मॉडर्न लायब्ररी इंग्रजी पुस्तकांची नोंद ठेवते. तेथे वाचक आपल्या पसंती नोंदवू शकतात, क्रिटिक्स टॉप व रिडर्स टॉप असे कौल घेतले जातात. मराठीत "रसिक" व 'अंतर्नाद' ने तसा प्रयोग केला. पण तो २००६ साली झाला. त्यानंतर तसा प्रयोग कुणी केल्याचे माझ्या ऐकण्यात नाही.
मायबोलीवरही तसा प्रयोग घडू शकतो. म्हणून हा प्रपंच. तुमच्या दृष्टीने मराठीतील सर्वोत्कॄष्ट पुस्तकं कोणती आहेत?
संदर्भासाठी 'अंतर्नाद' मासिकाची २००६ साली असलेली टॉप २०.
कादंबरी (५)
१. श्यामची आई - साने गुरुजी
२. रणांगण - विश्राम बेडेकर
३. बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर
४. ययाती - वि. स. खांडेकर
५. कोसला - भालचंद्र नेमाडे
कथा (४)
६. चिमणरावांचे चर्हाट - चिं. वि. जोशी
७. कळ्यांचे नि:श्वास - विभावरी शिरूरकर
८. तलावातले चांदणे - गंगाधर गाडगीळ
९. काजळमाया - जी. ए. कुलकर्णी
नाटक (१)
१०. सखाराम बाईंडर - विजय तेंडुलकर
कविता (४)
११. संपूर्ण केशवसुत - केशवसुत
१२. विशाखा - कुसुमाग्रज
१३. मर्ढेकरांची कविता - बा. सी. मर्ढेकर
१४. मृद्गंध - विंदा करंदीकर
समीक्षा (१)
१५. युगांत - इरावती कर्वे
चरित्रे/आत्मचरित्रे (३)
१६. स्मृति-चित्रे - लक्ष्मीबाई टिळक
१७. बलुतं - दया पवार
१८. आहे मनोहर तरी - सुनीता देशपांडे
संकीर्ण (२)
१९. व्यक्ती आणि वल्ली - पु. ल. देशपांडे
२०. माणसं - अनिल अवचट
ही झाली २००६ ची 'अंतर्नाद' प्रमाणे टॉप २०. पण तुम्हाला काय वाटते?
लिहा तर मग, तुम्हाला आवडलेली/ वाटलेली सर्वोत्कॄष्ट पुस्तकं. ती अगदी २०/२५ असायला हवी असे बंधन नाही, अगदी एखादे देखील लिहीता येईल.
नाही, ते
नाही, ते रेटिंग देणं वगैरे सोपं जाईल म्हणत्ये. कारण ऑलरेडी बर्याच पुस्तकांवर चर्चा असेल ना तिथे?
हो
हो रेटिंगला मदत होईल. पण ते जिकीरेचे काम आहे, कारण तो बाफ बराच वाढला आहे, शिवाय जुन्या मायबोली प्रमाने, पोस्टच्या लिंक देता येत नाहीत. (अन सॉर्टेड कंटेंट )
हो, खरं आहे.
हो, खरं आहे.
केदार,
केदार, मस्त उपक्रम. मी पण माझ्या आवडत्या पुस्तकांची नावे टाकेन लवकरच.
रेटींगची कल्पना आवडली.
सध्या
सध्या मायबोलीच्या गाभ्याचे नूतनीकरणाचे काम चालू आहे. त्यामुळे पुढचे ३-५ आठवडे नवीन सुविधा देता येणार नाहीत. नाहीतर ते अर्धवट दोन Versions मधे अडकून बसेल. नूतनीकरण झाल्यावर हे सगळे सोपे कसे करता येईल (अभिप्राय देणे/मत देणे) हे पाहता येईल.
वाचन बघितल तर तस फार नसल तरि
वाचन बघितल तर तस फार नसल तरि कमी मात्र नक्किच नसाव. मला पसन्द असलेल म्हनाल तर "महानायक", "झाडाझडती", "नाझी भस्मासुराचा उदयास्त", "श्रिमान योगी", "पानिपत", "काळे पाणी ",
आरे लिहायच राहिलच मि पण
आरे लिहायच राहिलच मि पण टाकली बर का काहि नाव मी वाचलेली.
"आम्ही आणि आमचा बाप" "नाच गं
"आम्ही आणि आमचा बाप"
"नाच गं घुमा"
अरेच्चा, रणजित देसाई "झेप" , "झुंज" !
पु. लं. चे "व्यक्ती आणि
पु. लं. चे "व्यक्ती आणि वल्ली" हे व्यक्तीचित्रण, "सुंदर मी होणार" हे नाटक आणि तेंडुलकरांचे "शांतता कोर्ट चालू आहे" ही पुस्तके सर्वोत्कृष्ट पुस्तकांमध्य यायला हवीत.
नाच गं घुमा विंचुर्णीचे
नाच गं घुमा
विंचुर्णीचे धडे
स्वतःविषयी
रारंग ढांग
सोयरे सकळ
आहे मनोहर तरी
गौरी मनातली
आवर्तन
प्रवास
फॉर हिअर ऑर टू गो?
मृत्युंजय
राधेय
परिपुर्ती
निरगाठी
चंद्रिके गं सारिके गं
सध्यातरी एवढीच पुस्तकं आठवतायत.
ब्र , भिन्न, प्रकाशवाटा,
ब्र , भिन्न, प्रकाशवाटा, १९८४,
केदार बरीच नावं आलीत , एकच
केदार बरीच नावं आलीत , एकच यादी बनवता येईल का अल्फाबेटीकल ऑर्डर आणि रेटींगप्रमाणे ?
मस्त! छान यादी
मस्त! छान यादी मिळाली!
वाचायलाच हवं!
MI aata v s khandekar che
MI aata v s khandekar che krunchvadh pustak vachat hai ekdam mast hai
अमॄत्वेल टाकलय का कोणि
अमॄत्वेल टाकलय का कोणि
शी: कोसला हे पुस्तक नसुन
शी: कोसला हे पुस्तक नसुन आत्महत्येचं गाईड अहे. काय लिहायचं होतं ते त्या नेमाड्यालाच माहित! उगीच काय वाट्टेल ते लिहिले अहे- म्हणे बुध्द उदास आहे, रक्ताचे ट्पोरे थेंब चाटणे. कादंबरी नाही अवडंबरी आहे ती! ती वाचुन ईतकं भयाण
डिप्रेशन येतं. उगीच वाचलं वाटते. पु.लं. ची प्रवासवर्णनं मस्तच आहेत. शिवाय "हसरे दु:ख" हे चार्ली चॅप्लिनचं चरीत्र छान आहे.
Learn Marathi In 21 Days
Learn Marathi In 21 Days ...by Raj (?)....
@ कुलु कोसलासाठी १००% अनुमोदन
@ कुलु कोसलासाठी १००% अनुमोदन
सायली धन्स!
सायली धन्स!
भालचंद्र नेमाडे- कोसला, जी.ए.
भालचंद्र नेमाडे- कोसला,
जी.ए. कुलकर्णी- काजळमाया,
मेघना पेठे- नातिचरामि,
पु.ल.देशपांडे- व्यक्ती आणि वल्ली (फक्त हेच),
किरण नगरकर- सात सक्कम त्रेचाळिस.
ग्रेस- चंद्रमाधावीचे प्रदेश,
मर्ढेकर- मर्ढेकरांच्या कविता,
कु. कूरअतुलऐन हैदर- आगीचा दर्या (मुळ पुस्तकाचे नाव- आग का दर्या), हे खरतर अनुवादित पुस्तक आहे, कुणी केलय नाव लक्षात नाही, असो तर ह्या उर्दू/हिंदी लेखिकेबद्दल काही जाणत असाल तर अवश्य कळवा,
आगीचा दर्या खरेच उत्कृष्ट पुस्तक आहे,
ह्यांची अजुन पुस्तके वाचायची इच्छा आहे.
विशाखा- कुसुमाग्रज (वाचलेच पाहिजे),
विलास सारंग -एकूण कविता,
अरुण कोल्हटकर- भिजकी वही...
एक होता कार्व्हर-वीणा
एक होता कार्व्हर-वीणा गवाणकर
संभाजी- शिवाजी सावंत, ही दोन्ही पुस्तके अप्रतिम आहेत! जरुर वाचावीत अशी!
मला आवडणारे काही: आम्ही
मला आवडणारे काही:
आम्ही भगिरथाचे पुत्र- गो. नी. दांडेकर
गारंबीचा बापू- श्रीं. ना. पेंडसे
आहे मनोहर तरी - सुनीता देशपांडे
बटाट्याची चाळ, व्यक्ती आणि वल्ली, अपुर्वाई, पूर्वरंग, ती फुलराणी - पु.ल्.
एक होता कार्वर - वीणा गवाणकर
चौघीजणी - शांता शेळके (अनुवाद)
कुणा एकाची भ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर
हात ना पसरू कधी -- (अनुवाद)
झेप
छावा
पानिपत
स्मॄतीचित्रे -लक्ष्मीबाई टीळक
समग्र चिं वी जोशी
बनगरवाडी, माणदेशी माणसं -माडगूळकर
भिन्न, ब्र - कविता महाजन ( मला इतकं डिप्रेसिंग वाचवत नाही, पण पुस्तकं चांगली आहेत.)
ज्याचा त्याचा प्रश्न -प्रिया तेंडूलकर
पिंगळावेळ(?) - जी.ए.कुलकर्णी
सध्या इतकेच आठवताय...
वर उल्लेख असलेली एक्सेल शीट
वर उल्लेख असलेली एक्सेल शीट कुठे आहे? मला मिळेल का?
एक होता कार्वर - वीणा गवाणकर
एक होता कार्वर - वीणा गवाणकर (अनुवाद) >> हा अनुवाद आहे? मला वाटते हे लेखिकेचे स्वतःचे पुस्तक आहे किंवा रुपांतर आहे आणि अनुवाद नाही.
>>हा अनुवाद आहे? मला वाटते हे
>>हा अनुवाद आहे? मला वाटते हे लेखिकेचे स्वतःचे पुस्तक आहे किंवा रुपांतर आहे आणि अनुवाद नाही.
मिनोती अनुमोदन! हे वीणा गवाणकरांनी लिहिलेलं पुस्तक आहे.
Swa_P_Nil हि घ्या ती
Swa_P_Nil हि घ्या ती लिंक
https://spreadsheets.google.com/ccc?key=rNUm8ulX8EQQaFQ41-Rm-5w#
छान कल्पना आहे, विशेषतः ज्या
छान कल्पना आहे, विशेषतः ज्या व्यक्ती नोकरी-शिक्षण-व्यवसाय आदी कारणास्तव महाराष्ट्राच्या बाहेर प्रदीर्घ वास्तव्य करून राहिले आहेत त्यांच्यासाठी अशा प्रकारच्या, विविध अंगाने, विचार करून सादर केलेल्या पुस्तकांच्या याद्या निश्चितच उपयुक्त ठरतात. इंग्रजी असो वा अन्य कोणतीही भाषा असो, त्या त्या भाषेतील साहित्याच्या आवडीनिवडी या सातत्याने बदलत असतात, त्यामुळे "ऑल टाईम टॉप" अशी संकल्पना कायम स्वरुपाची कधी असू शकणारच नाही. लेखकाने वानगीदाखल दिलेल्या टॉप २० च्या यादीतील "ययाती"चे उदाहरण पुरेसे बोलके आहे. अगदी म.टा. व आकाशवाणी मुंबई केन्द्राने टॉप १०० च्या मागोव्यामध्ये या कादंबरीचे स्थान फार वरचे होते, पण मी इथले लेखन वाचल्यावर असे जाणवले की, एकाही वाचकाने या ज्ञानपीठ विजेत्या कलाकृतीबद्दल भारावून लिहिलेले नाही. (तीच गोष्ट साने गुरुजींच्या "श्यामची आई" बद्दल. "मायबोली" वरील साहित्यविषयक हालचालींची नोंद घेणार्या किती व्यक्ती ते पुस्तक "टॉप २०" मध्ये आहे म्हणून घ्यायला दुकानाकडे जातील?) याचाच अर्थ काळाच्या कसोटीवर प्रत्येक पुस्तक उतरेलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे वैयक्तीकरित्या "मला आवडलेली २० पुस्तके" हेच अंतीम सत्य समोर ठाकते.
माझी निवड
कादंबरी
१. बिढार : भालचन्द्र नेमाडे
२. सात सक्कं त्रेचाळीस : किरण नगरकर
३. लव्हाळी : श्री.ना.पेंडसे
४. निष्पर्ण वृक्षाखाली भर दुपारी : ह. मो. मराठे
५. चक्र : जयवंत दळवी
कथा
१. काजळमाया : जी.ए.कुलकर्णी
२. सूर्य : श्री.दा.पानवलकर
३. काळा सुर्य आणि हॅट घालणारी बाई : कमल देसाई
४. नागीन : चारुता सागर
५. चिरदाह : भारत सासणे
काव्य :
१. मर्ढेकरांची कविता
२. दुसरा पक्षी : पु. शि. रेगे
३. चंद्रमाधवीचे प्रदेश : ग्रेस
४. भिजकी वही : अरुण कोलटकर
५. समग्र बालकवी
संकीर्ण
१. कार्यरत : अनिल अवचट
२. असा मी असामी : पु.ल.देशपांडे
३. आहे मनोहर तरी : सुनिता देशपांडे
४. लमाण : श्रीराम लागू
५. मी कसा झालो : आचार्य अत्रे
माबोकर मित्रमंडळी ..नमस्कार
माबोकर मित्रमंडळी ..नमस्कार !
यातील कोणतही पुस्तक मी अजुन वाचलेल नाही, यातील एखाद पुस्तक कुणाकडे असेल,
तर आपण एकमेकाकडची पुस्तकं शेअर करु शकतो, तर क्रुपया मला जरुर कळवा,कारण सगळी पुस्तक विकत घेण शक्य नाही !
मंजिरी, मिनोती.. बरोबर
मंजिरी, मिनोती..
बरोबर आहे..बदल केलाय..
बरे झाले हा धागा सापडला..
बरे झाले हा धागा सापडला..
Pages