आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा रंगारंग कार्यक्रम या धाग्यावर पुढे सुरू राहू द्या.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
काही रंजक आकडेवारी :
१. भाग पहिला : http://www.maayboli.com/node/25569
या कोड्यांचा पहिला भाग ६ मे २०११ ला सुरू केला. या पहिल्याच भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ६ मे ते ७ जुन अशा एका महिन्यात तब्बल ७५ पानं प्रतिसाद (२००० पेक्षा जास्त) दिले गेले. या भागात कोड्यांना नंबर नव्हते पण कोडी नक्कीच २०० च्या वर असणार. आता हा धागा बंद करण्यात आला आहे (म्हणजे यावर प्रतिसाद देता येणार नाहीत).
२. भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/26366
७ जुन २०११ ला काढलेल्या दुसर्या धाग्यापासून कोड्यांना क्रमांक देण्यास सुरुवात झाली. २००२ प्रतिसाद आणि २०९ कोडी (एकूण ६७ पानं) झाल्यावर ११ ऑक्टोबरला दुसरा भागही संपला. त्यातलं २०९ क्रमांकाचं माधवनं विचारलेलं कोडं त्या भागावर अनुत्तरीत राहिल्यानं त्यानं ते पुन्हा तिसर्या भागात विचारलं आहे.
३. भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/29961
१८ ऑक्टोबर २०११ला सुरू केलेला हा भाग ८ जुन २०१२ ला संपला. शंभर कोडी झाली की तो भाग झोपवायचा यावर एकमत झाल्याने या भागात १०० कोडी (एकूण ३६ पानं भरली). या धाग्यामध्ये भागाचा क्रमांक आणि मग कोड्यांचा क्रमांक असे नंबर देण्यास सुरवात झाली.
या भागातच आपल्या जिप्सीनं चित्रकोड्यांचा नविन प्रकार आणला. तो अर्थातच प्रचंड लोकप्रिय झाला आहे.
४. भाग चौथा : http://www.maayboli.com/node/35529
७ जुन २०१२ ते १४ मार्च २०१३ (एकूण ३१ पानं). मंडळींचा उत्साह काहीसा आटल्यामुळे या भागातली कोडी पूर्ण व्हायला जवळजवळ एक वर्ष लागलं. पण तरीही एकदा का दोघातिघांनी पुढाकार घेतला की वर आलेला हा धागा सुरू राहतो.
आता हा पाचवा भाग आहे. नेहमीचे आणि ताज्या दमाचे खेळाडू येऊन लवकरच इथेही १०० कोड्यांचं टारगेट पूर्ण करतील हे मला ठाऊक आहे .....
हे धागे यशस्वी करणार्या सर्व खेळाडूंना धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा.
व्हिज्युअल इफेक्ट म्हणून एक
व्हिज्युअल इफेक्ट म्हणून एक भूत आणि एक भूतीणही आहेत गाण्यात.>>>>>>:फिदी:
गाणं खरंतर बघायचंच नाही, डोळे मिटून ऐकायचं फक्त>>>>अगदी अगदी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
या चित्रपटात म्हणे हिर्वीनीला रात्री झोपेत चालायची सवय असते.
मामी.. कोडं छान होतं. बाकी
मामी..
कोडं छान होतं.
बाकी त्या गाण्यात कुणी एक म्हातारा 'जिसका खौफ था वही हुआ..' असं काहीसं म्हणतो. खौफ वगैरे म्हटल्यावर ती हिरॉइन भूत सोडून अजून काहीच असू शकत नाही.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मला अशी आशा आहे की या
मला अशी आशा आहे की या अभूतपूर्व संशोधनामुळे इतरही अनेक कोड्यांना जन्म देता येईल. या कोड्यांना आशिष पराडकर कोडी (आपकोडी) म्हणता येईल.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
माझ्याच डोक्यात दोन्-तीन तयार होऊ घातलीयेत .......
हिरॉइन भूत सोडून अजून काहीच
हिरॉइन भूत सोडून अजून काहीच असू शकत नाही.>>>>>:फिदी:
पराडकर कोडी (आपकोडी) म्हणता येईल>>>>:फिदी: मला मायबोलीचा "आप" आठवला.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
रच्याकने, यातच "अपने आप रातों को चिलमने सरकती है...." आणि "कही एक मासूम नाजूकसी लडकी..." हि दोन अप्रतिम गाणी आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आप कोडं क्र. ०५/४८ डॉ आशिष
आप कोडं क्र. ०५/४८
डॉ आशिष पराडकरांच्या संशोधनानंतर मानवी जीवनात अमुलाग्र बदल घडून येतो. खूप लोकांचा जीव वाचतो. या संशोधनाचा उपयोग करून काहीजण प्रेमीजनांना प्रेमकूजन करण्याकरता नविन जागा उपलब्ध करून देऊ लागतात. गरीब लोकांना थोडे पैसे देऊन त्यांच्या शरीरात प्रेमीजीव एकांत शोधू लागतात. शहरातल्या बागा ओस पडू लागतात. नाहीतरी तिथे मॉरल पोलिसिंग अतिच वाढलेलं असतं, त्यामुळे हे नविन ठिकाण अधिक सुरक्षेचं वाटायला लागतं....
क्ष आणि क्षी असेच कोणाच्या शरीरात येऊन छातीच्या पिंजर्यात जाऊन बसतात. क्षीचे महासंतापी वडील त्या दोघांना शोधत त्याबाजूलाच येत असताना दिसतात. घाबरून ते आणखी खाली सरकून डायफ्रामखाली जाऊन बसतात. वडील डायफ्रामच्या वर शोधत असताना, खाली क्षी कोणतं गाणं म्हणत देवाची आळवणी करत असेल?
घाबरून ते आणखी खाली सरकून
घाबरून ते आणखी खाली सरकून डायफ्रामखाली जाऊन बसतात. वडील डायफ्रामच्या वर शोधत असताना, खाली क्षी कोणतं गाणं म्हणत देवाची आळवणी करत असेल?<<<<<
परदे में रहने दो, परदा ना उठाओ.
परदा जो उठ गया तो भेद खुल जायेगा..
अल्ला मेरी तौबा... अल्ला मेरी तौबा...
शाब्बास पोरी! सकाळधरून कुटंशी
शाब्बास पोरी! सकाळधरून कुटंशी व्हतीस बयो? कोडं टाकूनशान मोप टायम झाला पन उत्तर न्हाई, म्या म्हनतंच व्हते की शरध्दारानी कुटं गेली?
तुला चवळीची भाजी न कळणाची भाकरी. बरूबर कांदा न धह्याची वाटी!
आप कोडं क्र. ०५/४८
डॉ आशिष पराडकरांच्या संशोधनानंतर मानवी जीवनात अमुलाग्र बदल घडून येतो. खूप लोकांचा जीव वाचतो. या संशोधनाचा उपयोग करून काहीजण प्रेमीजनांना प्रेमकूजन करण्याकरता नविन जागा उपलब्ध करून देऊ लागतात. गरीब लोकांना थोडे पैसे देऊन त्यांच्या शरीरात प्रेमीजीव एकांत शोधू लागतात. शहरातल्या बागा ओस पडू लागतात. नाहीतरी तिथे मॉरल पोलिसिंग अतिच वाढलेलं असतं, त्यामुळे हे नविन ठिकाण अधिक सुरक्षेचं वाटायला लागतं....
क्ष आणि क्षी असेच कोणाच्या शरीरात येऊन छातीच्या पिंजर्यात जाऊन बसतात. क्षीचे महासंतापी वडील त्या दोघांना शोधत त्याबाजूलाच येत असताना दिसतात. घाबरून ते आणखी खाली सरकून डायफ्रामखाली जाऊन बसतात. वडील डायफ्रामच्या वर शोधत असताना, खाली क्षी कोणतं गाणं म्हणत देवाची आळवणी करत असेल?
उत्तर :
परदे में रहने दो, परदा ना उठाओ.
परदा जो उठ गया तो भेद खुल जायेगा..
अल्ला मेरी तौबा... अल्ला मेरी तौबा...
तुला चवळीची भाजी न कळणाची
तुला चवळीची भाजी न कळणाची भाकरी. बरूबर कांदा न धह्याची वाटी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
<<<< वावावा! कळण्याची भाकरी खाऊन लै दिस झाले. आणा हिकडं!
अरे व्वा! सही! अभिनंदन
अरे व्वा! सही! अभिनंदन श्रद्धा!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मामी,श्रद्धा ----/\------
मामी,श्रद्धा ----/\------
मामी, फासलेवाल्या कोड्यासाठी
मामी, फासलेवाल्या कोड्यासाठी __/\__
आप कोडं क्र.
आप कोडं क्र. ०५/४९
तुरुंगाच्या उंच भिंतीवरून उडी मारून ते जीव खात धावत सुटले. मागे सुरक्षारक्षक आणि त्यांच्या कुत्र्यांचा आवाज येतच होता. पण हे दोघेही तयारीनंच पळाले होते. जवळच्या गावात शिरताच त्यांनी बाहेर अंगणात झोपलेला एकजण हेरला आणि इंजेक्शन घेऊन लहान आकारात येऊन त्यांनी कॅप्सुलमध्ये बसून त्याच्या तोंडात प्रवेश केला. सुरक्षारक्षकही कॅप्सुलमध्ये बसून इथे येण्याची शक्यता होतीच.
'कुठे बरं लपावं आता?' असा विचार करत असतानाच, त्यांना हे दिसलं:
![](https://lh6.googleusercontent.com/-Fv_hqgAWftY/UcKTPp0JMJI/AAAAAAAAJ0M/8M-CipJAquk/s800/bladder.jpg)
तर त्यातला एकजण दुसर्याला काय म्हणेल?
अरे उत्तर द्या की लोक्स! श्र
अरे उत्तर द्या की लोक्स! श्र कु़ठे गेली?
आप कोडं क्र. ०५/४९>>> दोनो
आप कोडं क्र. ०५/४९>>>
दोनो किसीको नजर नही आये
चल दर्यामे डुब जाये.....
( एक अंदाज)
येस्स, मोकीमी. बरोब्बर. तुला
येस्स, मोकीमी. बरोब्बर.
तुला मणीजचा उपमा आणि फिल्टर कॉफी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मामी, कोडं क्र. ०५/४९ -
मामी, कोडं क्र. ०५/४९ - दर्याचा रेफरन्स कळला नाही![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
कोडं क्र. ०५/५०: 'सर्,
कोडं क्र. ०५/५०:
'सर्, निखिलचा फोन आला होता.' प्रोफेसर शेलार आल्या आल्या मुदितने सांगितलं.
'अरे वा, काय म्हणतोय आमचा हिरो? कसं चाललंय उत्खनन?' प्रोफेसर शेलार चष्म्यावरून त्याच्याकडे बघत म्हणाले.
'फर्स्ट क्लास सर्, खूप एक्साईट झाला होता. इतकं काय काय मिळतंय की काय डॉक्युमेंट करू आणि काय नाही असं झालंय म्हणे. अजून २-३ लोकांना पाठवायची विनंती केळी आहे त्याने'
'अरे, छान बातमी आहे मग. सारिका, वरूण आणि कल्पना तिघांना पाठवून दे आजच्या गाडीने. पेपरवर्क मी पहातो.'
'आणि सर, तो म्हणत होता की एकदा सर् येऊन पाहून गेले तर अजून झक्कास होईल'
'अरे, करू देत तरुण टीमला काम. माझी कशाला मध्ये लुडबुड?'
शेलार असं म्हणाले खरं पण हे उत्खनन त्यांच्यासाठी सुध्दा उत्साहवर्धक घटना होती. त्यांना रहावेना. तिघांच्या टीमसोबत तेही रात्रीच्या गाडीने रवाना झाले. साईटवर पोचताच रात्रीच्या प्रवासाचा त्यांचा सारा शीण निघून गेला. निखिल एखाद्या वाघासारखा काम करत होता. कुठे म्हणून नाव ठेवायला जागा नव्हती.
दुसर्या दिवशी त्यांनी निघायचा बेत जाहीर केला तेव्हा निखिल चकित झाला. 'सर, पण मला तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे.'
'अरे, तू सगळं समर्थपणे हाताळतो आहेस. तुझं काम पाहून मी खूप समाधानी आहे. माझं शिकवणं सत्कारणी लागलं.' प्रोफेसर म्हणाले.
हेच त्यांना गोल्डन एरामधलं गाणं म्हणून सांगायचं असतं तर त्यांनी कोणतं गाणं म्हटलं असतं?
कोडं क्र. ०५/५१: 'हा जी,
कोडं क्र. ०५/५१:
'हा जी, बोलिये, क्या नाम् है आपका?' रजिस्ट्रेशन करणारया माणसाने कीबोर्ड वर बोटं नाचवत विचारले.
'जी, आयेशा महमूद जामदार' त्या तरुणीने उत्तर दिलं. आणि इथेतिथे बघण्यात गर्क असलेल्या सोहेलने मान वर करून पाहिलं. आवाज एव्हढा गोड आहे तर त्याची मालकीण किती सुंदर असेल. त्याचा अंदाज बरोबर निघाला. आयेशा खरंच सुरेख होती. तकतकीत सावळा रंग, पाणीदार डोळे आणि ओठांवर हसू. बघता क्षणीच तो तिच्या प्रेमात पडला. पुढे स्पर्धेच्या निमित्ताने त्यांची ओळख झाल्यावर संधी पाहून त्याने एकदा विषय काढला. पण 'सध्या मला करियरवर लक्ष द्यायचं आहे' असं तिने सांगितले. सोहेल नाराज झाला पण त्याने आशा सोडली नाही.
एक दिवस अल्लाची कृपा झाली. एका गाण्यासाठी त्या दोघांची जोडी ठरली. सोहेलने एक गाणं म्हणून आयेशाला पुन्हा एकदा मागणी घातली. ओळखा ते गाणं.
कोडं क्र. ०५/५२: 'आई ग' घरी
कोडं क्र. ०५/५२:
'आई ग' घरी आल्या आल्या चित्रा दाणकन सोफ्यावर बसली आणि चप्पल काढून पाय चोळू लागली.
'काय ग चित्रा, काय झालं?' तिच्या आईने बाहेर येत विचारलं.
'अग, बिनडोक बीएमसीवाल्यांनी सगळ्या टाईल्स उखडून ठेवल्यात ४ दिवसांपासून. धडपडले मी. पाय मुरगाळलाय बहुतेक. आई ग'
'तरी सांगत होते मी. एव्हढ्या हाय हिल्सच्या चपला घालू नकोस म्हणून. पण माझं ऐकशील तर ना'
चांगली ४ दिवस ट्रीटमेन्ट घेतल्यावर आत्ता कुठे चित्राचा पाय बरा होत होता. तेव्हढ्यात संध्याकाळी नागपूरहून तिची मामेबहीण नमिता आली.
'ए काय ग चित्रा, मी एव्हढी आले आणि तू धडपडून घेतलंस. आता काय घरात बसून रहायचं?' आल्या आल्या तिने तोफ डागली.
'मला काय हौस आहे घरी बसायची? पण काय करणार? पाय वाईट मुरगाळलाय. अजून २ दिवस तरी बाहेर जायची परवानगी नाही डॉक्टरांची.' ४ दिवस घरी बसायला लागल्याने चित्रा पण वैतागली होती.
'ते काही नाही. मी तरी आज जेवल्यावर नाईट वॉकला जाणार.' नमिता म्हणाली.
ह्यावर तिला परावृत्त करण्यासाठी चित्राने काय गाणं म्हटलं असेल?
कोडं क्र. ०५/५०: देख ली तेरी
कोडं क्र. ०५/५०:
देख ली तेरी खुदाई, बस मेरा दिल भर गया
कोडं क्र. ०५/५१:
आजा आजा मै हुं प्यार तेरा
अल्ला अल्ला इन्कार तेरा
मामी, कोडं क्र. ०५/४९ - दर्याचा रेफरन्स कळला नाही >> अय्यो, स्वप्ना. ते कसलं चित्र आहे ते कळलं की दर्याचा रेफरन्स लगेच लागेल.
५२ मध्येही खुदा आहे हे नक्की!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कोडं क्र. ०५/५३ : नवरा
कोडं क्र. ०५/५३ :
नवरा गेल्यापासून बटाटेवड्यांची टपरी चालवून येशूताईंनी आपल्या मुलाला लहानाचं मोठं केलं होतं. पोरगंही लहानपासून आईला थोडीफार मदत करायचं. आता हाताशी आलेला मुलगा आपल्या व्यवसायातच आपल्याला व्यवस्थित मदत करू लागेल असा विचार करून येशूताईंनी त्याचं ट्रेनिंग सुरू केलं.
आईच्या हाताखाली आठ दिवस बटाटेवड्यांचं सारण शिकून झाल्यावर आज एकट्यानंच सगळं सारण बनवण्याचा किसनचा पहिलाच दिवस होता. पण जरा झोलच झाला .... लसणीच्या चटणीकरता लागणारे शेंगदाणे आणि आंबटगोड चटणीकरता लागणारी चिंच या दोन्ही गोष्टी त्यानं चुकून बटाट्याच्या भाजीतच घालून टाकल्या.
गिर्हाईकांनी आज वड्याला नाकं का मुरडली हे येशुताईंना स्वतः एक वडा खाल्यावर कळलं. मग टपरी बंद करून वड्यांच तसंच उरलेलं सामान घेऊन त्या घरी आल्या. आल्यावर एक वडा किसनला देऊन त्यांनी त्यांची तक्रार सांगितली. कोणतं गाणं म्हणून?
दर्याचा रेफरन्स - खारट पाणी
दर्याचा रेफरन्स - खारट पाणी ???
__/\__ मुन्नीबाई एमबीबीएस
कोडं क्र. ०५/५०: 'सर्,
कोडं क्र. ०५/५०:
'सर्, निखिलचा फोन आला होता.' प्रोफेसर शेलार आल्या आल्या मुदितने सांगितलं.
'अरे वा, काय म्हणतोय आमचा हिरो? कसं चाललंय उत्खनन?' प्रोफेसर शेलार चष्म्यावरून त्याच्याकडे बघत म्हणाले.
'फर्स्ट क्लास सर्, खूप एक्साईट झाला होता. इतकं काय काय मिळतंय की काय डॉक्युमेंट करू आणि काय नाही असं झालंय म्हणे. अजून २-३ लोकांना पाठवायची विनंती केळी आहे त्याने'
'अरे, छान बातमी आहे मग. सारिका, वरूण आणि कल्पना तिघांना पाठवून दे आजच्या गाडीने. पेपरवर्क मी पहातो.'
'आणि सर, तो म्हणत होता की एकदा सर् येऊन पाहून गेले तर अजून झक्कास होईल'
'अरे, करू देत तरुण टीमला काम. माझी कशाला मध्ये लुडबुड?'
शेलार असं म्हणाले खरं पण हे उत्खनन त्यांच्यासाठी सुध्दा उत्साहवर्धक घटना होती. त्यांना रहावेना. तिघांच्या टीमसोबत तेही रात्रीच्या गाडीने रवाना झाले. साईटवर पोचताच रात्रीच्या प्रवासाचा त्यांचा सारा शीण निघून गेला. निखिल एखाद्या वाघासारखा काम करत होता. कुठे म्हणून नाव ठेवायला जागा नव्हती.
दुसर्या दिवशी त्यांनी निघायचा बेत जाहीर केला तेव्हा निखिल चकित झाला. 'सर, पण मला तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे.'
'अरे, तू सगळं समर्थपणे हाताळतो आहेस. तुझं काम पाहून मी खूप समाधानी आहे. माझं शिकवणं सत्कारणी लागलं.' प्रोफेसर म्हणाले.
हेच त्यांना गोल्डन एरामधलं गाणं म्हणून सांगायचं असतं तर त्यांनी कोणतं गाणं म्हटलं असतं?
उत्तर:
देख ली तेरी खुदाई, बस मेरा दिल भर गया
कोडं क्र. ०५/५१: 'हा जी,
कोडं क्र. ०५/५१:
'हा जी, बोलिये, क्या नाम् है आपका?' रजिस्ट्रेशन करणारया माणसाने कीबोर्ड वर बोटं नाचवत विचारले.
'जी, आयेशा महमूद जामदार' त्या तरुणीने उत्तर दिलं. आणि इथेतिथे बघण्यात गर्क असलेल्या सोहेलने मान वर करून पाहिलं. आवाज एव्हढा गोड आहे तर त्याची मालकीण किती सुंदर असेल. त्याचा अंदाज बरोबर निघाला. आयेशा खरंच सुरेख होती. तकतकीत सावळा रंग, पाणीदार डोळे आणि ओठांवर हसू. बघता क्षणीच तो तिच्या प्रेमात पडला. पुढे स्पर्धेच्या निमित्ताने त्यांची ओळख झाल्यावर संधी पाहून त्याने एकदा विषय काढला. पण 'सध्या मला करियरवर लक्ष द्यायचं आहे' असं तिने सांगितले. सोहेल नाराज झाला पण त्याने आशा सोडली नाही.
एक दिवस अल्लाची कृपा झाली. एका गाण्यासाठी त्या दोघांची जोडी ठरली. सोहेलने एक गाणं म्हणून आयेशाला पुन्हा एकदा मागणी घातली. ओळखा ते गाणं.
उत्तरः
आजा आजा मै हू प्यार तेरा
आजा = आयेशा जामदार
अगं स्वप्ना, उत्तरं
अगं स्वप्ना, उत्तरं सांगितल्याबद्दल काही देशील की नाही?
मामी, येशुताईंनी केलेला वडाच
मामी, येशुताईंनी केलेला वडाच घे बक्षीस म्हनुन![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
तो बिघडलाय ना पण! काय रे
तो बिघडलाय ना पण!
काय रे जिप्सी, हे तुझे दिवस गाणी सुचायचे ना? मग हल्ली इथे येत का नाहीस?
मामी, सध्या चिक्कार बीझी आहे
मामी, सध्या चिक्कार बीझी आहे (ऑफिसच्या कामात) तरीही अधुन मधुन इथे येऊन हजेरी लावून जात असतो.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
कंस टाकला म्हणून आम्ही फसणार
कंस टाकला म्हणून आम्ही फसणार नाही.
मामे ... मणी च्या उपम्या साठी
मामे ...
मणी च्या उपम्या साठी ढण्यवाद.....
ते बटाटे वड्याचं क्लु दे बरं.......
Pages