चॅम्पिअन्स ट्रॉफी २०१३

Submitted by केदार जाधव on 6 June, 2013 - 04:56

चॅम्पिअन्स ट्रॉफी २०१३ सुरू व्हायला १ तास उरला तरी आपली मायबोली थंड ?
खर तर या स्पर्धेचा Format इतका Short and Crisp आहे की एकही रटाळ मॅच व्हायच कारणच नाही Happy
चला या घाग्यावर गप्पाही मारूया ,आणी आपले आपले अंदाजही बांधूया .
आज आपण तरी भारताच्या बाजूने Happy

वेळापत्रक :
June 6 India v South Africa, Group B, Sophia Gardens, Cardiff 3 pm

June 7 Pakistan v West Indies, Group B, the Oval, London, 3 pm

June 8 England v Australia, Group A, Edgbaston, Birmingham, 3 pm

June 9 New Zealand v Sri Lanka, Group A, Sophia Gardens, 3 pm

June 10 Pakistan v South Africa, Edgbaston, 5:30 pm

June 11 India v West Indies, Group B, the Oval, 3 pm

June 12 Australia v New Zealand, Group A, Edgbaston, 3 pm

June 13 England v Sri Lanka, Group A, the Oval, 5:30 pm

June 14 South Africa v West Indies, Group B, Sophia Gardens, 3 pm

June 15 India v Pakistan, Group B, Edgbaston, 3 pm

June 16 England v New Zealand, Group A, Sophia Gardens, 3 pm

June 17 Australia v Sri Lanka, Group A, the Oval, 5:30 pm

June 19 First semi-final A1 v B2, the Oval, 3 pm

June 20 Second semi-final A2 v B1, Sophia Gardens, 3 pm

June 23 Final, Edgbaston, 3 pm

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ईशांतची बॉलिंग बेकार पडत असतानाही धोनीने त्यालाच ती ओव्हर दिली त्याचं नक्की कारण समजलं नाही. त्याच्या बॉलिंगमधे काही तरी वेगळं आहे हे त्याला जाणवलं जे मला तरी समजलं नाही >> IPL follow करत होतास का ? स्टेन बरोबर बॉलिम्ग केल्यानंतर इशांतच्या बॉलिंगमधे बदल जाणवतो आहे. Consistency was never his forte but he is less inconsistent since IPL started. He has started using back of the length deliveries very well with mixing the pace. धोनीने नेहमीच इशांतला बॅकिंग दिलेले आहे.

पूर्ण ५० ओव्हरस्ची मॅच असती तर आपण चांगले टारगेट दिले असते असे वाटतेय.

भाऊ IPL च्या आधी आपले fielding बद्दलचे बोलणे आठवतेय का ? Happy

>> त्याने विचार केला की जर विकेट पडल्या तर इशांतच्या ओव्हर मध्ये कारण ते लोकं परत त्याला टारगेट करतील आणि तसेच झाले.

मला हे कारण बरोबर नाही वाटत. कारण ती १८वी ओव्हर होती व ओव्हरला १० रन्स पाहीजे होत्या तेव्हा कुणालाही बॉलिंग दिली असती तरी मारण्याचा प्रयत्न झालाच असता. ईशांतला देण्याचं कारण माझ्या आता लक्षात आलं आहे.. ते म्हणजे त्याचा शॉर्ट बॉल, त्याला त्याच्या उंचीमुळे चांगला बाउन्स मिळतो. आधीच्या तीन ओव्हरमधे पण त्याने शॉर्ट बॉल टाकले. बॉल स्विंग होत नव्हता त्यामुळेच धोनीला शॉर्ट बॉलवर विकेट मिळण्याची शक्यता जास्त वाटली.

<< ते म्हणजे त्याचा शॉर्ट बॉल, त्याला त्याच्या उंचीमुळे चांगला बाउन्स मिळतो.>> पण यादवही चांगले बाऊन्सर टाकतो, जास्त वेगवान आहे व ईशांतपेक्षां 'अ‍ॅक्यूरेट'ही आहे !

भाऊ तुझं उत्तर पाँटिंगनं २००८ मधेच दिलं आहे.. (मी ते विसरलो कसं हे मला समजत नाहीये)

"He is different in the sense that he hits the deck hard and gets some inconsistent bounce. I don't know whether it's because he changes his action.

"He looks dangerous and would be even more to the left-handers. Even to the right-handers, the kind of in-swing he manages is a bit unusual," Ponting said.

<< भाऊ तुझं उत्तर पाँटिंगनं २००८ मधेच दिलं आहे.. >> Ponting should obviously know better. This shatters my ' surprise element ' theory behind Dhoni's persistence with Ishant. In fact, it proves that it was not just a gamble but Dhoni had a definite & intelligent plan in persisting with Ishant and it did pay off !!
Thanks, Chiman.

I think, धोनीने इतका complicated विचार केला नसेल, he had 3 options, Bhuvi, with old ball and slower pace (add to that a bad day in office at start ) was already ruled out, यादव आणि इशान्त पैकि, यादव पुर्ण tournament unlucky होता(In terms of wickets), तर Ishant was getting wickets. आणि धोनीचा इशान्तवर जास्त विश्वास आहे ही तर known fact आहे .If Risk is same then I would go to one I trust more.

<< If Risk is same then I would go to one I trust more.>> मान्य. पण प्रश्न ईशांतला चेंडू देण्याबद्दल नाहीय, त्याची गोलंदाजी चालत नसूनही [ किंबहुना खराब पडत असूनही ] त्यालाच चालू ठेवण्याबद्दलचा आहे, असं मला वाटतं. << धोनीने इतका complicated विचार केला नसेल >> Even conceding this, Dhoni is certainly not that dumb also to risk the Champions Trophy by continuing to rely only on his personal preference at that crucial stage. म्हणूनच मला चिमण यानी मांडलेला मुद्दा माझ्या ' surprise element'च्या अंदाजापेक्षां अधिक ग्राह्य वाटतो.

उत्तराखंडातल्या पीडितांना सहाय्य केल्याबद्दल शिखर धवनचे अभिनंदन. बक्की मात्र सहाय्यार्थ फुटकी कवडीदेखील द्यायला तयार नाही. करसवलतीचा निकाल प्रलंबित असेतोवर अधिक मदत करणे शक्य नाही अशी असं बक्कीची भूमिका आहे. बक्कीकडे त्रिवार निषेध नोंदवायला हवा.

बक्कीचा दूरध्वनी क्रमांक : ००९१ २२२ २८९ ८८००
बक्कीची संपत्रे : bcci@vsnl.com, cricketboard@gmail.com

-गा.पै.

चलच्चित्र : http://www.youtube.com/watch?v=7M7gkmL96Mo

गामाजी ,
बीसीसीआय ने सहाय्य केले पाहिजे ही तुमची भूमिका मान्य आहे .
पण त्यानी सहाय्य नाही केले म्हणून त्यांचा निषेध करणे चुकीचे आहे . (They should , they don't have to )
मी ,माझ्या कुटूंबाने यथाशक्ती मदत केली आहे . त्यापलिकडे ती कुणी करावी हे सांगणारा मी कोण ?
तसे तर एका जरी राष्ट्रीय नेत्याने आपली संपत्ती जाहिर करून ती दिली तर सगळा प्रश्न सुटेल . पण ते करणार कोण आहे ? किती उद्योग पतीनी मदत केली आहे ?
No point in attacking it beacuse it is Soft Target Now .

केदार जाधव,

>> मी ,माझ्या कुटूंबाने यथाशक्ती मदत केली आहे . त्यापलिकडे ती कुणी करावी हे सांगणारा मी कोण ?

मदत केल्याबद्दल अभिनंदन. अशी वेळ यायला नकोच होती मुळी! पण आली तर आपण 'माझं' सोडून 'आपल्या'च्या मागे लागतो. निदान शिखर धवन, केदार जाधव, तिहार तुरुंगातले कैदी,...(यादी अपूर्ण) या लोकांची अशीच भावना आहे.

मात्र या यादीत बक्कीला आपलं नाव नोंदवावंसं वाटत नाही. यावरून बक्कीची प्रवृत्ती (अ‍ॅटिट्यूड) दिसते. शिवाय वर सांगताहेत की सरकारकडून करसूट मिळेपर्यंत आम्ही थांबणार. या प्रवृत्तीचा निषेध करावासा वाटतो. बक्कीच्या सहाय्यावाचून काही अडलेलं नाही.

जर चषक जिंकला तर खेळाडूंना पैसे देण्यास काही हरकत नाही. पण देशात हाहाकार माजला असतांना तिकडे दुर्लक्ष करावे का, हा प्रश्न आहे. एक सामान्य नागरिक म्हणूनच आपलं मत आपणंच ठासूनच मांडायलाच हवंच. भले आपला तो 'अधिकार' नसेल.

आ.न.,
-गा.पै.

एकटा इयन बेल काय ____ करणार होता... बाकीचे १० जणांनी काय दिवे लावले ? असे कोणीतरी पत्रकार परिषदेत विचारायला हवे होते...

Whinging Pom म्हणतात ते उगाच नाही .
पण त्याचबरोबर मटा ने अतिरंजित वर्णन केलय हेही खर .

अहो, गावसकर, तेंडुलकर याना किती वेळां संशयाचा फायदा नाकारणं सोडाच पण सपशेल खोटं बाद ठरवलं गेलंय ! पण त्यानी कधीही अशी पिरपीर केलेली मला तरी आठवत नाही [अपवाद : ऑस्ट्रेलियातील सुनीलचा 'वॉक आऊट' ] ! आणि, पाऊस नसता आला तर सध्याच्या फॉर्मवर धुतलंच असतं ना इंग्लंडला या संघाने. मग पावसासारखंच गेलाच एखादा निर्णय विरुद्ध तर तोही 'ग्लोरिअस अनसर्टन्टीज ऑफ क्रिकेट'मधे नाही मोडत ? रडे लेकाचे !!

आणि, पाऊस नसता आला तर सध्याच्या फॉर्मवर धुतलंच असतं ना इंग्लंडला या संघाने >> करेक्ट. एव्हढ्या चांगल्या गोलंदाजीसमोर सत्राशे साठ वेळा आलेल्या व्यतयानंतरही १३० बनवलेच होते. पूर्ण ५० ओव्हर्स असते तर सणसणीत स्कोर असताच. बेल ८० च्या strike rate वर होता. अजून राहता तर मॉर्गन नि बोपाराने खेचली तशी मॅच खेचता ह्याची काय गॅरंटि होती ?

बेलला तिसर्‍या पंचाने ढापला असे माझेही त्या क्षणापासून मत आहे. अर्थात त्यामुळे सामन्याचा निकाल बदलला असता की नाही हा भाग वेगळा. बेलला संशयाचा फायदा देणे आवश्यक होते...

इंद्रा, रॉहु मी हे त्याच दिवशी इथे लिहीले होते. बेलची बेल उडाली नव्हती त्यामुळे त्याला बेनीफिट ऑफ डाऊट द्यायला हवे होते. असो.

'बेल्स' नेमक्या केंव्हा उडाल्या यावरून बेलची घंटा वाजली ! प्रत्यक्ष घंटा वाजवणारा भारतीय किंवा उपखंडातला नव्हता व त्याने टेक्नॉलॉजी वापरून मगच घंटा वाजवली होती. संशयास्पद वाटला तरीही अशा तर्‍हेने घेतलेल्या निर्णयामुळे सामन्याचा निकालच बदलला असा कांगावा जरी भारतीयानीही केला असता तरीही तो निषेधार्हच ठरला असता !

एक सामान्य नागरिक म्हणूनच आपलं मत आपणंच ठासूनच मांडायलाच हवंच. भले आपला तो 'अधिकार' नसेल.
>>
हे मत मात्र पक्के नागपुरी आहे....

जाऊ द्या...
फिट्टंफाट झाली...

2011 च्याtest series मधे bell ला परत बोलवलं out असताना...

&

आता जाऊ दिलं..

Pages