माउंट व्हिटनी, कॅलिफोर्निया पदभ्रमण -- अमेरिकन मुख्य भूमीवरचं सर्वात उंच शिखर (१४,५०० फूट)

Submitted by दैत्य on 31 July, 2013 - 22:43

नमस्कार लोकहो !

अमेरिकेतली भटकंती चालू आहे. मागच्या महिन्यात ४ जुलैला माउंट व्हिटनीला जाऊन आलो! फारा वर्षांची 'तमन्ना', 'मनिषा','इच्छा', 'आकांक्षा' इ.इ. पूर्ण झाली!
हे अमेरिकन मुख्य भूमीवरचं सर्वात ऊंच शिखर म्हणून ओळखलं जातं आणि दरवर्षी शेकडो ट्रेकर्स माथ्यापर्यंत जाण्याचं धाडस करतात. शिखराची उंची साधारण १४,५०० फूट आहे आणि आजूबाजूला बरेच 'फोर्टीनर्स' म्हणजे १४,००० + फूट उंची असणारे डोंगरही आहेत. कॅलिफोर्निया आणि नेवाडा राज्यांमध्ये ही 'सिएरा नेवाडा' पर्वतरांग आहे आणि ह्याचा दक्षिणपूर्वेकडचा भाग (लास वेगास च्या जवळ) हा बाकी कॅलिफोर्नियाच्या एकदम विरूद्ध म्हणजे खूप रूक्ष, वाळवंटी, भयानक तापलेला, पर्जन्यछायेतला आणि थोडक्यात म्हणजे 'नॉन-ग्लॅमरस' (मराठी शब्द ?) आहे. तुरळक वस्ती असलेला हा भाग म्हणजे जुन्या शोले मधला गब्बर चा अड्डा किंवा 'डाकीया डाक लाया' मध्ये पोस्टमन ज्या भागातून जातो तसा भाग!

१. ओलांचा, कॅलिफोर्निया (हे गावाचं नाव आहे...शप्पथ!)
From Mt Whitney

२.पायथ्याशी असणार्‍या गावाचं नाव लोन पाईन. तिथून दिसणारी माउंट व्हिटनीची पर्वतरांगः

From Mt Whitney

खरं पदभ्रमण चालू होतं 'व्हिटनी पोर्टल' नावाच्या छोट्याश्या कँप पासून. तिथून माथ्यावर जाण्याचे दहा-बारा मार्ग आहेत. आम्ही निवडलेला मार्ग म्हणजे सर्वात सोपा पण सर्वात लांब असा होता. ह्या मार्गाची लांबी ११ मैल एका बाजूनं म्हणजेच एकूण २२ मैल होती. शिवाय, अतिशय उंचावर असल्यानं इकडे उन्हाळ्यात येणार्‍या वादळांची सतत भिती असते. एका दिवसात २२ मैल चालायचं असेल तर कमीत कमी १० तास ठेवायला हवे होते. परत एवढ्या वेळ डोंगरावर भटकायचं म्हणजे राक्षस-भूक लागणार! ह्यावर उपाय एकचः- रात्री ८-१२ झोप काढून पहाटे १.३० ला निघून बरोबर माणशी २.५ लिटर पाणी आणि फळं, पावर बार्स घेऊन जाणे!

३. व्हिटनी पोर्टल वरून दिसणारा पहिला डोंगर- हा संपूर्ण पर्वत ग्रेनाईट चा आहे...
From Mt Whitney

४. वाटेत दिसलेला रानटी गुलाब....

From Mt Whitney

५. वाटेत दिसणारं 'मिरर लेक'
From Mt Whitney

६. झाडांच्या वर गेल्यावर ग्रेनाईट वर पडलेले सूर्यकिरण
From Mt Whitney

७. अजून एक पर्वतातलं तळं - कन्सलटेशन लेक
From Mt Whitney

८. व्हिटनी च्या दरबारात प्रवेश!
From Mt Whitney

९. ९९ नागमोडी वळणांवरून मागे वळून पाहताना
From Mt Whitney

१०. वळणं संपून ट्रेल क्रेस्ट (Trail Crest) चालू होते तिथे. डाव्या बाजूला 'सेक्वोया नॅशनल पार्क' आहे.

From Mt Whitney

११. आजूबाजूला दिसणारे तुटलेले कडे ( असं बघितल्यावर स्फुरण चढतं आणि कधी एकदा माथ्यावर जातोय असं होतं

From Mt Whitney

१२. असाच अजून एक तुटलेला कडा
From Mt Whitney

१३. व्हिटनीची मागची (पश्चिम!) बाजू - गिटारच्या आकाराचं तळं 'गिटार लेक'! - जिथून फोटो काढला आहे ती जागा सुमारे १३,५०० फूटावर असेल.

From Mt Whitney

१४. शेवटी एकदा माउंट व्हिटनी सर झालं- माथ्यावरचं पहिलं दॄश्य !
From Mt Whitney

१५. माथ्यावरचा बोर्ड

From Mt Whitney

१६. माथ्यावरून

From Mt Whitney

१७. माथ्यावरून

From Mt Whitney

१८. परतताना

From Mt Whitney

१९. पुन्हा 'व्हिटनी पोर्टल' ला आल्यावर

From Mt Whitney

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन आणि मस्त फोटोज ,
मागच्या आठवड्यात MT. Charleston Peak ला जाण्याचा प्रयत्न केला पण वाइल्ड फायर मुळे वर जायला मिळालं नाही.

सगळ्यांना धन्यवाद!!

@केदारः- व्हिटनी वर जाण्यासाठी परमिट ची आवश्यकता असते आणि दर वर्षी जानेवारी मध्ये लॉटरी चालू होते. कधी कधी कोणी 'नो शो' असेल तर त्या गिर्यारोहकाचं परमिट एक दिवस आधी जाऊन परमिट मिळू शकतं, पण उन्हाळ्यात असं मिळणंही कठिण आहे.
तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर जरूर कळवा!

पूर्वतयारी आणि आधीचा प्रवास याबद्दल नक्की लिहीन

मी आमच्या ग्रुप बरोबर पहाटे १.३० ला निघालो. सकाळी ५ वाजेपर्यंत पूर्ण वेळ टॉर्च च्या प्रकाशात डोंगर चढत होतो. सुरूवातीला गप्पा मारत टिवल्या-बावल्या करत गेल्यामुळे अर्धं अंतर कापायला ५.३० वाजले. खरंतर इथे येण्यासाठी ३ तास पुरले असते. त्यानंतर मी एकटा पुढे निघालो आणि साधारण ९.३० समिट केलं. माझ्या मित्रांना यायला वेळ लागला आणि त्यांनी ११ ला समिट केलं. परतताना प्रत्येकजण आरामात उतरत होता, थांबून फोटोसुद्धा चालू होते. मी ४ वाजता परत खाली आलो आणि माझे मित्र ७.१५ पर्यंत येत होते.

सुनिधी:- माउंट व्हिटनी हे 'ईन्यो नॅशनल फॉरेस्ट' आणि 'सेक्वोया नॅशनल पर्क' मध्ये येतं. नेहेमीचा पदभ्रमणाचा रस्ता ८०% नॅशनल फॉरेस्ट मधून जात असल्यानं तिथे येणार्‍या गिर्यारोहकांची संख्या मर्यादित करण्यासाठी परवाना किंवा परमिट ची पद्धत आहे. त्यात पुन्हा एका दिवसात शिखर सर करून खाली येणारे आणि एक रात्र मुक्काम करून दुसर्‍या दिवशी येणारे ह्यासाठी वेगळी परमिट्स आहेत. माझ्या मते पहिल्या प्रकारच्या परमिटमध्ये दर दिवशी ६० अर्जदार (+ प्रत्येक अर्जदाराचा ग्रुप १५ पर्यंत) सोडले जातात. एक दिवस राहण्याच्या परमिटमध्ये हेच १०० असतात पण हे परमिट मिळणं कठिण असतं कारण कधी कधी एकाच तारखेसाठी २००० अर्ज येतात.
अर्ज दाखल करण्याचा कालावधी दर वर्षी १ जानेवारी ते ३१ मार्च असतो. ह्या काही वेबसाईट्स आहेत.
http://www.nps.gov/seki/planyourvisit/whitney.htm

Pages