Submitted by smi rocks on 19 July, 2013 - 05:17
लागणारा वेळ : १५-२० मिनीटे
साहीत्य : १ वाटी वरी तांदूळ, २ वाटया पाणी, चवीनुसार मीठ, इडलीचे पात्र व तेल.
क्रमवार पाककृती : एका मध्यम आकाराच्या टोपात पाणी उकळत ठेवावे. वरीचे तांदूळ धुउन घ्यावेत. पाणी उकळल्यावर त्यात धुतलेले तांदूळ घालावेत व त्यात चवीनुसार मीठ घालावे. २-३ उकळी आल्यावर गॅस बंद करावा. तयार झालेले मिश्रण चमच्याने टाकण्याइतपत घटट झाले की इडलीपात्राला तेल लावून ते मिश्रण त्यात घालावे.
१० मिनीटे इडली वाफवून घ्यावीत व साधारण थंड झाल्यावर काढून घ्यावीत. चटणीबरोबर खायल्या द्यावेत.
टिप :
एका वाटीत १०-१२ इडल्या होतात.
एकावेळी एकाच वाटीचे मिश्रण तयार करावे. जास्त केल्यास ते मिश्रण घटट होते त्यामुळे ते इडलीपात्रात घालता येत नाही.
फोटो :
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कसल्या सही दिसतायत. करायलाही
कसल्या सही दिसतायत. करायलाही सोपा प्रकार वाटतोय.
छान आहे फोटो! अरुंधतीने इकडे
छान आहे फोटो!
अरुंधतीने इकडे इडली रव्याचा उपमा करून मूदी पाडून त्या पुन्हा वाफवायच्या अश्या प्रकारची कृती टाकली होती, त्याची आठवण आली
भाऽरी! वर्याच्या तांदळाच्या
भाऽरी! वर्याच्या तांदळाच्या इडल्या आहेत असं वाटतच नाहीये!!
छान दिसताहेत इडल्या. अगदी
छान दिसताहेत इडल्या. अगदी डाळ-तांदळाच्या इडल्यांसारख्या.
करून बघणार नक्की.
मस्त दिसताहेत इडल्या!!.....
मस्त दिसताहेत इडल्या!!.....
लै भारी. आज संध्याकाळी
लै भारी. आज संध्याकाळी करतेच..
अरे! बघायला पाहिजे करुन ह्या
अरे! बघायला पाहिजे करुन ह्या इडल्या! न आंबवता पण इतक्या छान होतात,?
मस्त!
मस्तच! वाटत नाहीत वरीचे..
मस्तच! वाटत नाहीत वरीचे.. आंबवण्याचे पण त्रास नाहीत
वॉव ईडल्या काय मस्त
वॉव ईडल्या काय मस्त दिसतायेत..
वरीचा तांदुळ म्हणजे भगरच नं ??
कसल्या गोर्यापान अन बाळसेदार
कसल्या गोर्यापान अन बाळसेदार दिसतायत! तुकडा पाडणं जीवावर येईल.
सही! वरईच्या वाटत नाहीतच आणी
सही! वरईच्या वाटत नाहीतच आणी चटणीमुळे तोंपासु. संध्याकाळी करायला हव्यात्.:स्मित:
वाह! मस्तच दिसतायेत
वाह! मस्तच दिसतायेत
वाह वैनी ... क्या बात है!!!
वाह वैनी ... क्या बात है!!!
स्मि रॉक्स रॉक्स!
स्मि रॉक्स रॉक्स!
कसल्या गोर्यापान अन बाळसेदार
कसल्या गोर्यापान अन बाळसेदार दिसतायत!..]+++
वरईच्या वाटतचं नाहियेत..
स्मि... मस्तच गो!
स्मि... मस्तच गो!
धन्यवाद.. मंजूडी... मला
धन्यवाद..
मंजूडी... मला लिन्क मिळु शकेल का...?
स्मि, राईस बुलेट्स.
स्मि, राईस बुलेट्स.
कश्या गोर्यापान शुभ्र
कश्या गोर्यापान शुभ्र दिसतायेत, आंबवलेलं प्रकरण नसल्याने पित्ताचा त्रास होणार्यांसाठी उत्तम,
वरी मिळाली तर करून बघणार.
ओये मला सांगा ना वरी म्हणजे
ओये मला सांगा ना वरी म्हणजे भगर च का???
मला सांगा ना वरी म्हणजे भगर च
मला सांगा ना वरी म्हणजे भगर च का??? >> हो
धन्यवाद मंजूडी.. वाचली नक्की
धन्यवाद मंजूडी.. वाचली
नक्की प्रयत्न करुन बघिन..:)
ओये मला सांगा ना वरी म्हणजे भगर च का??? .>>>>> होय
थॅक्स करून बघते नक्की
थॅक्स
करून बघते नक्की
मस्त दिसतायत अगदि!
मस्त दिसतायत अगदि!
वा! मस्त दिस्ताहेत इडल्या.
वा! मस्त दिस्ताहेत इडल्या. छान रेसिपी. थँक्स!
वॉव! भारी प्रकार आहे.
वॉव!
भारी प्रकार आहे. ़खिचडीचा तसही कंटाळा येतो
अरे वा, खुपच मस्त. आताच केली.
अरे वा, खुपच मस्त. आताच केली. एक घाणा दाण्याच्या आमटी बरोबर तर दुसरा मसाला
(मिर्ची ,कोथिंबीर व अले + खोबऱ्याचे छोटे काप)
तुमचे मनापसुन धन्यवाद!
माझी ताई साबुदाणा आणि भगर
माझी ताई साबुदाणा आणि भगर भिजवून इडली करायची … पण हा प्रकार अगदी सोपा वाटताय … करून बघायला हवेच एकदा
काय मस्त दिसतायेत इडल्या.
काय मस्त दिसतायेत इडल्या. नक्की करुन बघणार.
ह्याबरोबर दाण्याच्या आमटीचं
ह्याबरोबर दाण्याच्या आमटीचं भोपळा घालून केलेलं सांबार नाही का?
Pages