नमस्कार लोकहो !
अमेरिकेतली भटकंती चालू आहे. मागच्या महिन्यात ४ जुलैला माउंट व्हिटनीला जाऊन आलो! फारा वर्षांची 'तमन्ना', 'मनिषा','इच्छा', 'आकांक्षा' इ.इ. पूर्ण झाली!
हे अमेरिकन मुख्य भूमीवरचं सर्वात ऊंच शिखर म्हणून ओळखलं जातं आणि दरवर्षी शेकडो ट्रेकर्स माथ्यापर्यंत जाण्याचं धाडस करतात. शिखराची उंची साधारण १४,५०० फूट आहे आणि आजूबाजूला बरेच 'फोर्टीनर्स' म्हणजे १४,००० + फूट उंची असणारे डोंगरही आहेत. कॅलिफोर्निया आणि नेवाडा राज्यांमध्ये ही 'सिएरा नेवाडा' पर्वतरांग आहे आणि ह्याचा दक्षिणपूर्वेकडचा भाग (लास वेगास च्या जवळ) हा बाकी कॅलिफोर्नियाच्या एकदम विरूद्ध म्हणजे खूप रूक्ष, वाळवंटी, भयानक तापलेला, पर्जन्यछायेतला आणि थोडक्यात म्हणजे 'नॉन-ग्लॅमरस' (मराठी शब्द ?) आहे. तुरळक वस्ती असलेला हा भाग म्हणजे जुन्या शोले मधला गब्बर चा अड्डा किंवा 'डाकीया डाक लाया' मध्ये पोस्टमन ज्या भागातून जातो तसा भाग!
१. ओलांचा, कॅलिफोर्निया (हे गावाचं नाव आहे...शप्पथ!)
From Mt Whitney
२.पायथ्याशी असणार्या गावाचं नाव लोन पाईन. तिथून दिसणारी माउंट व्हिटनीची पर्वतरांगः
From Mt Whitney
खरं पदभ्रमण चालू होतं 'व्हिटनी पोर्टल' नावाच्या छोट्याश्या कँप पासून. तिथून माथ्यावर जाण्याचे दहा-बारा मार्ग आहेत. आम्ही निवडलेला मार्ग म्हणजे सर्वात सोपा पण सर्वात लांब असा होता. ह्या मार्गाची लांबी ११ मैल एका बाजूनं म्हणजेच एकूण २२ मैल होती. शिवाय, अतिशय उंचावर असल्यानं इकडे उन्हाळ्यात येणार्या वादळांची सतत भिती असते. एका दिवसात २२ मैल चालायचं असेल तर कमीत कमी १० तास ठेवायला हवे होते. परत एवढ्या वेळ डोंगरावर भटकायचं म्हणजे राक्षस-भूक लागणार! ह्यावर उपाय एकचः- रात्री ८-१२ झोप काढून पहाटे १.३० ला निघून बरोबर माणशी २.५ लिटर पाणी आणि फळं, पावर बार्स घेऊन जाणे!
३. व्हिटनी पोर्टल वरून दिसणारा पहिला डोंगर- हा संपूर्ण पर्वत ग्रेनाईट चा आहे...
From Mt Whitney
४. वाटेत दिसलेला रानटी गुलाब....
From Mt Whitney
५. वाटेत दिसणारं 'मिरर लेक'
From Mt Whitney
६. झाडांच्या वर गेल्यावर ग्रेनाईट वर पडलेले सूर्यकिरण
From Mt Whitney
७. अजून एक पर्वतातलं तळं - कन्सलटेशन लेक
From Mt Whitney
८. व्हिटनी च्या दरबारात प्रवेश!
From Mt Whitney
९. ९९ नागमोडी वळणांवरून मागे वळून पाहताना
From Mt Whitney
१०. वळणं संपून ट्रेल क्रेस्ट (Trail Crest) चालू होते तिथे. डाव्या बाजूला 'सेक्वोया नॅशनल पार्क' आहे.
From Mt Whitney
११. आजूबाजूला दिसणारे तुटलेले कडे ( असं बघितल्यावर स्फुरण चढतं आणि कधी एकदा माथ्यावर जातोय असं होतं
From Mt Whitney
१२. असाच अजून एक तुटलेला कडा
From Mt Whitney
१३. व्हिटनीची मागची (पश्चिम!) बाजू - गिटारच्या आकाराचं तळं 'गिटार लेक'! - जिथून फोटो काढला आहे ती जागा सुमारे १३,५०० फूटावर असेल.
From Mt Whitney
१४. शेवटी एकदा माउंट व्हिटनी सर झालं- माथ्यावरचं पहिलं दॄश्य !
From Mt Whitney
१५. माथ्यावरचा बोर्ड
From Mt Whitney
१६. माथ्यावरून
From Mt Whitney
१७. माथ्यावरून
From Mt Whitney
१८. परतताना
From Mt Whitney
१९. पुन्हा 'व्हिटनी पोर्टल' ला आल्यावर
From Mt Whitney
(No subject)
मस्तच.
मस्तच.
जबरी
जबरी
मस्तच दैत्य. एकदम जुने दिवस
मस्तच दैत्य. एकदम जुने दिवस आठवले. व्हिटनी सर करायचे राहूनच गेले तेंव्हाही. आत्ता तर अशक्यच वाटतेय.
मस्त आलेत फोटो.... मझ्या
मस्त आलेत फोटो.... मझ्या लीस्ट मध्ये अॅड केलाय
थँक्स... भरपुर माहिती दिलीत.
थँक्स... भरपुर माहिती दिलीत. अवघड वाटतय ९ तास चढायचे.
मस्त. एक प्रश्न: तो जो
मस्त.
एक प्रश्न: तो जो ग्रॅनाईटचा डोंगर आहे तो ग्रॅनाईट म्हणजे भारतात ओट्याला वगैरे वापरला जातो तोच का?
खुपच सह्ही!!!!!!!!!!!
खुपच सह्ही!!!!!!!!!!!
व्वा मस्तच
व्वा मस्तच
अप्रतिम जागा. मस्त फोटो. छान
अप्रतिम जागा. मस्त फोटो. छान वर्णन.
एक प्रश्न: तो जो ग्रॅनाईटचा
एक प्रश्न: तो जो ग्रॅनाईटचा डोंगर आहे तो ग्रॅनाईट म्हणजे भारतात ओट्याला वगैरे वापरला जातो तोच का?
हो! तोच ग्रेनाईट.....मला त्यावेळी मनात विचार आला होता, किती ओटे बनतील ना ह्या अक्ख्या डोंगराचे?
निसर्गाचे रौद्र अन दांडगट ,
निसर्गाचे रौद्र अन दांडगट , राकट , रॉ रूप पाहून मस्त वाटलं.
उत्तम छायाचित्रे. हाय आल्टिट्युड त्रास झाला का?
अॅक्लेमटाईज व्हावे लागले का?
मस्तच!!
अभिनंदन
छानच. तयारी कशी केलीत? किती
छानच.
तयारी कशी केलीत? किती अवघड आहे?
हाय आल्टिट्युड त्रास झाला
हाय आल्टिट्युड त्रास झाला का?
अॅक्लेमटाईज व्हावे लागले का?
खूप त्रास नाही झाला पण तीच एक काळजी घ्यावी लागते. आम्ही अॅक्लेमटाईज होण्यासाठी आधी कोलोरॅडो मध्ये 'लाँग्स पीक' ला गेलो होतो आणि ह्या ट्रेक च्या आदल्या दिवशी व्हिटनीच्याच मार्गावर ११,००० फुटांवर जाऊन आलो. उंचीचा त्रास कमी करण्यासाठी अजून एक उपाय म्हणजे एखाद्या उंच ठिकाणी एक-दोन रात्री कँपिंग वगैरे करणे.
तयारी कशी केलीत? किती अवघड आहे
फारसा अवघड नाहीये कारण कुठेही 'टेक्निकल क्लाईंब' करावं लागत नाही, फक्त खूप न संपणारी वाट धीर न सोडता चालण्याची तयारी ठेवावी लागते! अजून एक महत्वाचं म्हणजे फक्त समर मध्ये पदभ्रमण करता येतं बाकीच्या वेळी (हिवाळ्यात) प्रचंड बर्फ असल्यानं नॉर्मल गिर्यारोहकांसाठी (जे प्रोफेशनल गिर्यारोहक नाहीत ते) मार्ग बंदच असतो.
मी ह्याची तयारी साधारण ३-४ महिने आधीपासून केली होती, ती म्हणजे रोज कमीतकमी १०,००० पावलं चालणे आणि वीकेंडला कमीतकमी ६ मैलाचा हाईक. ह्याशिवाय खाण्यात थोडा बदल म्हणजे चीज, तेलकट कमी आणि दारू पिणं कंप्लीट स्टाप! किती पार्ट्या ड्राय गेल्या म्हणून सांगू ! पण दारूबंदीचा नक्की उपयोग झाला ( ह्या एकाच कारणासाठी माझा पूर्ण सपोर्ट आहे! कारण एकदा का ट्रेक झाला की त्या रात्री आहेच!).
मस्त फोटो. तुमचे कौतूक आहे.
मस्त फोटो. तुमचे कौतूक आहे. किती चिका टीने शिखर पादाक्रांत केले आहे. एक मो ठी फिटनेस टेस्ट च आहे ही. सूर्य उजाड ल्यावर सर्व मस्त तापत असेल. ति थे कोल्हे माउंटन गोट्स वगैरे पण नाही का?
सर्वच प्रचि फार सुंदर.
सर्वच प्रचि फार सुंदर.
खूपच छान प्रचि अन वर्णनही.
खूपच छान प्रचि अन वर्णनही. तुमच्या चिकाटीच कौतुक!
सुंदरच.
सुंदरच.
.मला त्यावेळी मनात विचार आला
.मला त्यावेळी मनात विचार आला होता, किती ओटे बनतील ना ह्या अक्ख्या डोंगराचे? >> आत्तापर्यंत असा डोंगर भुईसपाटच झाला असता
दुसरा खास...
दुसरा खास...
जबराच ! प्र. ची. सुंदर आलेत
जबराच ! प्र. ची. सुंदर आलेत ध्न्यवाद...
अप्रतिम फोटोज!
अप्रतिम फोटोज!
Pages