आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा रंगारंग कार्यक्रम या धाग्यावर पुढे सुरू राहू द्या.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
काही रंजक आकडेवारी :
१. भाग पहिला : http://www.maayboli.com/node/25569
या कोड्यांचा पहिला भाग ६ मे २०११ ला सुरू केला. या पहिल्याच भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि ६ मे ते ७ जुन अशा एका महिन्यात तब्बल ७५ पानं प्रतिसाद (२००० पेक्षा जास्त) दिले गेले. या भागात कोड्यांना नंबर नव्हते पण कोडी नक्कीच २०० च्या वर असणार. आता हा धागा बंद करण्यात आला आहे (म्हणजे यावर प्रतिसाद देता येणार नाहीत).
२. भाग दुसरा : http://www.maayboli.com/node/26366
७ जुन २०११ ला काढलेल्या दुसर्या धाग्यापासून कोड्यांना क्रमांक देण्यास सुरुवात झाली. २००२ प्रतिसाद आणि २०९ कोडी (एकूण ६७ पानं) झाल्यावर ११ ऑक्टोबरला दुसरा भागही संपला. त्यातलं २०९ क्रमांकाचं माधवनं विचारलेलं कोडं त्या भागावर अनुत्तरीत राहिल्यानं त्यानं ते पुन्हा तिसर्या भागात विचारलं आहे.
३. भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/29961
१८ ऑक्टोबर २०११ला सुरू केलेला हा भाग ८ जुन २०१२ ला संपला. शंभर कोडी झाली की तो भाग झोपवायचा यावर एकमत झाल्याने या भागात १०० कोडी (एकूण ३६ पानं भरली). या धाग्यामध्ये भागाचा क्रमांक आणि मग कोड्यांचा क्रमांक असे नंबर देण्यास सुरवात झाली.
या भागातच आपल्या जिप्सीनं चित्रकोड्यांचा नविन प्रकार आणला. तो अर्थातच प्रचंड लोकप्रिय झाला आहे.
४. भाग चौथा : http://www.maayboli.com/node/35529
७ जुन २०१२ ते १४ मार्च २०१३ (एकूण ३१ पानं). मंडळींचा उत्साह काहीसा आटल्यामुळे या भागातली कोडी पूर्ण व्हायला जवळजवळ एक वर्ष लागलं. पण तरीही एकदा का दोघातिघांनी पुढाकार घेतला की वर आलेला हा धागा सुरू राहतो.
आता हा पाचवा भाग आहे. नेहमीचे आणि ताज्या दमाचे खेळाडू येऊन लवकरच इथेही १०० कोड्यांचं टारगेट पूर्ण करतील हे मला ठाऊक आहे .....
हे धागे यशस्वी करणार्या सर्व खेळाडूंना धन्यवाद, अभिनंदन आणि शुभेच्छा.
__/\__ श्रद्धा! अभिनंदन! मला
__/\__ श्रद्धा! अभिनंदन!
मला तर खुप डोकं चालवुनही कोडी सुटत नाहीयेत.
कोडं क्र ०५/६७: आटपाटनगरातले
कोडं क्र ०५/६७:
आटपाटनगरातले सगळे सरदार भारी चिडले होते. राणीच्या माहेराहून आलेला एक माणूस आजकाल राजाच्या मर्जीतला होऊन बसलेला होता. खरं पहाता तो अगदी बिनडोक होता. पण होता राणीच्या माहेरचा आणि वर राजाची खुशामत करायला नेहमी तयार असायचा. महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करायला गेलं की हा तिथे असायचाच आणि आपल्याला काहीही कळत नसताना उगाच मध्येमध्ये बोलायचा. ह्याची खोड मोडायची तरी कशी? शेवटी सरदारांनी दरबारच्या शहाण्याला साकडं घातलं. त्याने त्यांना मदत करायचं मान्य केलं.
तो त्या माणसाकडे गेला आणि म्हणाला 'तू राजेसाहेबांचा विश्वासातला माणूस. नेहमी त्यांच्यासोबत असतोस.त्यांच्या रक्षणासाठी तू एक मोठा दंडुका सोबत ठेवायला हवास.' असं म्हणून त्याने एक मोठा दंडुका त्याच्या हवाली केला.
काही दिवस गेले आणि एके दिवशी रात्री राजा झोपलेला असताना त्याच्या डोक्यावर एक माशी बसली. त्या सेवकाने मागचापुढचा कसलाही विचार न करता तो दंडुका राजाच्या कपाळावर मारला. कपाळावर खोक पडली आणि भळाभळा रक्त वाहायला लागलं. राजा बेशुद्ध पडला. राजवैद्यानी अथक प्रयत्न करून त्याला २ दिवसांनी शुद्धीवर आणलं. शुद्धीवर येताच त्याने प्रथम आज्ञा दिली - ह्या मूर्ख माणसाला कड्यावरून ढकलून द्या.
पण त्या सेवकाच्या किरकोळ शरीरयष्टीकडे पाहून राजाला दया आली. त्याने सेवकांना सांगितलं 'जरा बेतानेच फेका.' हेच त्याला गाणं म्हणून कसं सांगता आलं असतं?
कोडं क्र ०५/६८: 'काय नेहा,
कोडं क्र ०५/६८:
'काय नेहा, कसला विचार करते आहेस? बरीच रात्र झाली आहे. घरी जायचं नाहीये का? आईबाबा वाट बघत असतील' डॉक्टर परेश पारेख labच्या दरवाज्यातून आत येता येता म्हणाले.
'पारेखसर, तुम्ही कधी आलात? मला कळलंच नाही'
'अरे डिकरा, तू ती equations बघण्यात एव्हढी गढली होती ना के तुला कळलंच नाही.'
'काय करू सर? ही logarithmic equations अशी आहेत ना की काय निष्कर्ष काढावा तेच कळत नाहीये. एका बाजूने विचार करावा तर एक conclusion निघतं, दुसर्या बाजूने दुसरं conclusion निघतं. नक्की काय सांगतोय हा डेटा?'
ह्यावर पारेखसरांनी काय उत्तर दिलं असेल?
०५/६७: फूल (एक अर्थ - मूर्ख)
०५/६७:
फूल (एक अर्थ - मूर्ख) आहिस्ता फेको, फूल बडे नाजुक होते है... हे आहे का?
०५/६८:
कुछ तो 'लोग'(लॉग) कहेंगे
लोगोंका काम है कहना
छोडो बेकार की बातों मे
कही बीत न जायें रैना

उत्तर:
फूल आहिस्ता फेको, फूल बडे नाजूक होते है
कोडं क्र ०५/६८: 'काय नेहा,
कोडं क्र ०५/६८:
'काय नेहा, कसला विचार करते आहेस? बरीच रात्र झाली आहे. घरी जायचं नाहीये का? आईबाबा वाट बघत असतील' डॉक्टर परेश पारेख labच्या दरवाज्यातून आत येता येता म्हणाले.
'पारेखसर, तुम्ही कधी आलात? मला कळलंच नाही'
'अरे डिकरा, तू ती equations बघण्यात एव्हढी गढली होती ना के तुला कळलंच नाही.'
'काय करू सर? ही logarithmic equations अशी आहेत ना की काय निष्कर्ष काढावा तेच कळत नाहीये. एका बाजूने विचार करावा तर एक conclusion निघतं, दुसर्या बाजूने दुसरं conclusion निघतं. नक्की काय सांगतोय हा डेटा?'
ह्यावर पारेखसरांनी काय उत्तर दिलं असेल?
उत्तरः
कुछ तो 'लोग'(लॉग) कहेंगे
लोगोंका काम है कहना
छोडो बेकार की बातों मे
कही बीत न जायें रैना
कोडं क्र ०५/६९: राज
कोडं क्र ०५/६९:
राज कपूर-नर्गिसचं कुठलं गाणं ऐकून रामसे बंधू बेशुध्द पडले?
स्वप्ना, बक्षीस? ६९साठी क्लू
स्वप्ना, बक्षीस?
६९साठी क्लू हवा.
कोडं क्र ०५/६९: Bichhde Hue
कोडं क्र ०५/६९:
Bichhde Hue Pardesi
Ek Baar To Aana Tu
मामी नाही. आणि अग एवह्ढ्या
मामी नाही. आणि अग एवह्ढ्या रात्री झोपायचं सोडून कोड्यांच्या बीबीवर काय करत होतीस?
श्रध्दा, तुझं बक्षीस तुझ्या आवडत्या cuisine ची भरपेट थाळी
६९ साठी क्लू ची काहीच गरज नाही. गाणं सांगितल्यासारखं होईल. थोडा विचार करा. नक्की येईल उत्तर.
६९: आ जा सनम मधुर चांदनीमे
६९: आ जा सनम मधुर चांदनीमे
हम तुम मिले तो
विरानेमें भी आ जायेगी बहार
झुमने लगेगा आसमान ?
विरानेमें भी आ जायेगी बहार
विरानेमें भी आ जायेगी बहार >>>>>
हे बरोबर वाटतंय. वीरानेमें बहार आली तर खरंच बेशुद्ध पडतील रामसे बंधू...
येस्स माधव! कोडं क्र
येस्स माधव!
कोडं क्र ०५/६९:
राज कपूर-नर्गिसचं कुठलं गाणं ऐकून रामसे बंधू बेशुध्द पडले?
उत्तरः
आ जा सनम मधुर चांदनीमे
हम तुम मिले तो
विरानेमें भी आ जायेगी बहार
झुमने लगेगा आसमान
कोडं क्र ०५/७०: दहावीची
कोडं क्र ०५/७०:
दहावीची परीक्षा झाली अन लेकीबरोबरच जोशीकाकूंचाही जीव भांड्यात पडला. गेले कित्येक महिने लेक रात्री जागजागून अभ्यास करत होती. आज पेपर झाल्याने ती शांत झोपली असणार असा विचार करत त्या तिच्या खोलीत डोकावल्या तर काय ती डोळ्यातून आसवं काढत जागीच!
"काय झालं?" जोशीकाकू घाबरल्याच.
"काही नाही आई, घाबरू नकोस. डोळ्यात काहीतरी गेलंय. म्हणून पाणी येतंय."
लेकीनं डोळे चोळत चोळत उत्तर दिलं. तिनं पुन्हा एकदा डोळ्यात हलकेच बोट घालून ती खुपणारी गोष्ट काढली. आणि ती गोष्ट बघून ती आईला उद्देशून कोणतं गाणं म्हणेल?
कोडं क्र ०५/७१: चित्रपटाचं
कोडं क्र ०५/७१:
चित्रपटाचं शूटिंग जोरात सुरु होतं. आज क्लायमॅक्सचा सीन शूट होत होता. व्हिलन्स अजित, प्राण आणि रणजित अड्ड्यावर बसले होते. अमिताभला बांधून ठेवलं होतं. आणि समोर जया भादुरी गाणं म्हणत नाचत होती. दिग्दर्शकाचा हट्ट होता की संपूर्ण गाणं एकाच टेकमध्ये झालं पाहिजे. जयाने तयारी केली आणि शॉट सुरु झाला. एका फटक्यात शॉट ओके झाला आणि दिग्दर्शकाने कट म्हटलं तरी जया नाचायची थांबेना. ५ मिनिटं झाली, १० मिनिटं झाली पण ही आपली नाचतेय. रणजितला एक फोन आला म्हणून तो उठून गेला. आणखी ५ मिनिटांनी अजितही कंटाळून निघून गेला. इथे अमिताभही चुळबुळ करायला लागला. त्याने ओरडून जयाला विचारलं की बाई झालंय तरी काय? जयाने काय उत्तर दिलं असेल?
७१: जबतक है जान (प्राण)
७१: जबतक है जान (प्राण) जानेजहा मै नाचूंगी
समोर जया भादुरी गाणं म्हणत
समोर जया भादुरी गाणं म्हणत नाचत होती. >>> ठीक आहे स्वप्ना. ही आपली कोडीच आहेत म्हणून इंपोसिबल इव्हेन्टस अलाउड आहेत.
वळका की बिगी बिगी!!!!
वळका की बिगी बिगी!!!!
मामी, क्ल्यु द्या कि बिगी
मामी, क्ल्यु द्या कि बिगी बिगी.
कोडं क्र ०५/७०: दहावीची
कोडं क्र ०५/७०:
दहावीची परीक्षा झाली अन लेकीबरोबरच जोशीकाकूंचाही जीव भांड्यात पडला. गेले कित्येक महिने लेक रात्री जागजागून अभ्यास करत होती. आज पेपर झाल्याने ती शांत झोपली असणार असा विचार करत त्या तिच्या खोलीत डोकावल्या तर काय ती डोळ्यातून आसवं काढत जागीच!
"काय झालं?" जोशीकाकू घाबरल्याच.
"काही नाही आई, घाबरू नकोस. डोळ्यात काहीतरी गेलंय. म्हणून पाणी येतंय."
लेकीनं डोळे चोळत चोळत उत्तर दिलं. तिनं पुन्हा एकदा डोळ्यात हलकेच बोट घालून ती खुपणारी गोष्ट काढली. आणि ती गोष्ट बघून ती आईला उद्देशून कोणतं गाणं म्हणेल?
क्ल्यु : लेकीनं डोळ्यात हलकेच बोट घालून केसाचा एक लहान तुकडा काढला. तोच तिला खुपत होता.
कोडं क्र ०५/७१: चित्रपटाचं
कोडं क्र ०५/७१:
चित्रपटाचं शूटिंग जोरात सुरु होतं. आज क्लायमॅक्सचा सीन शूट होत होता. व्हिलन्स अजित, प्राण आणि रणजित अड्ड्यावर बसले होते. अमिताभला बांधून ठेवलं होतं. आणि समोर जया भादुरी गाणं म्हणत नाचत होती. दिग्दर्शकाचा हट्ट होता की संपूर्ण गाणं एकाच टेकमध्ये झालं पाहिजे. जयाने तयारी केली आणि शॉट सुरु झाला. एका फटक्यात शॉट ओके झाला आणि दिग्दर्शकाने कट म्हटलं तरी जया नाचायची थांबेना. ५ मिनिटं झाली, १० मिनिटं झाली पण ही आपली नाचतेय. रणजितला एक फोन आला म्हणून तो उठून गेला. आणखी ५ मिनिटांनी अजितही कंटाळून निघून गेला. इथे अमिताभही चुळबुळ करायला लागला. त्याने ओरडून जयाला विचारलं की बाई झालंय तरी काय? जयाने काय उत्तर दिलं असेल?
उत्तरः
जबतक है जान (प्राण) जानेजहा मै नाचूंगी
मामी, रेखाला नाचवायला हवं होतं ना?
क्ल्यु दिला तरी वळकता येईना
क्ल्यु दिला तरी वळकता येईना व्हय????? उत्तर देऊ दे का?
कोडं क्र ०५/७२: पहिला वायरलेस
कोडं क्र ०५/७२:
पहिला वायरलेस संदेश भारतात पाठवला असता तर मार्कोनीने कुठलं गाणं म्हटलं असतं?
(बोस का मार्कोनी हा वाद कृपया इथे घालू नये. हे कोडं आहे :-))
कोडं क्र ०५/७३: असिमने नवं घर
कोडं क्र ०५/७३:
असिमने नवं घर घेतलं तेव्हा अम्मीला उत्साहाने फोन केला. 'अम्मी, तू घर बघशील तर वेडी होशील वेडी. मोठ्ठं किचन आहे. हवेशीर बाल्कनी आहे....'
'किचन म्हणजे?'
'अग, म्हणजे रसोई आणि बाल्कनी म्हणजे......'
'बरं बरं, येईन तेव्हा बघेनच मी.' अम्मी हसत म्हणाली. 'पण हे बघ, आता ते घर नीट सजव. फकिराच्या मठीसारखं ठेवू नकोस.'
'अग, म्हणून तर तुला फोन केला. मला ना हॉलमध्ये ठेवायला काही पेन्टींग्ज हवी आहेत. आपल्या घराजवळ ते दुकान आहे बघ रशीदमियाचं तिथून काही विकत घे.'
'कशी पेन्टींग्ज हवी आहेत तुला?' अम्मीने विचारलं.
'आता कशी हवी आहेत ते कसं सांगू? हॉलला साजेल अशी हवी आहेत'.
ह्यावर अम्मीने असिमला काय प्रश्न विचारला असेल?
सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप
सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
कोडं क्र
कोडं क्र ०५/७४:
गणेशोत्सवासाठी वर्गणी मागायला बॉलिवुड स्टार्स निघाले तर बॅकग्राउन्डला कोणतं गाणं वाजेल?
कोडं क्र ०५/७३: हाल कैसा है
कोडं क्र ०५/७३:
हाल कैसा है जनाब का ......
कोडं क्र ०५/७०: दहावीची
कोडं क्र ०५/७०:
दहावीची परीक्षा झाली अन लेकीबरोबरच जोशीकाकूंचाही जीव भांड्यात पडला. गेले कित्येक महिने लेक रात्री जागजागून अभ्यास करत होती. आज पेपर झाल्याने ती शांत झोपली असणार असा विचार करत त्या तिच्या खोलीत डोकावल्या तर काय ती डोळ्यातून आसवं काढत जागीच!
"काय झालं?" जोशीकाकू घाबरल्याच.
"काही नाही आई, घाबरू नकोस. डोळ्यात काहीतरी गेलंय. म्हणून पाणी येतंय."
लेकीनं डोळे चोळत चोळत उत्तर दिलं. तिनं पुन्हा एकदा डोळ्यात हलकेच बोट घालून ती खुपणारी गोष्ट काढली. आणि ती गोष्ट बघून ती आईला उद्देशून कोणतं गाणं म्हणेल?
क्ल्यु : लेकीनं डोळ्यात हलकेच बोट घालून केसाचा एक लहान तुकडा काढला. तोच तिला खुपत होता.
उत्तर देऊनच टाकते.....
उत्तर :
छोटा सा बालमा (छोटा सा बाल, माँ)
आखियाँ नींद चुराय ले गयो
रतियाँ नींद ना आये
मामी, मस्त कोडं होतं पण हे
मामी, मस्त कोडं होतं पण हे गाणं मी ऐकलेलं नाही त्यामुळे मला उत्तर आलंच नसतं:-(
कोडं क्र ०५/७३: असिमने नवं घर
कोडं क्र ०५/७३:
असिमने नवं घर घेतलं तेव्हा अम्मीला उत्साहाने फोन केला. 'अम्मी, तू घर बघशील तर वेडी होशील वेडी. मोठ्ठं किचन आहे. हवेशीर बाल्कनी आहे....'
'किचन म्हणजे?'
'अग, म्हणजे रसोई आणि बाल्कनी म्हणजे......'
'बरं बरं, येईन तेव्हा बघेनच मी.' अम्मी हसत म्हणाली. 'पण हे बघ, आता ते घर नीट सजव. फकिराच्या मठीसारखं ठेवू नकोस.'
'अग, म्हणून तर तुला फोन केला. मला ना हॉलमध्ये ठेवायला काही पेन्टींग्ज हवी आहेत. आपल्या घराजवळ ते दुकान आहे बघ रशीदमियाचं तिथून काही विकत घे.'
'कशी पेन्टींग्ज हवी आहेत तुला?' अम्मीने विचारलं.
'आता कशी हवी आहेत ते कसं सांगू? हॉलला साजेल अशी हवी आहेत'.
ह्यावर अम्मीने असिमला काय प्रश्न विचारला असेल?
उत्तरः
हाल कैसा है जनाबका
Pages