मॉडर्न लायब्ररी इंग्रजी पुस्तकांची नोंद ठेवते. तेथे वाचक आपल्या पसंती नोंदवू शकतात, क्रिटिक्स टॉप व रिडर्स टॉप असे कौल घेतले जातात. मराठीत "रसिक" व 'अंतर्नाद' ने तसा प्रयोग केला. पण तो २००६ साली झाला. त्यानंतर तसा प्रयोग कुणी केल्याचे माझ्या ऐकण्यात नाही.
मायबोलीवरही तसा प्रयोग घडू शकतो. म्हणून हा प्रपंच. तुमच्या दृष्टीने मराठीतील सर्वोत्कॄष्ट पुस्तकं कोणती आहेत?
संदर्भासाठी 'अंतर्नाद' मासिकाची २००६ साली असलेली टॉप २०.
कादंबरी (५)
१. श्यामची आई - साने गुरुजी
२. रणांगण - विश्राम बेडेकर
३. बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर
४. ययाती - वि. स. खांडेकर
५. कोसला - भालचंद्र नेमाडे
कथा (४)
६. चिमणरावांचे चर्हाट - चिं. वि. जोशी
७. कळ्यांचे नि:श्वास - विभावरी शिरूरकर
८. तलावातले चांदणे - गंगाधर गाडगीळ
९. काजळमाया - जी. ए. कुलकर्णी
नाटक (१)
१०. सखाराम बाईंडर - विजय तेंडुलकर
कविता (४)
११. संपूर्ण केशवसुत - केशवसुत
१२. विशाखा - कुसुमाग्रज
१३. मर्ढेकरांची कविता - बा. सी. मर्ढेकर
१४. मृद्गंध - विंदा करंदीकर
समीक्षा (१)
१५. युगांत - इरावती कर्वे
चरित्रे/आत्मचरित्रे (३)
१६. स्मृति-चित्रे - लक्ष्मीबाई टिळक
१७. बलुतं - दया पवार
१८. आहे मनोहर तरी - सुनीता देशपांडे
संकीर्ण (२)
१९. व्यक्ती आणि वल्ली - पु. ल. देशपांडे
२०. माणसं - अनिल अवचट
ही झाली २००६ ची 'अंतर्नाद' प्रमाणे टॉप २०. पण तुम्हाला काय वाटते?
लिहा तर मग, तुम्हाला आवडलेली/ वाटलेली सर्वोत्कॄष्ट पुस्तकं. ती अगदी २०/२५ असायला हवी असे बंधन नाही, अगदी एखादे देखील लिहीता येईल.
कथासंग्रह
कथासंग्रहाचं नाव लिहा कोणीतरी.........
एम टी आयवा
एम टी आयवा मारु - येस्स मन्जु.. मी टाकणारच होतो.. आता ह्या वीकांतात बसून एक सलग यादी करतो आणि टाकतो. १०० पुस्तके वाचली आहेत का आजवर असे स्वतःला विचारावे लागेल आधी![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मला अजिबात न आवडलेली १०० पुस्तके अशी यादी करावी का? मग बरीच मारझोड होइल त्यावर अर्थातच. अशी यादी केल्यास घरावर मोर्चा घेउन लोकं आली तर काय करावे?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
हे वरच
हे वरच म्हटलय पण कोणीच लक्ष देत नाहीये .
-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....
चुकलो.
चुकलो. पंगत नाही, कथेचे नाव 'जेवणावळ' आहे... संग्रह आहे 'निजधाम'.
***
A falling leaf
looks at the tree...
perhaps, minus me
एक होता
एक होता कार्व्हर का नाहीये >>> येस हे हवचं अन black is beautiful हे मराठी पुस्तक सुध्दा..
करा यादी लवकर लवकर, म्हणजे राहिलेली काही वाचायचा प्लॅन करता येईल..
अन १०० च्या वर गेली तर काय हरकत आहे.. परप्रातस्थ्/परदेशस्थ वाचनाची आवड असलेल्या मा.बो. करांची किती सोय होईल त्यामुळे?
स्लार्टी,
स्लार्टी, धन्यवाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
केदार मस्त
केदार मस्त बाफ. यावेळी पुस्तकांची इतकी मोठी यादी झाली आहे कि येतांना (जादा सामानाचे पैसे भरुनसुद्धा) फक्त पुस्तकंच आणता येतील असं दिसतय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
_______________________________
"शापादपि शरादपि"
शास्त्रीब
शास्त्रीबुवा : बरोबर, गोडसे गुरुजी च. नाव आठवत नव्हतं बघ इतका वेळ ...........![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
या यादीत शिरिष कणेकरांचं यादोंकी बारात पण चालेल ............![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
~~~~~~~~~~~~~~
उद्या उद्याची किती काळजी बघ रांगेतून
परवा आहे उद्याच नंतर बोलू काही
चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही
संभाजी,
संभाजी, शहाजी हि पुस्तके पण छान आहेत. तसेच युगंधर पण.... ह्याच्यात गौरीची पुस्तक कशी नाहित?तसेच गो. नि. दांची पुस्तक पण नाहित![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
====================================
कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे....आपुले अंतर.....
सर्वोत्कृ
सर्वोत्कृष्ट पुस्तकांच्या यादीत साहित्याच्या प्रकारांची कशीही वर्गवारी केली तरी बेसिकली यात क्लासिक्स (जी पुस्तके स्थळ काळ सापेक्ष वाचकांच्या पसंतीला उतरू शकली) आणि कल्ट ( ज्यांनी मराठीत नव्या साहित्यप्रकारांचा पायंडा पाडला. कोसला/बलुतं वगैरे) अशाच पुस्तकांची निवड अपेक्षित आहे. अंतर्नाद ने दिलेल्या या यादीवरही अनेक आक्षेप घेतले गेले आहेत बर्याच जणांकडून तेव्हा यादी कशी केली तरी एकमत होणे अवघड. पण तरीही हा एक छानच प्रयत्न होऊ शकतो.
केदारला धन्यवाद हा उपक्रम सुरु केल्याबद्दल.
फक्त वर अनेकांनी जी वाचलेली पुस्तके टाकायची घाई केलीय त्यावरुन या बीबीला 'मराठीतील सर्वोत्कृष्ट पुस्तके' याऐवजी 'माझी आवडती पुस्तके' असेच नाव द्यावे लागणार असं दिसतय.
काल्पनिक ऐतिहासिक पुस्तकांना यात स्थान मिळावे कां हाही एक चर्चेचा विषय होऊ शकतो.
इथे प्रत्येकाने पुस्तकांची एकेक नावे लिहिण्यापेक्षा आपापल्या वाचनाच्या कुवतीनुसार (म्हणजे अगदी १०० नाही होणार २५ होतील. पण त्यात कादंबर्या/कविता/चरित्रात्मक वगैरे) वर्गवारी करुन पुस्तकांची यादी टाकत गेल्यास नंतर शॉर्ट लिस्ट करणं सोयीच पडेल. वर्गवारी कशी असावी हे मात्र एकदाच ठरवून घेऊयात.
स्लार्ट्य
स्लार्ट्या
एकपे रहेना. या पंगत बोलना या जेवणावळ बोलना. लेकीन यजमान, अतिथी वोईच होनेका.
सुहास शिरवळकरचे दुनियादारी, प्रभावळकरांचे टिपरे (हे तर मालिकेपेक्षा महान होते हे माझे मत), झुळुक, पुलंची अनेक (पण पुलंना ऐकण्यात खरी गम्मत), यादोंकी बारात पण घ्या हं.
बाबुजींचे अर्धवट आत्मचरीत्र पण झकास. हे वाचताना डोळ्यातले पाणी खळत नव्हते. पूर्ण व्हायला हवे होते हे पुस्तक.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
टण्यासारखे बसायल पाहीजे यादी करायला.
काका, कधी
काका, कधी बसायचे?
(तरी बरं चुकुन याद्या करायला असे लिहिले नाहीस. लोकं माझे अभिनंदन तर करताहेतच, तुलापण 'आता परत?' असे म्हणुन अभिनंदन करतील
)
ट्यु,
ट्यु, आवडती पुस्तके टाकायला हरकत नाही, कारण या पुस्तकांवर इथल्या वाचकांचा कौल घ्यायचा आहे, बरोबर ? मग कौल देण्यासाठी जास्तीत जास्त पुस्तकांची यादी असायला पाहिजे. जितकी मोठी यादी, तितका मायबोलीकरांच्या आवडीचा जास्त अचूक अंदाज येईल. ती यादी म्हणजे 'माबोकरांच्या मते सर्वोत्कृष्ट' अशी होईल. केदारला बहुतेक हे अपेक्षित आहे असा अंदाज.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्लासिक आणि पंथप्रसिद्ध याच पुस्तकांवर कौल घ्यायचा असेल तर इथे आधी ती पुस्तके नक्की कोणती हे स्पष्ट करावे लागेल. त्या यादीतून कौल घेऊन निवडता येतील. अशा निवडीची व्यापकता उपरोल्लेखित निवडीपेक्षा जास्त मर्यादित असेल.
आता पहिल्या प्रकारानुसार केले आणि 'आम्ही सारे अर्जुन' हे सर्वोत्कृष्ट ठरले तर... ही भीती आहेच
***
A falling leaf
looks at the tree...
perhaps, minus me
या यादीमधे
या यादीमधे जी. ए. कुलकर्णींची पण पुस्तके हवीत..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
निळासावळा, काजळमाया जबरदस्त आहेत पुस्तके...
केदार मस्त
केदार
मस्त बाफ उघडलायंस (त्याबद्दल तुला बक्षिस काय हवं ते सांगून टाक. :))
*तोतोचान एक होता कार्व्हर ही आणि अशांसारखी पुस्तकं अनुवादित असली तरी मराठी यादीत त्यांची गणना करणार ना? आणि इथे नुकती प्रकाशित पुस्तकं लिहीणं अपेक्षित आहे की आत्तापर्यंत वाचलेल्यांपैकी लिहीली तर चालणार आहे?
शाळा - मिलिंद बोकिल, चौघीजणी - शांता शेळके , द ब्रेड विनर - डेबोरा एलिस, ( अनुवाद कुणी केलाय आठवत नाही. :()नॉट विदाऊट माय डॉटर - बेट्टी माहमुदी, बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर,
झाडाझडती - विश्वास पाटील, अधांतरी - जयवंत दळवी ( हि कादंबरी ज्या वयात वाचली होती तेव्हा फार मोठा इम्पॅक्ट सोडून गेली होती माझ्या डोक्यावर.. (कदंबर्या)
गावकडच्या गोष्टी - व्यंकटेश माडगूळकर, शारदा संगित - प्रकाश संत, भूप - मोनिका गजेंद्रगडकर माणदेशी माणसं - व्यंकटेश माडगूळकर, माझ्या बापाची पेंड - द.मा. मिरासदार (कथा संग्रह)
त्रिपदी - गो. नि. दांडेकर, छंदांविषयी - अनिल अवचट (ललित)
गणगोत, व्यक्ती आणि वल्ली - पु. ल. देशपांडे, (व्यक्तिचित्रण)
पु.ल.एक साठवण - जयवंत दळवी. (संकिर्ण)
बनगरवाडी -
बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झाडाझडती - विश्वास पाटील,
अधांतरी - जयवंत दळवी
>>>>
अगदी अगदी दक्स.... झाडाझडती तर अप्रतिमच आहे
फक्त वर
फक्त वर अनेकांनी जी वाचलेली पुस्तके टाकायची घाई केलीय त्यावरुन या बीबीला 'मराठीतील सर्वोत्कृष्ट पुस्तके' याऐवजी 'माझी आवडती पुस्तके' असेच नाव द्यावे लागणार असं दिसतय.
ही यादी व्यक्तीसापेक्ष होणारच...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी जुन्या
मी जुन्या हितगुज वरुन मी वाचलेले पुस्तक व वाचु आनदे या बाफ वरुन काहि पुस्तकान्चि नावे जमा केली होती ति लिस्ट मी माणसाने दिलेल्या फाइल मध्ये नविन Sheet2 मध्ये टाकली आहेत.
वाळेकर
वाळेकर ,यादी चांगलीये . धन्यवाद यादीसाठी.
पण पुस्तकांची नावे देवनागरीत असायला हवी होती .
-------------------------------------------------------------------------
हम ना समझे थे बात इतनी सी ... ख्वाब शिशे के दुनिया पत्थर की....
हो ति मी
हो ति मी हळूहळू करीन. मि माझया कडचि Excel File मधलि Copy Paste केलि आहे.
svalekar
svalekar तुमच्या list मध्ये गारंबीचा बापु समोर पु. ल. देशपांडे लिहीलेय. तेव्हढे जरा correct करा.
गारंबीचा बापु - श्रीं. ना. पेंडसे
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा
मला वाटते
मला वाटते open ended discussion (मराठी शब्द काय याला?
) ठेवल्याने वादविवादच वाढतील. कारण सर्वोत्तम पुस्तक कुठले हा खुपच सापेक्ष विषय झाला. त्यामुळे वाद वाढवण्यापेक्षा प्रत्येक प्रकाराचा एक बाफ करावा. ज्यांना त्या प्रकारात रस आहे त्यांनी आपल्याला त्या प्रकारातील आवडणार्या (किंवा तुमच्या मतानुसार सर्वश्रेष्ठ) ५ पुस्तकांची फक्त नावे लिहायची (फफ्त नावे) हवं तर त्या ५ पुस्तकातही आवडीनुसार क्रम लावावेत. ही मते देण्यासाठी ठराविक मुदत द्यावी आणी त्यानंतर ज्या पुस्तकांना जास्त मते (आणी अग्रकम) मिळतील त्याप्रमाणे ही यादी प्रसिद्ध करावी..
अर्थात हे फक्त माझे मत..
बाकी उपक्रम चांगला आहे.
शाब्बास
शाब्बास केदार!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
"तुमच्या दृष्टीने मराठीतील सर्वोत्कॄष्ट पुस्तकं कोणती आहेत? " असा तुझा प्रश्न असल्याने वैयक्तिक आवडी निवडीतूनच शेवटची यादी तयार होईल असं वाटतं. सग़ळ्या साहित्याचा उद्देश हा करुण, विनोद, प्रेम असे वेगवेगळे रस वेगवेगळ्या मांडणीतून, रुपातून द्यायचा असला तरी त्यांची एकास एक तुलना निव्वळ अशक्य आहे. त्यापेक्षा वर म्हटल्याप्रमाणे प्रवासवर्णन, विनोदी, कादंबरी, ऐतिहासिक, भाष्गंतरीत, आत्मचरित्रात्मक अशी वर्गवारी करून प्रत्येक वर्गातली पाच किंवा दहा पुस्तके घेता येतील का? नंतर संकलनासाठी एखादा पोल उघडता आल्यास ते व्यवस्थित शक्य होईल असे वाटते नाहीतर हजारो मायबोलीकरांची मते जमा करुन त्यांचे वर्गीकरण करणे थोडं कठीण काम आहे.
जुन्या मायबोलीवर एसएमके ने अतिशय छान यादी बनवली होती पुस्तकांची, त्याचा 'काय वाचू?' असा प्रश्न पडणार्या बर्याच मायबोलीकरांना नक्कीच फायदा झाला.
सर्वांना
सर्वांना धागा आवडला हे पाहून आनंद झाला.
यादी तयार कशी करायची हा किचकट प्रश्न नाही पण निवडायचे कसे हा नक्कीच किचकट आहे.
मला वाटतं त्याप्रमाने इथे वाचकांनी नमुद केलेली पुस्तकं व त्यांची त्याबद्दलची वैयक्तिक मत, असे एकत्र करुन मतदान घेता येईल.
मतदानात प्रत्येक पुस्तकाला रेटींग देता यावे, जसे
कोसला - ***** - त्यापैकी तुमचा पर्याय - काही जनं एक देतील, काही जन पाच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रथचक्र - ***** - त्यापैकी तुमचा पर्याय
वगैर वगैरे
हे शक्य आहे का हे अॅडमिन टिम बहुदा पाहत आहे. तो पर्यंत इथे पुस्तकांची यादी देता येईलच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा वरचा पर्याय झाला रिडर्स वोटींगचा.
दुसरी पद्धत म्हणजे मायबोलीवरील काही पट्टीच्या वाचकांनी एकत्र येउन एक यादी बनवायची व ती देखील प्रसिद्ध करायची. आपण "महिन्यातील सर्वोत्तम कविता" जसे चालवतो तसे. फक्त दरवर्षी करता येईल. हा प्रकार क्रिटिक्स चॉईस होउ शकेल.
चांगली
चांगली आयडिया आहे. नुसते स्टार न देता पुस्तकाबद्दल थोडी माहितीही देता येणं अपेक्षित आहे का? जेणेकरुन वाचावं की नाही हे ठरवणं सोपं जाईल.
माहिती
माहिती द्यायची गरज नाही. बरेच स्टार भेटले की लोकं आपसुकच त्या पुस्तकाचा विचार करतील व वाचावयास घेतील.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माहिती
माहिती देण्यापेक्षा मायबोलीवर त्याची चर्चा असणार(च) , त्याची लिंक द्यावी.
'मी
'मी वाचलेले पुस्तक' हाच बाफ जर नीट ऑर्गनाईज करता आला (लेखक / विषयवार classification) तर हे सोपं जाईल का?
अगदी अगदी..
अगदी अगदी.. स्वाती मी हेच म्हणणार होतो... आपल्याइथे आधीच बरीच माहिती आहे.. जुन्या तसेच नव्या माबोत.. ती फक्त नीट मांडण्याची गरज आहे..
तर हे सोपं
तर हे सोपं जाईल का? >>
तो बाफ ऑर्गनाईज केला तर मदत होईल आणि नाही पण, कारण उदिष्ट्य वेगळे आहे.
तो बाफ व्यवस्थित मांडण्याची खरच गरज आहेच. ती कल्पना मी अॅडमिनना विपूत लिहीली आहे. ही कल्पना बरीच वेगळी आहे. जसे मी 'पार्टनर्'वाचले अन त्यावर मी लिहीले पण ते मराठीतील सर्वोत्कॄष्ट पुस्तक असेल असे नाही. ते फक्त मी वाचलेले किंवा मला बरे वाटले /आवडले.
Pages