मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणी एखादी जाहीरात आवडली सांगतांना तिची लिंक पण दिली तर शोधाशोध करावी लागणार नाही.

उदा. ही तनिष्क ची अ‍ॅड मी नाही पाहिलिये अजुन..

कसलीच सुंदर आहे ग ही अ‍ॅड!
जितक्यांदा पाहिली तितक्यांदा टचकन पाणी आलं डोळ्यातून!
हॅट्स ऑफ ज्याने कोणी बनवली त्याला!
म हा न अ‍ॅड आहे! >>> अगदी माझ्या मनातल बोललात! पाणीच आलं डोळ्यातून!!

पियुपरी थँक्स
सेम अशीच जाहिरात होती एक वडील बँड बाजा पथकात असतात. त्यांचा मुलगा शिकून मोठा ऑफिसर होऊन घरी परत येतो तर ते त्याचं स्वागत ते मोठं बिगुल वाजवून करतात. अक्षरशः रडायला यायचं ती जाहिरात पाहून.

ebay ची जाहिरात नाही आवडली. बायकोला खरेदी करून दिली की नवरा हवं तसं वागायला मोकळा होतो का?

line voice and messaging app च्या जाहिरातीतल्या लोकांच्या reactions मस्त आहेत, रिहर्सल करणार्या मुलामुलींना ऐकताना Happy

आज काल महाराष्ट्र टुरिसम ची जाहिरात दाखवतायत.. शंकर महादेवनचं गाणं आहे जोडीला... बर्‍याच हिंदी वाहिन्यांवरसुद्धा दिसली (हे जरा कौतुकास्पद वाटलं)... मस्त जमलीये ही जाहिरात...

मला ती लहान मुलीची अ‍ॅद खुप आवडली... कुठल्याश्या बँकेची आहे (बहुदा कॉसमॉस). ती जिथुन तिथुन सुट्टे पैसे गोळा करत असते आणि नंतर बँकेत खातं उघडते Happy

आणि ती क्युरिओसिटीसे बडा कोई टीचर नही वाली पारले जी ची सुद्धा!

मला ती पेनाची जाहिरात आवडली
मै और मेरा दस्तखत.. किती क्युट मुलगी आनि क्युट गाण आहे ते Happy

>>"तुझं माझं जमेना" मधे ती सनी लीऑनची जाहीरात का दाखवतात
झोपलेले लोक जागे व्हावेत म्हणून असेल. Happy

दोन बहिणींच्या अ‍ॅडमधले संवाद गंडले आहेत. सिर्फ तीन लाख??? Happy

त्यापेक्षा मला आधीची प्रेझेन्टेशन करणारी तरूण मुलगी आणि तिची बॉस- ती अ‍ॅड आवडली. त्या दोघीही, एस्प ती बॉस काय स्मार्ट आहे!

मला तनिष्कची दोन बहिणी दागिने खरेदी करायला येतात>>>> दोघीनी मस्त चेहर्यावर्चे भाव दाखवले आहेत.. आन कम ऑन ३ लाखा च्या बदल्यात लग्न .. खुपच महाग डील आहे Biggrin

त्यापेक्षा मला आधीची प्रेझेन्टेशन करणारी तरूण मुलगी आणि तिची बॉस- ती अ‍ॅड आवडली. त्या दोघीही, एस्प ती बॉस काय स्मार्ट आहे!>>>>>>>>.. मल पण आवडते ती....

अनिश्का, मला पण ती अ‍ॅड जास्त आवडली. त्या मुलीचा कॉन्फिडंस मस्त आहे आपल्या कामाबद्दलचा.

सध्या कुठल्याही डिओच्या अ‍ॅड्च घोषवाक्य मला वाटत एकच असावं..... डिओ लावा किंवा मारा पोरी पटवा.... जस काही हल्लीच्या मुलांच्या आयुष्यातलं अंतिम सत्य आहे. एकजात सगळ्या डिओच्या अ‍ॅडवर बंदी आणली पाहिजे.
एकदम बकवास. चुकिच्या विचारांना खतपाणी, उत्तेजन सगळकाही मिळत आहे...

ती बिपाशा बसूची अ‍ॅड पण डोक्यात जाते. मला वाटतं डाबर हनीची आहे. ती हातात एक फ्रेंच फ्राय घेऊन नवरा किंवा बॉफ्रेला विचारत असते की एक खाऊ का. तो अगदी जहागिर दिल्याच्या थाटात 'या, व्हाय नॉट' म्हणतो. मग ही विचारते मी जाड नाही ना होणार असं काहीतरी. काय फालतूपणा आहे हा.

Pages