Submitted by smi rocks on 19 July, 2013 - 05:17
लागणारा वेळ : १५-२० मिनीटे
साहीत्य : १ वाटी वरी तांदूळ, २ वाटया पाणी, चवीनुसार मीठ, इडलीचे पात्र व तेल.
क्रमवार पाककृती : एका मध्यम आकाराच्या टोपात पाणी उकळत ठेवावे. वरीचे तांदूळ धुउन घ्यावेत. पाणी उकळल्यावर त्यात धुतलेले तांदूळ घालावेत व त्यात चवीनुसार मीठ घालावे. २-३ उकळी आल्यावर गॅस बंद करावा. तयार झालेले मिश्रण चमच्याने टाकण्याइतपत घटट झाले की इडलीपात्राला तेल लावून ते मिश्रण त्यात घालावे.
१० मिनीटे इडली वाफवून घ्यावीत व साधारण थंड झाल्यावर काढून घ्यावीत. चटणीबरोबर खायल्या द्यावेत.
टिप :
एका वाटीत १०-१२ इडल्या होतात.
एकावेळी एकाच वाटीचे मिश्रण तयार करावे. जास्त केल्यास ते मिश्रण घटट होते त्यामुळे ते इडलीपात्रात घालता येत नाही.
फोटो :
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केल्या गं इडल्या. मस्त
केल्या गं इडल्या. मस्त झाल्या, धन्यवाद्.:स्मित: आता कोकणी पद्धतीच्या व्हेज पाककृती पण टाक बघु.:फिदी:
जल्ला त्या जागुला कधी वेळ मिळेल देव जाणे.:फिदी:
जबरदस्त! एकदम मस्त नि सोप्या
जबरदस्त! एकदम मस्त नि सोप्या दिसताहेत! आणखी प्रकार येऊ देत!
सह्ही दिसतायत या इडल्या....
सह्ही दिसतायत या इडल्या.... नक्की करुन बघनार
ह्या केल्यात पण थंड झाल्या की
ह्या केल्यात पण थंड झाल्या की खावत नाहीत. तेव्हा यो रॉक्स म्हणतात त्याला +१. नारळाचे दूधात गूळ घालून खातात आमच्याकडे.
मला वरीची खिचडीच मस्त लागते शेंगदाणे घालून...
अरे वा! काय पांढर्याशुभ्र
अरे वा! काय पांढर्याशुभ्र सुरेख दिसतायेत इडल्या. धन्यवाद हो.
सही!
सही!
झंपी.. ह्या केल्यात पण थंड
झंपी.. ह्या केल्यात पण थंड झाल्या की खावत नाहीत..>>> कहि हरकत नाहि..केलेल मिश्रण / इडली जर थंड झाल्या तर...
क्रुती: मिश्रण / इडलीचा चुरा करुन घ्यावा अगदी प्रत्येक कण सुट्सुटीत करुन त्याला जिरे, कडिपत्ता घालुन फोडणी द्यावी.. व मिरची घालावी.. मग केलेल मिश्रण त्यात घालावे.. व एक वाफ देऊन देखील खाऊ शकतो..
Pages