गॉट लेह्ड ! लेह लडाख ! गेले अनेक वर्षे जिथे जायची इच्छा ( ३ इडियटच्या आधीपासून) होती ती जागा! १९९९-२००० च्या छोट्या युद्धामुळे जगात सगळ्यांना कारगिल माहिती झाले ते लडाख! हायस्ट मोटारेबल रोड इन द वल्ड असणारी जागा आणि सेकंड कोल्डेस्ट हॅबिटट इन द वल्ड असणारी जागा ! द लामा लॅण्ड ! द रूफ ऑफ द वल्ड !
२०१२ च्या सिझन मध्ये मला जायचे होते पण माझ्या येणार्या सर्व मित्रांनी टांग मारली व नेहमीप्रमाणे मी एकटाच उरलो. मग जावे की नाही? ह्यात नाहीचा जय झाला आणि २०१२ असेच गेले. २०१३ च्या सुरूवातीलाच मी कैलास मानसरोवर यात्रेसाठी नाव नोंदनी केली आणि योगायोगाने माझे सिलेक्शन बॅच नं ७ साठी झाले. मग तेंव्हा (एप्रिल मध्ये) असे ठरविले की ह्या वर्षी परत लेहला सुट्टी किंवा अगदीच सप्टे मध्ये मला १० दिवस वेळ आहे तेंव्हा. कैलासाच्या नादात लेह बाजूला पडले, पण ह्या वेळी कैलास होणे नव्हते कारण उत्तराखंडाचा महापूर! त्यात बॅच २ ते १० रद्द झाल्या. तो महिना होता जून. आणि मी जुलै मध्ये कैलाससाठी जाणार होतो. रद्द झाल्यामुळे परत एकदा 'लेह'च्या आशा पुनर्जीवित झाल्या आणि मी परत एकदा मित्रांना विचारायला सुरू केले. परत तेच, कोणीही यायला तयार नव्हते. पण ह्यावेळी मी हारणार नव्हतो. एकटा तर एकटा. नाहीतरी मी अनेक ट्रेक गेले वर्षभरात "सोलो" केले आहेत, त्यामुळे सोलो साठी मी तयार होतो. पण पूर आणि इतर अनेक कारणांमुळे घरचे मात्र मला जाऊ द्यायला तयार नव्हते. अनेक भांडणे झाल्यावर बायको यायला तयार झाली. ( कारण माझ्या पत्नीला रोडवरील प्रवास अजिबात आवडत नाही शिवाय सतत गोल गोल नागमोडी रस्त्यांचा तिला तिटकारा आहे) मग मुलांचे काय करणार? तर त्यांनाही घेऊ या अशी पुस्ती मी जोडली. मग परत घरच्यांच्या शिव्या, पुराची परिस्थिती असूनही मुलांना इतक्या दुर ते ही जवळपास ६५०० किमी होती आणि ते पण माउंटेन्स मध्ये अशी ट्रीप मी आखू देखील कशी शकतो ह्यावर चर्चा / वाद असे होत होत शेवटी मी ज्या दिवशी कैलासला जाणार होतो ( ४ जुलै ) त्याच दिवशी लेहला पण निघायचे असे ठरले. पण आदल्या दिवशी परत गोंधळ झाला कारण माझ्या लहान भावाला अशी ट्रिप ( सोलो किंवा फॅमिलीसहीत) करणे म्हणजे येडेपणा वाटत होता. मग परत चर्चा/ विचार विनिमय आणि माझे आश्वासन की काहीही होणार नाही ! आणि सरतेशेवटी ऑल वॉज गुड !
सगळ्यात महत्त्वाची होती गाडीची तयारी !
लेहला जाणार म्हणून काही गोष्टी ज्या अत्यावश्यक होत्या त्या मी घेतल्या त्या अशा.
स्पेअर डिझेल टँक
पंक्चर रिपेअर किट ( ट्युबलेसचा मिळतो)
सिगारेट लायटर मधून चालणारे एअर कॉंप्रेसर.
२ लिटर कुलंट
१ लिटर ब्रेक ऑईल.
सिगारेट लायटर मोबाईल चार्जर
गाडीचे पूर्ण सर्व्हिसिंग आणि सगळ्या लेव्हल्सचे टॉपप.
बाकी गाडी तशी नवीनच असल्यामुळे टायर्सला काही प्रॉब्लेम नव्हता.
ऑक्झिलरी लॅम्प बसवावेत अशी माझी इच्छा होती. (ज्यामुळे प्रकाश कमी पण गाडीला स्पोर्टी लुक येईल हा अंतस्थ हेतू होता) पण माउंटेन्स मध्ये मध्ये रात्री गाडी चालवायची नाही असा एक रुल मीच बनविल्यामुळे ऑक्झिलरी बसवले नाही. पण तत्पूर्वी चांगल्या थ्रो साठी मी तसेही HID ६०००के चे बसवून घेतले आहेत त्यामुळे "लाईट" चा प्रॉब्लेम सॉल्व झाला.
बाकी तयारी.
१. अनेकदा वाद घातले. ज्यामुळेच ही ट्रीप माझी न होता "आमची" झाली. त्यामुळे मी आनंदी आहे.
२. काका हलवाईवर धाड मारून जायच्या आदल्या दिवशी ( ३ जुलै) भरपूर खायचे सामान भरून घेतले.
३. गाडीचे सीट फ्लॅट करता येतात त्यामुळे अंथरुन आणि पांघरून व उश्या
४. बायकोला नवीन गाणे आवडतात त्यामुळे नवीन दोन तीन सिड्या.
५. आणि दुपारी २ नंतर जाऊनही BSNL चे पोस्ट पेड कार्ड - जे अत्यावश्यक आहे. लेह मध्ये एअरसेल, एअरटेल आणि BSNL ( सर्व पोस्ट पेड) चालतात. तर लेहच्या आजूबाजूला फक्त BSNL चालते. माझे एअरटेल असल्यामुळे मी तसा बिनधास्त होतो पण दुपारी मित्राचा फोन आला ( जो सहकुटूंब विमानाने लेहवरून आदल्यादिवशीच २ जुलैला वापस आला होता) त्याने सांगीतले की अरे BSNL इज मस्ट. मग काय गेलो सर्व कागदपत्र घेऊन आणि आणले कार्ड. जे खरच कामाला आले.
६. छोटे ऑक्सिजन सिलेंडर मी खूप शोधले पण मला मिळाले नाही. पुढे श्रीनगर मध्ये घेऊ असा विचार करून निघालो.
७ AMS साठी डायमॉक्स आणि इतर नेहमीची सर्दी, डोके, अंगदुखी, ताप ह्यावरी औषधे.
८ आणि मुलांसाठी आयपॅड वर अनेक नवीन गेम्स डाउनलोड केले. ( हे सर्व ३ जुलैला म्हणजे आदल्या दिवशी! )
होता होता ३ जुलै प्रचंड व्याप घेऊन आला नी गेला आणि रात्री गाडीत सामान ठेवून झाले. वाट होती ती फक्त चार वाजन्याची, जे तसेही वाजलेच असते. रात्र पूर्ण अशीच गेली आणि आम्ही तयार होऊन ५ वाजता निघालो.
संपूर्ण वृत्तांत येत आहे. तो पर्यंत हे टिझर्स. ( आय नो की फोटो त्यातल्या त्यात माझे, विल नॉट डू जस्टिस. )
द जुले लॅण्ड -
माय चीता - काईन्डा होम !
दे से - देअर आर रोडस अॅण्ड देअर आर रोडस. काही ठिकाणी अत्यंत सुंदर टार रोड आणि काही ठिकाणी केवळ टायर ट्रॅक्स दिसतात म्हणून रोड आहे असे म्हणायचे. To see that wild, raw, untouched nature you need to burn lot of diesel and need to have lot of will power and patience खूप ठिकाणी " स्लो अॅन्ड स्टेडी विन्स द रेस" त्यामुळेच लिहिले आहे.
क्रमशः
भाग एक
भाग दोन
भाग तीन
भाग चार
भाग पाच
भाग सहा
भाग सात
भाग आठ
भाग नऊ
जस की हॉस्टेल डेज स विथ टू
जस की हॉस्टेल डेज स विथ टू किडस. >> वॉव!
जबरदस्त!!! वृत्तांत येऊ द्या
जबरदस्त!!!
वृत्तांत येऊ द्या लवकर.
मस्त फोटो
मस्त फोटो
केजो मस्त रे ! वाचतो आहे. तू
केजो मस्त रे !
वाचतो आहे. तू लिही !
वॉव भारी. अनप्लॅन्ड ट्रिप!!
वॉव भारी.
अनप्लॅन्ड ट्रिप!! मस्तच.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
अरे वा. मस्तच. माझा भाऊ आणि
अरे वा. मस्तच.
माझा भाऊ आणि वहिनीही अशातच जावून आलेत. ते जुलैच्या दुसर्या आठवड्यात गेले होते. तू पुण्याहून ड्राइव्ह करत गेलास ना? भावाने त्याची गाडी चंदिगढला आधी पाठवून दिली होती आणि ते चंदिगढपर्यंत फ्लाइटनी गेले. येताना श्रीनगरला गाडी सोडून आले.
यावेळी येताना श्रीनगरच्या रस्त्यात ते दोघं कर्फ्युमध्ये अडकले होते. मध्यरात्री जवळपास एकट्याने प्रवास करावा लागला. त्याला माहित असून त्याने बीएसएनएलचं पोस्टपेड सिम नेलं नाही म्हणून तिथे अडकलेलं असताना कुणाशी काँटॅक्ट पण करता आला नाही.
पूर्वी मित्राबरोबर दिल्ली लडाख बाइकवर जावून आलाय तो, त्यावेळी पण काश्मिरात अडकले होते म्हणे. पण तेंव्हा आर्मीच्या गाड्यांबरोबर बाहेर पडता आलं आणि सोबत रस्त्यामध्ये भेट झालेले बरेच बायकर्सपण होते.
फोटो मस्तच आहेत. पुर्ण प्रवासाबद्दल वाचायला आवडेल. बराच मोठ्ठा प्रवास होता तुमचा.
केदार तु आणि प्रज्ञा महान
केदार
तु आणि प्रज्ञा महान आहात.
__/\__ मस्तच... सगळे ईत्यंभूत
__/\__
मस्तच... सगळे ईत्यंभूत अनुभव सविस्तर वाचायला/ऐकायला आवडतील... जरूर लिहा
व्वा... खुप छान!
व्वा... खुप छान!
सुन्दर फोटो आणि माहिती....
सुन्दर फोटो आणि माहिती.... धाडसाचे कौतुक वाटते...
kedar salam.
kedar salam.
बापरे.. धन्य!! वृत्तांत येऊदे
बापरे.. धन्य!!
वृत्तांत येऊदे सगळा..
झकास.
झकास.
एक नंबर
एक नंबर
सहीच रे केदार , स्वतः
सहीच रे केदार , स्वतः ड्राईव्ह करत रोड ट्रिप म्हणजे जाम मजा आली असणार. फोटोही मस्त , पुढचा भाग लवकर टाक.
सह्हिच्च! गंतव्य स्थान आणि
सह्हिच्च! गंतव्य स्थान आणि गाडी दोन्ही माझे फेवरीट!
मजा येणार आता पुर्ण वृत्तांत वाचायला, केदार. आणि तूझ्या तोंडून इत्यंभूत वर्णन ऐकण्यासाठी गटग कधी करुयात ते सुद्धा नक्की कळव.
जबराट !! पूर्ण लेखाची वाट
जबराट !! पूर्ण लेखाची वाट बघतोय
सही, एकदम मस्त रे. मुख्य
सही, एकदम मस्त रे. मुख्य म्हणजे लहान मुलांसोबत ही ट्रीप केली म्हणून जास्तच कौतुक वाटले.
वर्णन वाचायला मजा येणार.
अप्रतिम फोटो आहेत! मुलांना
अप्रतिम फोटो आहेत!
मुलांना काखोटी मारून या ट्रिपा करणं शूर आई-बाप असल्याचं लक्षण आहे!
अखेर तात्यांच्या फ्येमस पांढर्या हत्तीचं दर्शन घडलं. भारी आहे गाडी!
आपल्याकडे नाइट सेक्युरिटीवाले रेस्ट एरियाज असते तर गाडीत झोपता येऊन धावत्या पाण्याची आणि विजेची सोय झाली असती.
अशा ट्रिपांमधे उपयोगी पडू शकणारे सॅटलाइट फोन वापरण्यावर भारतात बंदी आहे हे इतक्यातच कळलं.
इंट्रेस्टींग .....
इंट्रेस्टींग .....
नेव्हिगेशन वापरलं का? असेल तर
नेव्हिगेशन वापरलं का? असेल तर कोणत?
धाडसी आहातच पण मुलांची साथही ... दुधात साखर
वाट बघतोय पुढच्या भागाची
केदार टिजर जबरी आहे.
केदार टिजर जबरी आहे.
जबरी !!! लिही लवकर पुढचं
जबरी !!!
लिही लवकर पुढचं आता..
वा....... मलाही अशीट्रिप
वा....... मलाही अशीट्रिप करायला आवडेल.
पण त्यापेक्षा अद्यावत माहिती नंतर मी मिळवली. आता ती इथे टाकेन. विल ब द डेफिनेटिव्ह गाईड टू लेह. स्मित
आम्ही निघतोय उद्या..... तुमचे गाईड आम्हाला परिक्षेनंतर वाचायला मिळणार की काय????

पुन्हा पुन्हा जावे आणि
पुन्हा पुन्हा जावे आणि प्रेमात पडावे असा प्रदेश. कधी जाणार मी पुन्हा. ५ वर्ष झाली की आता जाउन.
धन्यवाद सर्वांना. दुसरा भाग
धन्यवाद सर्वांना.
दुसरा भाग टाकतो लवकरच. ते फोटो एम्बेड करणे आता पिकासातून बंद केले की काय? मला डाउनलोड ( < १५० केबी) आणि मग माबोवर अपलोड असा द्राविडी प्राणायम करावा लागत आहे.
साधना मला वाटल्यास कॉल करा. ट्रीप माझ्यामुळे बदलू नका पण मी नक्कीच काय जास्त चांगले आहे हे सांगू शकतो. लेह मधील काही जागा ओव्हरहाईप्ड पण आहेत.
विजय हो वापरले पण रूटस आधीच गुगल मॅपवरून पाहून ठेवले. माझ्या गाडीत डॅश मध्ये इनबिल्ट GPS आहे. त्याचे मॅप माय इंडियाचे व्हर्जन्स आहेत. नॉट बॅड आणि नॉट गुड असा अनुभव आहे. डिटेल मध्ये लिहितोच.
मृ - आताशा रेस्ट रूम काही हायवे वर आहेत. त्यात आघोंळीची सोय वगैरे पण आहे. पण आम्ही ह्या वेकेशनला तसे काही केले नाही, पण नॉट अ बॅड आयडिया. पुढच्या व्हेकेशनला एक दिवस तसे करून पाहीन.
साधना मला वाटल्यास कॉल करा.
साधना मला वाटल्यास कॉल करा. ट्रीप माझ्यामुळे बदलू नका पण मी नक्कीच काय जास्त चांगले आहे हे सांगू शकतो. लेह मधील काही जागा ओव्हरहाईप्ड पण आहेत.
बदलता येणार तर नाही, पण भाग लौकर टाका. प्रवासात चान्स मिळाला तर वाचता येतील.
नाहीतर पुढच्या वेळी कामाला येतील, हाकानाका
फोटो एम्बेड करणे आता
फोटो एम्बेड करणे आता पिकासातून बंद केले की काय?
>> सुरु आहे की.
Check Album properties & change it to 'Anyone with Link'
केदार आता अशीच सिक्किम -
केदार आता अशीच सिक्किम - भूतान ट्रिप प्लान कर.
कमाल कमाल कमाल! हेवा वाटला.
कमाल कमाल कमाल!
हेवा वाटला.
Pages