Submitted by पुरंदरे शशांक on 1 July, 2013 - 03:20
शाळेत जाताना ....
नव्वा नव्वा ड्रेस
नि नव्वे नव्वे शूज
आज स्वारी आहे
एकदम खूष खूष
नव्वी नव्वी शाळा
नि नव्या नव्या टीचर
हरबर्याचे झाड
आज पार आभाळभर
दारातच शाळेच्या
गर्दी केवढी तरी
खेळ, गाणी, डबा
लालूच भारी भारी
हात सुटता आईचा
अवसान सारे गेले
हरबर्याचे झाड पार
भुईसपाट झाले
बावरलेले मन
नि भिरभिरणारे डोळे
इवल्याशा पायात
बळ कुठुन आले
गाणी-खेळ मजेचे
होते भारी भारी
घंटा झाली तरी
खेळण्यात दंग स्वारी ...
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आहे. शाळेचा पहिला दिवस
मस्त आहे. शाळेचा पहिला दिवस आठवला.
(No subject)
खूप गोड!
खूप गोड!
>>हरबर्याचे झाड पार भुईसपाट
>>हरबर्याचे झाड पार
भुईसपाट झाले >>
वा वा वा
मस्त! "हरबर्याचे झाड पार
मस्त!
"हरबर्याचे झाड पार भुईसपाट झाले" हे एकदम आवडलं.
किती गोड आहे हि कविता.
किती गोड आहे हि कविता.
सर्वांचे मनापासून आभार .....
सर्वांचे मनापासून आभार .....
ग्गोड कविता "हरबर्याचे झाड
ग्गोड कविता
"हरबर्याचे झाड पार भुईसपाट झाले" हे एकदम आवडलं.>>>>>+१
मस्तच
मस्तच
निरागस!
निरागस!
एकदम छान. हात सुटता
एकदम छान.
हात सुटता आईचा
अवसान सारे गेले
हरबर्याचे झाड पार
भुईसपाट झाले >> मस्त !
मस्त!
मस्त!
गोड आणि छान चालीची आहे.
गोड आणि छान चालीची आहे. आवडली.
छानेय पण मी माझ्या
छानेय पण मी माझ्या मैत्रिणीच्या मुलाला ( वय वर्ष पाच) ऐकवली तर तो "हरबारा कुठाय? मला दे आत्ताच्या आत्ता" असं म्हणुन मागे लागलाय
लहान मुलं कशातुन काय घेतील त्याचा नेम नाही.
हरबार्याचं झाड प्रकार त्याला झेपला नसल्याने असं झालं असावं