युक्ती सुचवा युक्ती सांगा- ३

Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41

स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.

नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कारण हे कुठे मिळेल>>> "आपल्या नेहमीच्या वाण्याकडे देखिल" असा सल्ला दिलाय ना तुम्ही.. मग पुन्हा "कुठे मिळेल" कशासाठी?

मग त्यांना काम सांगितलं तर कुठे बिघडलं

कामवालीला माणसांच्या सेवेचे पैसे देणं आणि त्याच पैशात कबुतराची सेवाही करवून घेणं हे पाप नाही का? Proud कबुतरावर भूतदया करण्याच्या नादात कामवालीवर अन्याय का?

शिवाय कामवाला/वाली हे लोक कामे करण्यासाठीच असतात ना? मग त्यांना काम सांगितलं तर कुठे बिघडलं :दिवे:
>>>>

मग त्या सल्ल्याला <<पण मला तरी पर्सनली त्या गरीबांच्या तोंडचा घास काढणे आवडणार ना>> ही फ्रिल कशासाठी लावायची...

फ्रिल याच्यासाठी, की मला व्यक्तिशः कबुतराला खाऊ घालण्यापेक्षा कबुतर खायला जास्त आवडेल. आमच्याकडे कबुतराची अंडी देखिल मिळतात (विकत) Wink पण ते असो. अवांतर फारच जास्त होते आहे. आपण विपुत गप्पा मारूया का?

काही त्या कबुतरांचे लाड नका करू :रागः
एक नंबरचा उपद्रवी पक्षी...>>>>> १००%. या पक्षांनी माझी कित्येक रोपे मारून टाकली आहेत.सध्या कारल्याच्या वेलीवर संक्रांत आहे.

कामवालीला फोनवर अर्धी वाटी सालांवाली उडदाची डाळ आणि अर्धी वाटी हरबर्‍याची डाळ कुकरमध्ये शिजवून घ्यायला सांगितली होती. घरी आल्यावर बघितलं तर चक्क वाटी-दीड वाटीपेक्षा जास्त छिलकेवाली उडदाची डाळ भिजत घातली होती. त्यातली थोडी डाळ काढून घेवून बाकीची फ्रिजरमध्ये टाकली तर खराब नाही ना होणार? २-३ दिवसांनी परत काढून मा-चनेकी दाल बनवेल. का अजून काही करता येईल?

सालासकटच्या उडदाच्या डाळीचे डाळ भिजवून कांदा, कोथिंबीर, मिरच्या, कढीपत्ता वगैरे घालून किंवा ओलं खोबरं, कढीपत्ता, आलं, हिरव्या मिरच्या घालून वडे करतात.
ह्या ब्लॉगवर रेसिपी आहे बघ.
डोसेही बनवता येतील ही डाळ वापरून.

अकु, अगं आज सकाळीच आप्प्यांसाठी डाळ- तांदूळ भिजत घालून झालेत. त्यामूळे लगेच उद्या डोसे नाही खपणार आमच्याकडे. पण जर २-३ दिवसात खराब होणार नसेल तर मग नंतर ते वडे ट्राय करता येतिल.
धन्यवाद. Happy

भिजून दीड वाटीपेक्षा जास्त झाली असेल.. Wink किंवा जास्त झाली म्हणून तिला देऊन टाकशील म्हणून तिनं जास्तच भिजवली असेल..

तिच्या पण घरी कुणी नाहीये सध्या. नाहीतर तिलाच दिली असती. तिने अर्धी अर्धी वाटी दोन्ही डाळी शिजवायच्या ऐवजी एक वाटी एकच डाळ भिजवून ठेवली. आणि तासाभरात ती भिजूनपातेलांभर दिसायला लागली Proud (यापुढे फोनवर इंस्ट्रक्शन्स देणार नाही. जे काय सांगायचंय ते सकाळीच लेखी लिहून ठेवणार. )

मागे माझ्या धाकट्या जावेने आख्खे उडीद भिजवायच्या ऐवजी अशी डाळ अंदाज न आल्याने भरपूर भिजवून ठेवली होती. घरातले लोक २-४ दिवस मा-चनेकी दाल खात होते. Proud

अल्पना - फ्रीजमध्ये खराब होणार नाही. डाळ वाटून त्यात कणिक, मीठ घालून पुर्‍या/पराठेही करता येतील.

नुक्तीच नागपच्मि ला हातावर मेन्दि काधलि,पन हाताचि स्किन निघ्तेय,अस का होत असावे.(दुल्हन मेन्दि कोन)::अओ:

अल्पना, दिल्लीच्या हवेत भिजवलेली डाळ फ्रिजमधेही टिकणं जरा कठीण वाटतंय. फ्रिजमधे ठेवलीस तरी रोजच्या रोज धुवून टाकत जा, म्हणजे बुळबुळीत होणार नाही.
दहीवडे करता येतील त्याचे, ते भिजवलेले वडे दोन-तीन दिवस फ्रिजमधे राहतील.
किंवा आप्प्यांचं पीठ वाटताना ती डाळ पण वापरून टाक. बाईला जरा जास्तच आप्पे खाऊ घाल Wink

चॉकलेट राखी करायचा विचार आहे. कार्टुनच्या आकाराचे चॉकलेट करुन सॅटीन रिबनवर चिटववायचे. पण चिटकवण्यासाठी काय वापरावे Uhoh

ते चॉकलेट तसेच चिकटवले तर पाघळण्याची शक्यता नाही का?

त्यापेक्षा अ‍ॅल्युमिनिअम फॉईल किंवा चॉकलेट रॅपरमधे गुंडाळून मग सॅटीन रिबीनीवर चिकटवले (ते नेहमीच्या ग्लूने किंवा फेविकॉलनेही चिकटवता येईल) तर बरे असे मला वाटते.

चॉकलेट सेट होतानाच त्यात स्वच्छ जाड कॉटनच्या दोर्‍याची डबल वात घालून ठेवा. ती रिबिनीला बांधता येईल. हवे असेल तसे खाली डेकोरेशनही ओवता येईल तिच्यात, इतपत लांब दोरा ठेवा. जास्तीचा कापून टाका.

तांदुळ : डाळ ३:१ आणि ते वाटताना , अर्धी वाटी भिजवलेले पोहे पण घ्यावे. ईडल्या मऊ होतात.

मंजुडी, तू म्हणते तसे रॅपरपेक्षा ट्रान्सपरंट पेपर मधे केले तर हातावर बांधल्यावर दिसेल चॉकलेट Happy

इब्लीस तुमची पण आयडीया छान आहे. गाठीमधे असतो तसा धागा वापरुन ट्राय करता येइल.

दोन्ही पद्धतीने बणवते आजच Happy

मी २:१ घेत होते, तेव्हा ईडल्या चिकट होत असत.>>> २:१ प्रमाणही बरोबर आहे तांदूळ-डाळीचं. तांदूळ वाटताना अगदी मऊ पेस्ट नाही करायची, रवाळ वाटायचा तांदूळ. म्हणजे इडल्या चिकट होत नाहीत.

वर्षा_म, हातावर राखी बांधल्या बांधल्या गट्टम् स्वाहा का? Proud मी मनातल्या मनात इक्लेअर्स एका मागोमाग एक दोर्‍यात ओवून त्यांची ब्रेसलेट टाईप राखी तयारही केली!! Lol

ईडलीचा रवा वापरायचा असेल तर २:१ प्रमाण घ्यावे का ३:१ ? सामी, भिजवलेले पोहे टाकते मी, थांकू.

ईडलीचा रवा वापरायचा असेल तर २:१ प्रमाण घ्यावे का ३:१ ? >>>>> ३:१
शक्यतो उकडा तांदूळ वापरायचा. इडली वाटत असताना जर मिक्सरमधे वाटत असाल तर पीठ गरम होईल इतक्या फास्ट फिरवायचे नाही. पीठ गरम झाले की लवकर आंबतं आणि इडल्या वातड होतात.

Pages