दीड वाटी रवा. बारीक किंवा उपम्याचा- कोणताही.
एक वाटी दूध
एक वाटी गोड दही
एक ते दीड वाटी साखर
अर्धी वाटी तूप किंवा लोणी.
अर्धा टीस्पून खायचा सोडा
रंग, इसेन्स आवडीनुसार
सुकामेवा
-रवा हलका भाजून घ्या. उपम्याला लागतो तितका जास्त नाही, नीट गरम झाला, शेकला गेला की गॅस बंद करा.
-दह्यात साखर घालून फेटून घ्या. आधी एक वाटी साखर घालून थोडं चाखून मग हवी तर अजून साखर घाला. दही गोड असेल आणि केकचा गोडवा बेताचाच हवा असेल तर एक वाटी साखर पुरेल.
-दही नीट एकजीव झाल्यावर त्यात शेकलेला रवा, दूध, तूप, खायचा सोडा घालून नीट मिसळून अर्धा तास मिश्रण मुरवत ठेवा.
-अर्ध्या तासाने रंग आणि इसेन्स घालणार असाल तर घाला. सुकामेवा केकमधे हवा तर मिश्रणात घाला.
-नॉन स्टिक पॅनला तुपाचा हात लावून मिश्रण त्यात ओता आणि मंद आंचेवर पॅन ठेवा. झाकण ठेवा. मधे मधे झाकण काढून जमा झालेली वाफ जाऊ द्या.
-खरपूस छान वास आला की केकमधे सुरी घालून बघा. सुरी कोरडी आली की केक तयार!
-मी हार्ड अॅनोडईझ्ड पॅनमधे केला. तो पॅन एकदा तापला की सगळीकडूनच छान भाजला जातो केक आणि लवकरही होतो असा माझा अनुभव. त्यामुळे केकसाठी लागणारा वेळ पॅनवरही अवलंबून आहे (तरी २०-२५ मिनिटं अंदाजे). मी दिलेला वेळ तयारीसकट मला लागलेला वेळ आहे.
-सुकामेवा मला पॅनच्या तळाशी नीट सजवून वर मिश्रण घालायचं होतं, पण आयत्या वेळी विसरले. आणि सजावट नीट झाली तरी मिश्रण ओतल्यावर ती फिसकटली तर दुरुस्तीचा(!!!) व्याप होईल अशी भीती, म्हणून पुन्हा केला तेव्हा अस्साच केला! वरून काजू लावले फक्त. त्यामुळे इथे तुम्ही तुमची कल्पकता वगैरे वापरालच! त्याचे फोटो तुम्हीच टाका.
-ही अगदी बेसिक आणि तरीही खूप मस्त पाकृ आहे!
प्र९ हाणेल आता.
प्र९ हाणेल आता.
(No subject)
सुरमयी, तव्यावर ठेवणार असशील
सुरमयी, तव्यावर ठेवणार असशील तर कूकरचा हिंडालियमचा डबा चालावा.>>> मी विचार करतोय ह्या केक मध्ये अचानकच सुरमई मासा कुठुन आला.
अश्विनी वाळुचा प्रश्न मला नाही पडलाय.
मंजूडी थँक्स. अॅनोडाईझ्ड
मंजूडी थँक्स. अॅनोडाईझ्ड पॅन आहे.
वाळू तव्यावर टाकून त्यावर पॅन ठेवायचा का वाळूशिवाय डायरेक्ट गॅस वर हेच विचारायचे होते. .....
झकासराव
झकासराव
गरमागरमकेकतयार.केळंहीघातलंआहे
गरमागरमकेकतयार.केळंहीघातलंआहे.
माझा आवडता केक!
माझा आवडता केक!
प्रज्ञा९ मी आजच हा केक केला.
प्रज्ञा९ मी आजच हा केक केला. एक वाटी रव्याचा करून बघितला. मावेच्या कन्वेक्शन मोडवर १८०वर पहिल्यांदा २०मिनिटे बेक केला कमी वाटला मग अजून १०मिनिटे केले, अजून खरपूस होण्यासाठी ५ मिनिटे २००वर ठेवला, छान झाला, अजिबात जळला नाही. मी मावे pre-heat केला नव्हता. केकमध्ये थोडी dairy-milk कॅडबरी मिक्स केली होती. काचेच्या भांड्यात केला म्हणून कदाचित वेळ लागला असेल.धन्यवाद प्रज्ञा९.
Majhahi hs aavadata cake
Majhahi hs aavadata cake aahe. Magchya mahinyat kela hota pan oven madhe.
प्राजक्ता,किती वेळ बेक
प्राजक्ता,किती वेळ बेक केला?
बाकी रेसिपी मस्तच..आज करून बघीन. बाय द वे, हा शिर्यासारखा लागतो का थोडा?
प्रिन्ट काढली आहे. ह्या
प्रिन्ट काढली आहे.
ह्या रविवारी करण्याचा विचार आहे.
मामी तोंपासु फोटॉ आहे.
आता एकच शंका किंवा
आता एकच शंका किंवा प्रश्न...
यात रव्याच्या जागी मैदा वापरला तर कसा होइल?
म्हणजे चालेल का?
मामी, तुम्ही केलेला केक मस्त
मामी, तुम्ही केलेला केक मस्त मॉइस्ट दिसतोय. तो तसा कितीवेळ राहिला? (मॉइस्टनेस गायब व्हायच्या आत केक गायब झाला नसेल तर)
मयेकर,केळं.घातलं.असल्यानं.तो.
मयेकर,केळं.घातलं.असल्यानं.तो.मॉईस्ट्.राहिला.आणि.आहे.अजूनही.आहे.
मामी उचक्या देत देत का
मामी उचक्या देत देत का लिहीतेय ?
की.बोर्डाचं.डोकं.फिरलंय.
की.बोर्डाचं.डोकं.फिरलंय.
आज लेकीच्या डब्यासाठी हा केक
आज लेकीच्या डब्यासाठी हा केक केलाच.. फार्फारच सुंदर झाला आहे.
काल लोणी कढवलं होतं. तूप काढून घेतल्यावर भांड्याची बेरी खरवडून सारखी केली आणि त्यातच भाजलेला रवा, कोमट दूध, दही, साखर घालून मस्तपैकी फेटलं. दोन चहाचे चमचे तूप, वेलची, केशर सिरप आणि कुस्करलेलं केळं घालून मिश्रण तयार केलं आणि केक भाजला. केक भाजला जात असतानाच्या खमंग दरवळाने लेक जागी झाली आणि थेट स्वयंपाकघरात आली
आई ग्गं मंजू, वर्णनानेच पाणी
आई ग्गं मंजू, वर्णनानेच पाणी सुटले तोंडाला.
बेरीचा केक मस्तच होतो.. मी
बेरीचा केक मस्तच होतो.. मी मैदा नि कणिक घालून केला होता बेरीचा केक.. सुरेख झाला होता चवीला नि दिसायलाही.. आताच लोणी कढवलय आता रव्याचा केक करुन बघते.. मस्त.. आत्ताच तोंपासु..
आज करून पाहिला. लेकीला बसवले
आज करून पाहिला.
लेकीला बसवले दही-साखर फेटायला. मग सगळे मिश्रण तिनेच फेटून दिले.
अननसाचे तुकडे घातले होते मी. लेकीला खूप आवडला.
माझ्याकडे अवन किंवा पॅन नसल्याने तव्यावर जाड बुडाचे भांडे ठेवून भाजला केक. चांगला झाला.
केक भाजला जात असतानाच्या खमंग
केक भाजला जात असतानाच्या खमंग दरवळाने लेक जागी झाली आणि थेट स्वयंपाकघरात आली>>>
मी काल केला.. लेकीने फोटो
मी काल केला.. लेकीने फोटो पाहिले होते.. त्यामुळे तिचा हट्ट होता..
माझ्या मानाने उत्तमच झाला
फोटो आहे, डकवते थोड्या वेळात.
(No subject)
वॉव मस्त ग.......एकदम बेकरि
वॉव मस्त ग.......एकदम बेकरि तुन आणल्यासारखे वाटत आहेत....यम्मी.......
जाजु, मस्त दिसतोय केक. तो
जाजु, मस्त दिसतोय केक. तो अयंगार बेकरीमधे व्हीट केक मिळतो ना, तसाच अगदी मस्त खमंग दिसतोय.
धन्स.. श्रेय गोज टू सोप्पी, न
धन्स.. श्रेय गोज टू सोप्पी, न बिघडवता येणारी पाकृ!
मी पण केला हा केक... चवीला
मी पण केला हा केक... चवीला एकदम मस्त पण काय चुकल ते कळल नाही, माझा केक पॅनला चिकटला
इथे सांगितल्या प्रमाणे हार्ड अॅनोडईझ्ड पॅनमधेच केला होता.. नेक्स्ट टाइम नॉर्मल नॉन-स्टीक पॅन वापरुन करावा का असा विचार करतेय...
विनार्च .. पूर्ण थंड होऊ
विनार्च .. पूर्ण थंड होऊ दिलास का? आणि तळाला पूर्ण तुपाचा हात होता का?
माझा थोडा जास्तच (२ मिनिटे) गॅसवर राहीला.. त्यामुळे सलग निघाला नव्हता.
मस्तच!
मस्तच!
तळाला काय पूर्ण पॅनला तूप
तळाला काय पूर्ण पॅनला तूप लावल होत .... कदाचित जास्तवेळ राहिला असं वाटय आता ... थॅन्क यु जाईजुई
रेसीपीसाठी थॅन्क यु प्रज्ञा
Pages