गॉट लेह्ड ! लेह लडाख ! गेले अनेक वर्षे जिथे जायची इच्छा ( ३ इडियटच्या आधीपासून) होती ती जागा! १९९९-२००० च्या छोट्या युद्धामुळे जगात सगळ्यांना कारगिल माहिती झाले ते लडाख! हायस्ट मोटारेबल रोड इन द वल्ड असणारी जागा आणि सेकंड कोल्डेस्ट हॅबिटट इन द वल्ड असणारी जागा ! द लामा लॅण्ड ! द रूफ ऑफ द वल्ड !
२०१२ च्या सिझन मध्ये मला जायचे होते पण माझ्या येणार्या सर्व मित्रांनी टांग मारली व नेहमीप्रमाणे मी एकटाच उरलो. मग जावे की नाही? ह्यात नाहीचा जय झाला आणि २०१२ असेच गेले. २०१३ च्या सुरूवातीलाच मी कैलास मानसरोवर यात्रेसाठी नाव नोंदनी केली आणि योगायोगाने माझे सिलेक्शन बॅच नं ७ साठी झाले. मग तेंव्हा (एप्रिल मध्ये) असे ठरविले की ह्या वर्षी परत लेहला सुट्टी किंवा अगदीच सप्टे मध्ये मला १० दिवस वेळ आहे तेंव्हा. कैलासाच्या नादात लेह बाजूला पडले, पण ह्या वेळी कैलास होणे नव्हते कारण उत्तराखंडाचा महापूर! त्यात बॅच २ ते १० रद्द झाल्या. तो महिना होता जून. आणि मी जुलै मध्ये कैलाससाठी जाणार होतो. रद्द झाल्यामुळे परत एकदा 'लेह'च्या आशा पुनर्जीवित झाल्या आणि मी परत एकदा मित्रांना विचारायला सुरू केले. परत तेच, कोणीही यायला तयार नव्हते. पण ह्यावेळी मी हारणार नव्हतो. एकटा तर एकटा. नाहीतरी मी अनेक ट्रेक गेले वर्षभरात "सोलो" केले आहेत, त्यामुळे सोलो साठी मी तयार होतो. पण पूर आणि इतर अनेक कारणांमुळे घरचे मात्र मला जाऊ द्यायला तयार नव्हते. अनेक भांडणे झाल्यावर बायको यायला तयार झाली. ( कारण माझ्या पत्नीला रोडवरील प्रवास अजिबात आवडत नाही शिवाय सतत गोल गोल नागमोडी रस्त्यांचा तिला तिटकारा आहे) मग मुलांचे काय करणार? तर त्यांनाही घेऊ या अशी पुस्ती मी जोडली. मग परत घरच्यांच्या शिव्या, पुराची परिस्थिती असूनही मुलांना इतक्या दुर ते ही जवळपास ६५०० किमी होती आणि ते पण माउंटेन्स मध्ये अशी ट्रीप मी आखू देखील कशी शकतो ह्यावर चर्चा / वाद असे होत होत शेवटी मी ज्या दिवशी कैलासला जाणार होतो ( ४ जुलै ) त्याच दिवशी लेहला पण निघायचे असे ठरले. पण आदल्या दिवशी परत गोंधळ झाला कारण माझ्या लहान भावाला अशी ट्रिप ( सोलो किंवा फॅमिलीसहीत) करणे म्हणजे येडेपणा वाटत होता. मग परत चर्चा/ विचार विनिमय आणि माझे आश्वासन की काहीही होणार नाही ! आणि सरतेशेवटी ऑल वॉज गुड !
सगळ्यात महत्त्वाची होती गाडीची तयारी !
लेहला जाणार म्हणून काही गोष्टी ज्या अत्यावश्यक होत्या त्या मी घेतल्या त्या अशा.
स्पेअर डिझेल टँक
पंक्चर रिपेअर किट ( ट्युबलेसचा मिळतो)
सिगारेट लायटर मधून चालणारे एअर कॉंप्रेसर.
२ लिटर कुलंट
१ लिटर ब्रेक ऑईल.
सिगारेट लायटर मोबाईल चार्जर
गाडीचे पूर्ण सर्व्हिसिंग आणि सगळ्या लेव्हल्सचे टॉपप.
बाकी गाडी तशी नवीनच असल्यामुळे टायर्सला काही प्रॉब्लेम नव्हता.
ऑक्झिलरी लॅम्प बसवावेत अशी माझी इच्छा होती. (ज्यामुळे प्रकाश कमी पण गाडीला स्पोर्टी लुक येईल हा अंतस्थ हेतू होता) पण माउंटेन्स मध्ये मध्ये रात्री गाडी चालवायची नाही असा एक रुल मीच बनविल्यामुळे ऑक्झिलरी बसवले नाही. पण तत्पूर्वी चांगल्या थ्रो साठी मी तसेही HID ६०००के चे बसवून घेतले आहेत त्यामुळे "लाईट" चा प्रॉब्लेम सॉल्व झाला.
बाकी तयारी.
१. अनेकदा वाद घातले. ज्यामुळेच ही ट्रीप माझी न होता "आमची" झाली. त्यामुळे मी आनंदी आहे.
२. काका हलवाईवर धाड मारून जायच्या आदल्या दिवशी ( ३ जुलै) भरपूर खायचे सामान भरून घेतले.
३. गाडीचे सीट फ्लॅट करता येतात त्यामुळे अंथरुन आणि पांघरून व उश्या
४. बायकोला नवीन गाणे आवडतात त्यामुळे नवीन दोन तीन सिड्या.
५. आणि दुपारी २ नंतर जाऊनही BSNL चे पोस्ट पेड कार्ड - जे अत्यावश्यक आहे. लेह मध्ये एअरसेल, एअरटेल आणि BSNL ( सर्व पोस्ट पेड) चालतात. तर लेहच्या आजूबाजूला फक्त BSNL चालते. माझे एअरटेल असल्यामुळे मी तसा बिनधास्त होतो पण दुपारी मित्राचा फोन आला ( जो सहकुटूंब विमानाने लेहवरून आदल्यादिवशीच २ जुलैला वापस आला होता) त्याने सांगीतले की अरे BSNL इज मस्ट. मग काय गेलो सर्व कागदपत्र घेऊन आणि आणले कार्ड. जे खरच कामाला आले.
६. छोटे ऑक्सिजन सिलेंडर मी खूप शोधले पण मला मिळाले नाही. पुढे श्रीनगर मध्ये घेऊ असा विचार करून निघालो.
७ AMS साठी डायमॉक्स आणि इतर नेहमीची सर्दी, डोके, अंगदुखी, ताप ह्यावरी औषधे.
८ आणि मुलांसाठी आयपॅड वर अनेक नवीन गेम्स डाउनलोड केले. ( हे सर्व ३ जुलैला म्हणजे आदल्या दिवशी! )
होता होता ३ जुलै प्रचंड व्याप घेऊन आला नी गेला आणि रात्री गाडीत सामान ठेवून झाले. वाट होती ती फक्त चार वाजन्याची, जे तसेही वाजलेच असते. रात्र पूर्ण अशीच गेली आणि आम्ही तयार होऊन ५ वाजता निघालो.
संपूर्ण वृत्तांत येत आहे. तो पर्यंत हे टिझर्स. ( आय नो की फोटो त्यातल्या त्यात माझे, विल नॉट डू जस्टिस. )
द जुले लॅण्ड -
माय चीता - काईन्डा होम !
दे से - देअर आर रोडस अॅण्ड देअर आर रोडस. काही ठिकाणी अत्यंत सुंदर टार रोड आणि काही ठिकाणी केवळ टायर ट्रॅक्स दिसतात म्हणून रोड आहे असे म्हणायचे. To see that wild, raw, untouched nature you need to burn lot of diesel and need to have lot of will power and patience खूप ठिकाणी " स्लो अॅन्ड स्टेडी विन्स द रेस" त्यामुळेच लिहिले आहे.
क्रमशः
भाग एक
भाग दोन
भाग तीन
भाग चार
भाग पाच
भाग सहा
भाग सात
भाग आठ
भाग नऊ
भारी! 'माय चिता' काय!
भारी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
'माय चिता' काय! (cheetah का?) मग चीता तरी कर.
चिता. मुद्राराक्षस.
चिता.
मुद्राराक्षस.
जबरी!!!!!! लवकर लिहा
जबरी!!!!!!
लवकर लिहा प्रवासवर्णन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच! पुढील भागांच्या
मस्तच! पुढील भागांच्या प्रतिक्षेत.
भन्नाट! इथे बरेच लोक
भन्नाट!
इथे बरेच लोक कॅराव्हॅन/ मोटरहाऊस घेऊन असे प्रवास करतात पण भारतात कुणी स्वतः ड्राईव्ह करुन असा लांबचा प्रवास केल्याचे ऐकले नव्हते! तुमचे अनुभव ऐकायला आवडतील.
मुले केव्हढी आहेत?
छान आहेत की टीझर्स. आता वर्णन
छान आहेत की टीझर्स. आता वर्णन लवकर येऊ देत.
भलतीच अॅम्बिशस ट्रीप होती की
भलतीच अॅम्बिशस ट्रीप होती की ही. पहिला भाग मस्त झालाय. पुढच्या भागांची वाट पहात आहे.
फोटो पण जबरी आहेत.
माझी मुलगी ११ वर्षाची आणि
माझी मुलगी ११ वर्षाची आणि मुलगा चार. सुदैवाने कोणालाही काहीही त्रास झाला नाही.
जबरी !!!!! पुभाप्र
जबरी !!!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुभाप्र
मस्त फोटो. बाकी काही वाचलेलं
मस्त फोटो. बाकी काही वाचलेलं नाही अजून.
वाचलं. भारीच एकदम. गाडी पण मस्त रग्गड दिसतेय. मला आवडतात अशा गाड्या.
मी बाईकवर शंभर की मी जायचे
मी बाईकवर शंभर की मी जायचे म्हण्टले तरी घाबरतो, आपण तर फारच धाडसी दीसता.
सुपरकुल अजून लिहा, वाचायला
सुपरकुल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अजून लिहा, वाचायला आवडेल.
आमच्या पुस्तकाचा काही उपयोग
आमच्या पुस्तकाचा काही उपयोग झाला की नाही?
मुलांची वय बघता तुम्ही खुपच
मुलांची वय बघता तुम्ही खुपच मोठ धाडस केलत , या प्रवासाला आत्मविश्वास खुप हवा , जबरीच......
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
टण्या, हो झाला तर ! पण
टण्या, हो झाला तर ! पण त्यापेक्षा अद्यावत माहिती नंतर मी मिळवली. आता ती इथे टाकेन. विल ब द डेफिनेटिव्ह गाईड टू लेह.
सायो गाडी म्हणजे मख्खन आहे. ( अॅन्ड दिस इज कमिंग फ्रॉम द गाय व्हू युज टू हॅव अ कॅडी टू ड्राईव्ह! )
गाडीचं नाव काय केदार? शेव्ही
गाडीचं नाव काय केदार? शेव्ही आहे का?
अग आई ग्ग! केदार, माझी तिकडची
अग आई ग्ग! केदार, माझी तिकडची गाडी उचलून आणता यायला हवी होती . लगेच निघावं वाटतय की.
भार्री अनुभव असणार आहे हा.
नाही. मेड इन इंडिया. देशी
नाही. मेड इन इंडिया. देशी माल आहे हा. महिन्द्रा XUV 500 !
हो हा अनुभव मला खूप काही शिकवून गेला.
सात सिटर वगैरे का? मागच्या
सात सिटर वगैरे का? मागच्या सीट्स फ्लॅट करता येतात म्हणून विचारलं. तसंच धाकट्याकरता कार सीट वगैरे होती का / वापरली का?
केदार जबरी रे.. तुझं पूर्ण
केदार जबरी रे.. तुझं पूर्ण प्रवासवर्णन आत्त्ता वाचायला आणि नंतर तुझ्या तोंडून प्रत्यक्ष ऐकायला ज्याम उत्सुक आहे. भेटुयात रे नक्की त्यासाठी...
हो सात सिटर. धाकट्याकरता कार
हो सात सिटर. धाकट्याकरता कार सीट नव्हती पण तो नेहमी बेल्ट मध्ये असतो. अगदी आडवा होतो तेंव्हाही मधल्या बेल्टने बांधलेला. इथे आल्यावर त्याची सीटची सवय त्याची मोडली.
मयूरेश नक्की रे. एक गटग करूयात त्यासाठी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एक गटग करूयात
एक गटग करूयात त्यासाठी.....>>> अगदी...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त !! डिटेल व्रूत्तांत येऊ
मस्त !! डिटेल व्रूत्तांत येऊ द्या.
सॉल्लिड !! येउदे लौकर
सॉल्लिड !! येउदे लौकर
वॉव! डिटेल मध्ये येऊ दे
वॉव! डिटेल मध्ये येऊ दे एकदम...
वा वा! मस्त! धाडसी एकदम ..
वा वा! मस्त! धाडसी एकदम .. ड्रायव्हिंग तू एकटाच की विभागून?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच! पुढील भागांच्या
मस्तच! पुढील भागांच्या प्रतिक्षेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तीसरा फोटो सह्हीच.
माझ्या बील्डंगमधल्या एका साठीच्या आसपासच्या जोडप्यानं तीनेक वर्षांपूर्वी लेह-लडाखची दीड महीन्यांची ट्रीप पार पाडली. आयत्यावेळी मीळेल त्या हॉटेलात राहीले. ते सांगत होते की रु. १५०/नाईट ते रु. १५०००/नाईट अशा सगळ्या हॉटेलात राहीले. हवे तीथे हवे तेवढे रहायचे. आजूबाजूचा परीसर मनसोकत पहायचा अन मग पुढे जायचे.
मस्तच रे केदार. लवकर पूर्ण
मस्तच रे केदार. लवकर पूर्ण कर, अस समज कि ३ July तारीख आहे इथेही![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सह्ही!!
सह्ही!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लोल असामी. दुसरा लेख
लोल असामी.
दुसरा लेख लिहितोय ऑलरेडी.
सशल, एकुण ६४७३ किमी पैकी प्रज्ञाने २०० किमी चालवली. ती प्लेन्स मध्ये चालवणार होती त्यामुळे माउंटेन्स मध्ये ऑप्शन तसाही नव्हता.
मामी, हे व्हेकेशन तसेच करायचे, कुठलेही बुकींग न करता! मी रू ८५०० पर डे वाल्या रिसॉर्ट पासून अक्षरक्षः ७०० रू पर डे नो लाईट, नो रनिंग वॉटर अशा हॉटेल्स मध्ये राहिलो आणि तुम्ही म्हणता तसे एक दोनदा जागा चांगली वाटली म्हणून एक दोन दिवस तिथे वाढवले. हे सर्व व्हेकेशन ऑन द फ्लॉय होते. रोज जाऊन हॉटेल शोधने, जे जे वाट्टेल ते ते करणे. जस की हॉस्टेल डेज स विथ टू किडस.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages