Submitted by मेधावि on 1 August, 2013 - 21:22
कालच घराच्या स्वैपाकघराच्या खिडकीतून धबाक्-कन एक ढोल्या उंदराने एन्ट्री मारलीये. त्याला येताना पाहून आम्ही घरातल्या बाकी खोल्यांची दारे बंद करून घेतली जेणेकरून तो इतर खोल्या़ंमधे जाउ नये. आता तो स्वैपाकघरातच असावा असा अंदाज आहे. पण दिसत नाहीये. रॅट कील काल रात्री उघडे करून ठेवले होते परंतु ते आहे तसेच आहे. उंदीर-मामाचाही पत्ता लागत नाहिये. शक्यतो उंदराला न मारता हुसकावून लावण्याचा काही उपाय आहे का? उंदीर प़कडायचा पिंजरा नाहीये आम्च्याकडे त्यामुळे तो उपाय बाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उंदराला माणसाळायला नंतर
उंदराला माणसाळायला नंतर साधारण कीती वेळ लागेल?<<<
या धाग्यावरील प्रतिसादक उंदराळायला लागला त्याहून कमी
सचिन, पुस्तकात ज्या टिपा
सचिन, पुस्तकात ज्या टिपा दिल्या होत्या, त्यानुसार तरी हे सगळे करतांना उंदराचे पोट भरलेले असावे, जेणेकरुन रस त्याला पचेल.
गेंड्याचे शिंग मांसाहारात मोडते. सुमेधाच्या घरात समजा मांसाहार चालत नसला, तरी कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है, हे तिने समजून घ्यावे.
रस दर उंदरी किमान पावणेदोन चमचा ह्या हिशेबाने उगाळावा.
उंदराला माणसाळायला नंतर साधारण कीती वेळ लागेल?>>> जितका वेळ माणसाचे पांघरलेल्या लांडग्यात रुपांतर व्हायला लागतो तेवढाच...
काय उंदराला माणसाळाताय? "ही
काय उंदराला माणसाळाताय?
"ही तर निव्वळ बाटवाबाटवी आहे. उंदरात एका दुष्ट आणि हावरट प्राण्याच्या(माणूस) अनुरुप बदल घडवणे अनैसर्गिक आहे. याबद्द्ल समस्त उंदीर निषेध नोंदवत आहेत."
हे माझ्या संगणकाजवळील उंदराचे वैयक्तिक मत!
"उगाच भलतेसलते उपाय करु नका. उगाच उंदरांचा रोष कशाला ओढवून घेताय?"
- हे माझे वैयक्तिक मत!
महान आहे हा बीबी. गजानन,
महान आहे हा बीबी.
गजानन, अगस्ती मुनी वाचून भयंकर हसले
ह्या सगळ्या प्रतिक्रिया
ह्या सगळ्या प्रतिक्रिया उंदराला वाचुन दाखवा. हसुन हसुन मरेल
उंदराला माणसाळायला नंतर
उंदराला माणसाळायला नंतर साधारण कीती वेळ लागेल?<<<
या धाग्यावरील प्रतिसादक उंदराळायला लागला त्याहून कमी>>>>
उंदरात एका दुष्ट आणि हावरट
उंदरात एका दुष्ट आणि हावरट प्राण्याच्या(माणूस) अनुरुप बदल घडवणे अनैसर्गिक आहे. >>>>
कसम पैदा करने वाले की ,मेरे
कसम पैदा करने वाले की ,मेरे दो अनमोल रतन, सूरज का साँतवा घोडा, आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या हे चित्रपट त्याच्या बिळापाशी लावा.
किंवा 'प्यार करेला हिम्मत चाही' हा एकच भोजपुरी सिनेमा त्याला भेट द्या. कामच तमाम होईल त्याचे.
धम्माल आहे हा धागा.. हहपुवा
धम्माल आहे हा धागा.. हहपुवा अगदी!
पाल येऊ नये म्हणून घरात मोरपीस ठेवावे म्हणे!
अवांतर : उंदराचे काय झाले, गेला का?
आमच्याकडेही घर पहिल्या मजल्यावर असल्याने उंदीर येऊ शकतात अशी शंका आली होती तर मी सगळ्या खिडक्यांच्या बाहेर रॅटकिल आधीच ठेवून दिले होते.
रिया, लाजो _/\_ सानी .. काय
रिया, लाजो _/\_
सानी .. काय उपाय!
गेला का उंदीर? सुमेधाजी आल्या नाहीत परत
धन्स लोक्स मी कधी कधी विचार
धन्स लोक्स
मी कधी कधी विचार करते
असले बाफ वाचून अॅडमिन काय म्हणत असतील
उंदराने पासवर्ड पाहून ठेवला
उंदराने पासवर्ड पाहून ठेवला होता. हा बाफ त्यानेच टाकला आहे, प्रतिबंधक उपायांची माहिती करून घ्यायला..
अॅडमिननाही मागे असे त्रास
अॅडमिननाही मागे असे त्रास होते (चिपमंक्स) वगैरे. तेव्हा त्यांना अशा संकटात असलेल्यांबद्दल सहानुभूतीच असेल
घ्या हो सुमेधाव्ही, सगळा बेत
घ्या हो सुमेधाव्ही, सगळा बेत फक्कड जमलाय. आज्पासुन ६व्या दिवशी उंदरी अमावस्या आहे, घरची पोर ढोर झोपल्यावर सानी न सांगीतलेला उपाय उरकुन टाका. आणि हो ह्या कानाच त्या कानाला कळाया नग. उपाय झाल्यावर चार लिंब उंदरावर ओवाळुन पाटल्या इहीरीत फेकुन द्या
असले बाफ वाचून अॅडमिन काय
असले बाफ वाचून अॅडमिन काय म्हणत असतील
>>
अॅडमिन, प्लीज हा बाफ उडवू नका. धम्माल धागा आहे.
हो पण त्या खारूटल्यांसाठी
हो पण त्या खारूटल्यांसाठी कोणी असले उपाय दिलेले का?
एक शंका आहे. अमावास्येला
एक शंका आहे.
अमावास्येला उंदीर मारला आणि तो मेला तर त्याचे भूत नाही होत का?
सचिन
सचिन
अमावास्येला उंदीर मारला आणि
अमावास्येला उंदीर मारला आणि तो मेला तर त्याचे भूत नाही होत का? >>> नाही. सोन्याचा उंदीर करुन काशीयात्रा करावी म्हणजे उलट्या पायांची उंदरी भुतं घर झपाटणार नाहीत.
पालीसाठी मी कोकणात "कांची नरद राजा" असं लिहिलेलं पाहिलं होतं :-P. म्हणजे काय माहित नाही.
सुमेधा, गेला का गं?
अमावास्येला उंदीर मारला आणि
अमावास्येला उंदीर मारला आणि तो मेला तर त्याचे भूत नाही होत का?>>> नाही... त्याला उद् गती...आपलं सद् गती प्राप्त होते!
सेलिब्रिटी नसलेला उंदीर
सेलिब्रिटी नसलेला उंदीर मारण्यासाठी - संजीव कपूर यांची भाजणी थालीपीठ कृती वापरून थालीपीठ करावे. त्यावर लोणी घालू नये. उंदीर कॅलरी-कोन्शियस नसला तरी घालवायचा असलेल्या उन्दिराला मस्का मारू नये. हे थालीपीठ म्युन्सिपालीटी कडून उधार आणलेल्या पिंजर्यात ठेवा (गुरुवार, शनिवार सोडून). पिंजर्यात 'चीज' ठेवू नये. उगीच 'व्हू मुव्ह्द' सारख्या पुस्तकांना विषय मिळतो.
पालीसाठी मी कोकणात "कांची नरद
पालीसाठी मी कोकणात "कांची नरद राजा" असं लिहिलेलं पाहिलं होतं . >> ह्यावरुनच पाली भाषा उदयला आली अस ऐकवात आहे
एक जालिमऽऽऽऽ उपायऽऽऽऽ
एक जालिमऽऽऽऽ उपायऽऽऽऽ सापडलाऽऽऽऽ
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
नाहीऽऽऽऽऽऽ
उंदीर कॅलरी-कोन्शियस नसला तरी
उंदीर कॅलरी-कोन्शियस नसला तरी घालवायचा असलेल्या उन्दिराला मस्का मारू नये. >>> धन्य आहेस! पण मस्का न मारता कसा घालवायचा? घालवणे ही आपली गरज आहे, त्याची नाही..
@रिया, हो पण त्या
@रिया, हो पण त्या खारूटल्यांसाठी कोणी असले उपाय दिलेले का? >>> त्या खारुट्ल्यांचा उच्छाद घराबाहेर होता असणार. मग उपायही वेगळेच असणार ना?
त्या खारुट्ल्यांचा उच्छाद
त्या खारुट्ल्यांचा उच्छाद घराबाहेर होता असणार. मग उपायही वेगळेच असणार ना? >>> हो ना! बाहेरच्या दाराआड लपायचं. बाहेर खारकुंडी आली की तिला भॉऽऽक्क करुन घाबरवायचं :-P.
अॅडमिन, धागा उंदीरचा असताना
अॅडमिन, धागा उंदीरचा असताना काही सदस्य इतर प्राण्याची चर्चा करीत आहेत. अशा पोस्टी उंदीराचे महत्त्व कमी करणाऱ्या आणि मूळ समस्येस बगल देणाऱ्या आहेत. कृपया लक्ष द्या... (हलके...)
एक जालिम उपाय... उंदीर
एक जालिम उपाय... उंदीर खारुटल्या झुरळे साप विंचू घरात शिरल्यास.... खच्चून पावटा खावा......आणि वासास्त्र टाकावे..
ए गप्प बसा
ए गप्प बसा
(No subject)
Pages