चला स्वित्झर्लंडला

Submitted by दिनेश. on 31 July, 2013 - 02:35

तर चला मंडळी माझ्याबरोबर स्विस टुअरला. हि केवळ एक झलक. ( जसजसा वेळ मिळेल तसतसा या प्रत्येक जागेचे भरपूर फोटो दाखवीनच. )

सुरवात करुया फुलांपासून. डोळे भरून फुले बघितली, भरपूर फोटो काढलेत.

हि आहे आर गॉर्ज. यावेळची ट्रिप खास करुन या जागेसाठी होती.
४० मिनिटे या अरुंद गॉर्जमधून या खळाळत्या नदीच्या सोबतीने आपण जाऊ.

दहाएक मीटर खोल असलेली हि नदी खुप वेगात आपल्या पायगती वहात राहते.

हे आहे एक धरण Happy

आयूष्यात पहिल्यांदा हिमनग बघितले मी.

ही आहे एक ग्लेशियर. आपण हिच्या पोटातही जाऊ शकतो.

हा आहे इतिहासकालीन डेव्हील्स ब्रिज.

गुलाबासाठी प्रसिद्ध असलेले, रॅपर्सव्हील

नमुना म्हणून केवळ एक गुलाब.

हे आहे वडूझ गाव. ( हो याच नावाचे गाव आहे हे. )

त्यांच्या परिकथेचा संदर्भ असलेले एक गाव, हैदीलँड

हे आहे त्यांचे सर्वोच्च शिखर, जुंगफ्रॉव

हा र्‍हाईन नदीवरचा धबधबा, आपण त्या मधल्या सुळक्यावर पण जाणार आहोत.

आणि मग झुरीकमधल्या या सुंदर नदीच्या काठी, पाण्यात पाय बुडवून निवांत बसणार आहोत.

सर्व भारतीयांच्या लाडक्या टिटलीसच्या वाटेवर.

टिटलीसच्या शिखरावर.

त्याच्या पायथ्याची एक नदी.

हा देखील एक इतिहासकालीन पूल, लुझर्न गावचा. सर्व फुले खरी आहेत का तेदेखील बघूच.

आणि मग स्विस आल्प्सवरून उड्डाण करत परतही येऊ.

तर चला !

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला खरेच या एकेका जागेसाठी वेगवेगळे फोटोफिचर करावे लागेल.
फुलांच्या बाबतीत मजाच झाली. ठिकठिकाणी मस्त फुले दिसत होती, त्यांचे फोटो काढत गेलो. मग मुद्दाम स्विस आल्प्समधली फुले असे एक पुस्तक विकत घेतले पण मजा म्हणजे त्या पुस्तकातली मोजकीच फुले मला
दिसली होती म्हणजेच मी काढलेल्या फोटोतली बरीच फुले त्या पुस्तकात नव्हती Happy

या गॉर्ज ला कसे जायचे? जरा अजुन माहिती द्या ना. कारण मी कधि ह्या गॉर्ज बद्दल नव्हते वाचले.

Pages