाव करते. तिच्या बरोबरचा मोठा मुलगाही थक्क होऊन पाहत राहतो तिच्याकडे.

नंदिनी अनुमोदन...

एअरटेलची जाहिरात डोक्यात जाते माझ्या :रागः

तु येणार आहेस की नाही बोल... बोल बोलु दे.. समथिंग. अतिशय निरर्थक जाहिरात.

लेन्सकार्टची जाहीरात भारीये
त्या मुलीचे एक्प्रेशन पण
जिजाजी ....
आणि नंतर एक प्लेट इडली, सांबार अलग से...
धमाल

Pages